शेती करण्या संदर्भात

Submitted by _आनंदी_ on 21 January, 2016 - 00:58

गावाकडे थोडी जमीन आहे . तिथे काहीतरी शेती विचार आहे। मुंबई मध्ये आणि जमीन कराड च्या जवळ आहे। सुरुवात करण्या साठी शेवग्याच्या शेंगाची झाडे एक एकरावर लावण्याचा विचार आहे।
इथे खूप लोकाना शेती विषयक माहिती आहे।

कृपया मदत करा की सुरुवात कशी करू ।
आणि कुठे शेती विषयी कुणाकडे जाउन माहिती घेऊ शकतो तरी सांगा। जाउन माहिती करून घेउ।
काही पुस्तकं माहिती कुठे मिळेल ते सांगा।
कृपया मदत करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवग्याच्या शेंगांविषयी अप्रतिम माहिती डॉ बाविस्कर यांच्या साईटवर आहे.

तुमच्या विपूत लिंक टाकून ठेवते नंतर.

(मी पण असे उद्योग करण्याच्या विचारात असल्याने माहिती जमवून ठेवली आहे.)

तुमच्या शेतजमिनीवर आधीही शेती होत असेल तर कोणत्या प्रकाराची होती ही माहिती घ्या. जर रासायनिक शेती होत होती आणि तुम्हाला लगेच शेती करायची नसेल (तुम्ही झाडे लावुन ठेवणार म्हटलेय, म्हणजे लगेच शेती करयची नसेल) तर रासायनिक कडुन नैसर्गिक शेती कडे जाण्याचे उपाय या दरम्यानच्या काळात करु शकता. त्यानंतर जेव्हा स्वतः शेती साठी वेळ देऊ शकाल तेव्हा आयुर्वेदिक औषधांत वाप्रायच्या घटकाच्या शेतीचे उत्पादन करु शकता जसे लेंडी पिंपळि वगैरे.

https://sundayfarmer.wordpress.com/

वरिल ब्लॉगवर खुप चांगली माहिती आहे.

आनंदी शेवग्याची लागवड हे ही खुप छान आहे.

शेती ज्या भागात आहे तिथल्या स्थानिकांकडूनही थोडी माहिती घ्या. कारण तिथले हवामान, पाण्याचा अंदाज ह्यावर शेती अवलंबून असते.

आमच्याकडे शेती कशी असते हे तुम्हाला माझ्या खालच्या लेखात वर वर पहायला मिळेल.
http://www.maayboli.com/node/49476

धन्यवाद.. शेतात खुप दिवस काहिच पीक घेतले नाहिये ..
त्या आधी शेती कशी / काय करायचे त्याची माहिती काढेन आता...

अगदी बेसिक प्रश्न ..रासाअयनिक आणी नैसर्गिक काय फरक?

http://www.maay

boli.com/node/53868 ह्या धाग्यावर केतकी घाटे पण सल्ला मार्गदर्शन करतात. विदर्भातल्या व्हॉटस ग्रुपवर मेंबर आहे तिथे नैसर्गिक शेतीवर चर्चा, शिबीरांची माहिती मिळत असते पाहिजे असेन देईन तसेच त्याच ग्रुपवरुन कळले की वंदना शिवा एक महिन्याच मार्गदर्शन शिबीर देहराडून इथे घेतात...

'होय आम्ही शेतकरी' नावाचे एक फेसबूक पेज आहे. त्यावर इतरही बर्‍याच पिकांबद्दल सविस्तर (लागवड, काळजी, रोग नियंत्रण, उपाय, खत मात्रा, काढणी, कापणी, उपलब्ध जाती, एकरी उत्पन्न) माहिती दिली आहे.

शेवगा लागवड

मला सुद्धा शेतीची खुप आवड आहे. माझी सुद्धा कराड जवळ थोड़ी जमीन आहे. बागयती नाही जीरायत आहे.
माझा पण विचार आहे की शेती करावी पण पाण्याची सोय नाही. पाण्याची सोय करावी लागेल आणि ती झाली तर कमी पाण्यात काहीतरी मी करू शकतो.
दूसरी गोष्ट म्हणजे शेतीच्या बांधावर नाहीतर शेती मधे झाडे लाउन अन्तर पिक भाजी पाल्या सारखे घेऊ शकतो. यंदा जमले तर पावसाळ्यात झाडे लावण्याचा विचार आहे.
फळझाडे लावण्यासाठी महाराष्ट्र शासन अनुदान आणि प्रोत्साहन देते.
तुम्ही रोज ऑनलाइन अॅग्रोवन इपेपर वाचा (http://epaper.agrowon.com/Agrowon/index.htm) त्यामधे रोज ८ आणि ९ नम्बरच्या पेजवरती प्रयोगशील शेतकरी आणि कृषी अधिकारी यांची माहिती आणि त्यांचे फोन नंबर्स दिलेले असतात. तसेच पेपरच्या अन्य पेजमधे इतर शेती विषयी पूर्ण माहिती असते.
काल दि. २० जानेवारीचा अॅग्रोवन इपेपर वाचा. त्यामधे ९ नम्बर पेज वरती कराड जवळील दाम्पंत्याने कृषी पर्यटन केंद्र चालू केले आहे त्यांची यशोगाथा कथन केली आहे. दर रविवारच्या अॅग्रोवन इपेपर मधे "Sunday Farmer" यांची यशोगाथा ८ किंवा ९ नंबरच्या पेज वरती दिलेली असते. (मागील डेट चे पेपर ऑनलाइन पेपर तुम्ही पाहू शकता तशी सोय आहे.)
आनंदी तुमच्या कडे पाण्याची काय सोय आहे?
माझा विचार आहे की पावसाळ्यात झाडे लावून सुरवात करावी. आणि आजकल खुप आधुनिक नर्सरी पाहायला मिळतात.
माहितीच्या नर्सरी मधून २ ते ३ फुटाची चांगल्या वाणाची झाडे आणून लावावीत ती जगतात. बी लावण्याची गरज नाही.
वेळो वेळी सल्ला देण्यासाठी साधना आणि जागु यांच्या सारखे निसर्गप्रेमी आपल्या ग्रुप मधे आहेतच.
साधना यांनी सुद्धा टेरेस का बॉल्कनी मधे बाग फुलविली होती असे मी वाचून आहे. ( Am I Right?)
तसेच जागु तर निसर्गातच सानिध्यात राहतात. निसर्गाच्या गप्पा म्हणून त्यांचे सदर आपल्या मयबोलीवरती चालू आहे.
शेवटी एक आहे की स्वत: शेती केल्याशिवाय फायदेशीर ठरत नाही.
स्वत: म्हणजे नोकरी धंदा सोडून आपण काही पूर्ण वेळ शेती करू शकत नाही निदान जातीने लक्ष्य तरी घालु शकतो.
साधना यांनी सांगितल्या प्रमाणे "Sunday Farmer" संकल्पना राबवू शकतो.
आपल्या शेती मधे काम करणे आणि आपण लावलेल्या झाडाच्या सावलीला बसण्यात एक वेगळाच आनंद असतो तो शब्दात सांगता येत नाही.

माझे सुद्धा नवी मुंबई मधे अॅग्रो रिलेटेड Organic सेंद्रिय प्रोडक्ट चालते. (Organic Wheatgrass and Giloy)
सध्या बंद आहे. चालू झाल्यावरती मायबोलीवरती सविस्तर माहिती देतो.

Thank you...

स्वत: शेती केल्याशिवाय फायदेशीर ठरत नाही १००% खर आहे.

नितीन पूर्वी आम्ही शेती करायचो त्याचे प्रोसिजर मला पूर्ण माहीत आहे. पण आता खुप सुधारणा म्हणण्यापेक्षा रासायनीक शेती कडे लोक जास्त वळले आहेत. त्याची मला कल्पना नाही.

माझ्या वर लिंक दिलेल्या लेखात जवळ जवळ सगळी माहिती आहे.

रासायनिक शेती म्हणजे रासायनिक खते, किटकनाशके वापरुन केलेली शेती का?

हल्ली सेंद्रिय शेतीकडे सुजाण लोकांचा कल होवू लागला आहे. सिक्कीमचे उदाहरण घ्या. त्यांनीतर आदर्शच समोर ठेवला आहे.

महाराष्ट्रात कसावा लागवड का होत नाही ? इथे आफ्रिकेत त्याची भरपूर शेती होते आणि त्या शेतीत फारशी मेहनतही नाही. शिवाय काढणी केली नाही तर ते पिक जमिनीखाली सुरक्षित राहते. इथे कसावाचे बरेच उपयोग करतात. अंगोलात पानेही शिजवून खातात. ( माझ्या लेखात सविस्तर माहिती आहे )

वर्षूने अलिकडे जे यामचे फोटो दिले होते, त्याची पण लागवड व्हायला हवी. ही कंदमूळे पण भरपूर उत्पादन देतात.

शेती करायची हाये? कोण करणार? तुम्ही स्वत: राबणार का? तुमच्या घरात राबणारी माणसे किती? त्याना शेतीची सगळी ऑपरेशन्स येतात का? की मजूर ठेवून करून घेणार? मजूर मिळण्याची गावाकडे काय स्थिती आहे याची कल्पना आहे का तुम्हाला आणि मिळालेच तर त्याना प्रती दिन किती मजुरी द्यावी लागते, ते खरेच किती तास काम करतात , नियमितपणे रोज कामावर येतात का याची माहिती घेतली आहे का? घेतल्यास आधी घ्या.
हे सगळे सांगण्याचे कारण बैल नाहीत मजुरी परवडत नाही म्हणून बर्‍याच शेतकर्‍याना शेती बंद करावी लागलेली आहे. शेवग्यासारखे पीक घ्यायचे असेल तर त्याच्या राखणाची काय व्यवस्था आहे. तुमचा माणूस जर सतत तिथे नसेल तर गावातलेच लोक चोर्‍या करतात.

पादुकानंद तुमचे सगळे प्रश्न अगदी बरोबर आहेत..
लहानपणी स्वतःची शेती नव्हती पण दुसर्यांच्या शेतात जायचो थोडा अंदाज आहे..
ही शेती नवर्याची आहे... त्याचा एक भाउ गावाकडे आहे विश्वासु आहे..
सध्या हे सगळ अगदीच प्रायमरी स्टेज ला आहे...

माहिती गोळा करत आहोत...
शेती ची जागा रहत्या जागेपासुन लांब आहे म्हणुनच थोडा प्रॉब्लेम आहे
बघु आत्ता माहितीच घेउ..

गावातलिच माणसे पिक चोरुन नेतात किंवा उगाच नासाडी करतात. (मोगरा + कागडा + तेरडा अशी फुल्शेती होति) याला कंटाळून माहेरी भावाने शेती करण बंद केलय. त्यामुळे शेती राहत्या जागे पासुन लांब असेल तर भक्कम कुंपण करुन विश्वासू माणुस ठेवणे. जितकं नुकसान प्राणी करत नाहित तेवढ माणुस करतो.

मजुरी खुप जास्त वाढलिये शिवाय शेतीत काम करायला मजुर मिळत नाहीत.

नोकरदार शेतीत पडले की गावकर्याना भावकीला त्याचा मोठा पोटशूळ उठतो. मुळात हे शेती कधी विकताहेत याचा गावातले लोक अंदाज घेत असतात. त्यात नातेवाईकही आले. मग येन केन प्रकारेन त्यांचे नुकसान करीत राहून त्याना कंटाळून सोडायचे व शेती बंद करायला लावायची हा गावातल्या हितसंबंधियां चा अजेन्डा असतो. मग विकायला काढण्याचे सल्ले . घ्यायला तयारच असतात. त्यात गावात तयार असलेल्या सेना, ग्रूप्स मिट्वायला. तुम्ही शहरात राहून हे मॅनेज करू शकत नाही. तुअम्चे मजूर पळवून नेणे. मुळात सरकारी रोजगार हमी कामावर खूप मजुरी मिळते त्यापेक्षा जास्त मजूरी देऊन तुम्हाला शेती परवडत नाही. आमच्या मित्राने आंब्याचे झाडे लावण्याचा प्रयोग केला तर मुद्दम बकर्‍या चरायला सोडणे. त्या मानसिकतेची कल्पना तुम्ही करूही शकत नाही. खेड्यातले लोक मुळीच भोळेभाबडे नसतात . फार बेरकी असतात त्यामुळे स्वतः तिथे राबणार असाल आणि रोजची चक्कर टाकणार असाल तर विचार करा....

पादुकानन्द हेच अनुभव माहेरी वडीलांना घेताना पाहिले आहे. आनंदीताईंना निरुत्साही नको करायला म्हणून लिहीले नाही. पण अशी परिस्थिती असते हेही त्यांना कळायलाच हव म्हणजे त्यांना सावधगीरीने पुढची कामे आखता येतील.

आमची पाच एकर जागेत शेती होती. पण लागोपाठ तिन-चार वर्षे नुकसान झालेले ते महाग खत, न परवडणारी मजूरी आणि बदलणारे हवामान. नेमकी पीक तयार झाल्यावर कापायचा झाला पाऊस पडलेला एकदा. मग रोपे जमीनीला टेकून कणसाला मोड येऊन पीक फुकट जायचे. आजकाल विविध कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये माणसे जास्त पगारावर लावली जातात त्यामुळे एकतर मजूर मिळत नाहीत. जे मिळतात त्यांची अपेक्षा जास्त असते. त्यामुळे आजकाल शेती खुप कठीण झाली आहे. पण हे बदलायला हव. शेती पिकायला हवी. नाहीतर वाढत्या लोकसंख्येत अन्नाला मुकायची वेळ येईल. तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला हवा. किंवा अशी काही उपकरणे निघायला हवीत ज्याने लावणी, झोडणी एक-दोन माणसांत यंत्राने व्हायला पाहीजेत.

अजुन तुम्ही रोपांबद्दल बोललात तोही अनुभव.

माझे वडील वाडीची देखभाल व्हावी म्हणून प्रिमियर कंपनीत उरणहून कुर्ल्याला समुद्र प्रवासाने नेहमी नाईटशिफ्ट करायचे. रोज जाऊन येउन करायचे. त्यावेळी प्रवास तितका सोपा नव्हता. एक वर्ष वडीलांनीआ ५० आंब्याची कलमे लावलेली. ती कलमे रात्री कोणीतरी मुळासकट काढून नेली. त्यामुळे तो उत्साहही गेला.

शेती बिझिनेस म्हणुन (समजुन) करा.... आणि बिझिनेस कोणताही असो तो यशस्वी करण्याची मेथडालॉजी सेम असते.

बाकी सगळ्या गोलगप्पा असतात.

Pages