एअरलिफ्ट (AIRLIFT)

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 January, 2016 - 08:59

पंधरा-वीस पंचवीस वेळा ट्रेलर पाहिले होते तेव्हाच हा चित्रपट कोणाच्या परीक्षणाची वाट न पाहता बघायला जायचे हे ठरवले होते. आज तो निर्णय चुकला नव्हता यावर शिक्कामोर्तब करून आलो.

हा चित्रपट निघाला नसता तर माझ्यासारख्या अज्ञानी लोकांना कधी समजलेही नसते की ईराकने कुवैतवर केलेल्या हल्ल्यात तब्बल पावणेदोन लाख भारतीयांचे जीव धोक्यात होते. त्यांना एअरलिफ्ट करणे म्हणजेच हवाई मार्गाने तिथून सुखरूप हलवणे याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एवढ्या लोकांना परत आणने केवळ भारतीय एअरफोर्सच्या विमानांना शक्य नव्हते म्हणून सोबतीला एअर ईंडिया, ईंडियन एअरलाईन्सच्या विमानांची मदत घेतली गेली ज्यांनी खरे तर असे वॉर झोनमध्ये जाण्याची रिस्क घेणे अपेक्षित नसते. दुसर्‍या देशात अडकलेल्या आपल्या देशवासीयांची अशी सुटका करण्याचे हे जगाच्या ईतिहासातील सर्वात मोठे उदाहरण आहे. अशी अभिमानास्पद कामगिरी पडद्यावर बघणे आणि त्याबद्दल जाणून घेण्याची संधी सोडायची नव्हतीच. याऊपर एक कलाकृती म्हणून देखील हा चित्रपट खूप आवडला.

इराकचे रणगाडे कुवैतच्या रस्त्यावर फिरत आहेत. त्यांचे उन्मत्त सैनिक कुवैती नागरीकांची लुटालूट करत आहेत. जीव घेणे हा निव्वळ पोरखेळ बनला आहे. कधी कोण कुठून येऊन मारेल याची श्वाश्वती नाही. ना कसला कायदा, ना कानून. कुवैतचे सरकार सर्व नागरीकांना तसेच मरण्यासाठी सोडून पसार झाले आहे. हे कधी थांबेल याची कल्पना नाही. कोणीतरी येऊन आपली सुटका करेल याची वाट बघायची एवढेच आपल्या हातात उरलेय. अश्या परिस्थितीत कुवैतमधील एक भारतीय उद्योगपती (अक्षयकुमार) पुढे सरसावत, उद्भवलेल्या परिस्थितीनुसार स्वत:कडे नेतृत्व घेत, आपल्या काही सहकार्‍यांच्या मदतीने सर्व भारतीय निर्वासितांना एका छत्राखाली आणत त्यांच्या निवार्‍याची आणि सुरक्षिततेची काळजी घेतो. सर्वांच्या सुटकेचे प्रयत्न करत अखेर भारत सरकारशी संपर्क साधून त्यांच्यासोबत सुखरूप भारतात परततो, असा एकंदरीत प्लॉट आहे.

अक्षयकुमारला त्याच्या खिलाडीपटांपासून फॉलो करत असल्याने एक अभिनेता म्हणून त्यात घडत असलेले बदल बरेचदा थक्क करतात. या चित्रपटाने त्याला आणखी एक पातळी वर नेले आहे. त्याची विनोदाची शैली आवडतेच पण त्याच्यातील संयत अभिनेता जास्त आवडतो. आता त्यातही खूप सहजता येऊ लागलीय. या भुमिकेचे बेअरींग पहिल्या द्रुश्यापासूनच तो जबरदस्त पकडतो. पुढचा चित्रपट आपण त्याच्या नजरेने आणि त्या परिस्थितीत स्वत:ला त्याच्या जागी ठेवून बघतो.

हिरोईनला तुलनेत तितकेसे फूटेज नसल्याने ती कदाचित शोभेची बाहुली बनून राहिली असती. पण निम्रत कौर जेवढी छान दिसते तेवढीच ती लक्षातही राहते. तिच्या वाट्याला आलेल्या एकदोन भावखाऊ प्रसंगांचेही तिने आपल्या डायलॉगबाजीने चीज केले आहे. एक गंमत म्हणजे तिचे रूप बघून मला सारखी भिती वाटत होती की इराकी सैन्य कुवैती समजून हिलाच धरताहेत की काय..

ईतर छोटीमोठी पात्रे जी या प्रवासात भेटतात त्या प्रत्येकाने आपापले काम चोख बजावलेय. कुठलेही पात्र वा प्रसंग अनावश्यक वाटत नाही. चित्रपटाची लांबी वाढवत त्या पात्रांना आणखी खुलवले असते तरी बघायला आवडले असते. अर्थात, थिएटरमध्ये पैसे मोजून गेलोय आणि चित्रपट चांगला निघालाय तर तो आणखी बघावासा वाटणे ही हाव देखील यामागे असू शकते.
पण चित्रपट मुख्यत्वे अक्षयकुमारने केलेल्या प्रयत्नांभोवतीच फिरत राहिल्याने आपल्या इथून भारतीय अधिकार्‍यांनी जे काही प्रयत्न केले असतील ते तितकेसे प्रभावीपणे दाखवण्यात आले नाहीत असे मला वाटते. जर परीक्षकाच्या भुमिकेतून मला कुठे मार्क कापावासा वाटला तर तो मी इथे कापेन.

चित्रपटातील संगीत आवडले. सुरुवातीचे कुवैती आयटम सॉंग "दिदी" या अरेबिक गाण्यालाच भारतीय तडका देऊन त्याचे "दे दी" बनवल्याने आपण कुवैतमध्ये आहोत हे थोडक्यात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास यशस्वी ठरते. त्यानंतर लगेचच मुख्य घडामोडींना सुरुवात होते आणि पुढे येणारी गाणी कुठेही चित्रपटाचा मूड खंडीत करत नाहीत. शेवटचे केके च्या आवाजातील "तू भुला जिसे" गाणे त्यातील शब्दांसह बॅकग्राऊंड म्युजिकचे काम करते. तर मध्यंतराला जेव्हा सर्वांना एक सुटकेचा मार्ग दिसतो तेव्हा एक पंजाबी ठेक्याचे गाणे ताल धरते. पण चित्रपटातील माझे सर्वात आवडीचे गाणे, "तेनू ईतना मै प्यार करा, एक पल विच सौ बार करा.." https://www.youtube.com/watch?v=skPuv-EppEg .. वाह! अर्जित सिंगचा जादुई आवाज कमाल करून जातो. चित्रपटाची कथा थ्रिलरला साजेशी असूनही तो पुर्ण तसा न बनवता काही हळूवार प्रसंग दाखवलेत, त्यापैकी अक्षय आणि निम्रत कौरच्या नात्यातली पैलू हे गाणे तितकेच हळूवारपणे उलगडून जाते.

शेवटाकडे जाताना अतिरंजित ड्रामा टाळला आहे. तरीही जेव्हा भारताचा ध्वज फडकतो तेव्हा अंगावर शहारा येतोच. दूरदेशी अडकलेल्या भारतीयांसाठी तिथे भारताचा ध्वज फडकताना बघणे हा कसा आधार ठरू शकतो हे आपल्यालाही जाणवते. हा एक प्रसंग आणि त्यानंतर जेव्हा एअर ईंडियाचे पहिले विमान भारतीयांना घेऊन भारताच्या दिशेने उड्डाण करते तेव्हा, या दोन प्रसंगी थिएटरमध्ये आपसूक हलक्याश्या टाळ्या वाजल्या. घरी टिव्हीसमोर क्रिकेटची मॅच बघणे आणि स्टेडियममध्ये जाऊन भारताला जिंकताना बघणे या दोघांमधील फरक त्या टाळ्यांनी अधोरेखित केला. हा अनुभव घ्यायला तरी हा चित्रपट बघायला जायलाच हवे.
- समाप्त -

तळटीप - हे परीक्षण नाहीये तर मला चित्रपट आवडला म्हणून त्याबद्दल चार लोकांना सांगावेसे वाटले ईतकेच.

सर्वांना येत्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह, आता लेट कॉन्ट्रोवर्सी.. पण तथ्य असू शकेल..
मात्र हे देखील खरेय की अक्षयकुमारला हिरो म्हणूनच वावरताना दाखवले असले तरी शेवटी भारताचा, भारतीय एअरफोर्स, एअरलाईनचा आणि भारतीय असल्याचाच अभिमान वाटतो.

रोज पहिल्यापानावर ४ असतात पण आज चक्क ५ व्या पानावर एक दिसला. ठिक आहेस ना ऋन्मेऽऽष?
>>>>>
हा हा, हो.. म्हणजे नाहीये ठीक, बरोबर ओळखलेत.. तब्येत गंडलीय जरा.. माझा कधीही बरा न होणारा आजार.. जरा जीवात श्वास आला आणि श्वासात ताकद आली की टाकतो एक लेख यावरही.. तोपर्यंत सध्या उपवास Happy

Runmesh take care. I was also worried that you have not been posting this last week.

काळजीबद्दल धन्यवाद अमा, सस्मित..
तब्येतीची काळजी आणि सध्या हाती असलेले एक महत्वाचे काम या दोन्हींचा विचार करता हा पोस्टींचा दुष्काळ महिनाभर चालेल. पण आता या घडीला तब्येत ठीक आहे Happy

आपल्या इथून भारतीय अधिकार्‍यांनी जे काही प्रयत्न केले असतील ते तितकेसे प्रभावीपणे दाखवण्यात आले नाहीत असे मला वाटते.<<<

चांगला चित्रपट Happy

चित्रपटात बर्‍याच लोकांचे क्रेडिट पुरेसे दिलेले नाही. जे मूळचे उद्योगपती मॅथ्यू आहेत त्यांचा फोटो आणि बातमी पटकन एका स्लाईडवर शेवटी दाखवली आहे ती नीट दिसतही नाही. पररष्ट्र मंत्रालयाबाबत जरा अतिच केले आहे.शेवटी हे सगळे को ओर्डिनेशन त्यानी केल्याशिवाय होणे शक्य नाही आणि अयर इंडिया ही सरकार मध्ये असल्याशिवाय असे काम करणारही नाही. त्यावेळे पंप्र गुजराल सद्दमला जाऊनही भेटले होते , हे कुठे आलेले नाही .कत्यालच्या प्रयत्नाचे महत्व आहेच पण कत्यालचे एकट्याचे नाही. असे असले तरी या विषयावर चित्रपट निघावा आणि तोही इतका उत्तम हे विशेषच आहे. चुकवू नये असाच....

शनिवारी हा सिनेमा पाहिला. खूप आवडला.
कुवेती मेजर फारच आवडला. तो केबीसीच्या एका सीझनच्या जाहिरातीत होता. (एका गावात तंबू, डेकोरेशन, माईक वगैरे लावून तयारी करतात, आणि अमिताभचा केबीसी-एपिसोडचा ओपनिंग डायलॉग आख्ख्या गावाला ऐकवतात...)
फिल्मिस्तानमधेही त्यानं मस्त काम केलंय.

सिनेमाच्या शेवटी प्रत्यक्षात हे रेस्क्यू ऑपरेशन घडवून आणणार्‍या दोन्ही भारतीयांचे फोटो आणि नावं दाखवलेली आहेत. अक्षयकुमारने रंगवलेल्या पात्राचं काम प्रत्यक्षात यांनी केलं आहे अश्या अर्थाची ओळही आहे की! कॉन्ट्रोवर्सी कसली आलीय त्यात...

काल बघितला... एकदम मस्त वाटले चित्रपट बघून.
थिएटर मधे चित्रपट संपल्यावर सगळ्यांनी ऊत्स्फुर्तपणे वाजवल्या. खूप मस्त वाटले.
रणजीत कट्याल हे डमी नाव आहे. सेक्यूरीटी रिझन्स मुळे मि. मॅथ्यु यांचे नाव तेव्हा डिस्क्लोझ केले न्हवते असे कुठे तरी वाचले.

आवडला :).
अक्शयकुमार इतकेच सहकलाकार पण मस्तं !
ती लंच बॉक्स मधली अ‍ॅक्ट्रेस, इराकी मेजर, जॉर्ज , गव्हर्मेन्ट ऑफुसर कोहली ( स्वाभिमान मधला एकनाथ ), पूरब कोहली सगळ्यांनी मस्तं काम केलय .
तो इराकी मेजरचं काम करणारा मुळ कुठल्या देशाचा आहे ? अ‍ॅक्सेंट काय मस्तं जमलाय !
खटकलं फक्तं एकच्, अशा थ्रिलर सिनेमात गाणी टाकायचा मोह कधी आवरणार बॉलिवुडवाले Uhoh

ऋन्मेष, काय झाले तुला? कसला आजार आहे? नीट काळजी घे आणि काही मदत लागली तर सांग.

मी अक्षय कुमारचे खूप सिनेमे पाहिले आहेत कारण तो माझ्यावेळेसचा हीरो आहे.
ऐसर लिफ्ट प्रचंड आवडला. कुठेच बोअर झाला नाही.

शेवटचे रेस्क्यू ऑपरेशन जरा सावकाश दाखवायचे असते. एकदम गुंडाळले ते सगळे. संजीव कोलहीने ते काम कसे केले, पायलट लोकांनी कसे मान्य केले, भारतात आल्यावर ह्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या, ती कुवेतची मुलगी भारतात आली तिचे काय झाले.. हे सर्व दाखवायला हवे होते.

पासपोर्ट नसताना हे सर्व चालता का पण फक्त एका पानावर सही करुन दुसर्‍या देशात जायला? मला हे काहीच्या काही वाटल. त्यात जर इतर देशाची एखादी व्यक्ती आली तर?

त्यात जर इतर देशाची एखादी व्यक्ती आली तर?

मला वातते जॉर्डनमधला भारतीय अधिकारी हाच मुद्दा उपस्थित करतो. नोकरशाही ही कुणाला तरी जबाबदार असते त्यामुळे त्याना भावनावश होऊन चालत नाही. आईकमन नावाचा जर्मनीचा युद्ध गुन्हेगार जर्मनीतून रेड क्रॉसच्या मदत कँप मधून अर्जेंटिनात सटकला आणि तिकडेच नाव बदलोन सेटल झाला ( तरीही मोसादच्या लोकांनी त्याला अर्जेरिसमधून अपहरणासारखे रस्त्यावरून उचलून विमानात कोंबून पकडून आणून फाशी दिलाच ) त्यावर गॅरिबाल्डी हाऊस नावाचा अत्यंत सपक चित्रपट येऊन गेला. मात्र त्याचे मराठीतले पुस्तक फार थरारक आहे.

प्रत्येक देशाचे कायदे कानून असतात. भारताचे का.का. फार कडक नाहीत. मुळात भारत आणि भारतीय खूप भावनाशील आहेत.

ह्या सिनेमाचा दुसरा भाग यायला हवा. की हा सगळा प्रकार कसा काय घडला. शेवट फार संक्षिप्त केला आहे. एकही विमान लिफ्ट होताना दाखवले नाही.

शेवट बहुधा एडिटिंग मुळे फारच अ‍ॅबरप्ट झालाय. ही विमाने अम्मानवरून उडाली ना? कुवेत मधून की अम्मनमधून ते नक्की कळत नाही. तसेच कुवेत मधून अम्मनला कसे गेले सौदीतून की इराकमधून तेही कळत नाही. सुरुवातीला डिटेलमध्ये चाललेला चित्रपट शेवटी फारच गुंडाळला आहे.

ही विमाने अम्मानवरून उडाली ना? कुवेत मधून की अम्मनमधून ते नक्की कळत नाही. तसेच कुवेत मधून अम्मनला कसे गेले सौदीतून की इराकमधून तेही कळत नाही.>>>>>>>> जॉर्ड्नहुन विमानं उडाली.

around 1.5 lacs (approx) people were evacuated from Kuwaiti camp to Jordan. this would have happened over a period of around days 5-7 days approx maybe even more. in the movie its shown everything happened overnight. how did katiyal managed to get so many vehicles to evacuate so many people and get everything orchestrated overnight, or did katiyal managed only a few people to be evacuated uptill Jordan, and the rest may have followed him.

i have heard stories of people walking and taking different means of transportation and covering the distance from kuwait to jordan (amman) over a period of a month.

in my opinion evacuation would have been done only for those who were carrying valid passports and working visa.

एकूणात गवर्नमेन्ट एजन्सीजच्या इन्व्होल्वमेन्ट शिवाय येवढे होणे अशक्यच आहे. एक आहे सरकारी यंत्रणा कार्यान्वित होईपर्यन्त कुवेतमधल्या भारतेयांचे कॅम्पिंग, खाणे पिणे , सुरुवातीच्या ट्रूप्स कायदेशीर- बेकायदेशीर मार्गाने बाहेर काढण्याचा प्रयत्न नायकाने ( म्हनजे जे कोण मूळ मॅथ्यूज वगैरे ) होते त्यांनी केले असणार आणि तेही काही कमी नाही. कारण ते त्यानी नसते केले तरी त्यांची ती जबाबदारी नव्हती. पण देशप्रेमापोटी त्यानी बरेच काही केले हेही सत्यच. आता सिनेम्याटीक लिबर्टी म्हणून नायकाला लार्जर करण्याच्या हेतून इतरांचे ड्यू क्रेडिट पुरेसे दिले नाही एवढेच. मूळ कट्याल ( मॅथ्यू) चे काम अजोड आहेच. आणि ते घेतलेली आहे थरारक. काहीसे डिस्टॉर्शन आहे पण चलता है ती काही ऐतिहाशिक दॉक्युमेन्टरी नाही.

Pages