लिंबु मिरची

Submitted by सचिन पगारे on 28 January, 2016 - 10:56

मित्राने नवि चारचाकी घेतली त्याच्याकडे गेलो तर गाडीला लिंबु नि मिरची बांधायचे चालु होते हे कशाला विचारले तर म्हणाला गाडी वाईट नजरांपासुन सुरक्षित राहते, अपघात होत नाहित. त्याला म्हणालो, 'तुला हे शोभुन दिसते देशाला तुम्ही खरच रामराज्य काळात नेणार'.एवढा रसरशित लिंबु वाया जाणार म्हणुन मन हळहळले.

लिंबु सरबत हे माझे आवडते पेय.जेवणातही त्याचा आमच्या घरी भरपुर वापर होतो.आयर्वेदातही लिंबाला बरेच महत्व आहे असे म्हणतात खरे खोटे तो लिंबच जाणो. माझा तरी आयुर्वेदावर विश्वास नाही..मला अत्यंत आवडणारा लिंबु हा आपल्या देशात मात्र जादुइ बनला आहे जोडीला मिरची.बर्याच वाहनांवर लिंबु मिरची लावतात काही लोकांच्या तर घराच्या दारातही लिंबु लटकवलेला आढळतो.

लहान असताना आमच्या इमारतिच्या मागे एक तिनरस्ता असायचा तेथे नेहमि टाचणी लावलेले लिबु किंवा अर्धवट कापलेले नि आत कुंकू टाकलेले लिंबु नि नारळ पडलेले असायचे.कुणावर काही करणी केलेली असेल तर ती उतरवण्याकरता मांत्रिकाकडुन पुजाअर्चा करून अशा तिनरस्त्यावर लिंबुओवाळुन टाकले जायचे. आमच्यातल्या काही मुलांची जाम टरकायची पण आम्हि काही मुले मात्र क्रिकेटची मँच खेळुन आलो कि सरळ तिथले लिंबु उचलुन आणायचो त्याच्या टाचण्या वैगरे प्रकार काढुन सोसायटिच्या नळाखाली धुवुन त्यातल्या ताज्या लिंबाचा सोसायटिच्या आवारात बसुन बर्फ टाकुन थंडगार सरबत बनवायचो. आधि जी मुल करणिचा लिंबु म्हणुन घाबरायची त्यांचीही भिड चेपुन तिही लिंबु सरबत पिउ लागली. कुंकु लावलेले लिंबु हे सरबतासाठी निरुपयोगी असायची ती घेउन आम्ही गटारात फेकुन द्यायचो.

लिंबु मिरची ह्यांना उगाच जादुई केले गेलेय असे मला वाटते. आणि हे वाहनांना लिंबु मिरची लावण्याचे प्रकार हे हिंदु सोडुन इतर धर्मात तरी कधी पाहिलेले स्मरत नाहित.

लिंबु हा वाहनांवर लावणे खरेच शुभ असते का? मला तर ही हास्यास्पद अंधश्रध्दा वाटते.

कि खरच लिंबुने करणी उतरते?मायबोलिकरांना लिंबु मिरचीचे काहि चांगले वाइट असे अध्यात्मिक अनुभव असतील तर जरूर मांडावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठाण्याला सहा नंबरला यायला इतका वेळ सिग्नल मिळत न्हवता! आता सुटली ठाण्याहून. मागे बघायचं नाही, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा, सीएसटी. वेळेत गती मिळाली तर तिकडेही थांबायला नको. समुद्रात उडी.

असू देत पगारे. तुम्ही इकडे धागे उघडून आणि त्यावर चिडचिड करून कुणालाही काहीही ढिम्म फरक पडत नाही. लोकांना जे करायचं ते ते करतातच.

नवोदीत लेखकांचे धागे न वाचणारांच्या बोटाची शंभर शकले होऊन कीबोर्डावर लोळू लागतील आणि त्याचे स्क्रीनशॉट्स फेबु / व्हॉट्सअ‍ॅप वरून व्हायरल होतील असा दृष्टान्त फुसकेश्वराने दिला आहे.

हाय दय्या मै क्या करू ?

धागे काढुन मि माझे मत मांडतो कधी काही प्रश्न पडलेला असले तर त्या बद्दल शंका विचारतो त्याने इथे कुणाला फरक पडतो कि नाही ह्याबद्दल कल्पना नाहि.मात्र वास्तविक जिवनात मत मांडल्याने फरक पडतो हे अनुभवले आहे.

बि, आयुर्वेदाबाबतचे तुमचे म्हणणे पटले नाही.मलातर तो आरोग्याच्या द्रुष्टिने निरुपयोगी प्रकार वाटतो.

या देवाला फाट्यावर मारायचे किंवा कसे ! >>> कापोचे, तुमची जी काही मतं असतील ती मांडा. पण काही बाबतीत भाषा जपून वापरलीत तर बरं होईल. कोट केलेल्या वाक्यात 'देव' ऐवजी अल्ला, गौतम बुद्ध, येशू, महावीर, झरतुष्ट्र असं कुणीही घातलंत तरी तेच म्हणेन.

अश्विनी के

संबंधित देवांशी अशा अंधश्रद्धा सांगितल्यात तर बरं होईल. माझी आडकाठी नसेल. माणसाचं माणूसपण देवाच्या अशा मान्यतेने नष्ट होत असेल तर भाषा महत्वाची नसावी, अर्थात हे माझं मत आहे, ते कसं असावं हे माझ्या अल्पमतीप्रमाणे मांडलं आहे.

<<माझ्यामते अशा छोट्याछोट्या निरुपद्रवि गोष्टिंतुनच अंधश्रध्देसाठी सुपिक जमिन तयार केली जाते.>>
------- सचिन पगारे.... तुमच्या मताशी सहमत आहे.

छोट्या छोट्या निरुपयोगी गोष्टी आहेतच... पण त्यातुनच पुढे मोठे झाड फोफावते. विचार करणारी पिढी, प्रश्न विचारणारी, जिज्ञासा बाळगणारी पिढी तयार करा...

कापोचे, मी फक्त वर कॉपी केलेल्या वाक्याच्या भागाबद्दल बोलतेय. जे पटत नसेल ते जरूर मांडावंच इच्छा असेल तर. पण ते मांडण्याची भाषाही महत्वाची आहे. 'फाट्यावर' काय! वाचायलाही कसंतरी वाटतं. बाकीची श्रद्धास्थानं घालूनही वाचवलं नाही.

असो, ज्याची त्याची मर्जी.

धागे काढुन मि माझे मत मांडतो कधी काही प्रश्न पडलेला असले तर त्या बद्दल शंका विचारतो त्याने इथे कुणाला फरक पडतो कि नाही ह्याबद्दल कल्पना नाहि.मात्र वास्तविक जिवनात मत मांडल्याने फरक पडतो हे अनुभवले आहे.>>>>>>लिम्बु-मिर्ची जे आपल्या गाड्याना लावतात त्याना तुम्ही डायरेक्ट का विचारत नाही? आम्ही तर लावले नाही असले काही आमच्या गाडीला. आणी इथे परदेशस्थ मायबोलीकर आहेत, त्यानी पण हे केले नसणारच, नाहीतर तिथले पोलीस विचारतील की ओ बाई/ बुवा हे काय लावले गाडीला?:फिदी:

रस्त्यावर पडलेली / फेकलेली वस्तू खाऊ नये, चांगलं नसतं; पूर्वीपासून घरांतली वडीलधारी मंडळी लहानांना सांगत आहेत. ती अंधश्रद्धा नाही, त्यामध्ये तथ्य आहे. आता लहानांना अशी जाणिव करुन द्यायला; घरातल्या मोठ्यांनाच ह्या गोष्टी माहित नसतील तर अनुकंपा वाटते. डॉक्टरकडे (अ‍ॅलोपथी) जाऊन नीट तपासणी करून घेतलीत तर काय सांगा अजूनही काही इलाज होईल. लवकर बरं वाटू दे. Healthy body, healthy mind का कायसं ते.

कुणाला स्कोअर सेटल करायचे असतील तर मला शून्य फरक पडेल. टेपा लावणे वगैरे भाषा चालत असेल तर जगातील सर्वशेष्ठ संस्कृती मधे भेदभाव करणा-या प्रथांबाबतीत फाट्यावर मारणे ही भाषा पण तशीच होती असे मला वाटते. राहता राहिला वरच्या भाषेचा प्रश्न, त्याचं उत्तर मिळालेलं आहे असं मला वाटतं.

एखाद्या समूहाला मंदीरात प्रवेश नाही याचा निर्णय इतरांनी घेणारी संस्कृती सर्व जगात सर्वश्रेष्ठ का याबद्दल तिथे प्रवेश नसणा-यांच्या मुलाखती कुणी घेतल्या आणि या लोकांनी जर आम्ही अशा प्रवेशाला, देवाला, प्रथेला, धर्माला फाट्यावर मारतो असं म्हटलं तर काय करणार ? अशांना आमची संस्कृती अगदी युरोप अमेरिकेपेक्षाही श्रेष्ठ आहे असे बुरखेधा-यांचे दाखले देऊनही मान्य होणार नाही. ते आपलं म्हणणं मांडणारच. त्यामुळे आपल्याला दोष दिला आहे असा उफराटा गैरसमज करून घेणा-यांना यापेक्षा जास्त स्पष्टीकरण देत बसावं असं मला वाटत नाही, इच्छाही नाही. फक्त पुढे स्त्रीविषयक अत्याचाराच्या घटने मधे पुरुषी मानसिकता या विषयावर मतं मांडताना अशा प्रथांमुळे वाईट काही होत कसं नाही हे जाणून घ्यायला आवडेल.

पराग, तू कसे काय बोवा लिंबीच्या शेतातले तांदुळ खाल्लेस? Uhoh मला काहीच कसे आठवत नाही मी कुणाला कधी दिले होते ते? असो.
काल एक बातमि टीव्हीवर झळकत होती, ठाणे का कुठल्या मुलिने आत्महत्या केली मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून.
येवढे एक वाक्य सोडले, तर यच्चयावत मिडीया या पगारेंकडुन धडे घेतल्याप्रमाणे, "मासिक पाळीबाबतची धार्मिक समजुतींवर" घसरुन त्यानिमित्ताने धार्मिक समजुतींना धू धू धुवुन घेत होते. बहुतांश रोख अर्थातच हिंदु धर्मावर होता, अन विचित्र भाग असा की ती मुलगी ख्रिश्चन होती. (अन याबाबत चर्चच्या काय धार्मिक समजुती आहेत याची कल्पना नाही बोवा... )
अचाट अन अतर्क्य होते सगळे. एक व्यक्ति शारिरीक दु:खामुळे आत्महत्या करते, अन त्या घटनेचेही भांडवल करुन ही लोक लग्गेच "धार्मिक समजुतींवर हल्लाबोल" करायला उठतात टोळी टोळीने. मिडियादेखिल अशक्य अराजक माजविण्यात सहभागी आहे असे म्हणाव लागतय.
(मासिक पाळीबाबतच्या हिंदु धार्मिक समजुतींबाबत खरोखरच पुनर्विचार करणे आवश्य्क आहेच, पण काळ वेळ? एक पोरगी पोटात असह्य दुखते वा अन्य कारण (असल्यास ते पोलिस शोधतील) यामुळे आत्महत्या करते व ते निमित्त तत्काळ उचलुन पुढचे बारा तास त्यावर रतिब घालणे यच्चयावत न्युज मिडिया करते, याचा दुसरा अर्थ असाही होतो की मिडियाने "खरोखरीच्या घटना/बातम्या" यापासुन फारकत घेतली असुन, निमित्त मिळवुन त्यावर "बातमीचा फेसासारखा डोलारा" उभे करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे व टीआरपी करता वापरते आहे.

टेपा लावणे = थापा मारणे. ह्यात कुठलाही अनादर करणारा अर्थ नाही.

स्कोअर कुठले? मी ते हिशेब मेंटेन करत नाही. तुम्ही मेंटेन करत असाल तर तुम्ही सेटल करा Happy

मला दोष दिला आहे असा समज नाहिये माझा. मला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट लिहिलंय. आता अजून समजावून सांगत नाही.

मी लिंबू मिरची बिब्बा काळी बाहुली बांधत नाही. लिंबू मिरची स्वयंपाकात वापरते. त्याचा स्त्री पुरुष समानतेशी काय संबंध? :अओ:. ते शनी मंदिराबद्दल असेल तर मी शनी मंदिरात जातच नाही जायची इच्छाही नाही. त्या मंदिरात जाण्यासाठी झगडण्यापेक्षा इतर अनेक समानतेचे झगडण्याजोगे प्रश्न समाजापुढे आहेत.

तुमच्या इच्छा तुमच्याकडे ठेवल्या तर बरे होईल. त्याच्याशी घेणे देणे नाही. मला यावर वाद घालायची इच्छा नाही. जे काही लिहीलेले आहे ते अत्यंत स्पष्ट आहे. यावर एकटीनेच वाद घालायचा तर मैदान मोकळे आहे...

आजही अनेक ठिकाणी मंदीरप्रवेशासाठी अनेकांना परवानगी नाही. अशा ठिकाणी फाट्यावर मारणे ही भाषा चुकीची आहे असे अजिब्बात वाटत नाही कारण त्या त्या लोकांच्या भावनांना फाट्यावर मारणारी संस्कृती कशी सर्वश्रेष्ठ असे सांगणा-यांना ते समजेल असे वाटत नाही. धन्यवाद.

>>>> अशा ठिकाणी फाट्यावर मारणे ही भाषा चुकीची आहे असे अजिब्बात वाटत नाही <<<< Lol
माझ्या मते भाषा चुकीची आहे वा नाही हा खूप खूप नंतरचा प्रश्न, "पण मी अमक्यातमक्या (हिंदुंच्या देवाला/श्रद्धास्थानाला) फाट्यावर मारतो" हे "जाहिरपणे जाहिरात करत" सांगणे जास्त महत्वाचे अस्ते..... नै का कापोचेचाचा? Wink
अगदी शाळकरी वयापासुन ही सवय मुलांमधेही बघता येते की मी त्या अमक्या तमक्या मास्तरांना ह्यांव केले नि त्या तमक्या ढमक्या पोराला व्हाँवं केले अशा गमजा /फुशारकी तर शाळकरी पोरेही मारतात. तुमची "फाट्यावर " मारण्याची गमजा/फुशारकिही मला त्याच शाळकरी मानसिकतेतुन आलेली वाटते आहे. Biggrin तुमचे काय मत यावर?

अन्यथा, देवधर्मश्रद्धाभक्ति या निव्वळ खाजगी गोष्टी आहेत असा धोषा लावुनही, सोईस्कररित्या, मी अमक्यातमक्या देवाला/रुढीला/परंपरेला कसे फाट्यावर मारत अस्तो हे जाहीररित्या सांगायची "इतकी गरज का वाटावी"? Proud

वाद घालायची इच्छा नाही हे सांगितल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. तुटे वाद संवाद तो हितकारी. मला त्या शब्दाबद्दल सांगायचेय ते सांगून झाले आहे.

पगारे,

तुम्ही लहानपणी शाखेत जात होतात का हो ? Light 1

संघाच्या शाखेत उतरवून टाकलेले लिंबू गोळा करुन सरबत करुन प्यायाचा कार्यक्रम पुणे शाखेमधे झाल्याचे आठवते.

काय आहे ना लिंबूटिंबूकाका

मंदीरात प्रवेश केला म्हणून डोळे काढले, खून केला असे प्रकार चालणा-या संस्कृतीला फाट्यावर मारणे हे खटकत असेल आणि मंदीरप्रवेशाला बंदी खटकत नसेल तर अशा सर्वांना फाट्यावर मारण्यात कुणाला चूक दिसो किंवा जाहीरात.. काय फरक पडतो ? Lol

उद्या लिंबूजींनी घराबाहेर पडू नये कारण ठुसकेश्वराचा कोप होतो असे निवेदन तुम्हाला कुणी दिले तर तुम्ही घराबाहेर पडायचे थांबवाल काय ? Wink

साती ताई,

तुमची काल ची पोस्ट काही पटली नाही.

एकदा विचार न करता, सगळे करतात म्हणून,/ ज्ये.ना. सांग्तात म्हणून,/ केल्याने काय बिघडतय/ वगैरे वगैरे कारणामूळे करायला लागलात कि त्याला काही वेळा मर्यादा रहात नाही.

यात सुशिक्षित, अशिक्ष्ति, अर्धशिक्षित, सगळेच आले.

जबरदस्ती म्हणून नाही हो, पण एखाद्याला वाटलं असं काही करावंसं, ज्याने कुणालाही फिजीकल्/मॉरल त्रास होणार नाही, तर आडकाठी का करा?

सातीतै, (तुमचा तो विचार पटतो आहे किंबहुना कायदाही त्याच विचारांवर आधारीत राहुन धार्मिक समजुतींच्या आचरणाचे स्वातंत्र्य देतो)
पण सातीतै, तुम्ही आधी एक नक्की ठरवा बोवा....... तुम्ही त्या ह्यांच्यातल्या ? की त्या त्यांच्यातल्या? Biggrin

लिंबु, आम्ही मध्यममार्गी आहोत.
जोपर्यंत आमच्यावर डायरेक्टली/ इनडायरेक्टली/ फिजीकली/ मॉरली / एथिकली काही शेकत नाही तोपर्यंत कुणीही काहिही करा, आम्हाला चालतंय!
Happy

>>>> आणि त्रास होत असेल अशी श्रद्धा असेल तर ? <<<< म्हणून तर गोहत्याबंदी ना... Wink
जसे हिंदु देवस्थानांमधुन /धार्मिक यज्ञयागादी कृत्यांमधुन प्राण्यांचे बळी थांबवले गेले (त्या ऐवजी प्रतिक म्हणून नारळ वाढवणे सुरू झाले) तस्सेच, गोहत्याबंदीचेही..... ती थांबवली जात्ये.....
कुणाच्या तरी जीभेच्या अन आहाराच्या चवण्यांवर आधारीत गाय कापुन खाण्याच्या अंधश्रद्धेचा गायीला अन हिंदु धर्मियांना त्रास होतो म्हणुन गोहत्या बंदी! कळ्ळ? Wink

असे अन्याय करणारी माणसं ही धर्माच्या नावावर सैतानी वागणारी माणसं असतात. त्यांना कुठेही मारा. अगदी डोळ्यास डोळा घ्या. एखाद्या माणसांनी घडवत आणलेल्या, दुषित केलेल्या संस्कृतीत आत्मसन्मानाने जगणे अशक्य असेल तर तिचा नक्कीच त्याग करा.

लिंबूभौ, शनीशिंगणापूरला हौसेने तर नाहीच नाही जाणार. तिथून प्रतिमा, टाक वगैरे आणून पूजा करणं तर दूरचीच/अशक्य गोष्ट. शनीला मी स्त्री म्हणून नको असण्यापेक्षा मलाच तो नको आहे. हनुमंत आपले बरे. बाया जाऊ शकतात दर्शनाला आणि शनीसारख्या छायासंभूताला (छायेचे/अभावाचे प्रतिक) दाबातही ठेवतो.

लिंबूकाका,
तुम्ही तर भारतीय बॉलर्सपेक्षा वाईट बॉलिंग करताय ! आता एक हजाराचं रेकॉर्ड पण अपुरं पडणार बहुतेक

या श्रद्धेत पण वाईट काही नसेल ना ? इतर धर्मांच्या अंधश्रद्धांबद्दल का ओरडत नाही वगैरे पण ओरडा आणि काही केलं की.. .करे तो क्या करे ?
https://www.facebook.com/vinayak.hogade.92/videos/944997945607899/

Pages