Submitted by जीएस on 15 January, 2016 - 13:48
हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे तर काय उपाय करावा ? मागे एका मित्राच्या काकांची त्यांच्या डॉक्टरांनी बायपास केली होती तर मैत्रीणीच्या मावससासर्यांची दुसर्या डॉक्टरांनी अँन्जिओप्लास्टी केली होती त्यामुळे मला नक्की काय करू याबद्दल अधिक गोंधळायला झाले आहे. पण इथे व्यवस्थित सल्ला मिळून त्याप्रमाणे ताबडतोब उपाययोजना करता येईल असे वाट्ते.
कृपया उपचारांबद्दल बद्दल मार्गदर्शन करावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशा हृदयावर विसंबून राहू
अशा हृदयावर विसंबून राहू नये. प्लंबरला बोलावून एक छोटी टुल्लू मोटर कमरेपाशी फिट करून त्याच्या नळकांड्या काळजाला जोडाव्यात. त्याला व्हाल्व / तोटया बसवून घ्याव्यात. म्हणजे हार्टकडून सप्लाय बंद झाला की लगेच तोट्या फिरवून टुल्लू चालू करायचा. सोलनॉईड मोटर, सेन्सर, व्हाल्व आणि प्रेशर सेन्सर बसवले आणि मोबाईलमधे अॅप लोड केलं तर प्रेशर कमी झाल्याबरोबर रक्त या चॅनेलमधून खेळायला लागेल. जुना कालवा , नवा कालवा च्या धर्तीवर मग जुना कालवा मेण्टेनन्स साठी गॅरेजमधे देऊन यावा.
पिंपळपान रस,विट्ठल << हे
पिंपळपान रस,विट्ठल <<
हे दोन्ही व्हॉटसॅप सर्टिफाइड आहेत.
पुराव्यासाठी माझा भोंदू फॉर्वर्डसचा धागा बघ.
माहितीये भोंदू शब्द लिहून मी घोर चूक केलीये ते पण कधी कधी असे उपाय अश्या शब्दांच्या अवगुंठनाखाली जपून लपवावे लागतात. सगळेच करू लागले तर उपायातली शक्ती कमी होते ना. इसिलिये.. मजबुरीको समझो..
हे वाचून झालं की सांग हा. जास्त लोकांच्या नजरेला पडायच्या आत काढून टाकेन.
साती ताई - साष्टांग दंडवत
साती ताई - साष्टांग दंडवत घ्यावा !!!
Hillarious discussion. I came
Hillarious discussion. I came to check on some other home remedy on Mabo and forgot what my problem was
Lage raho. Satee what's special for dinner
कट्ट्र माबोप्रेमी लोकांसाठी
कट्ट्र माबोप्रेमी लोकांसाठी एक उपाय.
मायबोलीचा एक खोटा स्क्रीन्शॉट तयार करावा. व त्यात खालील धागे लिहावेत.
आरक्षण - हवे कि नको ३४५ प्रतिसाद , ३०१ नवीन.
शाकाहार कि मांसाहार २३२ प्रतिसाद, १८९ नवीन.
संघाचे नेमके काय चुकते? ५४६ प्रतिसाद १०२ नवीन.
अचाट सीन व अतर्क्य गाणी ४५३ प्रतिसाद ४६ नवीन.
हृदय विकार झटक्याने पडून असलेल्या मरणासन्न पेशंट ला हा दाखवावा. लगेच उठून वाय फाय आहे का असे विचारत फिरेल.
मायबोलीचा एक खोटा स्क्रीन्शॉट
मायबोलीचा एक खोटा स्क्रीन्शॉट तयार करावा. >>> एव्हढी मेहनत कशाला घ्यावी ? असा वरिजनल एसेस मिळेलच की कुठल्याही क्षणी
हा धागा विनोदी वाटंण्यासाठी
हा धागा विनोदी वाटंण्यासाठी आधीची काही काँटेक्स्ट आहे का? धागा माहिती हवी आहे सदरात आहे त्यामुळे कदाचित इतरत्र काही संदर्भ असावा बहुतेक.
माझ्या वडीलांना काही वर्षापुर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. ट्रस्ट मी..There is absolutely nothing even remotely funny about heart attack. I hope no one here or their loved ones ever get one.
तीव्र झटका आल्यावर मायबोलीवर
तीव्र झटका आल्यावर मायबोलीवर सल्ला मागणे यात काहीच विनोदी नाहीये का?
जनरली झटका आल्यावर अॅम्ब्युलन्स बोलवून अॅडमिट केले जाते.
माझ्या अल्प माहितीनुसार झटका आटोक्यात आणून पेशंटचा जीव वाचावा यासाठीचे उपचार आधी केले जातात.
पेशंट स्थिरावल्यावर टेस्टस सुरू होतात आणि डॉक्टरांना योग्य वाटेल तेवढ्या काळासाठी (बहुदा २४ तास) हृदयाच्या कामकाजाचे मॉनिटरींग केले जाते.
टेस्टसचे निकाल आल्यावर पुढच्या ट्रीटमेंटबद्दल कार्डीऑलॉजिस्टशी चर्चा होते.
हो ना?
यात मायबोलीवर पोस्टी टाकून सल्ले मागणे कुठे येते?
ते तसे करणे हा वेडेपणा नाही का?
तज्ञांशी चर्चा करायची सोडून माबोवर घरगुती उपाय शोधत फिरणे हे चूक नाही का?
हा धागा विनोदासाठी नसून सिरीयसली आहे असे वाटतेय म्हणजे जी एस वरच्या वाक्यात वर्णन केल्याइतका मूर्ख आहे असे तुम्हाला वाटतेय का?
:संत्र पार फोडींपर्यंत सोलून काढणारी बाहुली:
जीएस
बरोबर आहे तुमचे..एखाद्या
बरोबर आहे तुमचे..एखाद्या जीवघेण्या व्याधीबद्दल विनोद करणे आणि तो समजणे एवढी तुमच्याएवढी माझी विनोदबुद्धी डेवलप झालेली नाही. माय फॉल्ट..तुमचा अतिशहाणपणा तुम्ही वेळोवेळी सिद्ध केला आहेच तो परत सिद्ध केलात. काँग्रॅट्स..
बरोबर तुम्ही सोडून या
बरोबर तुम्ही सोडून या धाग्यावरचे सगळे (धागाकर्त्यासह!) अतिशहाणेच आहेत.
म्हणूनच सगळे इथे भंकस करतायत.
बाकी तुम्हाला भंकस समजली नाही म्हणून बाकीचे अतिशहाणे हे गृहितक जामच विनोदी आहे. आणि काहीच कारण नसताना वैयक्तिक पातळीवर उतरणे हे मात्र जाम हुशारीचे आहे हां. माझे सगळे 'हितचिंतक' आता तुमच्या पार्टीत येणार.
प्वालिटीक्स भारी हे राव!
धाग्याची आतापर्यंतची वाटचाल
धाग्याची आतापर्यंतची वाटचाल -
सॅटायर - ॲक्नाॅलेज्ड/ॲप्रिशेट्ड - बाउंसर - आॅफेंडेड/फ्लेम्ड - ट्युबलाइट/इपिफनी - बराज आॅफ क्रॅप टु कवरअप - एवरिबडी लिव्ड हॅपिली देरआफ्टर...
आपत्कालीन परीस्थिती
आपत्कालीन परीस्थिती मध्ये
सॉरबिट्रेट / ऍस्पिरीन (३०० एमजी )जीभेखाली ठेवावी .
Pages