Submitted by _आनंदी_ on 21 January, 2016 - 00:58
गावाकडे थोडी जमीन आहे . तिथे काहीतरी शेती विचार आहे। मुंबई मध्ये आणि जमीन कराड च्या जवळ आहे। सुरुवात करण्या साठी शेवग्याच्या शेंगाची झाडे एक एकरावर लावण्याचा विचार आहे।
इथे खूप लोकाना शेती विषयक माहिती आहे।
कृपया मदत करा की सुरुवात कशी करू ।
आणि कुठे शेती विषयी कुणाकडे जाउन माहिती घेऊ शकतो तरी सांगा। जाउन माहिती करून घेउ।
काही पुस्तकं माहिती कुठे मिळेल ते सांगा।
कृपया मदत करा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिपावर सुरन्गी यांची काही नवे
मिपावर सुरन्गी यांची काही नवे करावे म्हणून ही शेती (आंबाबाग) याविषयीची एक सुंदर मालिका आहे.
आरती म्हणाल्या तसे गावी सारखे सारखे जायचे कसे, कुठल्या सरकारी अधिकार्यांकडून काम करून घ्यायचे कसे, जेवणाची व्यवस्था कशी करायची इ. सगळ्या प्रश्नांची यथासांग चर्चा तिथे केलेली आहे.
जरा मोठी आहे मालिका , पण ज्यांना खरेच शेतीत रस असेल त्यांनी आवर्जून वाचावी अशी आहे.
साती, धन्यवाद. वाचते आता.
साती, धन्यवाद. वाचते आता.
-आनंदी- कल्पना छान आहे, गेली
-आनंदी-
कल्पना छान आहे,
गेली दिड वर्षे मी शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे, स्वतः शिकत आहे,सगळ्या गोष्टी शिकाव्या लागत आहेत, नाहीतर तुम्हाला किम्मत नाही,काही येत नाही म्हणुन तुमची चेष्टा केली जाईल, तुमच्या सगळ्या डिग्र्या इथे काही कामाच्या नाहीत.
शेती करताना मानसिक आणि शारीरिक ताकद खुप लागते.शहरांतलं जगणं आनि स्वतः शेती करणं खुप मोठा फरक आहे. शेती मध्ये (काहीतरी निर्माण करण्याच) समाधान आहे,तुम्हाला तुम्ही स्वःत पिकवलेलं सकस धान्य, भाज्या खाता येतील.शेतीत पैश्या पेक्षा बाकी समाधान देणार्या गोष्टी मिळतील, पण आवड असेल तर,मनासारख घडलं तर.
प्रथम तुमच्याकडे सिंचना साठी पाण्याची खात्री हवी, तुम्हाला पुर्वी शेती कामाची माहीती सवय नसेल तर खुप त्रास सहन करावा लागेल,शेती म्हंटल की ऊन पाऊस चिखल तुडवण्याची तयारी हवीच,त्यात भार नियमन असेल तर रात्री अपरात्री थंडीत शेतात काम कराव लागेल, मजुरांबरोबर काम केलं तर कामाचा थोडा अंदाज येतो.
शेतीत बेभरवसा खुप आहे,सवय करुन घ्यावी लागेल, तुम्ही मुंबईच्या जवळ असल्याने तुम्हाला शेवग्याला दर मात्र चांगलाच मिळेल, तो नफा मिळवुन देईल.
आमच्या मनापासुन शुभेच्छा !
साधना,जागु यांनी छान सल्ला दिला आहे.
साती,पादुकानंद तुम्ही ही बरोबर लिहलं आहे.
Please look for zero budget
Please look for zero budget natural farming.
Save our healths and save our soil.
Whatever they say about hybrid, BT, chemical farming - please do not go for it. It only helps big corporations and not us.
Going for GMOs is definitely loosing our freedom in short run and its loosing our future generations in longer run.
Will try to write more on this if I get time. But please do your research before listening to these 'Tadnya' mandala who advise non sustainable things like chemical farming - hybrid and GMOs.
https://www.facebook.com/orga
https://www.facebook.com/organicconsumers/videos/10153584285114934/?fref=nf
अजून एक खुप छान लिन्क. उघडली नाही तर " Life in Syntropy" शोधा फेसबुक वर.
मध्यंतरी आम्ही कोकणात जागा
मध्यंतरी आम्ही कोकणात जागा घेतली. तिथे खैराची (कात) बरीच झाडे आहेत आधीपासून. बुंध्याचा सरासरी घेर ४०-४५ सेमी च्या आसपास आहे. त्यातून कसे आणि किती उत्पादन/ उत्पन्न मिळते याबद्दल कोणी सांगू शकेल का?
ही एक मस्त वेबसाईट सापडली.
ही एक मस्त वेबसाईट सापडली. सर्व प्रमुख भारतीय भाषांमधे आहे.
http://mr.vikaspedia.in/agriculture
भुत्या - तुमच्या साठी
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand3/index.php/23...
Pages