भक्त आणि परमभक्तांबद्दल तुमचे काय मत आहे ?

Submitted by ssaurabh2008 on 27 January, 2016 - 08:36

12565514_1105884046088367_2747118675916804972_n.jpg

गेल्या वर्षी ‘हमीद अन्सारी’ नाव असलेल्या एका व्यक्तीला भक्तांनी मनसोक्त शिव्या घातल्या होत्या.
त्यावेळी आमच्यासारख्या काही मुर्खांनी भक्तांना समजावण्यासाठी प्रोटोकॉल वगैरेची माहिती देण्याचा प्रयत्न केला होता.
"तिरंग्यापुढे कसला आलाय प्रोटोकॉल?", "इच्छा असती, तर एका सेकंदात प्रोटोकॉल तोडला असता", ’पाकिस्तान... देशद्रोही...’ तेव्हा अशी नेहमीची काहीबाही उत्तरे मिळाली होती.
आज तेच भक्तगण "मोदींनी प्रोटोकॉल पाळून योग्यच केले.", "देशभक्ती मनात असावी लागते." असे सांगत आहेत.

पूर्वी वाटायचे की ब्रिटिशांच्या जुलूमगिरीनंतर या देशात सगळ्यात वाईट काही घडले असेल, तर ते म्हणजे भक्त/परमभक्त या जमातीचा उदय !
पण माझी ही धारणा किती चुकीची होती हे आता कळत आहे.
आता माझे ठाम मत बनले आहे की राजू श्रीवास्तवनंतर या देशात सगळ्यात मोठे एंटरटेनर कोणी असतील, तर ते फक्त भक्त आणि परमभक्तच !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं म्हणू नये. टिंगलीचा सूर वाटतो. मुद्दामून टर उडवली जाऊ नये असं मला वाटतं.
कसेही असले तरी मानवप्राणी आहेत. भूतदया वगैरे आपल्या संस्कृतीने शिकवलेलं आहे कि नाही ?

दुसरं म्हणजे भक्त / परमभक्त दिवसभर जेव्हां सर्वांचा समाचार घेऊन थकून भागून घरी जात असेल तेव्हां त्याची आई त्याला म्हणत असेलच ना कि ," आलं माझं शोनं, काय झाणार बाळा ?"
अगदी भक्त असला तरी कुणाचा तरी त्याच्यावर जीव असेलच ना ?
बच्चे की जान लोगे क्या ?

त्यान्चा सत्तेत असतानाचा अनुभव कमी पडतो आहे.... परिपक्वता यायला त्यान्नी कुठे ६५ वर्षे राज-सत्ता अनुभवली आहे. Happy

प्रजासत्ताकाच्या सर्वान्ना शुभेच्छा....

भक्तांनी राहुलबाळ कसा नीट स्याल्यूट करत नाही यावर उड्या मारायला सुरुवात केली.आता तो प्रोटोकॉल पाळत नाही असं म्हणायचीही सोय नाही. एका भक्ताने अमर जवान ज्योतीशी मोदींचा सलामी देतानाचा फोटो कवटाळून धरलाय.

त्या वेळी ज्या जाहीराती बनवल्या गेल्या, शेअर केल्या त्या सुद्धा युनिक अशाच होत्या. उदा.
https://www.facebook.com/FinalWarAgainstCorruption/videos/1071252436273643/

त्यासाठी आता टिंगल उडवणं क्लेषदायक आहे.