माझ्या वाईट सवयी ४ - निष्पाप जीवांची हत्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 January, 2016 - 12:50

लहानपणी मामाच्या गावाला फावल्या वेळेत मी खिडकीपाशी बसायचो. समोर ट्रेनचा ट्रॅक होता. तासाभराने एखादी ट्रेन जायची. पण माझी दोन तास बसायचीही तयारी असायची. खिडकी ओलांडून कधी पलीकडे गेलो नाही. कारण तेव्हा माझे वय वर्षे फक्त सहा होते.

एके दिवशी संध्याकाळच्या तांबड्या किरणांनी ऊजळून निघालेल्या त्या खिडकीच्या चौकटीवर, एक मुंग्यांची रांग मला ऊत्तरेकडून पश्चिमेकडे जाताना दिसली. कुतुहल चाळवले. हा काय प्राणी असतो म्हणून मामीकडे विचारणा केली. त्या लाल मुंग्या आहेत. धोकादायक असतात. चावल्या तर फोड येऊ शकतो. असे सांगत मला त्यांच्यापासून दूर राहायचा सल्ला मिळाला. पण न मागता मिळालेला सल्ला मी आजवर कधी घेतला नाही. प्राणी धोकादायक आहे तर त्याचा काटा काढायला हवा ही मानवी बुद्धी मला उपजत होती. पण आता तो काटा काढायचा कसा यावर माझे शैतानी दिमाग चालू लागले. आणि सुचले. त्या वयात सहज साध्य होणारे हत्यार. म्हणजेच पाणी!

‘मुंगीला मुताचा पूर’ ही म्हण माहीत व्हायच्या आधी मला हे सुचले हे विशेष. पाण्याची एक चूळ अलगद रांगोळी सोडावी तशी त्या मुंग्यांच्या रांगेवरून सोडली आणि दुसर्‍याच क्षणाला त्या मुंग्या सैरावैरा पळू लागल्या. पळता पळता शेजारच्या खाटेवर झोपलेल्या माझ्या मामाला चावल्या आणि मुंग्यांसोबत माझीही बिनपाण्याची धुलाई झाली.

असो, मात्र मुंग्यांना मारताना त्यांना बिथरवू नये हा मूलमंत्र मी शिकलो. मग मी दुसरा आणि यशस्वी उपाय वापरायला सुरुवात केली. तो चिचोक्यांचा की कसल्याश्या बियांचा खेळ असतो पहा. जमीनीवर बिया टाकायच्या आणि ईतर बियांना धक्का न लावता एकेक बी बाजूला काढायची. बस्स याचप्रकारे रांगेतली एकेक मुंगी बोटाने टिपून, तिला चिरडून गायब करू लागलो. तिच्या डेडबॉडीचा एक बारीकसा कणही त्या रांगेत ठेवायचो नाही. एखादी मुंगी एकटी बाजूला दिसली, की घेतला तिला कोपच्यात. तिच्या साथीदारांना जराही खबर न लागल्याने त्या चालत राहायच्या. असे करता करता हळूहळू एकेक मुंगी कमी होत जायची. त्या मुंग्यांची एकूण संख्या पाहता खूप वेळखाऊ आणि धीराचे काम होते हे. पण यातून मिळणार्‍या आसूरी आनंदाचे मोल अफाट होते.

हाच आसूरी आनंद मग मी पुढच्या आयुष्यात ईतर कैक जिवांना मारून मिळवू लागलो.

झुरळाला मी घाबरायचो, पण त्याला चपलेच्या एकाच फटक्यात मारायचो. झुरळ उडणारे असेल तर चप्पल फेकून मारायचो. पण मारायचो!
पालीला त्यापेक्षा जास्त घाबरायचो. पण शुक शुक करून हाकलून लावण्याऐवजी तिला काठीचा फटका मारणे पसंद करायचो. तिच्या तुटून पडलेल्या वळवळणार्‍या शेपटीकडे बघणे एखाद्या स्वयंचलित खेळण्यासारखा आनंद देऊन जायचे.

चतुर म्हणून एक किडा असतो पहा. त्याच्या नाजूकश्या पंखांच्या बारीकश्या फडफडीतून निघणारा नाद फार मजेशीर असतो. त्याची निमुळती शेपटी एका दोर्‍याला बांधून पतंग किंवा फुग्यासारखे खेळणे हा माझा छंद होता. त्या दोर्‍याच्या दुसर्‍या टोकाला आणखी एक चतुर बांधला की ते एकमेकांना खेचत उडतात. या खेळाला आणखी मजेशीर करायला म्हणून मी चार पाच चतुर वेगवेगळ्या दोर्‍यांना बांधून त्या दोर्‍यांची एकत्र गाठ मारायचो. प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला उडायचा बघायचा आणि कुठेही लांबवर उडून न जाता एका ठराविक परीघातच आपला जीव काढत फिरायचे.

पावसाळ्यात आम्ही दादरावर सार्वजनिक पॅसेजमध्ये कॅरम खेळायचो. तिथे मोठमोठ्या माश्या घोंघावत यायच्या. बरेचश्या सुस्तावलेल्या असायच्या. त्यांना मारण्याऐवजी मी चिमटीत पकडायचो आणि कॅरमवर टांगलेल्या बल्बचा त्यांना चटका द्यायचो. हेतू हा की त्यांच्यावर माझी दहशत बसावी, त्यांनी जाऊन त्यांच्या ईतर सवंगड्यांना सांगावे की त्या कॅरमवरच्या दादाला त्रास देऊ नका, तो पकडून नको तिथे चटका देतो.

माश्यांवरून आठवले, पावसाळ्यात लोकांच्या दारात कपडे वाळत घातलेले असायचे. त्यातील नाड्यांवर माश्यांचा झुबकाच बसलेला असायचा. त्यावर मूठ मारताच एकाच वेळी किमान सात-आठ माश्या मुठीत कैद व्हायच्या. मग ती बंद मूठ कोणाच्या तरी तोंडासमोर नेऊन उघडायची. अचानक नाकातोंडावर झालेल्या भुणभुणीने ती व्यक्ती भणभणूनच निघायला हवी. पण मग कधी असा एखादा गिर्हाईक नाही मिळाला तर त्या माश्या मुठीतच जीव सोडायच्या. त्यांना मूठमातीही न देता हात झटकून मोकळा व्हायचो. एकाच वेळी सात-आठ जीवांच्या रक्ताने रंगलेले हात असा हा प्रसंग विरळाच.

एक प्राणी होता ऊंदीर. त्याला पिंजर्‍यात पकडले की त्याची विल्हेवाट लावायचे काम माझ्याकडे लागायचे. तो पिंजरा घेत गच्चीवर जायचो आणि बिल्डींगच्या मागच्या बाजूला एका मोकळ्या जागेत त्या ऊंदराला भिरकावून द्यायचो. पडल्यापडल्या काही मरायचा नाही, पण जबर मार लागल्यागत निपचित पडून राहायचा. थोड्यावेळाने चालण्याईतपत ताकद यायची, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असायचा. कारण त्याला टाकायच्या आधी त्याचे प्रदर्शन मांडून मी आजूबाजूच्या घार-कावळ्यांना जेवायचे आमंत्रण दिलेले असायचे. तो खाली पडताच कुठून कुठून येत त्यावर तुटून पडायचे. अर्धा जीव मी घ्यायचो, अर्धा जीव ते काढायचे.

हा मूषक संहाराचा कार्यक्रम चालायचा तेव्हा मी एकटाच नसायचो तर भलामोठा ग्रूप असायचा, आम्ही बराच दंगा घालायचो. शेवटी लाईव्ह मृत्युचा खेळ बघणे कोणाला आवडत नाही.

मोठमोठे शास्त्रज्ञ आधी प्रयोग करतात मग शोध लावतात. लहान मुलांना आधी शोध लागतात मग ते प्रयोग करून त्याची पडताळणी करतात. असेच एके दिवशी आम्हाला शोध लागला की मांजराला वरून खाली टाकले तरी ती मरत नाही, तर चार पायांवर उभी राहते. मांजरीच्या सुदैवाने आम्ही या प्रयोगासाठी नेहमीसारखे गच्चीवर न जाता दुसर्‍या माळ्यावरून तिला टाकायचे ठरवले. बाजीगर चित्रपटात शिल्पा शेट्टीला शाहरूख ढकलून देताना ती जेवढी बेसावध होती, तेवढेच ती मांजरही बेसावध होती. जेव्हा आम्ही तिला गोंजारत गोंजारत अचानक वरतून खाली फेकून दिले. त्याचा परीणाम म्हणून म्हणा, ती चार पायांऐवजी साडेतीन पायांवर पडली. पुढे आम्हालाही मजबूत पडली कारण ती मांजर पाळीव होती. महिनाभर तरी लंगडत लंगडत चालत होती आणि आम्ही तिच्या मालकाच्या शिव्या खात होतो.

कुत्रा या प्राण्यावर लहानपणापासूनच खुन्नस. माझीच नाही तर आम्हा बरेच जणांची. काही ना काही कारणाने, कुठल्या ना कुठल्या कुत्र्यावर खुन्नस असायचीच. त्यामुळे या प्राण्याचे काही करता आले तर मजा येईल असे सारखे वाटायचे. पण आमचे शारीरीक वय आणि ताकद पाहता तेवढी आमची ऐपत नव्हती. पण एक दिवस समजले. यांच्या शेपटीला फटाक्यांची माळ लावल्यास यांची फार तंतरते. बस्स मग एकदोन दिवाळ्या अश्याही गाजवल्या.

यापेक्षा मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या नादी फारसे लागलो नाही. कारण ते सोपे नसायचे. तसेच प्राणी जेवढा मोठा तेवढी त्याबद्दलची भूतदया वाढत जाते, अन्यथा छोट्यामोठ्या किटकांना आपण कसलीही तमा न बाळगता सहज चिरडून टाकतो.

एकंदरीत मनुष्य कितीही नागरी झाला तरी या सृष्टीत नियम जंगलचेच चालतात. या जंगलचा राजा सिंह नाही तर माणूस आहे आणि हे जग फक्त माणसांचेच आहे. हे मला लहान वयातच समजले होते.

आता जरा मांसाहाराकडे वळूया Happy

जर मांसाहार करणे हे आपल्या उदरभरणासाठी केलेल्या निष्पाप जीवांच्या हत्याच असतील, तर वरची सारी उदाहरणे चिल्लर वाटावीत एवढा मांसाहार आजवर केलाय. कारण मी शाकाहार अपवादानेच करतो, जे काही करतो मांसाहारच करतो. खाईन तर मटणबोटी नाही तर अर्धपोटी हे माझे तत्व आहे, आणि ते पाळतोही.

अक्कल येईस्तोवर आईच्या सांगण्यानुसार शाकाहाराचे ठराविक वार पाळायचो. मग स्कूलमध्ये सायन्स वायन्स केले आणि समजले की वनस्पती सुद्धा सजीवच असतात. एक सजीव दुसर्‍या सजीवाला खाऊनच जगू शकतो. जर हेच वैश्विक सत्य असेल तर यात सण वार का आणा, असे म्हणत सारेच ताळतंत्र सोडले. आज वर्षाचे ३६५ (लीप ईयर असल्यास ३६६) दिवस मांसमच्छी खाऊ शकतो. त्यापैकी किमान ३०० दिवस तरी खाणे होतेच.

पण जर हे पाप कसायाच्या डोक्याला लागत असेल तर मात्र मी सुटलो. नाही म्हणायला एका सश्याच्या शिकारीत सामील होतो. त्याला मारून खाल्ले तेवढे पाप माझ्या शीरावर घ्यायला मी तयार आहे.

तसा मी संवेदनशील सुद्धा आहे. मानवी रक्त बघवत नाही. स्वत:चे तर मुळीच बघवत नाही. ते पाहता माझा एक शाकाहारी मित्र मला म्हणालेला, रुनम्या तू थेट तयार मांसमटण खातोस म्हणून तुला अपराधीपणाची भावना मनात येत नाही. कधी कोंबड्याबकरे मारताना त्यांची तडफड अनुभवशील तर कदाचित तुला खायला जमणार नाही.

यावर मी फक्त हसलो. कारण त्याचे ते वाक्य मला थेट भूतकाळात घेऊन गेले. माझे आजोबा अगदी दारात कोंबडी कापायचे. आमच्या शेजारपारच्यांची त्याबाबत काही तक्रार नसायची हे एक चांगले होते. आणि तसेही ते भल्या पहाटे उठून कापायचे. कापण्यात हुशार असल्याने कोंबड्याची जास्त तडफड व्हायची नाही. जास्त आवाज व्हायचा नाही. त्यानंतर त्याची पिसे काढून सोलायचा कार्यक्रमही तिथेच चालायचा. तर हे सारे बघायला म्हणून मी मुद्दाम लवकर उठायचो. कधी जाग नाही आली किंवा घरच्यांनी उठवले नाही तर रडून धिंगाणा घालायचो, एवढा तो नजारा बघायला मला आवडायचे. त्यामुळे लहानपणीच माझ्या मनावर हे ठाम ठसले होते की मांसाहाराचा आस्वाद घ्यायचा असेल तर मेलेल्या जीवासाठी अश्रू ढाळण्यात काही अर्थ नाही.

लेख ईथेच थांबवतो आता. पण जाता जाता कर्मसिद्धांतानुसार मला मिळालेली शिक्षा नक्कीच सांगावीशी वाटतेय.
फार काही नाही, बस्स माझी गर्लफ्रेंड, जिच्याशी मी लग्न देखील करणार आहे, ती तेवढी शुद्ध शाकाहारी मिळाली आहे Happy

चालायचंच,
बस्स आपलाच
ऋन्मेऽऽष

माझ्या आधीच्या वाईटसाईट सवयी वाचण्यासाठी खालील लिंकांवर टिचक्या मारू शकता.

माझ्या वाईट सवयी १ - चोरी http://www.maayboli.com/node/56756
माझ्या वाईट सवयी २ - जुगार http://www.maayboli.com/node/56890
माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ http://www.maayboli.com/node/56984

अवांतर - यावेळची वाचनखूण मस्त जमलीय. तसेही माझे धागे हे लेखनाची हत्याच असतात Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> देवही मनुष्यांच्याच फेवरमध्ये आहे तर... <<<<
नाही तसे नै म्हणायचे..... असे म्हणायचे की "हिंदुंचा देवही" वंचित दुर्बल किडामुंगी सारख्या घटकांच्या विरुद्ध आहे.... पार्शिलिटी कर्तोय... Proud

जो देवच मानत नाही त्याला काय हिंदूंचा आणि काय ईतरधर्मीयांचा..
पण हे एकंदरीत अन्यायकारक आहे हे आपल्यालाही कबूल तर

पळता पळता शेजारच्या खाटेवर झोपलेल्या माझ्या मामाला चावल्या आणि मुंग्यांसोबत माझीही बिनपाण्याची धुलाई झाली.>>>>:हाहा:

मी ४ ते ५ वर्षाची असेन. त्या वेळी मुन्गळे दिसले की त्याना फटका मारायची. मग आई-बाबा दोघे पण रागवले, त्यानी समजावुन सान्गीतले की अशा मुक्या जीवान्ची हत्या करु नये. मग ते बन्द झाले. नन्तर काही वर्षानी ( मी १० वर्षाची असताना) मी आणी माझ्या बाबान्च्या मित्राच्या मुलाने , तो माझ्यापेक्षा ३ वर्षानी लहान, मुन्गाच्या वारुळात पाणी+तेल्+व्हिनेगर आणी असच काहीतरी मिश्रण बनवुन ओतले. ( त्या वेळेस मुन्ग्या आणी तत्सम किटकान्ची घरे कशी असतात हे शोधायचे आणी नवीन सन्शोधक बनण्याचे डोहाळे लागले होते). त्या मुन्ग्या बिचार्‍या आधी धुम पळाल्या, बाकी पाण्यात गेल्या ( त्यान्च्या पत्रिकेत पाण्यात बुडुन मरण्याचे योग असतील) मग असले आचरट चाळे बन्द झाले.

लेटेस्ट म्हणजे नाताळात अलीबागला गेले असताना किनार्‍यावर खेकड्याची ( पिल्लु खेकडा) मनोहारी बिळे दिसली. एकदम पिटुकली होती. ओहोटी असताना ( सकाळी व दुपारी ३ च्या आसपास भरती होती ) सन्ध्याकाळी ती बिळे उघडी पडली. मग एकातुन एक पिल्लु उन्डारायला निघाले, पण माझी चाहुल लागल्यावर परत बिळात लपुन बसले. मग मी तिथे काड्या शोधायचा प्रयत्न केला, म्हणल काडी सापडली की ती बिळात घालुन याला बाहेर काढु. पण एकही काडी सापडली नाही. मग परत आलो, तेव्हा ठरवले की मायबोली ही काड्या करण्याची हक्काची जागा असताना, दुसरीकडे ते करायचे नाही.:खोखो:

>>>> पण हे एकंदरीत अन्यायकारक आहे हे आपल्यालाही कबूल तर <<<<<
नाही. देव्/चित्रगुप्त आपल्या केल्या कृतीचा "अर्थ" कसा लावून न्याय देतो त्याचा कोड/क्लॉजेस ठाऊक नाहीत त्यामुळे भाष्य करता येत नाही.
तुमच्या विचारणेमागिल सूप्त आशय असा की, जीवाच्या बदल्यात जीव असा न्याय व्हायला हवा, तर तसे मानवाच्या न्याय व्यवस्थेतही नसते (अपवाद वगळता).

तुमच्या विचारणेमागिल सूप्त आशय असा की, जीवाच्या बदल्यात जीव असा न्याय व्हायला हवा, तर तसे मानवाच्या न्याय व्यवस्थेतही नसते (अपवाद वगळता).
>>>
अगदी तसाच नाही, पण कमॉन.. करोडो मुंग्या, लाखो मच्छर, हजारो झुरळे, शेकडो पाली आणि तितकेच ऊंदरे मारूनही आज मी सर्दी थंडी ताप खोकला सारखे आजार घेत जगतोय. हा नक्कीच न्याय नाही. किंवा आपण म्हणता तसे माझ्या या कृतीचा काहीतरी चांगलाच अर्थ देवाने / चित्र गुप्ताने लावला असावा. कदाचित मी त्या जीवांना मोक्ष दिला असावा. जसे कृष्ण आणि रामाचे अवतार अनुक्रमे कंस आणि रावणाला संपवायला झाले तसे कदाचित मी देखील त्या क्षुद्र किड्यांना संपवायला जन्म घेतला असावा..

अदिती,
इथे कुणालाही ट्रीटमेंटची गरज नाही.
कारण असा चिटवळपणा आपण सगळ्यांनीच आपापल्या शक्तीनुसार केलेला आहे.
मी मुंग्यांच्या आणि डासांच्या बाबतीत डिट्टो!
त्याहून जास्त नाही.
झुरळ्/पाल्/उंदीर दिसल्यावर होलपटून टाकते त्यांच्याही मरणाचा आन्ण्द घेता येत नाही.

आणि दुटप्पीपणाची गोष्ट अशी की यातले (मुंग्या आणि डास सोडून )बाकीचे उपद्व्याप मुलांनाही करू देत नाही.

किंवा आपण म्हणता तसे माझ्या या कृतीचा काहीतरी चांगलाच अर्थ देवाने / चित्र गुप्ताने लावला असावा. कदाचित मी त्या जीवांना मोक्ष दिला असावा. जसे कृष्ण आणि रामाचे अवतार अनुक्रमे कंस आणि रावणाला संपवायला झाले तसे कदाचित मी देखील त्या क्षुद्र किड्यांना संपवायला जन्म घेतला असावा..
>> पण तुमचा देवावर विश्वास नाही ना?

>>>>> किंवा आपण म्हणता तसे माझ्या या कृतीचा काहीतरी चांगलाच अर्थ देवाने / चित्र गुप्ताने लावला असावा. <<<<
नाही, बर्‍याचदा असे दिसते की पूर्वसुकृताप्रमाणे संचित पुण्यकर्म असेस्तोवर माणसांस "क्रुतिचे स्वातंत्र्य" असते व तो त्यास हवे तसे वागत जातो. त्याच्या सर्व "कर्माची " नोंद होतच असते. हे स्वातंत्र्य असेस्तोवर बहुधा पूर्वकर्मफलाचे परिणाम भोगण्याचे पुढे पुढे ढकलले जात असावे असे वाटते. एकदा का पूर्वपुण्याईमुळेचे "कर्मस्वातंत्र्य" अर्थात चांगले वागण्याची परत परत मिळणारी संधी, पुण्य संपल्यावर मग आधीच्या सर्व कर्मफलांचा हिशेब घातला जात असावा....
हे म्हणजे माणुस जोवर कमावता आहे, दिवाळखोर जाहिर झालेला नाही तोवरचे लोकांचे त्याचेबरोबरचे वागणे, व दिवाळखोरीनंतरचे वागणे यातिल फरकासारखे वाटते. फक्त इथे "दिवाळखोरी" आर्थिक नसुन, "पुण्यकर्माच्या संचिताची" असते व ज्याक्षणी पूर्वसंचित पुण्याईद्वारे मिळणारे कर्मस्वातंत्र्य संपते त्याक्षणापासुन आधीच्या बर्‍यावाईट कर्मांचा हिशोब सुरु होतो. कर्मस्वातंत्र्य संपणे हा आर्थिक वा पूर्वपुण्याईचे संचित दिवाळखोरीत निघाल्याचा समान हिस्सा आहे. खिशातील सर्व पैका संपल्यावर माणूस जसा पराधीन होतो, तद्वतच, पण थोड्या वेगळ्या अंगाने, कर्मस्वातंत्र्यच संपल्यावर, मग उरतो तो निव्वळ केल्या बर्‍यावाईट (बहुधा वाईटच..) कर्मांचा भोग. वाईटच अशा अर्थाने की जोवर पुण्य आहे, तोवर कर्मस्वातंत्र्याचा थोडा तरी धागा जीवनेच्छेत शिल्लक असतो. पुण्यच संपले की निव्वळ भोग उरतो.

त्या त्या प्राण्यांना/किडामुंगीला तुमच्या हातुन अशा अशा प्रकारे मरण वा छळवाद हा "त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापकर्माचा भोग असेल" हे जरी मानले तरी तुम्हाला मनुष्यजन्मात मिळालेले "कर्मस्वातंत्र्य" तुम्ही कसे वापरता यावरही तुमचा पुढील "भोग निश्चित" होत जातो अशी हिंदु धर्माची मान्यता आहे.
देव करो अन तुमचे सर्दीखोकल्यावरच निभावो.

कृष्ण आणि रामाचे अवतार अनुक्रमे कंस आणि रावणाला संपवायला झाले तसे कदाचित मी देखील त्या क्षुद्र किड्यांना संपवायला जन्म घेतला असावा..<<<<<<

ॠ,तु किड्यांना क्षुद्र म्हणतो आहेस पण काहिजण तर माणसांनाच क्षुद्र ठरवुन मारतात त्यांचा हिशोब कसा आणि कुठे चुकता होतो?

पण तुमचा देवावर विश्वास नाही ना?
>>
माझा नाहीये. पण त्यांचा विश्वासानुसार देव खरा मानला तर हे असे असू शकते का असे त्यांना विचारतोय.
बाकी माझा देवावर विश्वास नसल्याने त्यांनी म्हटलेच की हो बाबा तू देवाचाच अवतार आहेस तर हुरळून जाणार नाही हे नक्की Happy

बर्‍याचदा असे दिसते की पूर्वसुकृताप्रमाणे संचित पुण्यकर्म असेस्तोवर
>>
लिंबूजी म्हणजे मी पुण्यकर्म केले आहे तर ..
या जन्मात की मागच्या जन्मात?

१) माझा विश्वास्/श्रद्धा असे आहे की मी लहानपणि कळत/नकळत ज्या ज्या किडामुंगी जीव जंतु यांना मारले आहे, त्याची फळे मला या ना त्या जखमा/दुखण्यांच्या स्वरुपात याच जन्मी प्राप्त झाली आहेत.

२) त्या त्या प्राण्यांना/किडामुंगीला तुमच्या हातुन अशा अशा प्रकारे मरण वा छळवाद हा "त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापकर्माचा भोग असेल"

>>>

या दोन वाक्यांनी कन्फ्यूज केलेय.
पापाची फळे त्याच जन्मात मिळतात की पुढचा जन्म किडामुंगीचा घेऊन एका पाप्याच्या हातून आपण चिरडले जातो?

ॠ,तु किड्यांना क्षुद्र म्हणतो आहेस पण काहिजण तर माणसांनाच क्षुद्र ठरवुन मारतात त्यांचा हिशोब कसा आणि कुठे चुकता होतो?
>>>
प्रत्येक धर्माचा आणि त्या धर्मातील हिशोब वेगळा असतो असे इथेही मानल्यास हिशोब करताना मारणार्‍या माणसाचा धर्म बघितला जातो की मरणार्‍या हे तर असा भेदभाव माननारेच सांगू शकतात.

गान्डूळान्वर मी ठ टाकल्यावर होणार्या गुन्डाळी ला बघायला मजा यायची. कोणी तरी सान्गीतलेल की मुन्ग्यावर कून्कू टाकल की मुन्ग्या जातात. तेव्हा ते टाकून वाट बघत बसायचे.

>>>> लिंबूजी म्हणजे मी पुण्यकर्म केले आहे तर .. या जन्मात की मागच्या जन्मात? <<<<
हिंदु धर्मश्रद्धेनुसार/शास्त्रानुसार, पुण्यकर्म करण्यास केवळ मानवजन्मच हवा असेही नाही. कोणत्याही योनितिल जन्मात त्या त्या योनिच्या मर्यादेनुसार तो तो जीव पुण्यकर्म करु शकतच असतो. मात्र मनुष्य जन्मात आधीच्या कर्माचे फल भोगुन, अधिकचे कर्मफल न वाढवता अंतिमतः मोक्षाप्रती म्हणजेच जन्मजन्मांतरीच्या फेर्‍यातुन सुटका होण्यास अधिक उपयोगी बुद्धी/मन दिलेले आहे.
त्यामुळे तुम्ही मागच्या कोणत्या जन्मात कोणत्या योनित काहीतरी (पुण्य) कर्म केले असल्याशिवाय मनुष्यजन्म प्राप्त होणे नाही. अन मिळालेल्या मनुष्य जन्माचा सदुपयोग करण्याचे नियम म्हणजे हिंदु धर्मतत्वज्ञान.

>>>> पापाची फळे त्याच जन्मात मिळतात की पुढचा जन्म किडामुंगीचा घेऊन एका पाप्याच्या हातून आपण चिरडले जातो? <<<< ते तुम्ही केलेल्या कर्माच्या फलाच्या तीव्रतेवर, तसेच आधीचे किती भोग भोगायचे अजुनही शिल्लक आहेत यावर अवलंबुन आहे. अन म्हणुनच मी माबोवरच एके ठिकाणी निवेदिले होते की १९७८ साली डोंगळ्यांना केपांनी मारल्याचे फळ मला उण्यापुर्‍या काही वर्षातच म्हणजे १९९५ मधेच मिळाले, तर मी असाही अर्थ लावु शकतो की जर मी कमित कमि वाईट कर्मफल नि:ष्पन्न होईल अशा कृति टाळल्या, शिवाय उगाचच "पुण्याच्या" मागे न धावता "नि:ष्काम कर्मयोग" आचरला तर मोक्षयोग लौकर येऊ शकतो कारण वरील ७८ ते ९५ हा अत्यंत थोडा कालखंड. बहुतांश मानव मात्र बघण्यात असे येते की "भोग भोगित असतात" व तेव्हा विचार करीत रहातात की मी तर या जन्मात् कुणाचेही कसलेही वाईट केले नाही तरी "हा भोग माझ्या(च) वाट्याला का अन अन्य दुसर्‍या कुणाच्या (जरी समान परिस्थितीत असले तरी) वाट्याला का नाही". याचे कारणच "पूर्व संचित" हे असते अशी हिंदुधर्माची मान्यता आहे.

>>>> प्रत्येक धर्माचा आणि त्या धर्मातील हिशोब वेगळा असतो असे इथेही मानल्यास हिशोब करताना मारणार्‍या माणसाचा धर्म बघितला जातो की मरणार्‍या हे तर असा भेदभाव माननारेच सांगू शकतात. <<<<
तुम्ही सध्याचे हिंदुतर जे धर्म बघता आहात ते "अर्वाचिन" आहेत, तर हिंदू धर्म फार फार पुरातन आहे, इतका की त्याचि कालनिश्चित होत नाही. अन्य धर्म (इथे मी प्रमुख ख्रिश्चन/मुस्लिम/बौद्ध आधी धर्म गृहित धरतोय) हिंदु तत्वज्ञान नाकारुन वा त्याच्या विरोधी जाउन निर्माण झालेले आहेत असे मानण्यास सबळ कारणे आहेत. तरीही निव्वळ हिंदु म्हणून विचार करावयाचा, तर तुम्ही कोणत्या धर्मात/जातीत्/भूप्रदेशात कसला जन्म घ्याल ते देखिल तुमच्या पूर्वकर्मांवर आधारित असेच ठरते, इरिस्पेक्टीव ऑफ तुम्ही सध्या कोणत्या धर्मात आहात. सबब हिंदु म्हणून मी तरी असेच मानतो, की व्यक्ति कोणत्याही जातीधर्मातील असेल, तिला "कर्मफल" आहेच आहे.

काय रे तुम्ही … इथेपण Proud

बाकी माझे कारनामे:

१. मुंग्या: कधीच मारावाश्या वाटल्या नाही. उलट थोडीशी साखर ठेऊन द्यायचो त्यांच्यासमोर Happy

२. झुरळे: लहानपणापासून हे पुण्यकर्म माझ्याचकडे. झाडणी, पेपर, आताशा हिट वापरून ह्यांचा नायनाट करतो.

३. किडे : पावसाळ्यात नेहेमी व्हायचे. आता पानाला तेल लाऊन ट्यूबला लटकवायचो आणि मग भरपूर जमले की एका चपलेत खतम (अर्थात ते पान खाली उतरवून बर Wink )

४. रातकिडे, नाकतोडे, चतुर: ह्यांना भरपुरदा पकडून त्यांच्या डोक्यात बारीक धाग्याने बांधून उडवायचो Wink नाकतोड्याच्या फायटिंग तेव्हा हिट आयटम होता. शिवाय एकेक पाय तोडून टाकायचो म्हणजे पळता यायचं नाही त्यांना.

५. फुलपाखरू, मखमलीचे किडे: ह्यांनाही सोडल नाहीये. पकडून बाटलीत बंद करून ठेवायचो. हवा जावी म्हणून २ छिद्र. मग फुलाच्या पाकळ्या फुल, पान आदी टाकून बघत राहणे. ह्या उद्योगाहून मार पडलाय Proud

६. लहानपणी घर शेताच्या बाजूला असल्याने गुलेरनी पक्षांना उडवणे आदी प्रकार झालेत. आता हे कबुतरांच्या बाबतीत असत.

७. खेकड्यांच्या नांगी तोडून मित्रांशी मारामारी करणे Wink

आता वाटत की मी फारच क्रूर होतो. पण ऋन्मेष, तुझ्यामुळे कळले, हे असे बरेच आहेत Proud

रसना.. वावा वावा गांडूळ मस्तच.. विसरलेलोच याला. पण ते ही बरोबर आहे म्हणा, कारण तो मीठाचा प्रयोग वगळता कधी फारसे क्रूरपणे छळले नाही याला.. की हट गांडूळा म्हणत चिरडले नाही. उलट मॅगी नूडल्स खायला जेवढी मजा यायची तेवढेच गांडूळांचा झुबका बघायला मजा यायची. मोठ्यांना भले तो किळसवाणा प्रकार वाटत असेना.. एखादा मातीत रुतलेला दगड हटवला की त्याखाली आरामात पहुडलेली गांडुळे अचानक वळवळ करू लागणे हे द्रुश्य बघायला मजेशीर वाटायचे.. मग हिरयाच्या झाडूची काडी घेऊन त्यांना उचलणे, त्या काडीवर सुकत घातलेल्या टॉवेलसारखे त्यांचे लटकणे आणि मग ती काडी घेत ज्याला किळस वाटते अश्याच्या अंगावर धाऊन जाणे.. धमाल यायची.... गेले ते दिवस .. रम्य ते बालपण

@ लिंबूभाऊ,
लवकरच आपण एका स्वतंत्र धाग्यात भेटूया.
अन्यथा मी माझ्या १०० वाईट सवयी सांगणार आणि प्रत्येक धाग्यात आपण दोघे कर्मसिद्धांतानुसार त्यावर चर्चा करत बसणार ..

>>>> अन्यथा मी माझ्या १०० वाईट सवयी सांगणार आणि प्रत्येक धाग्यात आपण दोघे कर्मसिद्धांतानुसार त्यावर चर्चा करत बसणार .. <<<<<< Lol ओके, डन.
पण केल्या पापकर्माची "शांती" होमहवनाद्वारे करुन टाका..... Wink म्हणजे काळजी नको...

माझा सध्याचा क्रुरपणा एवढाच आहे की,,, मी बाल्कनी, पॅसेज्,खिडक्या ,अजुन कुठे जिथे कबुतरांना घरटे करणे शक्य आहे तिथे करु देत नाही.लगेच साफसफाई करुन टाकते.अंडी घातली असतील तर वाईट वाटत..पण काय करणार ?????
त्यांना दाणे टाकले म्हणजे आपली संपत्ती वाढते ह्या विचारसरणीचा तीव्र निषेध Angry
बाकी मांसाहारभक्षण करण्याबाबत मला कधीच वाईट वाटत नाही. Happy

लहानपणीचे उद्योग म्हणून बाकी सगळे एकवेळा ठीक आहे पण

शेवटी लाईव्ह मृत्युचा खेळ बघणे कोणाला आवडत नाही.>> हे जरा अतीच होतेय Angry

शेवटी लाईव्ह मृत्युचा खेळ बघणे कोणाला आवडत नाही.>> हे जरा अतीच होतेय
>>
संस्कृत भाषेत एक म्हण आहे. साधारण याच अर्थाची. ओळखायचा प्रयत्न करा. अन्यथा नंतर मी सांगेनच.

@ कबुतर,
यांची अंडी आपण खात असतो तर ..
माणूस पण कमाल स्वार्थी आहे. कोंबडीने दिलेली अंडी मचाक मचाक करत गटकावतो. पण जी अंडी खात नाही त्यातील जीवाबद्दल हळहळ वाटते Happy

.

संस्कृत भाषेत एक म्हण आहे. साधारण याच अर्थाची. ओळखायचा प्रयत्न करा. अन्यथा नंतर मी सांगेनच.>>> मला म्हण माहित नाही आणि संस्कृतमधे म्हण आहे म्हणून त्याचा राग येणार नाही असेही नाही.

ऋन्मेश माझ्या माहितीनुसार खाण्यासाठी प्राणी मारला तर, किंवा शिकार केली तर त्याचे पाप लागत नाही. त्यामुळे जे ससा मारल्याचे पाप तुला मान्य आहे ते पाप नाही. बाकी मुंग्या झुरळ आणि काय काय ते आता मोज तुझ्या पापांचा घडा किती भरलाय ते Lol

लाडू हायला चुकलोच मग, मारलेली मुंग्या झुरळे खाल्ली असती तर त्या पापातून सुटलो असतो ना. Wink

नताशा, आपल्याला राग येणे न येणे हा आपला हक्क आहे. मी त्याबाबत नव्हते म्हटले. तर आपल्याला राग आला ते वाक्य ओरिजिनली माझे नसून एका संस्कृत म्हणीचे विडंबन केले होते ईतकेच नमूद करायचे होते Happy

. >> स्पॉक या टिंबासाठी स्पेशल धन्यवाद. थेंबे थेंबे तळे साचे तसे अशी टिंबे टिंबे जोडूनच धाग्यावर शंभर प्रतिसाद होतात Happy

Pages