पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियु, निधी Lol

पियु मी तिथे लिहीणार होते की जिलबीबरोबर खायचा मठ्ठा नव्हे. पण वेळ कमी पडला.

<< त्याच्या बायकोलाच मठाधिपती करायला पाहिजे.. >> हिम्सकूलजी, स्वतः च्या मुलीची नवर्‍याबद्दल गंभीर तक्रार आहे , हे समजल्यावरही तिला त्याबद्दल कांहींही न विचारतां जो बाप तिलाच दम देवून नवर्‍याशीं जुळवून घेणं हेंच स्त्रीचं कर्तव्य आहे असं सांगून तिला परत जायची ऑर्डर सोडतो, त्याच्याकडून अशी अपेक्षा ? अहो, 'माठाधिपति' मीं म्हटलं तें खर्‍याखुर्‍या पोटतिडीकेने , शब्दांचा खेळ करून विनोद करण्यासाठी नव्हे !

भाऊकाका गल्लत झाली दोन कॅरेक्टर्समध्ये. हिम्सकूल म्हणतोय ते शिरेलीच्या हिरवीणीबद्दल. वासु म्हणजे पुनर्वसु जो मठ्ठ आहे अस म्हटल तर त्याच्या बायकोला म्हणजे उर्मीला मठाधिपती करायला हव अस म्हणतोय तो....

<< म्हणजे उर्मीला मठाधिपती करायला हव अस म्हणतोय तो....>> अहो, पण हें सिनीयर 'माठाधिपतिं'च्या संमतिशिवाय नाहीं होणार ना; म्हणून स्त्रीयांविषयीची त्यांची मानसिकता सांगितली !

ओह्ह्ह्ह. हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

स्वतः च्या मुलीची नवर्‍याबद्दल गंभीर तक्रार आहे , हे समजल्यावरही तिला त्याबद्दल कांहींही न विचारतां जो बाप तिलाच दम देवून नवर्‍याशीं जुळवून घेणं हेंच स्त्रीचं कर्तव्य आहे असं सांगून तिला परत जायची ऑर्डर सोडतो

>> हे कधी दाखवलं? काय तक्रार आहे तिची? मीपण याच विचारात होते की ती इतके दिवस इकडे कशी?

उर्मी सुरेख शुदध मराठी बोलते. आवडते मला ते ऐकायला.

>> पुणेरी

<< हे कधी दाखवलं? काय तक्रार आहे तिची? >> नेमकी तक्रार तिने सांगितलेली नाहीं. पण आईकडे व भावाकडे तिने घरीं परत जाण्याची इच्छा नसल्याचं अनेक वेळा रडूनही सांगितलंय व माईनी तें नेहमीच्या दबक्या आवाजात वडीलांच्या कानावरही घातलंय.

वासू मठ्ठ आहे तर वासूच्या त्याच्या बायकोलाच मठाधिपती करायला पाहिजे.. >>>>>> मग तिला मठाधिपत्नी म्हणावं लागेल का? Proud

अग, वडिलांसारखं कशाला, अगदीं मित्रासारखं बोल बाबांशीं; आईला 'माई' म्हणतों
म्हणून हल्लीं मस्करीत 'मठाधिपति' म्हणतो त्याना आम्ही !!
mathaadhi.JPG

काल थोडा वेळ ही सिरियल बघितली. त्यात त्या नंदिनीला बघायला येणार असतात तर ती इतकी गबाळ्यासारखी का दाखवली आहे? निदान जरा बरी केशभूषा आणि वेशभूषा करायची की!

त्या नंदिनीला बघायला येणार असतात तर ती इतकी गबाळ्यासारखी का दाखवली आहे? निदान जरा बरी केशभूषा आणि वेशभूषा करायची की!>>
तिला त्याच्याशी लग्न करायचं नसतं म्हणून ती अशी येते त्यांच्यासमोर.

निधी, जेव्हा तिला वासुशी लग्न करायच होत तेव्हा कुठे नीटनेटकी रहात होती? काल फक्त साडी फाडुन नेसली मुद्दाम.. तरी त्यातल्या त्यात एक बरय की त्या दोन आत्या तिच्या कारस्थानांमध्ये सामिल नाहीयेत त्यामुळे एकाच सडक्या डोक्याच्या कारस्थानी कारवाया बघाव्या लागणार आहेत. केकतेची शिरेल असती तर त्या दोन्ही आत्यांनी तिच्या आवाक्यापेक्षा भयंकर कैतरी कारस्थानं करायला लावुन आपल डोक उठवल असत.

रावी छोट्या आत्याला संशय येतोय की नंदिनीच्या मनात काहीतरी भयंकर चालु आहे याचा.. ती म्हणते की तिला एकदा की तु पुनर्वसुबरोबर तशीच रहाणार आहेस का म्हणुन. कालच्या भागातही म्हणते की नक्की तुझ्या मनात काय आहे?

त्यात एक बरय की त्या दोन आत्या तिच्या कारस्थानांमध्ये सामिल नाहीयेत >>> पण ती कुमुद आहे कि थोडी शामिल ..
फाट्क्या साडीचे तर कै च्या कैच होते Uhoh

नंदिनी झी हॉरर शो मध्ये नक्कीच शोभेल. डोळ्यात कायम उग्र भाव असतात तिच्या. काही म्हणा, झी वाले वेचुन वेचुन पात्रं निवडतात. कारेदुमध्ये रजनी पर्फेक्ट होती, पण तिचा अभिनय पण दमदार होता. इथे नंदिनीबाई काय दिवे उजळतात देव जाणे. उर्मीने सुनीलला सांगीतले का नंदिनीबद्दल खरे काय ते? उर्मीचा दोन्ही बाजूने ढोल वाजणार आहे, नंदी ला सुनीलने नाकारले तरी ताप आणी तिने सुनीलला स्वत नाकारले तरी ताप.

वासु आणी त्याचा भाऊ दोघे मठ्ठंभारती आहेत.

क्लिओपात्रा, कुमुद तिची आत्या नाहीये, दादांची मोठी सून आहे आणि अस नाही तर तस तिला पुनर्वसुच लग्न मोडायलाच हवय किंवा पुनर्वसुने घरातुन बाहेर जायला हवय म्हणजे हिच्या नवर्‍याचा मठाधिपती होण्याचा मार्ग मोकळा.... आतापर्यंतचा शिरेलींचा इतिहास अस सांगतो की मालिकेतल्या खलनयिकेच्या घरातली माणस हि तिच्या कटात सामिल असतात...

काल मी अर्धवट पाहीले ( नेहेमीप्रमाणे). पण कुमुद सुनीलकडे गेल्याचे तिच्या नवर्‍याला व पुनर्वसुला कळते. कुमुद तो आरोप उर्मीवर टाकते. पण वासुचा भाऊ म्हणतो की तो सगळे खरे खोटे दादांसमोरच करेल. आजच्या भागात हे दाखवणार आहेत की वासुचा भाऊ दादाना सांगतो की कुमुद नंदिनीचे लग्न मोडायला सुनीलकडे गेली होती.

Pages