लिंबु मिरची

Submitted by सचिन पगारे on 28 January, 2016 - 10:56

मित्राने नवि चारचाकी घेतली त्याच्याकडे गेलो तर गाडीला लिंबु नि मिरची बांधायचे चालु होते हे कशाला विचारले तर म्हणाला गाडी वाईट नजरांपासुन सुरक्षित राहते, अपघात होत नाहित. त्याला म्हणालो, 'तुला हे शोभुन दिसते देशाला तुम्ही खरच रामराज्य काळात नेणार'.एवढा रसरशित लिंबु वाया जाणार म्हणुन मन हळहळले.

लिंबु सरबत हे माझे आवडते पेय.जेवणातही त्याचा आमच्या घरी भरपुर वापर होतो.आयर्वेदातही लिंबाला बरेच महत्व आहे असे म्हणतात खरे खोटे तो लिंबच जाणो. माझा तरी आयुर्वेदावर विश्वास नाही..मला अत्यंत आवडणारा लिंबु हा आपल्या देशात मात्र जादुइ बनला आहे जोडीला मिरची.बर्याच वाहनांवर लिंबु मिरची लावतात काही लोकांच्या तर घराच्या दारातही लिंबु लटकवलेला आढळतो.

लहान असताना आमच्या इमारतिच्या मागे एक तिनरस्ता असायचा तेथे नेहमि टाचणी लावलेले लिबु किंवा अर्धवट कापलेले नि आत कुंकू टाकलेले लिंबु नि नारळ पडलेले असायचे.कुणावर काही करणी केलेली असेल तर ती उतरवण्याकरता मांत्रिकाकडुन पुजाअर्चा करून अशा तिनरस्त्यावर लिंबुओवाळुन टाकले जायचे. आमच्यातल्या काही मुलांची जाम टरकायची पण आम्हि काही मुले मात्र क्रिकेटची मँच खेळुन आलो कि सरळ तिथले लिंबु उचलुन आणायचो त्याच्या टाचण्या वैगरे प्रकार काढुन सोसायटिच्या नळाखाली धुवुन त्यातल्या ताज्या लिंबाचा सोसायटिच्या आवारात बसुन बर्फ टाकुन थंडगार सरबत बनवायचो. आधि जी मुल करणिचा लिंबु म्हणुन घाबरायची त्यांचीही भिड चेपुन तिही लिंबु सरबत पिउ लागली. कुंकु लावलेले लिंबु हे सरबतासाठी निरुपयोगी असायची ती घेउन आम्ही गटारात फेकुन द्यायचो.

लिंबु मिरची ह्यांना उगाच जादुई केले गेलेय असे मला वाटते. आणि हे वाहनांना लिंबु मिरची लावण्याचे प्रकार हे हिंदु सोडुन इतर धर्मात तरी कधी पाहिलेले स्मरत नाहित.

लिंबु हा वाहनांवर लावणे खरेच शुभ असते का? मला तर ही हास्यास्पद अंधश्रध्दा वाटते.

कि खरच लिंबुने करणी उतरते?मायबोलिकरांना लिंबु मिरचीचे काहि चांगले वाइट असे अध्यात्मिक अनुभव असतील तर जरूर मांडावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच लिंबुने करणी उतरते?मायबोलिकरांना लिंबु मिरचीचे काहि चांगले वाइट असे अध्यात्मिक अनुभव असतील तर जरूर मांडावेत. >> नसावे उतरत, माबो वर बघा दहाएक वर्षे तरी एक लिंबू नि एक मिरची आहे पण साईटवर झालेली 'करणी' अजून सुरूच आहे.

नसावे उतरत, माबो वर बघा दहाएक वर्षे तरी एक लिंबू नि एक मिरची आहे पण साईटवर झालेली 'करणी' अजून सुरूच आहे. >>> गुडवन असामी Lol

>>मायबोलिकरांना लिंबु मिरचीचे काहि चांगले वाइट असे अध्यात्मिक अनुभव असतील तर जरूर मांडावेत.<<

आहेत. लिंबू-मिरची सोबत बारीक चॉप केलेला कांदा आणि चण्याची मसाला डाळ घालुन बनवलेला चखणा आवडत्या पेयासोबत घेतल्यास ब्रह्मानंदी टाळी लागण्यास हमखास मदत होते... Happy

Asami. Lol

निर्जीव वस्तु, जी स्वत:चे सुद्धा रक्षण करू शकत नाही , ती आपले रक्षण करु शकते असे मानणे किती भाबडेपणाचे आहे हे नव्याने सांगावयास नकोच. दर आठवड्यानंतर , जुनी मिरची व लिंबू , फेकुन देतांना , आपण आपल्या रक्षणकर्त्यास किती सहजपणे फेकून देतो हे यांच्या लक्षात तरी येते काय ?
ज्यांना रिकामा वेळ असेल त्यांनी , जेथे जेथे अपघात झाला असेल , तेथे तेथे जावून, अपघातग्रस्त वाहनावर लिंबू मिरची टांगली होती काय ? याचा शोध घेवून आकडेवारी प्रसिद्ध करावी. त्यांचा वेळ बरा जाईल, आणि आपली सर्वांची छान करमणुक होईल.

माझ्याकडून एक लिंबूसरबत आणि मिर्च्यांची भजी नक्की. >> ते तू चार्ल्स रिव्हर वरच्या MIT समोरच्या ब्रिजच्या तिठ्यावरून वगैरे उचलून आणलेले नसेल तर काहीच हरकत नाही. तसे असेल तर धुवून लेखकाला दे Wink

अमित 'बिब्बा' हा पण एक आयडी होता. काळी बाहुली वगैरे घ्यायचे असतील पुढचा लेख यायच्या आत, तर घेऊन टाका. Wink

असाम्या, एवढ्या चांगल्या टॉपिक मध्ये बिब्बा घातलास ना!! लेखकराव विसरले बिब्बा.>>>>:हहगलो:

लिम्बु-मिर्ची Lol

लिंबू मिरचीचे माहीत नाही पण त्याचा धर्माशी संबंध प्लीजच जोडू नका. मुस्लीम , christian , jews सगळीकडे जगात सर्वत्र असे प्रकार चालतात. अमुक तमुक लावलं तर आपलं बरं होईल या मानसिकतेशी त्याचा संबंध जोडता येईल फारतर. लिंबू मिरची वाया जाते मान्य पण अशा किती गोष्टी जगात सगळीकडेच वाया जातात , त्यात अजून एकाची भर.

वाह असामी! हाफ व्हॉली मिळालाच होता, कव्हर ड्राईव्ह पण खणखणीत बसला. भास्कराचार्यांकडून लिंबू सरबत लागू झालच आहे. माझ्याकडून राज ने उल्लेखलेलं, ब्रम्हानंदी टाळी वालं पेय सुद्धा अ‍ॅड करा.

या विषयावर जामोप्या च्या धाग्यावर चर्चा झालेली आहे.

http://www.maayboli.com/node/26718

त्यान्चा पाय मोडणे हे निमीत्त होते पण त्या कारणाने त्यान्च्या हाताने काही पुण्याचे कामही घडले.... Happy
LimbuMirachi.png

शीर्षक वाचून कसलंतरी ललित असावं असं वाटलं. पण लेखकाचे नाव वाचून उत्सुकता निर्माण झाली. सदर लेखाचा उद्देश हा हिंदुंच्या तथाकथित अंधश्रद्धांची टिंगलटवाळी करणे हा असावा असे प्राथमिक मत झाले आहे. सदर लेखकाच्या निदर्शनास नम्रपणे काही गोष्टी आणून द्याव्याशा वाटत आहेत.लिंबू मिर्ची या अंधश्रद्धा पूर्वीच्या काळात होत्या व त्यास मनोवैज्ञानिक कारणे होती. त्या काळात अध्यात्माचा शास्त्रीयरित्या फारसा विचार झालेला नसणे हे मुख्य कारण असावे.

सूक्ष्मातील तमोगुण असणा-या शक्तिंना प्रतिबंध करण्यासाठी लिंबूमिर्चीचा वापर केला जात असे. परंतु त्यामुळे देहातील सूक्ष्मामधे सकारात्मक विचारांची निर्मिती होत असून त्यामुळे सकारात्मक उर्जा वाढीस लागत असे. यामुळे तमोगुणांवर मात करता येत असे. त्यात लिंबूमिर्चीचा वाटा काहीच नाही हे संशोधनाने समजून आलेले आहे. संशोधनाने हे ही ध्यानात आलेले आहे की अशा वस्तूंचा वापर करण्याऐवजी अध्यात्म आणि नामजप पुरेसे होते.

अध्यात्मिक संशोधन आता दैवी कणांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे विश्वाची रहस्ये उलगडण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संबंधित लेखकास आवाहन आहे की अशा पद्धतीने टुकूटुकू धावा काढण्याऐवजी एकूणात बदललेल्या शास्त्राचा अभ्यास करण्यात यावा. एकीकडे हिग्ज बोसॉन विज्ञानाच्या सहाय्याने मिळत असताना दुसरीकडे दैवी कण देखील मिळत आहेत. या कणांचे विश्लेषण वैज्ञानिक रित्या केले असता त्यातून मिळालेले वैज्ञानिक अहवाल हे धक्कादायक असेच आहेत.

उठसूठ विज्ञानाचे नाव घेऊन अंधपणे टीका करणा-यांसाठी सदर संशोधन हे आव्हान ठरले आहे.
अधिक माहितीसाठी.

http://www.sanatan.org/mr/a/1140.html

दैवी कणांचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेले संशोधन
आणि यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला
खोटे ठरवणारे असतात तथाकथित पुरोगामी, तर अध्यात्म
विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी सनातन संस्था आहे खरी पुरोगामी !

1400736358_daivi_kan_ppdr_hand[1].jpg

प.पू. डॉ. आठवले यांच्या हातावर प्रथम दिसलेले दैवी कण (वर्तुळात)
५ जुलै २०१२ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले यांच्या हाताच्या त्वचेवरील सोनेरी दैवी कण त्यांनी हाताची त्वचा चोळल्यावर अलग होऊन खाली पडले आणि ते गोळा करता आले. त्यामुळे नाविन्यपूर्ण अशा दैवी कणांचा शोध लागला. त्यानंतर दुसर्‍या दिवसापासून प.पू. डॉ. आठवले रहात असलेल्या गोव्यातील रामनाथी येथील आश्रमातील साधकांना आणि मग काही दिवसांत ते आठवड्यांत भारतातील, तसेच सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या जगभरातील साधकांना दैवी कण मिळू लागले. हे दैवी कण त्यांना त्यांचे शरीर, वस्तू आणि ते वास्तव्य करत असलेले ठिकाण येथे मिळू लागले. ते चंदेरी, सोनेरी आणि इतर रंगांचेही होते.

साधकांना मिळत असलेल्या कणांना दैवी कण का म्हटले आहे ?, असा प्रश्‍न कोणाच्याही मनात येईल. याचे उत्तर असे की, या कणांमुळे साधकांना येथे दिल्याप्रमाणे चांगले अनुभव आले आहेत. हे कण कधी निर्माण होणार ? त्यांची निर्माण होण्याची प्रक्रिया काय ?, हे साधकांना समजत नाही. ते ईश्‍वराच्या इच्छेने निर्माण होतात आणि ते कणांच्या रूपात असतात; म्हणून त्यांना दैवी कण म्हटले आहे. बिग बँग नावाचा महाप्रयोग करणार्‍या स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांना सापडलेल्या कणांचा उल्लेख हिग्स-बोसॉनचे गॉड पार्टिकल, म्हणजे हिग्स-बोसॉनचे देव कण, असा केला जात आहे. त्याप्रमाणेच साधकांना मिळत असलेल्या कणांचा उल्लेख आम्ही दैवी कण असा करत आहोत.

दैवी कण मिळणे, ही सध्याच्या मानवजातीसाठी नाविन्यपूर्ण घटना असल्यामुळे दैवी कण म्हणजे नेमके काय आहे ?, याचा सनातनने वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही अभ्यास करायचे ठरवले. याकरता ते चाचण्यांसाठी मुंबई येथील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बी.ए.आर्.सी.) आणि आय.आय.टी. या नामांकित संस्थांना पाठवले. तसेच आणखी कोणत्या तंत्रज्ञानाने दैवी कणांचे गुणधर्म शोधणे शक्य आहे, याचा शोध घेतला. त्यासाठी विविध ठिकाणच्या वैज्ञानिकांना दैवी कण दाखवून त्यांना ते संशोधनासाठी दिले. यातून दैवी कणांची जी काही माहिती मिळाली, ती येथे देत आहोत.

१. वैज्ञानिक संस्थांनी दिलेले अहवाल

१ अ. एक प्रयोगशाळा

१. १०० पट आकार दिसणार्‍या सूक्ष्मदर्शक यंत्रातून बघितल्यावर असे लक्षात आले की, सर्व रंगांचे दैवी कण षट्कोनी या आकाराचे आहेत. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

२. दैवी कण अ‍ॅक्वारेजिया या आम्लामध्ये २४ घंटे ठेवल्यावरही विरघळत नाहीत. (धातू अ‍ॅक्वारेजियामध्ये विरघळतात.) याचा अर्थ दैवी कणांमध्ये कोणताही सर्वसामान्यपणे आढळणारा धातू नाही.

१ आ. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बी.ए.आर्.सी.), मुंबई

पुढे वाचा..
http://www.sanatan.org/mr/a/1140.html

लेखकाचे दुष्ट हेतू हाणून पाडण्यासाठी अवांतर प्रतिसाद देण्याची काही एक आवश्यकता नाही. त्यास वैज्ञानिक आव्हान देऊन त्याबद्दल स्पष्टीकरणे विचारून निरुत्तर करणे हा एक जालीम उपाय आहे. सदर संशोधनात्मक लेखामुळे लेखकाचे डोळे पांढरे होण्याची शक्यता असल्याने विषयापासून न भरकटता लेखकाच्या उत्तराची प्रतिक्षा करावी हे विनम्र आवाहन.

>>>>> खरच लिंबुने करणी उतरते?मायबोलिकरांना लिंबु मिरचीचे काहि चांगले वाइट असे अध्यात्मिक अनुभव असतील तर जरूर मांडावेत. >> नसावे उतरत, माबो वर बघा दहाएक वर्षे तरी एक लिंबू नि एक मिरची आहे पण साईटवर झालेली 'करणी' अजून सुरूच आहे. <<<<<< Lol
>>>>> करणी नुसती सुरूच नाही तर वाढतच चालली आहे. <<<<< Biggrin

असामि नि अंजली... कस्ला अचूक वर्मी बाण मारलात...... ब्रेव्हो... ! Happy

बायदिवे, कापोच्याचाचाने दाखविलेल्या फोटोतल्यासारखे सोनेरी कण लहानपणि माझ्याही हातांवर अंगावर दिसु लागले होते असे पुसटसे आठवते. मात्र आईला त्याबद्दल सूक्ष्मातले अधिक ज्ञान नसल्याने तिने आधी मला खसखसुन साबण लावुन आंघोळ घातल्याचे स्मरते, तरीही ते कण तसेच दिसत राहिल्याने शेवटी इडापीडाटळूदे म्हणत तिने माझ्यावरुन चक्क मीठमोहरी उतरवुन टाकली होती. दुपारपर्यंत ते कण दिसेनासे झाले. Wink
(मी असत्य बोलत नाही, वरील प्रसंगही खरोखरच घडलेला आहे)

Pages