नाबाद १००९ प्रणव धनावडे कौतुक.

Submitted by अश्विनीमामी on 5 January, 2016 - 23:24

कल्याणच्या १५ वर्षीय प्रणव धनावडेने भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी केली आहे. काल ६५२ नाबाद वाचले होते तेव्हाच अरे व्वा असे वाटले होते. घरी येउन बघितले तर १००९!!! चक्क ते ही नाबाद. आता त्याच्या टीम ने डाव डिक्लेअर केला आहे.

१२९ चौकार आणि ५९ षटकारांनी ही खेळी अविस्मरणीय झाली आहे. या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा ११७ वर्षांचा जुना विक्रम मोडीत निघाला आहे. असा विक्रम आहे हेच मला काल पहिल्यांदा कळलं . मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रणवने ही अप्रतिम खेळी केली आहे. आता शालेय क्रिकेट म्हणून हा विक्रम कमी लेखण्यासारखा आजिबातच नाही. अजून पाच सहा वर्शात हा युवा खेळाडू भारता तर्फे खेळावा व भारताला अनेक विजय, मान मरातब मिळवून द्यावेत हीच शुभेच्छा.

प्रणवच्या शिक्षण आणि क्रिकेट प्रशिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. दिग्ग़ज क्रिकेट खेळाडूंनी ही त्याचे अभिनंदन केले आहे. आंतर शालेय क्रिकेट मधून असे नवे हिरे सापडत असतात त्यामुळे ह्या स्पर्धा मुलांसाठी महत्वाच्याच आहेत.
खूप आनंदाची बातमी. व प्रणवचे कौतूक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई शप्पथ, एक दिवस उठून हा माणूस थेट हिमाचल प्रदेश रणजी संघाचा कर्णधार झाला. फक्त रणजी खेळणं हा क्रायटेरिया होता तर एक सामान्य खेळाडू म्हणुन खेळू शकला असता. पण माज बघा, खेळायचे तर कर्णधार! राजकारणी रक्त ते हेच.
ह्यावर एक जबरी सिनेमाच झाला पाहिजे.

सिस्टम बनवल्या तरी कशाही वाकवता येतात याचे उत्तम उदाहरण.

प्रणव धनावडेचं सिलेक्शन का झालं नाही याचा पटण्यासारखा खुलासा एबीपी माझा ने केला आहे. त्याने बहुतेकांचे समाधान झाले आहे. सोशल मीडीयावर निषेध करणा-यांनी आपापल्या पोस्ट्स मागे घेतल्या आहेत.

जन्मतारखेप्रमाणे त्याला इतक्यात संघात प्रवेश मिळणार नाही. तसेच त्याने अर्जच केलेला नाही. त्याला चार महीने थांबावे लागले असते.

जन्मतारखेचा संबंध नसेल. तो १६ चाच आहे अजून.

भम - जबरी आहे तो प्रकार. भारतीय क्रिकेट मधले अचाट प्रकार असंख्य आहेत. कसलाही अंकुश नसलेली व प्रचंड पैसा असलेली संस्था जसे वागेल तसेच बीसीसीआय वागते.

>>या एका फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्याच्या जोरावर ते पुढे बीसीसीआयच्या राष्ट्रीय ज्युनियर निवड समितीचे सदस्यही झाले.<<

आयला, मला तर पवार साहेबांनी खेळलेला एकहि फर्स्टक्लास क्रिकेट सामना आठवत नाहि... Proud

अफाट गुणवत्ता अनेक वेळा सिद्ध करुनही ज्या व्यक्तीन्ना खेळाडून्ना भारताच्या सन्घात स्थान मिळाले नाही त्या मधे मला पद्माकर शिवलकर, राजिन्दर गोयल हे दोन अत्यन्त गुणवान खेळाडूचे नाव चटकन आठवले.

Pages