शेती करण्या संदर्भात

Submitted by _आनंदी_ on 21 January, 2016 - 00:58

गावाकडे थोडी जमीन आहे . तिथे काहीतरी शेती विचार आहे। मुंबई मध्ये आणि जमीन कराड च्या जवळ आहे। सुरुवात करण्या साठी शेवग्याच्या शेंगाची झाडे एक एकरावर लावण्याचा विचार आहे।
इथे खूप लोकाना शेती विषयक माहिती आहे।

कृपया मदत करा की सुरुवात कशी करू ।
आणि कुठे शेती विषयी कुणाकडे जाउन माहिती घेऊ शकतो तरी सांगा। जाउन माहिती करून घेउ।
काही पुस्तकं माहिती कुठे मिळेल ते सांगा।
कृपया मदत करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यावर नजर ठेवायला एखाद्या झाडाच्या फांदीत लपवून दुसरा सीसी टीव्ही कॅमेरा लावायचा फिदीफिदी
>>> त्यापक्षा मूळ कॅमेराच फांदीत लपवून ठेवला तर? Happy

खेड्यातले लोक मुळीच भोळेभाबडे नसतात . फार बेरकी असतात त्यामुळे स्वतः तिथे राबणार असाल आणि रोजची चक्कर टाकणार असाल तर विचार करा.... <<<<<< + 100000, पादूकानंद, तुम्हीवर नमुद केलेल्या प्रत्येक पाँईटचा गेल्या ३-४ वर्षात अनुभव घेतला आहे. Sad ते सुद्धा सख्या नातेवाईंकांनाकडून पण काही लोक खरच चांगली असतात आणि त्यांची मदतही मिळाली आहे. एक मुलगी शेती करते तेव्हा फसवणूकीला जास्त वाव असतो त्यांना कारण ही काय आणि किती दिवस करणार हे ते गृहीत धरूनच चालतात. Sad Uhoh

शेती आणि बिझनेसमध्ये कोणीही विश्वासू नसत हे लक्षात ठेवा. खूप मेहनतीच काम आहे, सहज काहीच हाती नाही लागत. किंवा सरळ आपली झाड एजंटला द्यावी आणि घरबसल्या बँकेत अकाउंटला पैसे घ्यावे. हे आंबा,,नारळ, काजू, फणस, रतांबे, जांभळ या साठी माहित आहे. पण त्यासाठी तुमची स्वतःची झाड असण आवश्यक आहे. सुरुवातीला कायम स्वरुपी नोकर ठेवून आणि प्रत्येक आठवड्याला अचानक तिथे व्हिजीट द्यावी. नोकरालाही कळवू नये तुम्ही कधी येता ते. एकदा झाड २- ३ वर्षाची झाली की मग जास्त मेहनत नाही घ्यावी लागत.

भात शेती करायची इच्छा आहे पण मॅन पॉवर आणि अनुभव नसल्याने तसेच वेळही नसल्याने त्या जमिनी पडीक आहेत. Sad बहुतेक त्या जमिनीत आंबा, काजूची लागवड होईल पण तरीसुद्धा मन तयार होत नाही आहे.

आमच जास्त नुकसान माकडांमूळे होत. पण पप्पा म्हणतात जावू देत मुक्या प्राण्यांचा आशिर्वाद मिळेल त्यांना आता खायला कुठे काय उरल आहे, हे सुद्धा सत्य आहेच. Sad
मार्लेश्वर, वनीची देवी इथे माकडांना पेप्सी, थम्स अप पिताना बघितल आहे. Uhoh

जागू, मलासुद्धा भात शेतीची काळजी वाटते आमच्या गावात तर अर्ध्याहून अधिक भात शेतीच्या जमिनी पडीकच आहेत. शेती करण हा व्यवसाय म्हणजे ती व्यक्ती कमी शिकलेली आणि ढ समजतात लोक. Sad हे बदलायला हव. शेती करणार्‍या व्यक्तींकडे आणि शहर किंवा परदेशी नोकरी करणार्‍यांकडे खूप वेगळ्या नजरेने बघितल जात. Sad

गावी बैल वापरण कमी झाल आहे, हा अजून एक वेगळा विषय आहे की नविन जन्मलेल्या पाड्याच काय होत. Sad
भात शेतीसाठी. सध्या ट्रॅक्टर वापरले जात आहेत.

पण काही गावांमध्ये अजूनही एकजूटी आहे आणि ते बघून खूप छान वाटले. एका गावात, गावातील लोकांनी मिळून ट्रॅक्टर विकत घेतला आहे आणि प्रत्येकाचे दिवस ठरवले आहेत. ज्या दिवशी ज्याच्या जमिनीचा नंबर असेल त्या दिवशी तिथे ट्रॅक्टर घेऊन गावातील बाकीची लोक मदतीला जातात. त्यामूळे कामही लवकर होत आणि कोणाला मजूरीही द्यावी लागत नाही. हे भात शेतीसाठी बघितल आहे. पण हेच सर्व गावांमध्ये होण शक्य नाही.

रॉहू, मूळ कॅमेरा फांदीत लपवून चालणार नाही कारण त्याची नजर लिमिटेड राहील फांदी आणि पानांमुळे. त्यामुळे सगळीकडे बघणार्‍या कॅमेर्‍यावरफक्त फोकस राहील असा तो फांदीतला कॅमेरा ठेवायचा. फांदीवरच्या कॅमेर्‍याला पक्ष्यांची पिसं बिसं किंवा पानं चिकटवून ठेवायची झाडात मिसळून जाण्यासाठी..... आवरा... (हे स्वतःलाच).

आरती अगदी बरोबर. पूर्वी माझ्या माहेरच्या गावात ४-५ गोठे होते. आता एकही अस्थित्वात नाही. सगळीकडे आता पिशव्याच येतात दूधाच्या.

भात शेती पडुन आहे कारण नविन तंत्र, संशोधन वगरेंची नीट माहिती नाहिये.
हल्ली भात पेरणी, लावणी, कापणी मळणी साठी यंत्र आहेत. त्याने नुकसान कमी शिवाय मनुष्याबळ पण कमी लागत. (सगुणा - भात शेती)

अवांतरः- अजुन ५-६ वर्ष नोकरी करुन नंतर भातशेती (व्यावसाईक) करायचा माझा विचार आहे..

सगुणाबाग वाले करतात आधुनिक भात शेती. पण ते नवराबयको स्वतःही काम करतात शेतात. जातीने लक्ष घालतात सगळ्यात.

खेड्यातले लोक मुळीच भोळेभाबडे नसतात . फार बेरकी असतात त्यामुळे स्वतः तिथे राबणार असाल आणि रोजची चक्कर टाकणार असाल तर विचार करा>>>>>> प्रत्येक गावात अश्या प्रकारचे ठराविक लोक असतात पण सगळीच लोकं अशी नसतात.
तुमच्या शेताशेजारीच जर एखादा शेतकरी असेल की ज्याला स्वतःचे भांडवल घालून शेती करणे शक्य नाही पण तुम्ही खर्च करणार असाल तर वाट्याने (भागिदारीत) तुमच्या शेतीत तुम्हाला हवे ते पिक घ्यायला ते मदत करू शकतात.

वार्षिक भाड्याने ही शेती करायला दिली जाते. उदा. जसे की त्यांनी त्या शेतातून हवे ते उत्पन्न घ्यायचे पण त्यांनी तुम्हाला ठरलेली रक्कम (एकरी १५ हजार) द्यायची.

आमच्या गावी पण गेल्या ३ वर्षापासुन बहुतेक भातशेती बंद आहे. कारण काय तर जंगलातुन गवे आणि हत्ती येतात, एका रात्रीत सगळे होत्याचे नव्हते करतात. वनखाते प्रतिबंधासाठी प्रयत्न करते पण खुप कमी पडताहेत ते प्रयत्न. मुळात जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप इतका वाढलाय की प्राणी जंगलाबाहेर पडताहेत. आमच्या इथल्या जंगलात कित्येक वर्षांपासुन गवे राहात होते पण कधी बाहेर पडले नाहीत. आता पर्यटकांना जंगली जनावरे अगदी त्यांच्या घरात जाऊन पाहायची असतात. मग जंगलात मचाणे बाण्धली जातात, काहीजणांनी तर पक्क्या झोपड्याही बांधल्यात. रात्रभर दिवे लाऊन जंगले धुंडाळली जातात, आणि हे प्राणी पडतात बाहेर.

अजून एक पाँईट जेव्हा तुम्ही नोकरी करत शेती करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वीक एन्ड शेतीच्या ठीकाणी देता येईलच असे नाही.

तसेच प्रवासात होणारी दगदग ह्याचाही विचार करा. हा प्रवास जमनेबल आहे का आपल्याला हे चेक करा. ट्रॅव्हलिंगचा होणारा खर्च हा ही विचारात घ्या. गावी गेल्यावर लगेच स्वत:च्या जेवणाची सोय कशी करायची ह्याचा ही विचार करा. प्रत्येक वेळी गावातील नातेवाईंकां कडे जाण मला पटत नाही. प्रत्येकाचा चॉईस वेगळा असू शकतो. कारण प्रवास करून गावी गेल्यावर घरकाम आवरून शेतावर जाणे आणि तिकडची कामे बघणे हे खूप त्रासदायक काम आहे. २-३ दिवसात तुम्हाला महत्वाची कामे संपवायची असतात. २-३ दिवसांकरता तुमच्या घरी स्वंयपाक आणि घरकामासाठी बाई मिळणे कठीण असते. लक असेल तर मिळते किंवा नाही. नाही मिळाली की वाटत उगीच शोधण्यात वेळ घालवला त्या वेळात मीच काम केल असत. तसेच सरकारी कामेही ही जमिनी संदर्भात असतात त्यासाठी ही वेळ जातो. तसेच प्रवासात तुम्ही पूर्ण वेळ झोपलात की बाकीचे सहप्रवासी तुमच्याबद्दल टिपण्णी करतात. त्याकडेसुद्धा दुर्लक्ष करता आल पाहिजे. स्वानुभवाने लिहिल आहे.

शेतीला सुरुवात केल्यावर लगेच काही हाती नाही लागल म्हणून नाउमेद नका होऊ. शिकत पुढे चला.

प्रत्येक जिल्हा / गाव लेव्हलवर सरकारी नर्सरी आणि शेतकी अधिकारी आहेत. त्यांच्याशी संपर्क करा. तुमच्या गावाच नाव सांगितल्यावर ते तेथील कॉन्टॅक्ट नंबर देतात तसेच तुमच्या जमिनीची पूर्ण माहिती विचारून तुम्ही कशा प्रकारे सुरुवात करा ह्याची ही खूप छान माहिती देतात.

शेती करण्यातले प्रॉब्लेम्स बरेच आहेत. माझ्या घराण्यात २/३ पिढ्यांपुर्वीच शेती सुटली.

सहकारी तत्वावर, एखादी संस्था स्थापन करून शेती करायचे प्रयोग झाले पाहिजेत. एकाच व्यक्तीला किंवा कुटुंबाला सगळे मॅनेज करणे कठीण आहे.

प्रत्येक जिल्हा / गाव लेव्हलवर सरकारी नर्सरी आणि शेतकी अधिकारी आहेत. त्यांच्याशी संपर्क करा. तुमच्या गावाच नाव सांगितल्यावर ते तेथील कॉन्टॅक्ट नंबर देतात तसेच तुमच्या जमिनीची पूर्ण माहिती विचारून तुम्ही कशा प्रकारे सुरुवात करा ह्याची ही खूप छान माहिती देतात

अरे वा छान माहिती. संपर्क कसा साधायचा? कुठले कार्यालय वगैरे?

माझ्याकडे काही गावांचे नंबर आहेत. उद्या इथेच देते. वसई, कर्जत ह्या ठीकाणचे सुद्धा आहेत. काही रोप हवी होती म्हणून ही नाव आणि नंबर्स घेतले होते. दापोलीच्या कृषी विद्यापीठाला जमल तर नक्की भेट द्या. मला अजून शक्य नाही झाल आहे.

मला वाटत हल्ली त्यांना सरकारी मोबाईल्स दिले आहेत. त्यामूळे सर्व काम मोबाईल नंबरवरून होतात. घर बसल्या खूप छान माहीती मिळते.

आरती , नक्की दे ही माहिती. खुप उपयोगी आहे. मलाही दापोलिला भेट द्यायचीय. खुप ऐकलेय त्याबद्दल.

निबाशे, हो उद्या इथेच देते लिहिल आहे. Happy नक्की फायदा घ्या सरकारी उपक्रमाचा आणि खरच खूप व्यवस्थित माहिती देतात.

एक माबोकरांची ट्रिप अरेंज करुया दापोली कृषी विद्यापीठासाठी. मघाशी साधनाच्या प्रतिसादात लिहून खोडल. Happy
तीन डोकींची इच्छा तर इथे दिसत आहे.

मोबाईल अ‍ॅप आहे शेतकर्‍यांसाठी. मी भारतात जाहीराती बघितल्या होत्या.
फेब्रुवारी मधे दापोलीला जायचे का ? मी आहे भारतात.

अ‍ॅग्रीकल्चर रीर्सच स्टेशन, पालघर - ०२५२५ - २४१०४८

श्री. एन. टी. मुणगेकर, गार्डन टेक्नॉलॉजी कोर्स -
९८२१७५३७६४

कर्जत कृषी विद्यापीठ

श्री. सावले - ८२७५४७३७२८

Pages