लिंबु मिरची

Submitted by सचिन पगारे on 28 January, 2016 - 10:56

मित्राने नवि चारचाकी घेतली त्याच्याकडे गेलो तर गाडीला लिंबु नि मिरची बांधायचे चालु होते हे कशाला विचारले तर म्हणाला गाडी वाईट नजरांपासुन सुरक्षित राहते, अपघात होत नाहित. त्याला म्हणालो, 'तुला हे शोभुन दिसते देशाला तुम्ही खरच रामराज्य काळात नेणार'.एवढा रसरशित लिंबु वाया जाणार म्हणुन मन हळहळले.

लिंबु सरबत हे माझे आवडते पेय.जेवणातही त्याचा आमच्या घरी भरपुर वापर होतो.आयर्वेदातही लिंबाला बरेच महत्व आहे असे म्हणतात खरे खोटे तो लिंबच जाणो. माझा तरी आयुर्वेदावर विश्वास नाही..मला अत्यंत आवडणारा लिंबु हा आपल्या देशात मात्र जादुइ बनला आहे जोडीला मिरची.बर्याच वाहनांवर लिंबु मिरची लावतात काही लोकांच्या तर घराच्या दारातही लिंबु लटकवलेला आढळतो.

लहान असताना आमच्या इमारतिच्या मागे एक तिनरस्ता असायचा तेथे नेहमि टाचणी लावलेले लिबु किंवा अर्धवट कापलेले नि आत कुंकू टाकलेले लिंबु नि नारळ पडलेले असायचे.कुणावर काही करणी केलेली असेल तर ती उतरवण्याकरता मांत्रिकाकडुन पुजाअर्चा करून अशा तिनरस्त्यावर लिंबुओवाळुन टाकले जायचे. आमच्यातल्या काही मुलांची जाम टरकायची पण आम्हि काही मुले मात्र क्रिकेटची मँच खेळुन आलो कि सरळ तिथले लिंबु उचलुन आणायचो त्याच्या टाचण्या वैगरे प्रकार काढुन सोसायटिच्या नळाखाली धुवुन त्यातल्या ताज्या लिंबाचा सोसायटिच्या आवारात बसुन बर्फ टाकुन थंडगार सरबत बनवायचो. आधि जी मुल करणिचा लिंबु म्हणुन घाबरायची त्यांचीही भिड चेपुन तिही लिंबु सरबत पिउ लागली. कुंकु लावलेले लिंबु हे सरबतासाठी निरुपयोगी असायची ती घेउन आम्ही गटारात फेकुन द्यायचो.

लिंबु मिरची ह्यांना उगाच जादुई केले गेलेय असे मला वाटते. आणि हे वाहनांना लिंबु मिरची लावण्याचे प्रकार हे हिंदु सोडुन इतर धर्मात तरी कधी पाहिलेले स्मरत नाहित.

लिंबु हा वाहनांवर लावणे खरेच शुभ असते का? मला तर ही हास्यास्पद अंधश्रध्दा वाटते.

कि खरच लिंबुने करणी उतरते?मायबोलिकरांना लिंबु मिरचीचे काहि चांगले वाइट असे अध्यात्मिक अनुभव असतील तर जरूर मांडावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाम्या... प्रौडॉफ्यू पुत्रा... Biggrin

बाकी लिंबू मिरची वापरूनही कोंबडशेपुट बनतंय हो .<<
ते जरा बेतानेच घ्यावं. अन्यथा त्याची करणी दुसर्‍या दिवशी सकाळी चांगलीच भोवते. Wink

मायबोलिकरांना लिंबु मिरचीचे काहि चांगले वाइट असे अध्यात्मिक अनुभव असतील तर जरूर मांडावेत. >>

अध्यात्मिक म्हणावा की नाही माहित नाही पण एक ताजा अनुभव मांडत आहे.

मिसेज भडभड्यांनी काल रात्रिच हा लेख वाचला यावर मुलाशी चर्चा पण झाली पगारेंच्या शरबताची आईड्या त्याला भारी आवडली. आणि आज सकाळी पोह्याचा नाष्टा करायचे ठरले पण नेमक्या मिरच्या संपलेल्या
मग काय भडभडेंनी मुलाला मिरच्या लिंब आणायला भाजिवाल्या कडे पाठवले सोसायटी पार करुन भाजिवाल्या पर्यन्त पोहोंचले तर भाजिवाला गायब मग काय हा लेख उपयोगाला आला सोसायटितल्या १०० गाड्या पैकी निम्म्या गाड्यांना मिरच्या लटकलेल्या त्यातल्यात्यात त्याज्या मिरच्या शोधुन ति तार काढलि गेली मिरच्या बरोअबर लिंबु पण
मिळाला स्वारी मिरच्या-लिंब घेउन घरी हजर वेळ भागली .

भडभडे च्या मुलाने आईला वादा केला आहे की त्या गाडिच्या मिर्च्या वापस तरी करेल नाहि तर गाडी मधे ५-१० रु तरी ठेवेल.
पगारे,धन्यवाद


मला काही हा लेख पटला नाही.
आज दारावर /गाडीला लिंबू मिरच्या बांधणे हास्यास्पद म्हणताय, उद्या फोटोंना/देवांना हार घालणे/ फुलांच्या जाळ्या कबरीवर चढवणे/चर्चमध्ये मेणबत्त्या लावणे ह्या अंधश्रद्धा आणि पर्यावरणाचा नाश करवणार्‍या गोष्टी म्हणाल.

बहुतेक केवळ दोन वेळा खाणे पिणे आणि स्वच्छता याव्यतिरिक्त केलेल्या कुठल्याही गोष्टीला अवाजवी म्हणाल.

मग एकंदर जगण्याला अर्थ काय राहिला?
वैतागवाणं नाही का ते?

माझा तरी आयुर्वेदावर विश्वास नाही..>>

हे वाक्य फारच चुकीच आहे. आयुर्वेदाचा रोजच्या जीवनात उपयोग केला तर स्वास्थ शरिर राहायला खूप खूप मदत होते. आपल्या पारंपरिक पाककृतीमधे खरे तर आयुर्वेदच असते. आपण जे मसाले वगैरे वापरतो. ज्या फोडण्या घालतो त्यामागे आयुर्वेद दडलेले आहे. तुम्ही रोज हळद, लसून, आले, लवंग, वेलची, मिरची हे सगळे वापरता त्यातून त्यातही आयुर्वेद आहे. आणि तुम्ही लिंबु शरबत आवडत अस म्हणालात तेही आयुर्वेदच आहे.

माझा हळद, लसून, आले, लवंग, वेलची, मिरची याच्या वर विश्वास आहे पण आयुर्वेदाच्य नावाने भरमसाठ पैसे उकळण्यार्‍या डॉ . वर विश्वास नाही.

"म्हणून दैवी कणांची निर्मिती ही ऊर्जेपासून अणूच्या निर्मितीची विश्‍वातील पहिलीच घटना आहे "

कापोचे काही गरज होती का ती लिंक द्यायची....

आता हे पण लगे हात वाचुन टाका...
प.पू. डॉक्टरांनी आजारपणात वापरलेल्या आणि सुगंध
येणार्‍या थुंकीच्या आणि उलटीच्या भांड्यांतून प्रक्षेपित
होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास.

लिंबाजीराव, तुम्ही लहान पणीच खुप मोठे झाला असतात, चान्स गेला राव. Wink आज नाही म्हटले तरी २-४ हजार एकर जागा असती, ४-५ टन सोने असते गेला बाजार २५-३० लाख कोटी रुपयांचा टर्न ओहर असता. छ्या एका खसखसुन घाटलेल्या अंघोळीने घात झाला बघा. Wink

एकदा ट्रॅव्हल्समधुन उतरल्यावर माझ्या सगळ्या सामानासकट माझ्या अंगावर अतीदैवी कण आढळले (चिकटले) होते. काढुन टाकता टाकता नाकिनउ आले. चंदेरी सोनेरी बर्‍याच रंगाचे होते.

बहुतेक ट्रॅव्हल्स आदल्या दिवशी लग्नासाठी बुक होती, आणि लग्नात झालेल्या प्रचंड उर्जानाशामुळे (E=mc2) ते कण तयार झाले असणार. ( रेफ. कापोचे लिंक, स्वजबाबदारीवर वाचणे, भौतिकशात्राचे घोकुन घोकुन तयार केलेले नियम विसरले गेले तर आम्ही जबाब्दार नाही)

माझा हळद, लसून, आले, लवंग, वेलची, मिरची याच्या वर विश्वास आहे पण आयुर्वेदाच्य नावाने भरमसाठ पैसे उकळण्यार्‍या डो. वर विश्वास नाही.>>

पुस्तके वाचून ती समजवून थोडा अभ्यास करुन घरच्या घरी आयुर्वेद शिकता येते असे मला वाटते. आजीबाईंचा बटवा असे जे आपण म्हणतो ते म्हणजे आजीबाईंनी हे घटक नीट वापरुन त्याचे फायदे तोटे पाहिले आहे. हवामानाचा अभ्यास केला आहे. खोकला झाला की आल्याचा रस घ्या. मध घ्या. उन लागून ताप चडला की कांद्याचा रस कपाळाला लावा. जखम झाली की हळद लावा. पोट दुखत असेल तर ओवा चघळा. दात दुखत असेल तर लवंगाचे तेल लावा. पोट बिघडले असेल तर जेष्ठमध खा. फोट फुगले असेल तर विड्याचे पान खा. त्वचा कोरडी पडली असेल तर लिंबु लावा .. खा. हे आणि अशा अनेक घरगुती उपयांच्या मागे आयुर्वेदच आहे.

>>>> मिरच्या लटकलेल्या त्यातल्यात्यात त्याज्या मिरच्या शोधुन ति तार काढलि गेली मिरच्या बरोअबर लिंबु पण
मिळाला <<<<<
मला पण हे पटल नाही, काल गुरुवारी त्यातल्यात्यातही लटकवलेल्या ताज्या मिरच्या मिळतीलच कशा काय?
शनिवार टू शनिवार लटकवतात, तेव्हा आधीच्या शनिवारि लटकवलेल्या मिरच्या गुरुवारी घेतल्या असतील तर त्या ताज्या असणे शक्यच नाही, शिवाय शनिवार टू गुरुवार, रस्त्यावरची धूळ अन धूर अन चिखलपाणि ल्यालेल्या असतील..... अन तशा त्या खाल्यात? ईऽऽऽऽ..... वेळ भागवताना अहो भूताची भिती नाही बाळगली तरी निदान रोगराई /जंतुंची /बॅक्टेरियाची/ फंगसची/ चिखल-माती-धूळ- रस्त्यावरुन उडालेली गूघाण यांची तरी फिकीर करायची? याऽऽक... !
आणि डोण्टच से हां की धुवुन घेतले होते..... वर वर धुण्याने काय होणारे? शनिवार ते गुरुवार वरील सर्व घाण त्या लिंबुमिरचीमधे आतवर मुरलेली असेल, तशीच खाल्ली?

>>>>> काल पेपरला आलय, रोज रोज अंघोळ करु नका म्हणुन <<<<<
हो का? कित्ती मज्जा...... तसेही हल्ली थंडीत आंघोळ नकोच अस्ते... म्हणजे आंघोळ करताना बरे वाटते पण नंतर थंडी वाजते ना.... !
बाकी हिंदू धर्मात आयुर्वेद व अध्यात्माद्वारे यावरही उपाय सांगितला गेला आहेच्च.
मृत्तीका स्नान किम्वा भस्म स्नान. त्यातुनही "चिताभस्म" असेल तर सर्वोत्कृष्ट Proud
परळीच्या औष्णीक विद्युत केंद्रातिल राखेचे सफेद भस्माचे तुकडेही मिळतात. तसेही त्या शेकडो टनावारी राखेचे काय करायचे हा त्यांना प्रश्नच असतो. सरकारी अधिकृतपणे "भस्म स्नानास" राख वापरण्यास उत्तेजन मिळावे असा अर्ज पगारेंनी करावा काय? नै म्हणजे ते छान लिहू शकतात म्हणुन त्यांना अर्ज करायला सांगतोय. Wink

हुश्शSS........जंप मारली.
आज सुकुर्वार है जस्ट नाष्टा संपला काल रात्री घागा निर्मान झाला आहे
अक्कल .............खायला गेली आहे वाटत.
इथे आमच्या सोसायटित गुरवारी मिरच्या लटकतात.

बरोबर निवांतजी!
उगीचच दररोज आं घोळ करणे ही एक अंधश्रद्धाच म्हणता येईल.
विशेषतःथंड प्रदेशात आणि तुम्ही काही अंगमेहनतीचं किंवा ऑटडोअर काम करत नसाल तर!
आंघोळीऐवजी अर्धी बादली पाण्यात हात पाय तोंड धुवून होतं.
थंडित त्वचा जे संरक्षक तेल निर्माण करते ते रोजच्या रोज आंघोळ करून आपण धुवून टाकतो. आणि मग महागडे मॉईस्चरायजर लावत बसतो.

आमच्या गावात आमच्या धर्माच्या लोकांत रोजच्या रोज कपडे धुणे ही ही एक अंधश्रद्धा आहे.
मी एक वॉशिंग मशीन लोड भरल्याशिवाय कपडे धूत नाही (तीनचार दिवसांतून एकदा) म्हणून (ही) मी प्रचंड धर्मबुडवी आहे.
Happy

पुस्तके वाचून ती समजवून थोडा अभ्यास करुन घरच्या घरी आयुर्वेद शिकता येते असे मला वाटते. आजीबाईंचा बटवा असे जे आपण म्हणतो ते म्हणजे आजीबाईंनी हे घटक नीट वापरुन त्याचे फायदे तोटे पाहिले आहे. हवामानाचा अभ्यास केला आहे. खोकला झाला की आल्याचा रस घ्या. मध घ्या. उन लागून ताप चडला की कांद्याचा रस कपाळाला लावा. जखम झाली की हळद लावा. पोट दुखत असेल तर ओवा चघळा. दात दुखत असेल तर लवंगाचे तेल लावा. पोट बिघडले असेल तर जेष्ठमध खा. फोट फुगले असेल तर विड्याचे पान खा. त्वचा कोरडी पडली असेल तर लिंबु लावा .. खा. हे आणि अशा अनेक घरगुती उपयांच्या मागे आयुर्वेदच आहे.<<<<<<<<<

हे बरोबर आहे मान्य आहे.
म्हणजे आपण च आयुर्वेदिक डॉ. आहोतकी मग हेच आयुर्वेदाच्या नावाने विकुन लोकांना लुटणार्‍या डॉ.कडे का जायचे.

सकुरा, लोक मुर्ख असतात आपल्या रोजच्या आहारातून ह्या गोष्टी वंचित करतात. अशा लोकांना डॉ. लुटले तर बरेच केले असेल मी म्हणेल. चुकीची जीवनशैली जगणारे अनेक जीव मी जगभरात पाहिले आहेत. अमेरिकेत जी ओबेसीटी हल्ली वाढली आहे त्याचे कारण चुकीचा आहार.. चुकीची जीवनशैली हीच आहे. काय खावे हेच ह्या लोकांना माहिती नाही. इतके संशोधन झाले आहे होत आहे तरी त्यांचे ब्रेडचे डेकर वर डेकर आणि मधे चीज आणि मास हेच त्यांना अधिक आवडत.

चिनी लोक वेडे नसतात असे म्हणायचे का तुम्हाला बी ? >> वेडे असणे कुणा रेसची मक्तेदारी नाही. प्रत्येक संस्कृतीत अशा गोष्टी असतात हे सांगायचे होते म्हणून ते वाक्य लिहिले आहे.

असाम्या Lol

बाकी ते दिव्यकण आमच्याही अंगावर पडतात. घरी किंवा कुठे हल्ली मुलांचे वाढदिवस साजरे झाले की मोठ्ठा फुगा लावुन त्यात चाकलेटं भरलेली असली की हमखास दिव्यकणासाठी तयार रहावे. वाढदिवसाला जे पुष्पगुच्छा दिले जाता त्या सोबत हे दिव्यकण तर तो फ्लॉवरीस्ट्पण मोठ्या मनाने देतो. सोबत ज्याची खिचडी करता येत नाही असे थर्मोकोलचे साबुदाणे पण. Proud

अमेरिकेत जी ओबेसीटी हल्ली वाढली आहे त्याचे कारण चुकीचा आहार.. चुकीची जीवनशैली हीच आहे. काय खावे हेच ह्या लोकांना माहिती नाही. इतके संशोधन झाले आहे होत आहे तरी त्यांचे ब्रेडचे डेकर वर डेकर आणि मधे चीज आणि मास हेच त्यांना अधिक आवडत.<<<<<<<<<<<+१

बी, मी हेअमेरिकेत बघितले आहे माझा मुलगा तिथेच राहतो.
पण दुसरी गंमत पण बघितली आहे जपान मधे तिथले लोकही मांसाहारी आहेत आपल्या कडचे कुठलेही मसाले तिकडे औशधालाही मिळनार नाहित पण ते लोकं दिर्घाआयुषी,काटक, शांत मेहनती,हुशार असतात हे कसे?

साती Happy

पण ते लोकं दिर्घाआयुषी,काटक, शांत मेहनती,हुशार असतात हे कसे?>>>> कारण ते उठसुट एकमेकान्चे गालगुच्चे घेत बसत नाहीत. त्यान्चा एकच धर्म तो म्हणजे मेहेनत, कष्ट. एकमेकाना नावे ठेवत बसत नाहीत. एकाच बेटावर रहातात. एकच भाषा वापरतात ( असतील त्यातही काही डायलेक्ट) एकाच तर्हेचे कपडे घालतात, एकाच टाईपचे खाणे ( सुशी वगैरे) खातात. गोड धोड जास्त खात नाहीत, म्हणून डायबेटीस पण नाही. हुश्श!

Pages