हृदयविकाराच्या तीव्र झटक्यावर उपाय हवा आहे.

Submitted by जीएस on 15 January, 2016 - 13:48

हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे तर काय उपाय करावा ? मागे एका मित्राच्या काकांची त्यांच्या डॉक्टरांनी बायपास केली होती तर मैत्रीणीच्या मावससासर्‍यांची दुसर्‍या डॉक्टरांनी अँन्जिओप्लास्टी केली होती त्यामुळे मला नक्की काय करू याबद्दल अधिक गोंधळायला झाले आहे. पण इथे व्यवस्थित सल्ला मिळून त्याप्रमाणे ताबडतोब उपाययोजना करता येईल असे वाट्ते.

कृपया उपचारांबद्दल बद्दल मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हृदये कचाकचा चावून खाणार्‍यांनी पहिला सल्ला द्यावा याला काय म्हणावे बरे? Proud

मी अमक्या शहरात आहे.... शहराचे नाव लिहीले असते तर तज्ञ मन्डळीन्ची नावे मिळाली असती... पुढे अजुन कुणाला रेफरन्स म्हणुन उपयोगी पडले असते....

लसुन खा आणि लवकर बरे व्हा....

ज्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल त्यांच्या नाकाजवळ दहा दिवस वापरलेला मोजा ( सॉक्स ) १० वेळा , १ मिनिटांसाठी १ सेकंदाच्या अंतराने धरावा.
वरील उपायाने फरक न पडल्यास Limburger चीजचा एक तुकडा तोंडात कोंबावाआणि दुसरा तुकडा नाकाजवळ धरावा.

सरकारला सांगा हृदयविकारावरची लस विकसित करायला !! हेच का तुमच्या सरकारचं काम ?
आज कॉंग्रेस सरकार असतं, तर अशी मायबोलीवर सल्ले मागत फिरायची वेळ आली नसती !!

सगळ्यात आधी एक सांगा की हृदय विकाराचा झटका कुणाला आला की उपाय हवाय?
तुम्हाला आला की दुसर्‍या कुणाला?
दुसर्‍या कुणाला आला तर जौदे, तुम्ही कशाला टेंशन घेताय?

तुम्हाला यायचाच असेल तर तुम्ही एक हार्टलेस माबोकर आहात की सहहृदय (विथ हार्ट) ते पहा.
जर तुम्हाला हृदय असेल तरच झटका येण्याची शक्यता आहे.
सो आधी तुम्हाला हृदय आहे याची खात्री जवळच्या व्यक्तींकडून (डॉक्टर बिक्टरकडे जाऊ नका, त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान डॉक्टर नसलेल्यांनाच असते) करून घ्या.
मगच असे धागे काढा.
धन्यवाद!

रुग्णाचा जीव वाचवणे हेच सर्वांचे ध्येय असले पाहीजे. काय करावे हे या व्हिडीओत पाहता येईल

https://www.youtube.com/watch?v=BKF2w95nbdc

कृत्रिम हृदयाचा विचारही करायला हरकत नसावी ( माबोवरचे डॉक्टर्स इतका अभ्यास करत नाहीत असा अंदाज आहे).

https://www.youtube.com/watch?v=TpBVNaY3xb4

हृदयविकाराचा तीव्र झटका आला असता जोरजोरात 'विठ्ठल , विठ्ठल' असा जप करावा. यातल्या ठ च्या आघताने हृदय पूर्ववतच नव्हे तर पूर्वीपेक्षा तंदुरुस्त होते.

असे वात्स्यायनाने पाणिनीच्या सुश्रितसंहितेत लिहून ठेवले आहे.

धागाकर्ते आहेत का अजून? असतील तर झटका तसा माइल्डच होता म्हणायचा.
की धागा श्रद्धांजली ग्रूपात हलवावा?

बरं उपाय.
भारतात (महाराष्ट्रात) १०८ व अमेरिकेत १९९ ला फोन करावा.

अरे हो की. ९११ बरोबरे. डोक्यात तेच होतं, बोटातून १९९ आलं. याप्रकारच्या झटक्याला १९९च पाहिजे Wink

कालच सहयाद्री वाहिनीवर हलो डॉक्टर मध्ये राहुल साने यान्ची या विषयावर मुलाखत होती .तीचे पुन:प्रसारण पहा.

हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे तर काय >>

ते उपाय जाऊदे.
आधी फेबुवर 'हॅविंग हार्ट अ‍ॅटॅक) असा स्टॅटस अपडेट टाका.
मायबोलीवर एक परिच्छेदभरून हृदयविकाराचे वर्णन लिहा. आणि ते कॉपीपेस्ट करून तुमचा वावर असलेल्या प्रत्येक वाहत्या पानावर टाका.
पेनफुल फेसचा एक सेल्फि घेऊन व्हॉटसॅप डीपी लावा.

मग माबोवर धागा काढा. त्यात सजेशन देणार्‍या प्रत्येकाला विपू करून अधिक माहिती विचारा.
मग आम्ही गामांच्या दोन धाग्यांच्या लिंक्स देऊ ते अभ्यासा.

अँजिओ की बायपास कन्फ्युजनच नको.
आधी कार्डीओलॉजिस्ट कडे जाऊन अँजिओग्राफी करून घ्या, निम्म्या करोनरिजची प्लास्टी करा.
मग सीव्हीटीएस कडे जाऊन बाकीच्या करोनरीजची बायपास करून घ्या.
शेवटी प्रत्येकाचे योगक्षेम चालविणे हे पेशंटसचे आद्य कर्तव्य आहे.

(अजून काही माहिती हवी असेल तर संपर्कातून ईमेल करा. मी हार्ट अ‍ॅटॅक्स दुरुस्त करते. तुमची मेल स्पॅममध्ये जाऊन डिलीट झाली नाही तर लवकरात लवकर उत्तर देईन.)

अरे ए! मी काहितरी सिरियस वाटून हा धागा उघडला :अओ:.
'लांडगा आला रे आला' ची गत होईल हा!

एनीवेज, खरंच कुणा पेशंटसाठी हा धागा असेल तर उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा.

अर्थात अश्या गंभीर बाबतीत अमक्याच्या तमक्याला डॉक्टरांनी ढमुक उपाय सांगितला म्हणून माबोकरांनी सल्ला द्यावा म्हटले तेव्हाच समजायला हवे की ही भंकस आहे Proud

डॅाक्टरांना स्वत:लाच असले झटके येतात याचा अर्थ याची काही पूर्व लक्षणे नसावीत.शरीरात काय बदल झाले की झटक्यांची शक्यता बळावते वगैरे.आर्थिक नुकसान,अचानक कुणाचे निधन या अनपेक्षित गोष्टींनी होत असेल तर त्याला दुर्घटनेच्या धक्क्यातून सावरणे हेच औषध असावे.

पिंपळपानाचा आकार हृदयासारखा असतो तसेच 'एका पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे' असे संतवचनही आहे. जिथे विश्वच तरतंय तिथे हृदयाची काय कथा..
तस्मात पिंपळपानाचा रस घेत चला.
हा रस घेऊन पांडुरंगासारखे उभे राहून विठ्ठल विठ्ठल असा जप केल्यास जास्त उपयोग होईल.

Pages