निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

catappa

IMG_3487.JPG

धन्यवाद स्निग्धा, मेधा. करंजच आहे ते. फोटो मॅच होताहेत. फ्लॉवर्स ऑफ इंडिया म्हणते
The leaves are a soft, shiny burgundy in early summer

पुढल्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये जाऊन बघायला पाहिजे...

catappa काय?? :-o विलायती चिंच आहे का ते??

http://www.maayboli.com/node/21536

प्रज्ञा, कथा होती ती..

इंद्रा.. हे जंगली बदामाचे झाड फोटोतच बरे. घराजवळ असेल तर फुलांची दुर्गंधी सहन होत नाही. माझ्या बारावीच्या परिक्षेचे सेंटर राजा शिवाजी विद्यालय होते, आणि तिथेच खिडकीजवळ हि झाडे, परिक्षेच्या दिवसात ऐन बहरात. काय बिशाद आहे कुणाला डुलकी लागेल !!!

त्याला, उक्षी म्हणतात. कोकणात या दिवसात सगळीकडेच फुललेली दिसते.>>>>>>>दिनेशदा, मी पोहोचले कोकणात. Proud

मानुषी, अहाहा! काय अद्भुत दृष्य आहे.

दिनेशदा, निसर्गाची गुढी पाहून, कोकणातली होळी आठवली अशीच उंचच्या ऊंच असते.

माऊ, टोमॅटो मस्त. हाच आवडतो मला. पिकला की माझ्यासाठी नक्की फोटो काढ. Happy

जिप्सी, मस्त फ़ोटो.

दुसरे काय आहे??>>>>>>..पांढरा चाफ़ा आहे का?

शोभा, या दिवसातला एस टी चा प्रवास म्हणजे, उक्षी, काजू, कुडा, फणस संमिश्र गंध !!!>>>>>>>>>.हो ना. आणि आजूबाजूला करवंदाच्या जाळी! Happy

माझ्या कडच्या अनंताला वाढ नाही & फुल पण नाही म्हणून मी मागे एकदा विचारले होते .
जागू , सायु & दिनेश यांनी सांगितले म्हणून मी पाल्म बराचसा कापला . त्यामुळे उन जास्त मिळायला लागले आणि झाड वाढायला लागले. या आठवड्यात एक कळी पण आली
खूप खूप आनंद झालाय .
धन्यवाद सगळ्यांना

हाय निगकर्स कसे आहात?
वाचतीये हळूहळू. शोभा धन्यवाद.
या वर्षीचा चेरी ब्लॉसम फेस्ट. ...हवा चांगलीच ढगाळ असल्याने फोटो ओक्केच.
हा गुलाबी

हा पांढरा

या फोटोत (पोटोमॅक नदीच्या) टायड्ल बेसिनच्या पलिकडील ब्लॉसमही दिसतोय.


आहाहा, आहाहा, आहाहा काय एकेक फोटू सायली आणि मानुषीताई.

मृणाल अभिनंदन.

सोसायटीतल्या झाडाला लिंब खुप लागली होती, गॅलरीतून थोडं वाकून बघायला लागतं, आज फोटु काढुया ठरवलं तर लिंब गायब. काढली असतील कोणीतरी. मी नाही काढत. Happy .

शेजा-यांनी काढली तर देतात मला.

अहाहा मस्त फोटो मानुषी!! साकुरा हानामी इन अमेलिका! Happy

मला शेवटून दुसरा खूप आवडला. आणि potomac च्या पलीकडल्या तीरावरचा दिसत नाहीय...

मानु............ सुंदर......... डोळे भरून पाहिलं तरी मन भरतच नाहीये............ सिंपली ऑसम!!!!!!!!!!!

मृणाल.. पहिल्या कळीबद्दल अभिनंदन.

मानुषी, फुलांचे क्लोजप्स प्लीज.. हि फुले समुहात जशी सुंदर दिसतात तशीच एकेकटी पण.. तेव्हा ते हवेतच.

अन्जू.. लिम्बे गेली लोणच्यात आता !

Pages