१. ब्राऊन राईस १ कप शिजवून
२. उकडलेल्या बीन्स : १ टीन, धुवून निथळून (किडनी बीन्स/ मिक्स रंगीत आवडतील त्या)
३. कांदा (चिरून)
४. टोमॅटो (चिरून)
५. अॅव्हकॅडो : लहान तुकडे करून
६. पालक : बारीक चिरून
७. कोथिंबीर : बारीक चिरून
८. हॅलपिनो : बारीक तुकडे करून
९. सिमला मिरची : बारीक तुकडे करून
१०, सावर क्रीम
११. सीराचा सॉस
१२. मीठ
१. एका मोठ्या बोलमध्ये आधी ब्राऊन राईस घ्या, त्यावर उकडलेल्या किडनी बीन्स घाला. टीन मधल्या वापरायच्या नसतील तर भिजवून उकडलेल्या घाला.
२. आता त्यावर वरील सगळे जिन्नस टोमॅटो, कांदा, अॅव्हकॅडो, सिमला मिरची, पालक, कोथिंबीर, हॅलपिनो आवडी प्रमाणे एक एक करून घाला.
३. चवीप्रमाणे मीठ, सीराचा सॉस, सावर क्रीम घालून ढवळा, आणि खा. हवं तर किसलेलं चीजही घालू शकता.
१. टिनमधल्या बीन्स उकडलेल्या असतात, त्या वापरायच्या नसतील तर भिजवून उकडलेल्या घालू शकता. उकडल्यावर बीन्स वर थोडं मीठ टाका.
२. वरील जीन्नसातील कुठलाही जिन्नस आवडी/ उपलब्धी प्रमाणे वगळून तुमच्या आवडीची इतर कुठलीही भाजी घालू शकता. जसं स्वीट कॉर्न, रंगीत पेपर, मशरूम. इ. चावायला मऊ किंवा किंचित क्रंची कुठलीही भाजी.
३. प्रोटीनसाठी ग्रील केलेले चिकन, फिश इ. चे बारीक तुकडे करून घालू शकता.
४. सीराचा सॉस भारतात मिळत नसेल, तर मिरची आणि थोडी लसूण एकत्र करून मिक्सरमधून बारीक पेस्ट घालू शकता. अजिबात घातला नाही तरी चवीत फार फरक पडत नाही.
५. सालसा सॉसही घालू शकता.
६. अगदी सोप्पं, पोटभरीचं आणि वन डिश हेल्दी आणि चविष्ट जेवण १० मिनिटात तयार होतं.

मस्त आहे. चिपोतले ची आठवण
मस्त आहे. चिपोतले ची आठवण झाली. यात दाणे वगैरे घालून क्रंची पण होईल जरा.
मस्तच. try करुन बघिन. तयार
मस्तच. try करुन बघिन.
तयार डिश चा एक फोटो टाकाल का?
ओह वॉव.. चुकून विकत आणलेला
ओह वॉव.. चुकून विकत आणलेला ब्राऊन राईस ,कोणालाच न आवडल्याने अगदी वाळीत पडलाय बिचारा..
या रेस्पी मुळे उद्धार होईल त्याचा.. साऊंड्स गुड.. सर्व जिन्नस आहेत , एक्सेप्ट फॉर श्रीरासॉस , हा ब्रँड ..मला नाही माहीत.. फोटो टाक पाहू इथे
https://sparklemarkets.files.
https://sparklemarkets.files.wordpress.com/2013/07/screen-shot-2013-07-1...
म्म्म्म्म्म्म.. ओके.. पी एफ
म्म्म्म्म्म्म.. ओके.. पी एफ चांग मधे हे सर्व करतात सॉस.. थाय सॉस, चायनीज लेट्तर्स.. पण मेड इन अमेरिका..
पण रिप्लेसेबल आहे..
ऊप्स रीपीट
ऊप्स रीपीट
छान.. खुपदा इथल्या हॉटेल्स
छान.. खुपदा इथल्या हॉटेल्स मधे माझ्या साठी याशिवाय दुसरा काही चॉईसच नसतो.
http://www.bigbasket.com/pd/4
http://www.bigbasket.com/pd/40003655/real-thai-sauce-sriracha-hot-chilli...
स्रिराचा सॉस बिग बास्केट वर उपलब्ध आहे. छान आहे रेसीपी. काल परवाच्या मुंबई मिरर / मिड डे मध्ये मील इन अ बोल असा लेख आला होता.
मस्तं पाककृती. भाज्या,
मस्तं पाककृती. भाज्या, कार्ब्स, प्रोटीन ऑल इन वन.
" चिपोतले ची आठवण झाली"...येस्स!
" चिपोतले ची आठवण झाली"... >>
" चिपोतले ची आठवण झाली"... >> +१
ह्यात सालसा म्हणुन दिमांची टोमॅटो भरीत रेसिपी पण चालेल
चिपोतले वरुन आठवले. आमच्या
चिपोतले वरुन आठवले.
आमच्या गावात चपाति नावाचे Indian grill restaurant चालु झाले आहे. त्यात फक्त व्हेजी बोल च मिळतो. आता ह्या restaurant च्या दोन-तीन शाखा पण निघणार आहेत.
त्यात सालसा म्हणुन टॉमेटॉ/काकडीची कोशिंबिर, सॉस म्हणुन पुदिन्याची , चिंचेची चटणी. क्रीम म्हणुन घट्ट दही असते.
http://www.chapatiindiangrill.com/
अरे वा! मस्तच ! बाकी हल्ली दर
अरे वा! मस्तच ! बाकी हल्ली दर वीकेन्डाला रेस्प्या ! काय चाललांय क्कॉय !
अमित, रेस्पी मस्तं. १२ घटक
अमित, रेस्पी मस्तं.
१२ घटक पदार्थ एकत्र केल्यावरचा एक बाउलीचा फोटु टाकला असता तर नीट कळलं असतं.
>>चुकून विकत आणलेला ब्राऊन राईस ,कोणालाच न आवडल्याने अगदी वाळीत पडलाय बिचारा..
दोसे, धिरडी करण्यात वापरून टाकला तर लवकर संपेल. दोश्यांत तर उकड्या तांदळापेक्षा ब्राउन राइस जास्त चांगला लागला.
ओह्,ओक्के मृण्मयी.. थांकु
ओह्,ओक्के मृण्मयी.. थांकु
पालक/ कोथिंबीरीपुढे उरलेले १०
पालक/ कोथिंबीरीपुढे उरलेले १० घटक लाजले टाईप कमेंटच्या भीतीने तो फोटोच लाजला.

शोधून टाकतो.
आमच्या गावात चपाति नावाचे
आमच्या गावात चपाति नावाचे Indian grill restaurant..
<<
मेन्यू पाहून भंजाळलो.
एकतर प्रोटीनच्या यादीत जीरा आलू घातलंय.
वरतून प्रोटीन पोर्शनची किंमत किमान पा व णे सा त डॉलर्स! अबबब!! सव्वाचार्शे रुपयांत अख्ख्या २ कोंबड्या येतील भात अन घासफूससकट. बटाटे किती येतील?
आधी आलु जीरा कुठून आलं कळलंच
आधी आलु जीरा कुठून आलं कळलंच नाही.
प्रोटीन म्हणजे आलू, गम्मतच आहे.
पण दिमा, अहो ते ग्रील रेस्टो आहे, पोल्ट्री फार्म नाही आणि ती रॅपची किंमत आहे.
कशात किती प्रोटीन असते ते कधी
कशात किती प्रोटीन असते ते कधी बघितले नाही. चिपोतले मध्ये जशी ढब्बु मिरचिची भाजी असते त्याचा ऐवजी आजु जीरा असतो.
पा व णे सा त डॉलर्स ही रॅप किंवा बोल ची किंमत आहे. त्याची serving साईझ मोठी असते. जर दोन बोल घरी पॅक करुन आणले तर त्यात चौघाचे जेवण होते.
मस्त! स्पेलिंग 'स्रिराचा'
मस्त!
स्पेलिंग 'स्रिराचा' असलं तरी उच्चार सिराचा असतो बरं का.
मस्त! समरमधे लंचसाठी छान
मस्त! समरमधे लंचसाठी छान पर्याय.
सगळ्यांना धन्यवाद. सिराचा
सगळ्यांना धन्यवाद.
सिराचा बदललं.
मस्तय. तयार डिशचा फोटो हवा
मस्तय. तयार डिशचा फोटो हवा होता .
अमित्,एकदम रेसिपी किंग झालायस
अमित्,एकदम रेसिपी किंग झालायस सध्या!
छान दिसतय प्रकरण - चिपोटले मध्ये खायला आवडतो हा प्रकार (तर मेला त्यांच्याकडे ई-कोलाय निघाला... असो!)
सिराचाचे जनसामान्य नाव - कोंबडाछाप सॉस!
छान रेसिपी.
छान रेसिपी.
अय्या मी तर ते पहिले श्रि रचा
अय्या मी तर ते पहिले श्रि रचा असे च सर्च केलेले. काहीच आले नाही. मग प्रकाश पडला स्रिराचा असेल. आर सायलेंट म्हणुन
इथे उपलब्ध साहित्यातून नक्की
इथे उपलब्ध साहित्यातून नक्की करुन बघेन
उकडलेला ब्र/उन राईस पाहुन
उकडलेला ब्र/उन राईस पाहुन घरी पडलेल्या गावच्या लाल तांदळाची आठवण झाली . तोच वापरुन हा वेजी बोल करेन. कसा लागेल देव जाणे कारण भात हा कायम द्रव पदार्थाबरोबर खायची सवय आहे. पण घरातल्या जेनेक्सला असले काहीतरी फंडू पदार्थ आवडातता. सो, करुन पाहणे आलेच.
कालच केला होता व्हेजी बोल.
कालच केला होता व्हेजी बोल. चिपोटले मधल्या व्हेजी बोलमधले बीन्स, राइस आणि ग्रिल्ड भाज्या हे जिन्नस गरम असतात म्हणून मी पण सगळ्या जिन्नसांना जरा चटका दिला चांगल्या तापलेल्या कढईत. स्मोकी फ्लेवर आला.
भाताऐवजी किन्वा आणि पालकाऐवजी आमचा केल पण चालेल बर्का
परवा कुठल्या तरी फुड्फुड
परवा कुठल्या तरी फुड्फुड प्रकारच्या च्यानलवर एका गोल चेहर्याच्या कुकने चिपोटले = एक प्रकारच्या स्पॅनिश मिर्चीची पेस्ट असं सांगीतलं. बरोबरे का?
आपल्याकडे मिर्ची नावाची हाटेलं असत्तात तसं तिकडे चिपोटले नावाचं हॉटेल आहे का? तुम्ही लोक कोणत्या चिपोटल्याबद्दल बोलत आहात?
दीमा, चिपोटले ही फास्ट फूड
दीमा, चिपोटले ही फास्ट फूड चेन आहे इथे.
https://www.chipotle.com/menu
Pages