नाईट रायडर्स ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 January, 2016 - 10:08

नाईट रायडर्स ..
सहज सोप्या मराठीत सांगायचे झाल्यास, जे रात्रीच्या अंधारावर स्वार होत आयुष्याचा आनंद भरभरून लुटतात ते रात्रभैरव !

मात्र ज्यांना रात्रपाळीसाठी वा ईतर कामासाठी नाईलाजाने जागावेच लागते ते यात नाही मोडत. अश्यांना फार तर रात्रीचे पहारेदार म्हणता येईल.

तर या नाईट रायडर्स क्लबमध्ये ते येतात जे उर्वरीत जग झोपले असताना केवळ मौजमजेसाठी, आयुष्य आपल्या पद्धतीने आणि ईतरांच्या लुडबुडीशिवाय जगता जावे म्हणून जागत राहतात. ज्यांच्यासाठी रात्रीचे जागणे हेच खरे जगणे असते. दिवसा कुठेतरी ते आपली दिनचर्या रात्रीच्या आगमनाची वाट पाहत व्यतीत करत असतात किंवा वटवाघूळासारखे उलटे लटकून निपचित पडलेले असतात.

ज्यांचा विकेंड रात्रींमध्येच साजरा होतो आणि पहाट झाली की जे भिंतीला तंगड्या लावून सुर्य डोक्यावर येईपर्यंत बेडवर डाराडूर पडले असतात...
ज्यांची छोट्याश्या सहलीची कल्पना नाईट स्टे आणि त्या रात्रीत केलेली धमाल या भोवती रेंगाळते...
ज्यांनी आपली शैक्षणिक डिग्री मित्रांबरोबर स्टडी नाईटस मारून मिळवलेली असते...
ज्यांना शाहरूखच्या पिक्चरचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ नाही तर एखाद्या अ‍ॅक्शन थ्रिलर मूवीचा ‘लास्ट शो’ बघण्यात जास्त ईंटरेस्ट असतो...
ज्यांना झोप उडवणार्‍या सकाळच्या चहापेक्षा रात्र जागवणार्‍या कॉफीचे घोट जास्त लुभावतात...

वगैरे वगैरे .. वगैरे वगैरे..

तर माझ्या नाईट रायडर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या रात्रीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, रात्र जागवायचे छंद, वाचायची पुस्तके, ऐकायची गाणी, गप्पांचे विषय, करायचे किडे, सारेच काही ईतर चारचौघापेक्षा वेगळे असते. ते इथे गप्पांच्या ओघात शेअर करूया. आजवर जागवलेल्या आपल्या अविस्मरणीय रात्रींच्या आठवणी जागवूया. त्या रात्रींचे अनुभव एकमेकांना सांगूया Happy

आशा करतो, मी एकटाच इथे वटवाघूळ वा घुबड नाहीये Happy
तोपर्यंत आलो जरा भटकून ......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्या उद्या सान्गन. तोपत्तुर रात नावाचा पिक्चर पा आणी गाणी ऐक.

रात अकेली है..

रातका समा, घुमे चन्द्रमा

रात बाकी, बात बाकी...

भीगी भीगी रातोमे कभी तुम आओ ना..

१. कार + किशोर + आर डी! दि बेस्ट कॉम्बो Proud निवांत रस्त्यांहून शांत गाणी वाजवत भटकायचे Happy घाटांमध्ये खूप झ्याक फिलिंग.

२. पूर्ण रायडींग गीअर, आर्म आणि नी गार्ड, लेदर ज्याकेट (फुल इष्टैलमे) घालून बुलेटा भटकावत ढाबे गाठायचे. भरपूर तंदूर चिकन हाणायच आणि बुलेटची धडधड ऐकत निवांत घरी यायचं.

बाकी अजून टंकतो.

व्वा ऋन्म्या.. ये हुई ना बात!
मलासुद्धा रात्री जगायची सवय आहे. (इंजिनियरिंग केलेल्या बहुतेकांना असेलच अर्थात)

पूर्वी एक काळ होता मी रात्री गाणे ऐकत बसायचो.
कोणाशीतरी बोलत बसायचो कधिकधी. माझी एक मैत्रीण सुद्धा अशी निशाचर आहे. तिच्याशी गप्पा होत असत बऱ्याचदा. पण लवकरच आमच्या कडचे विषय आटले.
कधी पुस्तक असेल तर वाचत बसायचो. आता पुढे माबो वगेरे वर टाईमपास किंवा थोडे प्रोग्रामिंग वगेरे.
स्टक झालेले technical इश्युज रात्री हमखास सुटतात Happy
youtube वर tp होतो कधिकधी. मी आपकी अदालत वगेरे पाहत बसतो.
youtube वर कुमार विश्वास पाहत बसणे हे मध्येमध्ये एक आवडते काम झाले होते.
नंतर ते हे कोक स्टुडियो, unplugged वगेरे पण पाहतो मूड प्रमाणे.

कॉलेजमध्ये दर वर्षी शेवटची कर्जत लोकल पकडुन पहाटे नेरळ - माथेरान ट्रेकिंग किंवा मढ ला समुद्र किनारी नाईट आउट क॑रायला जायचो. मस्त धमाल यायची. त्याकाळी mp3 किंवा मोबाईल नसल्याने आम्हालाच गाणि म्हणावी लागायची. (सोनी चे वॉकमन नुकतेच बाजारात आले होती पण ते परवडत न्हवते. )

ऊद्या येते. एवढि वाट पाहुन रात्र झालिय. आता dont disturb. ऊद्या सामान्यजनाचा दिवस चालु झाला कि मला खुप वेळ असेल. तेव्हा निवान्त टन्कते.

रात्रीचं जागरणं (ठरवून केलेलं) ही माझी आवडती गोष्ट आहे.

लेख वाचून अशा बऱ्याच रात्री आठवल्या Happy

>>त्याकाळी mp3 किंवा मोबाईल नसल्याने आम्हालाच गाणि म्हणावी लागायची. (सोनी चे वॉकमन नुकतेच बाजारात आले होती पण ते परवडत न्हवते. <<

हो हो, "मेरी तुझे केस, लांब लांब लांब..." या कॅटेगोरीतली... Proud

जव्हेरगंज, हा लेख नाहीये. तर आपल्याला आठवलेल्या रात्रींबद्दलच दोन शब्द लिहायचा धागा आहे.. Happy

प्रकु वाह, आपले बरेच जुळते माझ्याशी..
रात्रीच्या नीरव शांततेत आणि एकांतात आपल्या आवडीची गाणी ऐकणे या सारखी मजा नाही.. आपल्या आयुष्यातील संगीताची खरी किंमत अश्यावेळी समजते.
यू ट्यूबची सवय मलाही हल्लीच लागलीय..
मायबोलीवर सुद्धा रात्री कडमडत असतोच.. अगदी रात्रीचे ३ वाजता प्रकाशित केलेले धागेही दिसतील माझे इथे..
रात्र रात्र जागवून पुस्तके वाचायची सवय शाळेत होती, जेव्हा मोबाईल मायबोली सारखे पर्याय नव्हते..
आणि रात्रीची मैत्रीणींशी चॅटींग म्हणाल तर स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल तो Happy

तिच्याशी गप्पा होत असत बऱ्याचदा. पण लवकरच आमच्या कडचे विषय आटले
.>>>>
याचा अर्थ ती तितकी खास मैत्रीण नसणार Happy
कारण हा निशाचर मैत्रीणींशी गप्पांचा अनुभव मलाही. त्या पैकी ३ अगदी खास मैत्रीणी होत्या, त्यांच्याशी बोलायचे विषय संपणे शक्यच नव्हते. रात्रीचे ३, ४,५, पहाट.. मग त्यातली एक वजा झाली आणि उरलेल्या दोन मध्ये मी एकीच्या तरी प्रेमात पडणार अशी भिती निर्माण झाली... फायनली तसेच झाले.. एक आता माझी गर्लफ्रेंड म्हणून मिरवतेय Happy

रात्री बाइकवर खुप फिरलोय. जेऊन झाल्यावर साबां ना जरा खालुन राउंड मारुन येतो असं सांगुन बाइकवरुन थेट गेटवे-मरीन ड्राइव गाठायचं. Happy

याचा अर्थ ती तितकी खास मैत्रीण नसणार >> अस काही नाही खरं. मला जनरली फार काही सुचत नाही बोलायला.
तरी वर म्हणालो त्या मैत्रिणीशी बऱ्यापैकी काळ बोललो असेन. बाकी जणींशी तर अगदी एक दोन रात्री फक्त.
तरीसुद्धा त्या माझ्या छान मैत्रिणी आहेतच. Happy

तुझी गर्लफ्रेंड निशाचर आहे हे भारीच आहे.
माझी फार लवकर झोपते.

सस्मित मस्त Happy

मला पहिल्यापासूनच लवकर निजणे आणि लवकर उठणे अशी सवय होती.
अलिकडे प्रोजेक्ट बदलल्यापासून निशाचर झाले आहे. रात्री किमान १ वाजतो झोपायला. काम खूप असेल तर २ किंवा अडिच सुद्धा. कॉल असेल तर ३.३०-४.००
त्यामुळे हे असलं जागणं बेक्कारच. काहितरी हवंहवंस करत जागण्याची मजा औरच.

मला पहिल्यापासूनच लवकर निजणे आणि लवकर उठणे अशी सवय होती.

काहितरी हवंहवंस करत जागण्याची मजा औरच. अगदी मम दक्षे.

मी, नाईलाजाने जागावेच लागते, या गटातील. Lol . त्यामुळे वर ऋन्मेषने लिहिल्यानुसार रात्रीचे पहारेदार पण नेटमुळे थोडं सुसह्य, वाचनासाठी छान शांतता मिळते. यु ट्यूबवर आवडती गाणी बघता येतात.

नशीबाला १२ चे ग्रहण लागलेय. ते काही सुटत नाही. कितीही ठरवले तरी सवयीमुळे आता रात्री १२ शिवाय झोप लागत नाही. नवरा टिव्ही बघतोय, तोपर्यन्त मायबोलीवर नाचता येते.

पूर्वी अशा रात्री आम्ही गणपतीत जागवल्यात. रात्री २-३ पर्यन्त देखावे बघत हिन्डायचे. एकदा पहाटे ५ वाजता शनीपाराजवळ गोरे बन्धुन्च्या समोर जे अनोखा केन्द्र आहे तिथे भेळ खाल्ली होती. मी, माझी मामेबहीण, तिची मैत्रिण जी सपे मध्ये रहात होती, तिच्या बहिणी. असा आमचा गृप भटकायचा गणपतीत. एकदा विसर्जनाच्या वेळी रात्री जेवण आटोपुन निघालो, रात्रभर नारायण पेठ, सपे, लक्ष्मी रोड असे भटकत होतो. पहाटे ५ नन्तर पहिला मानाचा कसबा गणपती आला, मग त्या पाठोपाठ जोगेश्वरी, दगडुशेट असे मानाप्रमाणे आले. मग घरी आलो तेव्हा जाणवले की पायाचे दुखुन तुकडे पडलेत. पण काही म्हणा, मज्जानी लाईफ होती ती.

वाह रश्मीताय, गणपतीच्या रात्रींची काय आठवण काढलीत.. फक्त आमच्या अश्या रात्री लालबाग परळ मूंबईनगरीत गेल्या आहेत. जे दिवसा गणपती बघायला जातात ते भाविक असतात आणि रात्री दर्शनाला बाहेर पडतात ते रसिक असतात.
नवरात्रीत सुद्धा आमच्याईथला गरबा संपला की आणखी लेटनाईट चालणारा दुसरा शोधत फिरायचे.. अखेरच्या दिवशी पुर्ण रात्र जागवून दसर्‍याची पहाट उजाडायच्या आधीच आंघोळ उरकून अनवाणी पायाने महालक्ष्मीच्या दर्शनाला तास दीड तास चालत जायचे. जाताना रस्त्याने गाणी गायची. गरबा खेळून आपापल्या घरात शांत झोपलेली लोकं किती शिव्या घालत असतील या कल्पनेनेच आताही हसायला येतेय..