पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो म्हणूनच मी ही सिरीयल बघत नाही, काल रजनीकांत सिरीयलमधे मोठा ब्रेक होता ३ मिनिटांचा, तेव्हा सहज लावली. बाकी साड्यांबद्दल कुठल्या कोणत्या आधीच्या सिरीयलमधल्या ते एका मैत्रीणीने w a वर लिहिलं मला म्हणून माहिती. पडदे काल सोताच्या डोळ्याने बघितले.

कालची उर्मी सर्व साधारण (normal) वाटली. एकदम लॉजिकल बोलली. नंदिनी वारलेल्या वडिलांची खोटी शपथ घेते आणि उर्मीवर आरोप करते. वासूची बहीण जेव्हा तिला या बद्दल विचारते तेव्हा ती म्हणते मी माझ्या जिवंत बाबांची शपथ घेऊन सांगते की मी असं काहीही बोलले नाही. मग मेलेल्या माणसाच्या शपथेपेक्षा जिवंत माणसाच्या शपथेची किंमत जास्त ना? एकदम लॉजिकल! उर्मी बद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षा भंग होऊ नये ही channel चरणी(creative director) विनंती.

अरे एवढं सगळं होऊनही उर्मी त्या नंदुटल्याची काळजी करतेय. Uhoh
हिच्याशी लग्न करायला तयार असणार्‍या NRI पार्थशी तिचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न करायचा. Uhoh

उर्मी पण अधू व्हायच्या वाटेवर चालू पडलीय...

अगदी अगदी, पण महत्वाचं म्हणजे त्या वासुला तरी कळतं की लंडन वाल्याशी तिचं शक्य नाही. दोघांत एक तरी सेंसिबल वागो ही इच्छा !!!

काल्च्या भागात मठाधिपतींना नंदिनी खोटी वाटते का उर्मि ? नंदि असेल तर आश्चर्य म्हणायच. कारण आत्ता पर्यंत मालिकांमधे कोणी एवढं हुषार दाखवल नव्हतं.

नाही नाही असं काही नाही, तो झी वाल्यांचा नाव न घेता बोलण्याचा नेहमीचाच आवडता घोळ आहे. त्या काकु नंदिनी बद्द्ल बोलतात आणि मठाधिपतीं उर्मी बद्द्ल

ओह्ह तरीच म्हंटल एवढे हुषार कसे झाले ? ती माई तर वारा वाहेल त्या दिशेने जात असते. स्वतःची मतच नाहीत.

ओह्ह तरीच म्हंटल एवढे हुषार कसे झाले ? ती माई तर वारा वाहेल त्या दिशेने जात असते. स्वतःची मतच नाहीत.

<< काकु नंदिनी बद्द्ल बोलतात आणि मठाधिपतीं उर्मी बद्द्ल >>किती कृत्रिम व बालीशपणे असले कौटूंबिक घोळ[ [ ज्याला सिरीयलवाले 'ग्रेट सस्पेन्स' समजत असावेत !] निर्माण करतात !!

मला काल त्या उर्मीच्या जावेसाठी फार वाईट वाटलं. काही प्रमाणात स्वतःला रीलेट करू शकले तिच्याशी.

तिला घरातल्या पोझिशनसाठी नवर्‍याच्या घरातल्या पोझिशनवर अवलंबून राहावे लागतेय. मठाधिपती का काय ते बनण्यासाठी काय कर्मठ उद्योग करावे लागतात. ते ती लग्न झाल्यापासून आज ना उद्या सासरे आपल्या नवर्‍याला मठाधिपती या पदासाठी एलिजिबल समजतील या आशेवर करतेय. तिच्या आयुष्यात इतर काही मुल बाळ नाही. पर्यायाने कोड कौतुक, प्रेम हे सगळंही नाही. अश्यावेळी तिच्यासाठी नवर्‍याने मठाधिपती बनणे हाच एक विचार सतत घोळत राहिला तर नवल नाही. त्यामुळे ते पद हातातून जातेय असं वाटलं तर तिचं इन्सिक्युअर होणंही मला अगदी स्वाभाविक वाटतं.

दुसरीकडे ज्याच्यावर तिची सगळी भिस्त आहे त्या नवर्‍याला काडीची महत्वाकांक्षा दिसत नाही. आपण नाही तर आपल्या बायकोसाठी कमवावे..तिला दागदागिने घ्यावे याची शून्य जाणीव आहे. एकत्र कुटुंबात राहाणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व (मग यात स्वतःचा वेगळा असा काही संसार, स्वतःच्या किंवा स्वतःच्या जोडीदाराच्या इच्छा आकांक्षा, आवडीनिवडी सगळेच आले) पुसुन टाकणे या थोर्थोर भारतीय संस्कृतीने दिलेल्या शिकवणीचा पगडा डोक्यावर घेऊन तो दादांच्या (दादाच ना? कि अण्णा?) मर्जीनुसार आपले आयुष्य व्यतित करत आहे.

अश्या वेळी जिला महत्वाकांक्षा आहे तिला काही करायला न मिळणे (बाहेर पडून नोकरी करणे म्हणा वा इतरत्र आपले मन रमवणे म्हणा) आणि ज्याच्यावर संपूर्णतः अवलंबून राहावे लागते त्याला काडीची महत्वाकांक्षा नसणे आणि हिच्या मनाचा सल आणि कल त्याने न जाणणे हे तिच्यासाठी खूप अन्यायकारक वाटले.

मला अजुन एक कळलेल नाही, जर दादांना मोठा मुलगा आहे, त्याच लग्न झालेल आहे तर मठाधिपती पदासाठी त्यांना पुनर्वसुच का योग्य वाटतोय आणि त्यासाठी त्याच लग्न होण्याची वाट का बघत होते किंवा त्याच लग्न करण्याच्या मागे का लागले होते? पुनर्वसुपेक्षा मोठा मुलगाच अधिक योग्य नाही का या पदासाठी? कारण तो पूर्णवेळ दादांबरोबर राहुन मठाच कामकाज बघतोय, पुनर्वसु शिक्षणासाठी बाहेर आहे त्यामुळे मठाच्या कारभारतल्या खाचाखोवा या पुनर्वसुपेक्षा मोठ्या मुलालाच जास्त माहित असणार ना?

दादांना मोठा मुलगा आहे, त्याच लग्न झालेल आहे तर मठाधिपती पदासाठी त्यांना पुनर्वसुच का योग्य वाटतोय>>
मठाधिपती दादांच्या इच्छेप्रमाणे नाही तर लोकांच्या (बहुतेक देणगी देणारे नक्की माहित नाही) मताप्रमाणे ठरवला जातो आणि त्यांना पुनर्वसु मठाधिपती पदासाठी योग्य वाटतोय. (मी साबांना असाच प्रश्न विचारलेला तेव्हा त्यांनी सांगितलेली माहिती.)

अरे मग त्याच लग्नच कशाला व्हायला हव? आणि तस असेल तर लोक काय व्होटिंग करुन मठाधिपतीची निवड करणार का?

निधी, हे जनरल मठांमध्ये चालत असेल. कारण वासुच्या लग्नाविषयी बायकोशी बोलत असताना दादाच स्वत: म्हणाले होते की एकदा का पुनर्वसुंच लग्न झाल की मठाचा कारभार त्यांच्यावर सोपवता येईल. तसच मोठी सून कुमुदसुद्धा त्यावेळी याच विचाराने धास्तावलेली असते की पुनर्वसुच लग्न झाल्यावर मठाधिपतीची सूत्र त्याच्या हाती जातील. यावरुन हेच लक्षात येत की इथे भावी मठाधिपती दादांच्याच निर्णयाने ठरवला जातो...

हे जनरल मठांमध्ये चालत असेल. >>
अगं मी त्यांना विचारलं होतं जर वासूला या मठाधिपती पदात इंटरेस्ट नाही तर त्याला का करतायत मठाधिपती मोठ्या भावाला का करत नाहीत.. यावर त्यांनी सिरियलमध्येच आधी लोकांनी वासूलाच मठाधिपती करायची मागणी केली होती आणि दादा मठ म्हणजे लोकांचीच प्राॅपर्टी मानतात त्यामुळे लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यालाच करणार मठाधिपती असं या सिरियलच्या संदर्भातच सांगितलं.

जनरल मठांबाबत अन् लग्नाबद्दल काही माहीत नाही मला.

दादांना वाटते की वासू मठधिपती होण्यास जास्त लायक आहे. कारण राम घाबरट आहे. सांगकाम्यासारखा वागतो. धडाडीने काही निर्णय वगेरे घेत नाही.

दादांना वाटते की वासू मठधिपती होण्यास जास्त लायक आहे. कारण राम घाबरट आहे. सांगकाम्यासारखा वागतो. धडाडीने काही निर्णय वगेरे घेत नाही. >>>> डोंबल, इथे माझ एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार हे वडीलांना सांगायच धाडस करु शकला नाही, तिकडे उर्मीला माझ्या घरच वातावरण जुन्या वळणाच आहे हे स्वतः तोंडाने सांगायच सोडुन पत्र पाठवत बसला, पळुन जाउन लग्न करुन घरी आल्यावरसुद्धा बोलला नाही की आम्ही तुम्हाला न सांगता लग्न करुन आलोय कारण माझ आणि उर्मीच एकमेकांवर प्रेम आहे, ज्या दिवशी लग्न होत त्याच दिवशी आपला साखरपुडा दुसर्‍याच मुलीशी ठरवलेला असल्याच होणार्या बायकोला सांगु शकला नाही.

पर्सनल लाईफमध्ये इतका लेचापेचा असलेला माणुस मठाधिपतीच्या पदासाठी कसा काय लायक ठरतो ब्वा? त्यापेक्षा राम बरा नवे काही निर्णय नसते घेतले तरी किमान आखुन दिलेल्या वाटेवर तरी निमुटपणे चालला असता आणि शेवटी मठ चालु रहाण्यासाठी तिथे येणार्‍या भक्तांची महाराजांवरची श्रद्धा महत्त्वाची मठाधिपती कोण आहे याच्याशी काय घेण देण?

जिथे दादा स्वतःच खर्‍या खोट्याची शहानिशा नीट करू शकत नाहीत तिथे त्यांच मुलांबद्दलच जजमेंट कस काय बरोबर असेल बुवा Wink

आणि वासु कोणता इतका ' डायनॅमिक' आहे? मद्दड दिसतो अगदी. ऊर्मी तरी स्मार्ट वाटते. मठाधिपती म्हणे ! अरे! कोणत्या जमान्यात वावरताहेत ही लोकं..? अर्थात वर म्हटल्याप्रमाणे ' देणगीदारांची' इच्छा आहे की वासु ने मठाधिपती व्हावं! का ही ही !!
Happy
निधी ,साबांकडून असेच अपडेटस घेऊन सांगत जा!

Pages