Submitted by जीएस on 15 January, 2016 - 13:48
हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे तर काय उपाय करावा ? मागे एका मित्राच्या काकांची त्यांच्या डॉक्टरांनी बायपास केली होती तर मैत्रीणीच्या मावससासर्यांची दुसर्या डॉक्टरांनी अँन्जिओप्लास्टी केली होती त्यामुळे मला नक्की काय करू याबद्दल अधिक गोंधळायला झाले आहे. पण इथे व्यवस्थित सल्ला मिळून त्याप्रमाणे ताबडतोब उपाययोजना करता येईल असे वाट्ते.
कृपया उपचारांबद्दल बद्दल मार्गदर्शन करावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा रस झोकून असा शब्दप्रयोग
हा रस झोकून असा शब्दप्रयोग जास्त सांयुक्तिक राहील.
हृदयविकाराचा तीव्र झटका आला
हृदयविकाराचा तीव्र झटका आला असता जोरजोरात 'विठ्ठल , विठ्ठल' असा जप करावा. >> आलो, आलो!!
आलो, आलो!!>>>>>>>> :D
आलो, आलो!!>>>>>>>>

विठ्ठल चा काहीतरी संबध आहे
विठ्ठल चा काहीतरी संबध आहे वाट्ट. आलेच शोधुन.
बेलाच्या पानामधील औषधी
बेलाच्या पानामधील औषधी गुणवैशिष्ट्यांचा अनुल्लेख करू नयेत. दररोज एक बेलाचे पान घेऊन मायबोली वाचत वाचत खावे व प्रशासकांकडे एक तक्रार नोंदवावी. फुसके बार ते फुसके बार अश्या चोवीस तासांत किमान चार पेटलेल्या धाग्यांवर संयमाने प्रतिसाद लिहिण्याचा सराव सहा महिने केला आणि बेलाची पाने खात राहिले तर आपल्यालाच काय आजूबाजूच्या कित्येकांना हृदयविकार होत नाही.
सस्मित, शोधायची गरज
सस्मित, शोधायची गरज नाही.
यावर फार पूर्वीच जर्मनीतल्या श्री ग्लुटेन्बर्गर यांनी चॅन्सलर विद्यापीठात संशोधन केले आहे.
त्यानुसार हार्ट अॅटॅक म्हणजे काय तर हार्टला सप्लाय करणारे रक्ताचे पाईप म्हणजे करोनरिज ब्लॉक होतात.
आणि मूळात या करोनरित रक्त कुठून येतं तर हार्टमधून. आणि हार्टमध्ये रक्त शुद्ध करून कुठून येतं तर फुफ्फुसातून.
फुफ्फुस हा वातमय कोश, हार्ट हा प्राणमय कोश आणि त्यावरचे शरीर हा अन्नमय कोश आहे.
ज्यावेळी करोनरिज ब्लॉक होतात तेव्हा जोराने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे.
ठ्ठ हा शब्द अतिआघातक आणि वातौत्सर्जक असल्याने फुफ्फुसाच्या वातमय कोशाचे प्रसरण होते. त्यामुळे साहजिक करोनरिजचे प्रसरण होते आणि हार्टचा रक्तसप्लाय पूर्ववत होऊन हार्ट अटॅकची तीव्रता अगदी कमी होते.
जोराने ठ्ठ म्हटल्यावर पूर्ण हार्ट अॅटॅक पूर्ववतही होऊ शकतो.
मात्र यातली शक्ती फार जास्त असल्याने हार्ट अॅटॅक नसेल तर याचा प्रयोग करू नये. इतर काही कारणांनी छातीत दुखत असताना हा प्रयोग केल्यास विरुद्ध शक्ती वाढून उलट प्राणमय आणि अन्नमय कोशाचे नुकसान वातमय कोश करू शकतो.
(कोष नाही हां कोश)
तसेच अनस्टेबल अंजायना किंवा मायनर अॅटॅक असेल तर इतका मोठ्याने ठ्ठ म्हणायची गरज नसते.
नुसते ट म्हणून चालते. त्यावेळी 'सट्टल, सट्टल' म्हणावे.
(जन - अनहितार्थ जारी!)
(No subject)
Sati
Sati
रोज सकाळचा योगाभ्यासाचा वेळ
रोज सकाळचा योगाभ्यासाचा वेळ कमी करुन ट्ट आणि ठ्ठ म्हणत रहावे का?
ठ्ठ असेच म्हटले पाहिजे का?
ठ्ठ असेच म्हटले पाहिजे का? 'ठ्ठो ठ्ठो' असे आवाज काढले तर चालणार नाही का? वातमय कोश मोकळा करण्यासाठी? किंवा ढुम ढुम किंवा किमानपक्षी....
याबाबतीत कु.रु. जास्त चांगले
याबाबतीत कु.रु. जास्त चांगले सांगु शकेल वेगळा धागा काढुन.
साती, त्या जहनितार्थ
साती, त्या जहनितार्थ पोस्टीखाली "सी.एम.ओ. सिव्हिल हॉस्पिटल, मुंबई " अशी पदवी टाका. अन आपल्या त्या ह्यांच्या बोम्बाईल नंबर द्या.
हिरा 'ठ्ठ ऐवजी ठ्ठो असा आवाज
हिरा 'ठ्ठ ऐवजी ठ्ठो असा आवाज करून चालणार नाही का?' असा प्रश्न कुणीतरी अज्ञ बालक विचारेल याची कल्पना होतीच.
तर शास्त्रानुसार कोणत्याही कृतीमागे परमेश्वरी संकेत/ सदिच्छा नसेल तर ती कृती कितीही बलकारक असली तरी फलकारक होत नाही.
तेथे (ईश्वराचे) अधिष्ठान पाहिजे.
हे आपलेच ग्रंथ वाचून जर्मनांना उमजले पण आपण दळभद्री ते ज्ञान तिकडून इकडे येईपर्यंत वाट पहात , अनेकानेक हार्ट अटॅक्स आणि यमाचे थैमान सहन करत राहिलो याशिवाय दुसरा दैवदुर्विलास नसेल.
तेव्हा 'ठ्ठो' असा बंदुकीची आठवण देणारा विनाशकारी शब्द नको.
'विठ्ठल' च हवे.
'सटल' मधला 'स' हा ही सद्हेतू दर्शक आहे. 'सदिच्छा' सारखा.
स- चांगला
टल- हे अनस्टेबल अंजायना/मायनर अॅटॅक, तू निघून जा.
असा त्याचा अर्थ आहे.
(No subject)
हिला आवरा!!
हिला आवरा!!
सातीतै _/\_
सातीतै _/\_
व्यक्तीस रक्तगुत्थिकान्तक
व्यक्तीस रक्तगुत्थिकान्तक मेदारी घुटीका उगाळून द्यावी. शिवाय हृद्यबळवर्धक सुवर्णअंशयुक्त अमृतासव देण्यात यावे.
(नावाचा) वैद्य.
_तात्या_, एव्हढं मोठ्ठं नाव
_तात्या_, एव्हढं मोठ्ठं नाव वाचुन होईस्तोवर पेशंट तिरडीवरच जायचा.. _X_ असां
(No subject)
तात्या, माफ करा. तुम्ही
तात्या, माफ करा.
तुम्ही सांगितलेला उपाय हा हृदयविकारक्षम माणसाला हृदयविकार होऊच नये याकरिता आहे.
किंवा फार पूर्वी हृवि येऊन गेल्यानंतर हृदयाचे आकुंचन प्रसरण बल ( इजेक्शन फ्रॅक्शन ) वाढविण्यासाठी आहे.
हे दुशीकडूनआंधळ्याअनियोजितक्रमसुनियोजितआयुर्वेदिकुपचारचाचण्यांत (डबल ब्लाईंड रँडमाईज्ड कन्ट्रोल्ड आयुर्वेदिक क्लिनीकल ट्रायल्स) सिद्ध झाले आहे.
तुम्हाला ठाम उपचार माहित नसतील तर आडनावाचा गैरफायदा करून कन्फ्युजन तरी क्रिएट करू नका.
ज्यांना हृदय आहे त्यांनीच इथे
ज्यांना हृदय आहे त्यांनीच इथे प्रतिसाद द्यावा.
हृदय नसलेल्यांना अटॅक काही किडनीला येणार नाही.
धन्यवाद
आसंय का सातीताई, बरे झाले
आसंय का सातीताई, बरे झाले सांगितले. जातक (अर्र) रुग्णास वाचवले बघा तुम्ही. ते पाप टाळले बघा. ह्याबद्दल आपले आभार कसे माणू तेच समजत नाही.
आता आम्हासच नेत्रांजनी व मनतत्वआत्यंतवेगवर्धिनी काढा घ्यावा लागणार आस दिसतंय. सर्वत्र बोकाळलेल्या वजनव्यवस्थापन आश्रमांमध्ये सल्ले देत बसल्याने होत आस कधी कधी. तरी लोभ असावा.
तर प्रकीयेचे दोन भाग पडू शकतील. हृद्य बंद पडले असल्यास अथवा क्षीणतेने सुरु असल्यास.
हृदय बंद पडले हृद्यबडवतीक्रीया करून सुरु करण्याचा प्रयत्न करावा. एकदा ते सुरु झाले की धमनीलाशुद्धीकारक सत्वे द्यावी लागतील. तसेच झटक्यानंतर आलेला अशक्तपणा घालवण्यास सुहृदकाढा द्यावा लागेल.
साती
साती
विठ्ठला, ते काय
विठ्ठला,
ते काय तैलद्वीचक्ररथाचे स्वतच आटपा प्रणाली (डू इट युरसेल्फवाल मोटरसायकल) आहे होय? रुग्णाने ते वाचत बसायच्या फंदात पडू नये. स्वतःच्या वाचण्याची चिंता करावी.
पेजिंग फॉर मामी. मायबोलीवरचे
पेजिंग फॉर मामी. मायबोलीवरचे धम्माल धागे इथे सामील व्हायचं पोटेन्शिअल आहे या धाग्यात.
विषयाला धरून मी एकट्यानेच
विषयाला धरून मी एकट्यानेच प्रतिसाद दिला आहे असे वाटतेय हे कुणीही त्या लिंकावर क्लिक न केल्याने सिद्ध झाले.
बापरे....... काय चाललय इथे एक
बापरे....... काय चाललय इथे एक आयडी जिव तोडुन मदत मागतोय आणि हे असे सल्ले.
घोर कलयुग म्हणतात ते हेच का?
केश्वी +१
केश्वी +१
>> धागाकर्ते आहेत का
>> धागाकर्ते आहेत का अजून?
आहेस आहेत, गेलो तर अमानवीयवर अपडेट देईन. तोपर्यंत कृपया उपाय कळवत रहा.
साती आणि इतर सगळेच उपाय
पग्या आणि सिंडरेलाच्या राजकीय टोमण्यांचा अनुल्लेख करण्यात येत आहे.
तेलगू हार्ट, पिंपळपान रस,विट्ठल वगैरे सगळेच उपाय वैज्ञानिक मनाला पटत आहेत. पण हे सगळे उपचार फेबु आणि व्हॉटसअॅप सर्टिफाईड आहेत की नाही हे कसे कळावे? उपायाच्या माहितीबरोबर रतन टाटा, नारायणमुर्ती, व्हिएतनामचे तिसरे पंतप्रधान, आईन्स्टाईन, नासा किंवा गेला बाजार नाना पाटेकर यांचा हवाला व फोटो असता तर अस्सलतेबद्दल खात्री पटली असती.
यातला नक्की कुठला उपाय करू याबद्दल एक नवा धागेssष वा पोलेssष काढू का?
गेला बाजार नाना पाटेकर यांचा
गेला बाजार नाना पाटेकर यांचा हवाला व फोटो>>>>
अगदी
Pages