खाओ सोय- चिकनसूप फॉर द स्टमक

Submitted by वर्षू. on 25 January, 2016 - 09:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नॉर्दनमोस्ट थायलँड ची खासियत असलेले हे सूप, अगदी बँकॉक मधे ही शोधून सापडणार नाही. पोट भरण्यासाठी,बस्,एक बोल ही काफी है!! Happy
अतिशय चविष्ट आणी पौष्टिक असं हे सूप करायलाही सोपं आहे.
तर पेश आहे ,'ऑथेंटिक खाओ सोय'
लागणार्‍या जिन्नसांची यादी लंबी चौडी दिसत असली तरी तुमच्या किचन मधे यापैकी ९५% जिन्नस सापडतील..

मसाला पेस्ट करता-
१) १/२ टेबल स्पून हळद
२) ३ तेजपाने (बे लीफ)
३) १ १/२ टेबलस्पून धन्याची पूड
४) १ टेबल स्पून जिरपूड
५) २ टी स्पून आल्या ची पेस्ट किंवा इंचभर लांबी चे आले,चकत्या करून
६) १ टी स्पून पांढर्‍या किंवा काळ्या मिर्‍याची पूड
७) ३ टी स्पून किंवा आवडीनुसार तिखट चिली फ्लेक्स
८) १ लवंग
९) लसणाच्या ८,९ सोललेल्या पाकळ्या ,चकत्या करून
१०) २ मध्यम आकाराचे कांदे- उभे पातळ चिरून
११) १/४ कप कोथिंबीर मुळांसकट चिरलेली
१२) ५,६ वाळक्या लाल मिरच्या ( तिखट वर्जन)
१३) तीनेक इंच लांबी चे गालांगल
१४) काफिर लाईम ची मूठभर पाने
१५) १ टी स्पून काफिर लाईम पावडर
सूप करता

१) १ टेबलस्पून तेल
२) १ किलो चिकन ब्रेस्ट आणी लेग्स ( मोठेसेच तुकडे घ्यायचेत)
३) ३ कप होम मेड चिकन स्टॉक
(थोडे चिकन पीसेस( वेगळे घ्यायचेत- वर लिहिल्यापैकी नाही ) , बोन्स सकट भरपूर पाण्यात उकळत ठेवावे. यात सेलेरी ची पाने, एक मोठा कांदा चिरलेला, दोन लहान कॅप्सीकम चिरलेले, ४,५ लसणाच्या कळ्या ठेचून घेतलेल्या, ( पांडान लीव्ज- ऑप्शनल) आणी मीठ
घाला. खूप उकळल्यावर स्टॉक गाळून काचेच्या बरणीत स्टोअर करून फ्रीज मधे ठेवावा. आमच्याकडे हा स्टॉक , स्टॉक मधे करून ठेवलेला असतो. यातील चिकन, श्रेड करून फ्राईड राईस मधे वापरता येते.)

४) १ कॅन नॉन स्वीटंड कोकोनट मिल्क
५) २ पॅकेट्स एग नूडल्स

सजवण्याकरता
१) दोन लहान कांदे - पातळ काप करून
२) विनीगर मधील हिरव्या मिर्च्या ( रेडीमेड)
३) कांद्याच्या पाती बारीक चिरून घेतलेल्या
४) २,३ लिंबांच्या फोडी

क्रमवार पाककृती: 

१)मसाला बनवण्याकरता दिलेले जिन्नस , एकेक करून सर्व कोरडे भाजून घ्या.
(काफिर लाईम ची पाने आणी वाळक्या मिरच्या वगळून)
२) तोपर्यन्त वाळलेल्या मिरच्या, थोड्या गरम पाण्यात भिजवून ठेवा.
३) सर्व जिन्नस भाजून घेतल्यावर मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्या.
४) मोठ्या भांड्यात तेल गरम करायला ठेवा. यात मसाला पेस्ट टाकून, तेल वर येईस्तो परता.
५) ही सर्व तयारी होत असता दुसर्‍या गॅस वर कढईत चिकन चे तुकडे परतायला ठेवा. चिकन चा रंग चारी बाजूने पिवळसर झाला की गॅस बंद करा. अ‍ॅक्चुली थाय लोकं कच्चेच चिकन चे तुकडे टाकतात पण आपल्याला परतल्याशिवाय चैन नाही नं पडत.. म्हणून!!!
६) मसाला नीट फ्राय झाला कि त्यात पाणी, चिकन स्टॉक घाला. उकळी फुटल्यावर काफिर लाईम ची पाने, कोकोनट मिल्क अ‍ॅड करा.
खूप थिक नको सूप. जरूरी नुसार पाणी किंवा चिकन स्टॉक अ‍ॅड करा. आता चिकन पीसेस घालून नीट मिक्स करा.
झाकण ठेवून चिकन , मऊ शिजेपर्यन्त मंद गॅस वर ठेवून द्या.

७) तोपर्यन्त पाकिटावर लिहिलेल्या सूचनांनुसार एग नूडल्स शिजवून ठेवा.
८) खायला घेताना बोल मधे एग नूडल्स घ्या. वरून गरमागरम सूप, नूडल्स बुडतील इतके घ्या. लिंबु पिळणे मस्ट आहे. आवडीनुसार आंबटपणा कमी आधिक ,अ‍ॅडजस्ट करता येईल.

मसाला पेस्ट

ओह..हॉ.. एंड प्रोडक्ट मधे वरून तळलेले नूडल्स ही टाकायचे आहेत

वाढणी/प्रमाण: 
माणशी एक बोल .. पुरेसंय
अधिक टिपा: 

शेवटच्या फोटूत दिसणारे चिली ऑइल मी घरीच केलंय. थाय चिली फ्लेक्स ना गरम तेलात जळू न देता जस्ट परतून एका बॉटल मधे भरून स्टोअर करून ठेवलंय.
थाय इन्ग्रेडिएंट्स अमेरिकेत एशिअन स्टोअर मधे सहज मिळू शकतील.
आजकाल भारतात ही नेचर बास्केट सारख्या दुकानांतून मिळतील बहुतेक!!

माहितीचा स्रोत: 
चायनीज ओरिजिन चा थाय मित्र!!!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पपया सॅलड ही वेजीज करता मस्त ऑप्शन आहे >>> हो. माझं आवडतं. आमच्या इथे व्हेजच मिळतं. व्हेज टॉम यम सूपपण खूप आवडतं. थंडीत सही ऑप्शन.

कालच हॉटेलातून थायफुड घरी आले आहे. ड्रंकन नुडल्स(स्पायसी बेझिल) पनांग करी स्प्रिंग रोल्स वगैरे.. तरीही भूक लागली हे सगळं वाचून! Happy

वर्षुताई थाय सॉसच्या रेस्पीज पण लिही ना. तो चिकन सातेबरोबर येणारा पीनट सॉस.. किंवा स्प्रिंग रोल्सबरोबर देतात तो सोनेरी आंबट गोड सॉस..

थांकु बस्के..थाय सॉसेस मोस्टली सगळे रेडीमेड मिळतातच.. कधी घरी केले काही डिपिंग सॉस, तर जरूर शेअर करीन.
अगा ते पीनट सॉस , पानांग करी बेसिकली मलय्,इंडोनेशिअन स्पेशालिटी आहे. इंडोनेशियाला राहात असताना
पीनट सॉस+ साते , गाडोगाडो + पीनट सॉस, फ्राईड तोफू + ग्रीन छुटकी तिख्खट मिरची , स्टेपल फूड्स होते माझे.
पीनट सॉस खूपच सोपंये करायला. पानांग करी शी मिळती जुळती थाय करी आहे,' मास्सामान करी'
खूप टेस्टी आहे ही करी ही

>>किंवा स्प्रिंग रोल्सबरोबर देतात तो सोनेरी आंबट गोड सॉस..<<
डक साॅस.

सुप इन्वायटिंग आहे, टिपिकल थाय सुप वाॅटरी असतं, हे मस्त दाट आहे. बायदवे, आॅथेंटिक थाय सुप मध्ये चिकन बोन इन असतं का? इथे चंक्स किंवा पुल्ड पिसेस घालतात...

@ राज- थाय फूड्स मधे वरायटी ऑफ सूप्स आहे. सम थिक आणी सम थिन..
हे सूप ही फार थिक नाही पण वॉटरी ही नाही. स्टमक फिलिंग आहे म्हणून जर्रासे थिक. थॉम यम सूप मात्र नेहमी वॉटरीच मिळेल. इट्स अ‍ॅन अ‍ॅपिटायझर, नॉट मेन मील.

>>थॉम यम सूप मात्र नेहमी वॉटरीच मिळेल. इट्स अ‍ॅन अ‍ॅपिटायझर, नॉट मेन मील<<
अग्रीड, पण इथे लोकाग्रहास्तव मोठा पोर्शन असतो, लंचकरता. Proud

थँक्स राज. मला नाव माहित नव्हते.

वर्षु, हे सगळे मी थाई रेस्टॉरंट मध्येच खाल्ले आहेत. माहित नव्हते हे अ‍ॅक्चुअली इंडोनेशिअन ऑर मलेशिअन असेल. Happy

वर्षु, जबरी आहे ग हा पदार्थ...

जेव्ह कुमार ऋ. ला बोलावशील तेव्हा मला पण बोलाव गं सोबत. Happy

रेसिपी वाचायच्या आधी खाओ सोय वाचुन सोय सॉस घालुन काहीतरी खायचा पदार्थ बनवलाय असे वाटलेले.. Happy

वर्षूतै , नॉट लिस्निंग !
मला नुडल्स , चिकन , स्पाइसेस पाहून फो आठवल.
कोकोनट मिल्क न घालता , स्टार अनिस काही व्हेजीज घालून बर्‍यापैकी फो च्या जवळ जाईल. सुकीयाकी ऐन थंडीत खाल्लय.
अहाहा.
तुझ्या रेस्प्या ( नुसत्या ) वाचणे म्हणजे शिक्षा आहे . Happy
रच्याकने , न परतता चिकनचा स्वाद जास्त ओरिजिनल/ऑथेंटिक लागेल.

हायला काय भारी आहेस ग वर्षूताई. तिथला सगळा स्टॉक घेउन ये भारतात. मी येतेच.

साधना Happy मोस्ट वेल्कम !!!
नंदिनी.. .. ते गालांगल आणी काफिर लाईम मिळालं की.. चुकनेका सवालच नई Wink
जागु.. नक्की नक्की... Happy
इन्ना... अगा मी पण असं खोटं खोटंच परतल्यासारखं केलं होतं.. जस्ट अबाऊट लाईट्ट क्रीमीश कलर येस्तो..
बघ नं फोटोत Lol

काफिर लाईमचा स्वाद घेतलाय. लेट्स शेफ मधुन लेकीने काहीतरी थाय पदार्थ करायला मागवलेला त्यात काफिर लाईम होते. पण गलांगल मात्र कसे लागते माहित नाही. आल्यासारखे लागते का?

आमच्या इथे हे सगळे (नशिबाने) मिळते. त्यामुळे वापरु शकते पण स्वाद माहित नसला आणि नंतर आवडला नाही तर वांधे. लेट्स शेफच्या किटमध्ये काफिर लाईमची १०-१५ पाने होती आणि किती पाने घाला हे लिहिले नसल्याने ऐशुने ती सग्ळी पाने रेसिपीत ढकलली . त्यामुळॅ लाईमचा डोस जरा स्ट्राँग वाटला. पण तो वास आवडतो त्यामुळे चालुन गेले. गलांगल आवडले नाही तर वाट लागायची.

गालांगल , आल्या सारखे नाही लागत , अगदी वेगळा फ्लेवर आहे. पण तुला नक्की आवडेल.. जनरली थाय फूड मधील काफिर लाईम चा फ्लेवर बर्‍याच जणांना अगदी नाही चालत..

ते चिली ऑइल कसे वापरायचे? कि आपले उगीच बोट लावून चाटायचे?

काल काफिर लाईम पाने आणि गलांगल आणले. आपल्या लिंबाची पाने सहज खपतील काला म्हणून. गलांगल जरा वेगळे आहे. वास कुठेतरी ओळखीचा आहे पण कॅच करता नाही आला.

वॉव.. साधना.. मस्तं ..मुंबईत हे सर्व इन्ग्रेडिएंट्स मिळताहेत आता..

चिली ऑइल, सूप मधे तिखट पणा यायला टाकतात .. कमी, जास्त.. आपापल्या चवीनुसार. लिंबा चा रस मात्र मस्ट.तो ही आपापल्या चवी नुसार घ्यायचा. मला थोडं आंबट आवडतं..
हॅपी कुकिंग!!! Happy

Pages