पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झीला लग्नाशिवाय दुसरे काही विषय नाहीत. लग्न लागल्यावर थांबतील तर तेही नाही. लग्न मुरून त्याला चांगली बुरशी येईपर्यंत त्याच बरणीत पाणीयुक्त तेल घालत राहतात.

मालिकेची माहिती

मालिकेतले नविन कलाकार बघता हि मालिका टीआरपी अभावी 'असे हे कन्यादान' सारखी गुंडाळायला लागु नये म्हणजे मिळवले.

संत आहे मुलगी

अशी आगळी वेगळी मालिका सुरू करा म्हणावं. नेहमी नेहमी त्या कारस्थानी बायका बघून कंटाळा आला. जरा सज्जन, संत , सोवळी ओवळी दिसली तर बरं वाटेल जिवाला.

संथ असेल तीच नायिका असते ना ?
स्मार्ट, सुंदर मुली या खलवृत्तीच्या असाव्यात असं एकता गाईडलाईन्स मधे म्हटलंय.

अरे पहीलाच एपिसोड महाबोअर झाला मला. तरी ह्याच प्रॉडक्शन हाऊसच्या एका सिरियलची मी फॅन होते. डायलॉग रायटर आणि बरीचशी टीम तिच आहे. पण बात कुछ् जमी नही.

पुनर्वसु हे नायकाचं नाव आहे यात.

लग्न मुरून त्याला चांगली बुरशी येईपर्यंत त्याच बरणीत पाणीयुक्त तेल घालत राहतात. >>> Lol लग्नच काय कोणत्याही सीन्/घटनेबद्दल हे खरे असेल.

मेन पेअर तर चांगली दिसते.

प्रियदर्शिनी देशपांडे डायलॉग रायटर आहे त्यामुळे चांगल्या डायलॉग्जची अपेक्षा आहे, आधीच्या माझ्या अनुभवानुसार, बघुया. आजतरी काही खास वाटलं नाही.

पुनर्वसुला फोन लागत नाहीये? म्हणजे कोण हिरो की हिरवीण? असं नाव माणसाचं पण असतं का?
>>>>

आज नेमके रात्री जेवताना ही मालिका रीपीट टेलिकास्ट लागली होती.
तेव्हा आईला मी सुद्धा हक्काबक्का होत हाच प्रश्न विचारला.. हे काय नाव आहे..??

माझ्या आईने उत्तर दिले, त्याचे बाबा पत्रिका बघणारे आहेत. ते तसे वाटावेत म्हणून त्याला असे नाव दिले आहे. अश्या व्यवसायातील माणसे आपल्या मुलांची नावे अशीच हटके ठेवतात.

आता यात लॉजिक शोधायला जाऊ नका. आमच्याकडे हे असे वरचेवर चालते. मी सिरीअलची सिरीअसली टिंगल उडवणार आणि माझी आई तेवढ्याच सिरीअसली त्या सिरीअलचा बचाव करणार, जणू काही तिची होणारी सूनच त्या सिरीअलमध्ये काम करतेय.

बाकी सिरीअलमध्ये काही दम नाही पण आमच्या घरचे अफाट आहेत.. स्टार प्रवाहवरची सखे ग टाक पुढचे पाऊल अक्कासाहेब सुद्धा बघितली जाते.... तर जिल्ले इलाही झेलतील हिलाही

कोणालाही कमी लेखू नये... पण मी या मालिकेच्या हिरोला पाहताच किंवा तो हिरो असल्याचा संशय येतात सिरीअलीस्टाईलमध्येच तीन वेळा आईला विचारले... हा हिरो आहे? हा हिरो आहे? हा हिरो आहे? .. कारण कुठल्याही अँगलने तो साईड हिरोच वाटत होता..

त्यांना लिंनि अर्थाने वापरायचे असेल. "मुलगा अगदी नक्षत्रासारखा देखणा आहे हो!" असा संवाद असेल सिरीयल मधे.

त्या लिन्क वरच्या जाहिरातीत वसु नाव दिसले (किंवा वासू).

त्याला वसु म्हणतात त्याचे मित्र.

ऋन्मेष, ती आक्कासाहेब माझी आई पण बघते Sad . त्यावरून परवा भाऊ वैतागला होता. Lol

अहो अन्जू ती खरेच अफाट सिरीअल आहे.. तिच्या पटकथेपुढे महाभारत बालकथा वाटेल.. तुमच्या भावाला पुर्ण सहानुभूती आहे Sad

फारेंण्ड मग वसूच असेल रे, आमच्याकडे वासू म्हटले की नाक्यावर उभे राहणारे पक्षीनिरीक्षक Happy

"मुलगा अगदी नक्षत्रासारखा देखणा आहे हो!" असा संवाद असेल सिरीयल मधे. हे लय भारी Lol

ते अल्फा मराठी असल्यापासून झी मराठी होईपर्यंत जे नितीन वैद्य धुरा सांभाळत होते झीची आधी (आता काही वर्ष नाही), त्यांचीच दशमी क्रिएशन ही निर्मिती संस्था आहे आणि त्यांचीच ही सिरीयल आहे. त्यांच्या बाकीच्या सिरीयल वेगवेगळ्या channel वर चालू आहेत. दुर्वा, कमला.

काय योगायोग बघा.. दुर्वा आता फोनवर आहे.. चालू आहे समोर... रात्रीचे दीड वाजता.. शंभर वर्षे आयुष्य.. सिरीअलचे.

ऋन्मेष हो, एरवी भाऊ नसतो घरी, परवा नेमकी सुट्टी होती. बहिण आईला सांगते त्यापेक्षा तू माझा सांगाती बघ, तुकाराम महाराजांची पण आई ती रिपीट दुसऱ्या दिवशी बघते पण त्यावेळी आक्कासाहेबच.

ती दुर्वा मी बघत नाही पण बरीच वर्षे चालू आहे. कमला पण नाही बघत.

आमच्याकडे या रीपीट टेलिकास्टना अ‍ॅडजस्ट करत एकूण एक मालिका बघितल्या जातात. मी चला हवा येऊ द्या वगळता एकही स्वताहून बघत नाही. बस्स आईच्या अवतीभवती रेंगाळत असल्याने नजरेस पडतात .. असो, आता ती कलर्स वरची बालगणेशाची लागलीय.. चला शुभरात्री!

शुगोल, तेच म्हणायचं होतं, की नक्षत्र स्त्रीलिंगीच असतात ना? Happy
"मुलगा अगदी नक्षत्रासारखा देखणा आहे हो!" >> Biggrin मग क्लोजप नक्षत्रा. Wink

ती काहीतरी स्टोरीपण आहेना, सर्व नक्षत्र ह्या बहिणी २७ आणि त्यांचा विवाह चंद्राशी होतो. त्यामुळे अमितव म्हणतायेत त्यात point आहे.

नक्षत्र स्त्रीलिंगीच असतात ना? >>> असा काही नियम असेल मला माहित आनी. मी फक्त "पुनर्वसु" हे काय याचं उत्तर दिलं. खरं तर नक्षत्र हा शब्द आपण ' ते नक्षत्र ' असा वापरतो. Wink

तसंच, सर्व नक्षत्र ह्या बहिणी २७ आणि त्यांचा विवाह चंद्राशी होतो. >>> अशी काही स्टोरी असेल तर माहित करुन घ्यायला आवडेल.

फार आठवत नाही पण पूर्वी टीव्हीवरच एका धार्मिक सिरीयलमध्ये बघितलं. बहुतेक 'दक्ष' राजा (कदाचित संदर्भ चुकत असेल) त्याच्या २७ मुली, सर्वांचा विवाह चंद्राशी होतो, चंद्र मात्र रोहिणीवर जास्त प्रेम करतो त्याचा इतर बहिणींना राग येतो, त्या पित्याकडे तक्रार करतात. एवढंच आठवतंय.

नक्षत्रानुसार प्रभाव आणि राशीफल

पुनर्वसू - विचारपूर्वक कार्य करणारा, शिक्षक, तल्लख, दंतरोगांनी त्रस्त, सासुरवाडीकडून धन प्राप्त करणारा , वृद्धावस्थेत सुखी, स्वच्छ वस्त्रांची आवड असणारा, तापट, क्रोधी, अभिमानी, उच्चाभिलाषी, उत्तम - महत्वपूर्ण पद प्राप्त करणारा , व्यभिचारी / आळशीळ, हात पायांच्या पीडेने त्रस्त.

सिरीअलीस्टाईलमध्येच तीन वेळा आईला विचारले... हा हिरो आहे? हा हिरो आहे? हा हिरो आहे? .. कारण कुठल्याही अँगलने तो साईड हिरोच वाटत होता..>> ऋन्मेऽऽष सेम पिंच..
आज त्या पुनर्वसुला मुद्दाम पाहिला. गिरीश ओक आल्यानंतरचा हाॅस्टेलमधला सीन. कोण हिरो तेच कळेना मला. Uhoh

त्यातही हिरो आणि घोंगडी हातात घेऊन त्या बेडशेजारी उभा असलेला मित्र दोघे सख्खे भाऊ वाटावे इतक्या सारख्या चेहर्‍याचे दिसत होते.

कापोचे, मृग नक्षत्राबद्दल पण सांगा ना. Happy

कॉलेजमधल्या वयाचे वाटावे असे हिरो-हिरोईन आहेत हे चांगलच आहे की. नाहितर स्वजो, सई सारख्यांना एफ-वाय मधले म्हणून खवपतात ! Uhoh

अजून पाहिली नाही ही मालिका. होपफुली बरी असावी.

Pages