शेपूची भाकरी

Submitted by दिनेश. on 25 January, 2016 - 15:06
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ भाकर्‍या होतील.
माहितीचा स्रोत: 
तरलाबेन अने दिनेसभाई
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मस्तच, कृतीपण मस्त पण शेपुला बिग नो. कोथिंबीर घालून करेन ट्राय.

मला निवग्र्या आठवल्या एकदम, उकडीत कोथिंबीर, ठेचा किंवा लाल तिखट घालून आम्ही मोदकाप्रमाणे उकडवतो. करतोच मोदक केले की.

छान प्रकार दिनेशदा!
दक्षिण कर्नाटकात अक्की रोटी करतात त्यात अगदी हमखास शेपू टाकतात.
आमचे तुळू शेजारी तर शेपूची परतून भाजी खात नाहीत पण अक्की रोटीत , भातात किंवा पातळ रश्शात टाकतात.

तांदूळ पीठ ओले असताना कढईत ओतले तर पिठल्यासारखे होईल ना? मळता येईल का ते?

मस्त आहे हा प्रकार. मी करून बघणार Happy

साती, मी अक्की रोटी खाल्ली आहे त्यात तर मला पानकोबी आढळला Happy शेपू नाही आढळली Happy इथे एम. टी. आर. मधे खूपदा खाल्ली आहे.

दिनेशदा माझ्याकडे ब्राऊन राईसे पीठ उरले आहेस. ते वापरुन ही कृती करणार आहे. धन्यवाद.

बी, घरी करतात तेव्हा बर्‍याचदा शेपू घालतात.
मे बी रेस्तेराँमध्ये सगळ्यांना टेस्ट आवडावी म्हणून घालत नसतील.
तशी कुठलीही भाजी घालतात अक्कि रोटीत.

साबस्की म्हणतात ते लोक शेपूला.

आभार,

साती, अक्की रोटी आहे अजेंडावर !! शेपू तसाही फार कमी वेळा हॉटेलमधे खाल्लाय. इथे तो भाजी म्हणून नाही तर कोथिंबीर, पुदीन्यासारखा स्वादासाठी वापरतात. मी पुर्वी अजिबात शेपू खात नसे. गोव्याला सोयरा थोरात एक हॉटेल चालवतात. त्यांच्याकडे खुपदा असते हि भाजी.

आशु, पिठात तेवढेच पाणी असल्याने ते लगेच शिजून घट्ट होते. दोन मिनिटात गोळा जमून जातो. सहज मळता येते.

मस्त दिसतेय पण शेपू.....

अक्की रोटी जबरदस्त आवडते, त्यामुळे शेपूशिवाय काही इतर स्वाद घालून ट्राय करतो. घरात इतर मात्र शेपूप्रेमी आहेत त्यांना आवडेलच

फोटो मस्त, चविष्ट लागत असणार हा प्रकार Happy

माझी कानडी मैत्रीण, शिजवलेला भात + तांदुळाचे पीठ + शेपु घालून थालिपीठ (अक्की रोटी ?) करते.
मी त्या पद्धतीने करते , मस्त लागतात ती थालिपीठं.

आता या पद्धतीने उकड काढून पण करुन बघेन. Happy

मस्त रेसिपी! पण शेपु आवडत नाही .. कोथिंबीर घालुन बघेन Happy

मीपु.. वा! मस्त दिसतयं थालिपीठ.. भाताची डिझाईन Happy

मस्त फोटो आहे.

निवगर्‍या +१

मीपुणेकरचं हिरवंगार थालिपीठही झक्कास दिसतंय. ते भाजायचंय ना अजून?

मीपुणेकर.. मस्तच रंग आलाय. हो, अक्की रोटी तशीच करतात. कूर्गी व्हर्जन मधे तांदळाचा रवा वापरतात. भाज्या हव्यातच असे नाही.

वा: शेपू आपली एक नम्बर आवडती. पण दिनेशदा तुमच्या भाकरीत पुरेशी शेपू नाहे दिसत लैच तुरळक तुरळ्क आहे.

माझी कानडी मैत्रीण, शिजवलेला भात + तांदुळाचे पीठ + शेपु घालून थालिपीठ (अक्की रोटी ?) करते.>>

चित्र तर छान दिसते आहे पण मग ह्यात चवीसाठी बाकी गोष्टी घालत नाही का? तिखट मीठ इतके तरी?

वा! मस्त प्रकार आहे हा. शेपू अन भाकरी दोन्ही आवडीचं.

मी पुणेकरचं थालीपीठ किती सुरेख दिसतेय. मी पण भरपूर शेपू घालून भाकरी करून बघेन.

***********************************************************************

रच्याकने, मी आता आयडी स्पेसिफिक धमाल धागे काढायच्या विचारात आहे. एनी सजेशन्स? Wink

छान आहेत फोटो व कृती. Happy
दिनेशभाऊंच्या फोटोत शेपु खरेच फारच कमी दिसतो आहे. घाबरत घाबरत टाकला काय दिनेशभौ? Wink
मला शेपू आवडतो.

अरे, सढळ हाताने शेपू टाकायला मी काय भारतात आहे का ? इथे शेपू भाजी म्हणून नाही, तर कोथिंबीर, पुदीना सेक्शन मधे असतो. ( तेवढीच जुडी आणि तशीच किम्मत ) पण भाकरीवर दिसतो तेवढ्यावर जाऊ नका, आत पण आहे Happy म्हणून तर मुद्दाम क्लोज अप दिलाय !!!

मामी, फार कमी आयडी कायम राहतात, निदान तूझ्या धाग्याने ( भिंतीवरच्या गांधींजीसारखे) डोळ्यासमोर राहतील. पुण्याचे काम आहे हो हे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखे घाट बांधून ठेव !!!

Pages