माझ्या वाईट सवयी ४ - निष्पाप जीवांची हत्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 January, 2016 - 12:50

लहानपणी मामाच्या गावाला फावल्या वेळेत मी खिडकीपाशी बसायचो. समोर ट्रेनचा ट्रॅक होता. तासाभराने एखादी ट्रेन जायची. पण माझी दोन तास बसायचीही तयारी असायची. खिडकी ओलांडून कधी पलीकडे गेलो नाही. कारण तेव्हा माझे वय वर्षे फक्त सहा होते.

एके दिवशी संध्याकाळच्या तांबड्या किरणांनी ऊजळून निघालेल्या त्या खिडकीच्या चौकटीवर, एक मुंग्यांची रांग मला ऊत्तरेकडून पश्चिमेकडे जाताना दिसली. कुतुहल चाळवले. हा काय प्राणी असतो म्हणून मामीकडे विचारणा केली. त्या लाल मुंग्या आहेत. धोकादायक असतात. चावल्या तर फोड येऊ शकतो. असे सांगत मला त्यांच्यापासून दूर राहायचा सल्ला मिळाला. पण न मागता मिळालेला सल्ला मी आजवर कधी घेतला नाही. प्राणी धोकादायक आहे तर त्याचा काटा काढायला हवा ही मानवी बुद्धी मला उपजत होती. पण आता तो काटा काढायचा कसा यावर माझे शैतानी दिमाग चालू लागले. आणि सुचले. त्या वयात सहज साध्य होणारे हत्यार. म्हणजेच पाणी!

‘मुंगीला मुताचा पूर’ ही म्हण माहीत व्हायच्या आधी मला हे सुचले हे विशेष. पाण्याची एक चूळ अलगद रांगोळी सोडावी तशी त्या मुंग्यांच्या रांगेवरून सोडली आणि दुसर्‍याच क्षणाला त्या मुंग्या सैरावैरा पळू लागल्या. पळता पळता शेजारच्या खाटेवर झोपलेल्या माझ्या मामाला चावल्या आणि मुंग्यांसोबत माझीही बिनपाण्याची धुलाई झाली.

असो, मात्र मुंग्यांना मारताना त्यांना बिथरवू नये हा मूलमंत्र मी शिकलो. मग मी दुसरा आणि यशस्वी उपाय वापरायला सुरुवात केली. तो चिचोक्यांचा की कसल्याश्या बियांचा खेळ असतो पहा. जमीनीवर बिया टाकायच्या आणि ईतर बियांना धक्का न लावता एकेक बी बाजूला काढायची. बस्स याचप्रकारे रांगेतली एकेक मुंगी बोटाने टिपून, तिला चिरडून गायब करू लागलो. तिच्या डेडबॉडीचा एक बारीकसा कणही त्या रांगेत ठेवायचो नाही. एखादी मुंगी एकटी बाजूला दिसली, की घेतला तिला कोपच्यात. तिच्या साथीदारांना जराही खबर न लागल्याने त्या चालत राहायच्या. असे करता करता हळूहळू एकेक मुंगी कमी होत जायची. त्या मुंग्यांची एकूण संख्या पाहता खूप वेळखाऊ आणि धीराचे काम होते हे. पण यातून मिळणार्‍या आसूरी आनंदाचे मोल अफाट होते.

हाच आसूरी आनंद मग मी पुढच्या आयुष्यात ईतर कैक जिवांना मारून मिळवू लागलो.

झुरळाला मी घाबरायचो, पण त्याला चपलेच्या एकाच फटक्यात मारायचो. झुरळ उडणारे असेल तर चप्पल फेकून मारायचो. पण मारायचो!
पालीला त्यापेक्षा जास्त घाबरायचो. पण शुक शुक करून हाकलून लावण्याऐवजी तिला काठीचा फटका मारणे पसंद करायचो. तिच्या तुटून पडलेल्या वळवळणार्‍या शेपटीकडे बघणे एखाद्या स्वयंचलित खेळण्यासारखा आनंद देऊन जायचे.

चतुर म्हणून एक किडा असतो पहा. त्याच्या नाजूकश्या पंखांच्या बारीकश्या फडफडीतून निघणारा नाद फार मजेशीर असतो. त्याची निमुळती शेपटी एका दोर्‍याला बांधून पतंग किंवा फुग्यासारखे खेळणे हा माझा छंद होता. त्या दोर्‍याच्या दुसर्‍या टोकाला आणखी एक चतुर बांधला की ते एकमेकांना खेचत उडतात. या खेळाला आणखी मजेशीर करायला म्हणून मी चार पाच चतुर वेगवेगळ्या दोर्‍यांना बांधून त्या दोर्‍यांची एकत्र गाठ मारायचो. प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला उडायचा बघायचा आणि कुठेही लांबवर उडून न जाता एका ठराविक परीघातच आपला जीव काढत फिरायचे.

पावसाळ्यात आम्ही दादरावर सार्वजनिक पॅसेजमध्ये कॅरम खेळायचो. तिथे मोठमोठ्या माश्या घोंघावत यायच्या. बरेचश्या सुस्तावलेल्या असायच्या. त्यांना मारण्याऐवजी मी चिमटीत पकडायचो आणि कॅरमवर टांगलेल्या बल्बचा त्यांना चटका द्यायचो. हेतू हा की त्यांच्यावर माझी दहशत बसावी, त्यांनी जाऊन त्यांच्या ईतर सवंगड्यांना सांगावे की त्या कॅरमवरच्या दादाला त्रास देऊ नका, तो पकडून नको तिथे चटका देतो.

माश्यांवरून आठवले, पावसाळ्यात लोकांच्या दारात कपडे वाळत घातलेले असायचे. त्यातील नाड्यांवर माश्यांचा झुबकाच बसलेला असायचा. त्यावर मूठ मारताच एकाच वेळी किमान सात-आठ माश्या मुठीत कैद व्हायच्या. मग ती बंद मूठ कोणाच्या तरी तोंडासमोर नेऊन उघडायची. अचानक नाकातोंडावर झालेल्या भुणभुणीने ती व्यक्ती भणभणूनच निघायला हवी. पण मग कधी असा एखादा गिर्हाईक नाही मिळाला तर त्या माश्या मुठीतच जीव सोडायच्या. त्यांना मूठमातीही न देता हात झटकून मोकळा व्हायचो. एकाच वेळी सात-आठ जीवांच्या रक्ताने रंगलेले हात असा हा प्रसंग विरळाच.

एक प्राणी होता ऊंदीर. त्याला पिंजर्‍यात पकडले की त्याची विल्हेवाट लावायचे काम माझ्याकडे लागायचे. तो पिंजरा घेत गच्चीवर जायचो आणि बिल्डींगच्या मागच्या बाजूला एका मोकळ्या जागेत त्या ऊंदराला भिरकावून द्यायचो. पडल्यापडल्या काही मरायचा नाही, पण जबर मार लागल्यागत निपचित पडून राहायचा. थोड्यावेळाने चालण्याईतपत ताकद यायची, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असायचा. कारण त्याला टाकायच्या आधी त्याचे प्रदर्शन मांडून मी आजूबाजूच्या घार-कावळ्यांना जेवायचे आमंत्रण दिलेले असायचे. तो खाली पडताच कुठून कुठून येत त्यावर तुटून पडायचे. अर्धा जीव मी घ्यायचो, अर्धा जीव ते काढायचे.

हा मूषक संहाराचा कार्यक्रम चालायचा तेव्हा मी एकटाच नसायचो तर भलामोठा ग्रूप असायचा, आम्ही बराच दंगा घालायचो. शेवटी लाईव्ह मृत्युचा खेळ बघणे कोणाला आवडत नाही.

मोठमोठे शास्त्रज्ञ आधी प्रयोग करतात मग शोध लावतात. लहान मुलांना आधी शोध लागतात मग ते प्रयोग करून त्याची पडताळणी करतात. असेच एके दिवशी आम्हाला शोध लागला की मांजराला वरून खाली टाकले तरी ती मरत नाही, तर चार पायांवर उभी राहते. मांजरीच्या सुदैवाने आम्ही या प्रयोगासाठी नेहमीसारखे गच्चीवर न जाता दुसर्‍या माळ्यावरून तिला टाकायचे ठरवले. बाजीगर चित्रपटात शिल्पा शेट्टीला शाहरूख ढकलून देताना ती जेवढी बेसावध होती, तेवढेच ती मांजरही बेसावध होती. जेव्हा आम्ही तिला गोंजारत गोंजारत अचानक वरतून खाली फेकून दिले. त्याचा परीणाम म्हणून म्हणा, ती चार पायांऐवजी साडेतीन पायांवर पडली. पुढे आम्हालाही मजबूत पडली कारण ती मांजर पाळीव होती. महिनाभर तरी लंगडत लंगडत चालत होती आणि आम्ही तिच्या मालकाच्या शिव्या खात होतो.

कुत्रा या प्राण्यावर लहानपणापासूनच खुन्नस. माझीच नाही तर आम्हा बरेच जणांची. काही ना काही कारणाने, कुठल्या ना कुठल्या कुत्र्यावर खुन्नस असायचीच. त्यामुळे या प्राण्याचे काही करता आले तर मजा येईल असे सारखे वाटायचे. पण आमचे शारीरीक वय आणि ताकद पाहता तेवढी आमची ऐपत नव्हती. पण एक दिवस समजले. यांच्या शेपटीला फटाक्यांची माळ लावल्यास यांची फार तंतरते. बस्स मग एकदोन दिवाळ्या अश्याही गाजवल्या.

यापेक्षा मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या नादी फारसे लागलो नाही. कारण ते सोपे नसायचे. तसेच प्राणी जेवढा मोठा तेवढी त्याबद्दलची भूतदया वाढत जाते, अन्यथा छोट्यामोठ्या किटकांना आपण कसलीही तमा न बाळगता सहज चिरडून टाकतो.

एकंदरीत मनुष्य कितीही नागरी झाला तरी या सृष्टीत नियम जंगलचेच चालतात. या जंगलचा राजा सिंह नाही तर माणूस आहे आणि हे जग फक्त माणसांचेच आहे. हे मला लहान वयातच समजले होते.

आता जरा मांसाहाराकडे वळूया Happy

जर मांसाहार करणे हे आपल्या उदरभरणासाठी केलेल्या निष्पाप जीवांच्या हत्याच असतील, तर वरची सारी उदाहरणे चिल्लर वाटावीत एवढा मांसाहार आजवर केलाय. कारण मी शाकाहार अपवादानेच करतो, जे काही करतो मांसाहारच करतो. खाईन तर मटणबोटी नाही तर अर्धपोटी हे माझे तत्व आहे, आणि ते पाळतोही.

अक्कल येईस्तोवर आईच्या सांगण्यानुसार शाकाहाराचे ठराविक वार पाळायचो. मग स्कूलमध्ये सायन्स वायन्स केले आणि समजले की वनस्पती सुद्धा सजीवच असतात. एक सजीव दुसर्‍या सजीवाला खाऊनच जगू शकतो. जर हेच वैश्विक सत्य असेल तर यात सण वार का आणा, असे म्हणत सारेच ताळतंत्र सोडले. आज वर्षाचे ३६५ (लीप ईयर असल्यास ३६६) दिवस मांसमच्छी खाऊ शकतो. त्यापैकी किमान ३०० दिवस तरी खाणे होतेच.

पण जर हे पाप कसायाच्या डोक्याला लागत असेल तर मात्र मी सुटलो. नाही म्हणायला एका सश्याच्या शिकारीत सामील होतो. त्याला मारून खाल्ले तेवढे पाप माझ्या शीरावर घ्यायला मी तयार आहे.

तसा मी संवेदनशील सुद्धा आहे. मानवी रक्त बघवत नाही. स्वत:चे तर मुळीच बघवत नाही. ते पाहता माझा एक शाकाहारी मित्र मला म्हणालेला, रुनम्या तू थेट तयार मांसमटण खातोस म्हणून तुला अपराधीपणाची भावना मनात येत नाही. कधी कोंबड्याबकरे मारताना त्यांची तडफड अनुभवशील तर कदाचित तुला खायला जमणार नाही.

यावर मी फक्त हसलो. कारण त्याचे ते वाक्य मला थेट भूतकाळात घेऊन गेले. माझे आजोबा अगदी दारात कोंबडी कापायचे. आमच्या शेजारपारच्यांची त्याबाबत काही तक्रार नसायची हे एक चांगले होते. आणि तसेही ते भल्या पहाटे उठून कापायचे. कापण्यात हुशार असल्याने कोंबड्याची जास्त तडफड व्हायची नाही. जास्त आवाज व्हायचा नाही. त्यानंतर त्याची पिसे काढून सोलायचा कार्यक्रमही तिथेच चालायचा. तर हे सारे बघायला म्हणून मी मुद्दाम लवकर उठायचो. कधी जाग नाही आली किंवा घरच्यांनी उठवले नाही तर रडून धिंगाणा घालायचो, एवढा तो नजारा बघायला मला आवडायचे. त्यामुळे लहानपणीच माझ्या मनावर हे ठाम ठसले होते की मांसाहाराचा आस्वाद घ्यायचा असेल तर मेलेल्या जीवासाठी अश्रू ढाळण्यात काही अर्थ नाही.

लेख ईथेच थांबवतो आता. पण जाता जाता कर्मसिद्धांतानुसार मला मिळालेली शिक्षा नक्कीच सांगावीशी वाटतेय.
फार काही नाही, बस्स माझी गर्लफ्रेंड, जिच्याशी मी लग्न देखील करणार आहे, ती तेवढी शुद्ध शाकाहारी मिळाली आहे Happy

चालायचंच,
बस्स आपलाच
ऋन्मेऽऽष

माझ्या आधीच्या वाईटसाईट सवयी वाचण्यासाठी खालील लिंकांवर टिचक्या मारू शकता.

माझ्या वाईट सवयी १ - चोरी http://www.maayboli.com/node/56756
माझ्या वाईट सवयी २ - जुगार http://www.maayboli.com/node/56890
माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ http://www.maayboli.com/node/56984

अवांतर - यावेळची वाचनखूण मस्त जमलीय. तसेही माझे धागे हे लेखनाची हत्याच असतात Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol भारी.
हे सगळे प्राणी अगदी अशाच उत्साहाने आणि चवीने आणि निरागस पणे आणि नवं काही शिकायच्या उद्देशाने मारले आहेत. वेळ मिळाला की डिटेल मध्ये लिहितो.

>>पण न मागता मिळालेला सल्ला मी आजवर कधी घेतला नाही>. वा, वा. आता तुला मायबोलीचा अमिताभ म्हणायला हरकत नाही.
चार जिलब्या पडल्या. आणखी किती पाडायचा विचार आहे?

अमितव Proud वाट पाहतोय

सायो, मी इथे मायबोलीचा शाहरूख खान बनायच्या चक्कर मध्ये आहे आणि तुम्ही अमिताभ बनवत आहात.. मुद्दाम चिडवत आहात ना Wink

सोनाली, कोणता प्राणी राहिला?
नीलगाय किंवा डुक्कर तर नाही ना Wink
की ते आपले नेहमीचे ढेकूण मच्छर वगैरे.. त्यांचा जन्म तर माणसाच्या हातून मरण्यासाठीच झाला असतो.

मुंग्या: रॉकेलच्या (त्याला पॉयश्या म्हणायचे, का कोणास ठावून) पंपात अर्ध बेगॉन आणि अर्ध रॉकेल टाकून आमच्याकाळी डास, झुरळं, मुंग्या, पाली असलं काहीबाही मारायचे. ते तर करायचोच. पण पाणी टाकून मुंग्या मारणे एकदम आवडतं. ऋन्मेश म्हणतो तशी एकच मुंगी मारायची. तिचं प्रेत मुंग्यांच्या वाटेत टाकून त्या प्रेताला घाबरतात का बघायचं. त्यांना मेलेल्या मुंगीचा वास येतो का हे बघायचं. कधी भसकन पाणी ओतून मुंग्यांना गारद करायचं तर मुंग्यांची रांग भिंतीवर असेल तर पाणी टाक टाकून त्यांचा पाथ बदलवायला लावायचं. त्या साखरेचे कण ओढून नेतात, ते तर एकदम भारी आवडायचं बघायला. ४-५ मुंग्या तो तांदुळाचा/ साखरेचा कण ओढतात. तर तो ओढून थोडा दूर घेऊन गेल्या की, तो कण मुंग्यांना इजा न करता काढून घायचा, मग त्याच्या चेहेऱ्यावर खुन्नस येतो का बघायचं. मुंग्यांच्या रांगेत असंच काहीतरी त्यांच्या आवडीचं टाकायचं. कधी एक कण, कधी बारका ढीग. मग त्यांची प्रतिक्रिया बघायची. मुंग्यांची जाणारी आणि येणारी रांग शेजार शेजारी पण वेगळी असते. काही गप्पाडया मुंग्या परत येणाऱ्या मित्र मैत्रिणींशी बोलतात, तर त्या ख्याली खुशाली सांगतायत का पुढे अडथळा आहे सावकाश जा असे संदेश देतायत ते बघायला जाणाऱ्या रांगेतली एक मुंगी मारायची, प्रेत तिकडेच. मग त्या रांगेतल्या मुंग्या पाथ बदलतात. तर त्या उलट दिशेने येऊन धोक्याचा सिग्नल पण देतात का? उधर के उधर इधर के इधर सांगतात का? हे व्हायला किती वेळ लागतो. एका आड एक मुंगी मारली तर जास्त panic होते का कसं.
कधी डासाला किंवा बारक्या झुरळाला मारून त्या मुंग्याच्या पाथच्या जवळ टाकून, मुंग्यांना ते समजायला किती वेळ लागतो, समजलं की त्या कशा इतर परिवाराला जमा करतात आणि ओढत ओढत नेतात ते तासंतास बघत बसायचं.
घरचे मुंग्यांचा कंटाळले की बाबा सिमेंट कालवून ती भोकं बुजवायला द्यायचे, ते पण आवडायचं.
लिहायला घेतलं तर काय काय आठवेल. बाकी प्राणी ब्रेक के बाद.

मी लहानपणी , वाघ आणि सिंह मारायचो , दिसला वाघ/ सिंह की मुरगाळ त्याची मान. पण एकदा आमच्या शाळेतल्या बाईंनी ते पाहीलं आणि माझा कान पिरगाळला तेव्हापासुन मी वाघ/ सिंहाची मान मुरगाळणं सोडुन दिलं. आजही ते माझ्यासमोर आले मी मला ' थ्यँक्यु' म्हणतात . Proud

अमितव चोख निरीक्षण आणि सेम पिंच.
मुंग्यांची रांग भिंतीवर असेल तर वरपासून खालपर्यंत पाण्याचा ओघळ सोडायचा आणि मार्ग बंद करायचा. ईकडच्या मुंग्या ईथे, तिकडच्या तिथे. त्याला समांतर आणखी एक धार सोडली की त्या लॉक झाल्या. जमीनीवर असतील तर सर्कल बनवायचे. मारण्यापेक्षा छळण्यात जास्त मजा येते हे नक्की. आणि जीव तर नाही ना घेत आहोत हे समाधानही मिळते. किंबहुना आजही मी निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला कुठल्याही बंदिस्त वा मोकळ्या जागेत बसलो असतो तेव्हाही मनात हाच विचार येतो की ईथे टाईमपासला एखादी मुंग्यांची रांग असती तर बरे झाले असते. थोडे पाणी तिथेही टाकत बसलो असतो.

झुरळ : झाडू, चप्पल काय मिळेल त्याने झुरळ मारायचे आणि केरसुणीच्या झुबक्यात अलगत पकडून हात न लावता बाल्कनीतून बाहेर फेकायचे. खाली मातीचं अंगण होतं आणि ते कुणाच्या अंगावर पडण्याची भीती न्हवती, पण सगळा कचरा केराच्या टोपलीत टाकणारे आम्ही झुरळ/ पाल का बाहेर फेकायचो, आणि घरचे ओरडायचे कसे नाही माहित नाही. पक्षांना खायला मिळेल असला काहीतरी उदात्त हेतू असावा.

डास: डास मुठीत पकडायचा, मारायचा नाही. किंवा मारता मारता एखादा अर्धमेला झाला तर त्याला पकडायचं.
आता त्याचा एक एक करून पाय तोडायचा, मग एक पंख तोडायचा. डासाला मिनिमम काय अवयव उडायला लागतात याची चाचपणी. कोणी किती डास मारले याची शर्यंत त्याची प्रेतं जमवून भाऊ आणि मी करायचो.

किडा: लहानपणी एक किडा मेलेला दिसलेला. इतक्यातच बिल्डींगमध्ये एक मृत्यू झालेला, तर आम्ही त्या किड्याची प्रेतयात्रा काढलेली आणि त्याला पुरलेलं. वर गोष्टीत वाचल्या प्रमाणे खुणेचा दगड आणि एक झाड लावणार होतो, ते काय झालं नाही बहुतेक.

पाल: अगेन झाडूने मारायची. जनरली पाल उंचावर असायची. त्यामुळे टेबल, खुर्ची, खिडकी असं कशावर तरी चढून झाडू मारायचा. त्यात झाडूची धूळ डोळ्यात उडायची. पालीची आधी शेपटी तुटायची, पाल खाली पडली तर झटकन उडी मारून ती लपायच्या आत दुसरा झाडू पडला पाहिजे. टार्गेट बरेचदा मिस व्हायचं. मग ढोसून ढोसून बाहेर काढून मारायचं. पण जोपर्यंत किल्ला सर होत नाही लढत राहायचं.
पालीची किळस वाटायची, त्यामुळे फार निरीक्षण न करता थ्रो इट. बारक्या पाली मारायला काही वाटायचं नाही, ढोली जाडी काळी पाल आली की पाकपुक व्हायचं, पण ते न दाखवता धीर एकवटून मारायची. घाबरायला झालं तर बिंधास ओरडायचं, त्याची लाज बाळगायचं काहीच कारण नाही.

उंदीर: मी सगळे झोपले की स्वयंपाकघरात बरेचदा अभ्यासाला बसायचो. मुंबईच्या उन्हाळ्यात पंखा लावून ढिम्म काही होत नाही. बाहेर गेलं तर वाऱ्याची झुळूक असायची पण मेला वारा घरात शिरायचा नाही, तर हा वारा घरात कसा आणता येईल? यावर विचार करून एक उपाय सुचला. स्वयंपाकघराची सगळी दारं खिडक्या कडेकोट लावायच्या. आणि एक्झोस्ट पंखा चालू करायचा. आता खिडकी अगदी बारीक उघडायची, हवेच्या दाबामुळे वारा घरात. Happy
तर असंच एकदा स्वयंपाक घरात उंदीरमामा दिसले. जवळ नारळ होता, तो लोटून दिला तर मामा गॅससिलेंडर ठेवतो त्या कप्प्यात घुसले. धुणं वाळत घालायच्या काठीने ढोसलं तर मामा गॅसचा पाईप न्यायला ओटा आणि सिलेंडर मध्ये एक भोक असतं तिकडे घुसले. वर किंवा खाली कुठेच यायला तयार नाही. सुदैवाने गॅसची नळी आई त्या भोकातून न काढता बाहेरून काढत असे, कारण तिकडे झुरळ होतात. आता कसं काढायचं. वरून चमचा किंवा कशाने ढोसल तरी मामा ना बरोबर अशी जागा सापडलेली की ढिम्म हलत न्हवते. मग ट्युब पेटली, भावाला उठवलं, आणि एक प्लास्टिकची पिशवी घेवून ओट्यावर ते भोक बंद करायला सागितलं, एक मेणबत्ती पेटवली आणि सिलेंडरच्या साईडने त्या भोकात ती ज्योत घातली, वर्कड, मामा टुणकन उडी मारून डायरेक्ट पिशवीत. मोहीम फत्ते. रात्री कचऱ्याच्या कुंडी पर्यंत चक्कर पडली टाकायला.

कोणी म्हणेल, किती हा क्रूरपणा.
पण, हे घर माझं आहे. तिकडे मला हे प्राणी नकोत या स्पष्ट मताचा मी आहे. घराबाहेर जाऊन मी कुणाला मारत नाही. अर्थात डास सोडून. (माबोवर माशा असली फाको नको) बाकी डासाला अर्धमेला करून कोळ्याचा जाळ्यात सोडणे आणि नंतर काय होतं ते बघणे इ. प्रकार म्हणजे लहानपणी डिस्कव्हरी होती, त्यातून बरंच काही शिकलो. मुलगा ८-९ महिन्याचा असताना अपार्टमेट मध्ये गवतावर रांगत होता, त्याला मुंगी दिसली आणि त्याने फटकन चापटी मारालीन, त्याचं सुख, आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. Proud

बाप रे .. किती हिंस्त्रपणा .. Wink

मी लहानपणी फक्त मांजरांनां त्रास दिलेला आठवतो आहे .. ती तेव्हापासूनच आवडायची नाहीत बहुतेक ..

ह्याबाबत मी आहे सिंडरेलाच्या पाठीशी. होऊन जाऊ देत! Lol

1 हुईssss हाssss
2 हुईssss हाssss

(तयारी म्हणून दंड बैठका मारत आहे... ह्या आता लेकांनो... बघतो एकेकाला... )
बाकी सायोबेन चक्की बिक्कू घेऊन येऊ नका फाईटीला, ते चिटिंग आहे! Lol

सशल, येउदे किस्से मांजरांचे. Proud हम भी साथ है.
बाकी यात हिंस्त्रपणा नाही, पण प्रचंड कुतूहल (भाग १ आणि २) मात्र होतं.

नको नको .. इकडे हल्लाबोल करण्यासाठी जोर बैठका वगैरे सुरू आहेत .. उगीच निष्पाप हत्या व्हायची माझी .. Lol

मांजरांनांच का त्रास द्यावासा वाटला ते काही आठवत नाही पण एक किस्सा म्हणजे एकदा एका पिल्लाला रेन गटर मधून सोडून दिलं होतं .. खरतर खेळ असा चालू होता आधी सोडायचं मग शेपटी धरून मागे खेचायचं .. पण शेवटी ते निसटलं आणि मला मागे खेचता येईना .. :| मग ते डायरेक्ट मागच्या चौकातच घसरून खाली आलं .. त्याच्या मनावर काही विपरीत परिणाम झाला असेल तर काही कल्पना नाही ..

पांडुरंग सांगवीकर ने मारलेल्या उंदरांची वर्णनं मराठीतला मैलाचा दगड समजतात काही जणं. उदाहरणार्थ चांगदेव पाटीलने पण डोक्यात दगड घालून लूत लागलेलं कुत्रं वगैरे लंबे केलं होतं.

श्री
सहीष्णूता आवडली आणि गहीवरून आलं. मलाही लहान असताना गेंड्यांना धडक मारून त्यांचे प्राण हरण करण्याची वाईट सवय होती. खूप लहान होतो तेव्हां मी डायनासोर मारलेले असे म्हणतात (मला काहीच आठवत नाही !). झाडावरचे अजगर या फांदीवरून त्या फांदीला बांधून झोके खेळताना मला असुरी आनंद वाटायचा, त्या वेळी त्या निष्पाप जिवाला काय यातना होत असतील हे कळायचे नाही.

थोडा मोठा झालो, चालता येऊ लागलं तसं पाण्यात जाऊन खांद्यावर दोन मगरी मगरी घेऊन यावं आणि शेपटीला धरून उंच फेकावं असा खेळ सुरू झाला. तेव्हां माझे प्राणीप्रेमी असलेले एक काका , जे आजारी हत्तींना पाठीवरून घरी आणून त्यांची सेवा करायचे, मला खूप रागवले.

ऋ, सारख्यांच्या विरुद्ध गटाची पण काही मुले असतात.
जखमी झालेले कुत्रे,मांजरे,कबुतर,चिमणी कावळे अजुनही छोटे-मोठे जख्मी जिव घरी आणुन त्यांची सेवा शुश्रुशा
करणारी मुलं.

त्यांची सेवा शुश्रुशा मधे आई-बाबांना पण कामाला लावणारी...आमच्या कडे माझ्या मुलांशिवाय अजुनही काही नमुने पाहिलेत मी असे.

माझा विश्वास्/श्रद्धा असे आहे की मी लहानपणि कळत/नकळत ज्या ज्या किडामुंगी जीव जंतु यांना मारले आहे, त्याची फळे मला या ना त्या जखमा/दुखण्यांच्या स्वरुपात याच जन्मी प्राप्त झाली आहेत. मी तेव्हा जे काही केले ते आठवले तरी त्याचा खेद वाटतो, पःश्चात्ताप होतो.

लिंबूजी, हे तर ईतर प्राणीमात्रांवर अन्याय आहे.
म्हणजे मनुष्य म्हणून आपण कित्येक निष्पाप जीवांची हत्या करायची, आणि त्या बदल्यात शिक्षा म्हणून आपल्याला काही जखमा दुखापती ईतकेच.
देवही मनुष्यांच्याच फेवरमध्ये आहे तर...

सकुरा,
माझ्या विरुद्ध गटात मी स्वताही होतो. आणि लेखात उल्लेखलेले आमचे टोळकेही होते. आमच्या बिल्डींगमध्ये एक जैन बाई जखमी आणि आजारी कबूतरांची आणि पक्ष्यांची सेवासुश्रूषा करायची. आम्ही देखील कुठे असा जखमी अवस्थेतील पक्षी मिळाल्यास त्याला ईमानईतबारे त्या बाईकडे घेऊन जायचो.

Pages