कल्याणच्या १५ वर्षीय प्रणव धनावडेने भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी केली आहे. काल ६५२ नाबाद वाचले होते तेव्हाच अरे व्वा असे वाटले होते. घरी येउन बघितले तर १००९!!! चक्क ते ही नाबाद. आता त्याच्या टीम ने डाव डिक्लेअर केला आहे.
१२९ चौकार आणि ५९ षटकारांनी ही खेळी अविस्मरणीय झाली आहे. या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा ११७ वर्षांचा जुना विक्रम मोडीत निघाला आहे. असा विक्रम आहे हेच मला काल पहिल्यांदा कळलं . मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रणवने ही अप्रतिम खेळी केली आहे. आता शालेय क्रिकेट म्हणून हा विक्रम कमी लेखण्यासारखा आजिबातच नाही. अजून पाच सहा वर्शात हा युवा खेळाडू भारता तर्फे खेळावा व भारताला अनेक विजय, मान मरातब मिळवून द्यावेत हीच शुभेच्छा.
प्रणवच्या शिक्षण आणि क्रिकेट प्रशिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. दिग्ग़ज क्रिकेट खेळाडूंनी ही त्याचे अभिनंदन केले आहे. आंतर शालेय क्रिकेट मधून असे नवे हिरे सापडत असतात त्यामुळे ह्या स्पर्धा मुलांसाठी महत्वाच्याच आहेत.
खूप आनंदाची बातमी. व प्रणवचे कौतूक.
प्रणवचे हार्दिक अभिनंदन!
प्रणवचे हार्दिक अभिनंदन!
संपादित.
संपादित.
स्वस्थ बसवत नाही म्हणून -
स्वस्थ बसवत नाही म्हणून - अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा जलदगती गोलंदाज आहे, तर प्रणव धनावडे हा फलंदाज आहे. तुलना करायचीच असेल तर फलंदाजांशी करा.
अर्जुनने गेल्या वर्षी
अर्जुनने गेल्या वर्षी मुंबईतल्या एका अंडर-१६ स्पर्धेत अर्जुनने एकाच सामन्यात शतक झळकवले होते व मग चार बळीही घेतले होते. तसंच त्याची मुंबईच्या अंडर १६ संघात गेल्यावर्षीच निवड झाली होती.
प्रणव धनवडेचे. त्याच्या पालकांचे, मेहनतीचे कौतुक आहे. पण ती १००० धावांची खेळी १५ वर्षांच्या मुलाने १० वर्षांच्या गोलंदाजांसमोर केली होती (वयातला हा फरक त्या वयात नक्कीच मोठा आहे) आणि ते मैदान खूप लहान होते.
प्रणवलाही पुढे संधी मिळेलच अशी आशा आहे.
.ज्या स्पर्धेत शतक झळकावले ते
.ज्या स्पर्धेत शतक झळकावले ते मैदान, प्रतिस्पर्धी संघातील मुलांचे वय याबद्दल काही कल्पना आहे का ?
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांनी आंतरशालेय स्पर्धेत जी विक्रमी कामगिरी केली त्या स्पर्धेतील प्रतिस्पर्धी संघातील मुलांच्या वयाबद्दल आजतागायत काहीच वाचनात आलेले नाही. पण या दोघांनीही त्यांची खेळी निर्विवाद आहे हे सिद्ध केलं होतं.
सुनील गावस्कर भारताचा ऑल टाईम ग्रेट फलंदाज आहे. पण त्याच्या मुलाला कुमारांच्या टीममधे संधी मिळाली होती. तसेच रणजी न खेळता क्रिकेट टीममधे घेतल्यावरून टीका झाल्याने नंतर वगळलेही होते. पुन्हा एकदा सिलेक्शन होऊन प्रत्यक्ष संघात समावेश न झाल्याचा काहीतरी एक प्रकार झाला होता. नीट स्मरणात नाही. पण त्यानंतर रणजी खेळलेले आवश्यक असावे असा एक नियम सिलेक्शन कमिटीने बनवला होता. त्यानंतर रोहन गावस्कर पम बंगाल कि बिहारच्या टीममधून काही दिवस खेळला होता. रणजी मधे त्याची छाप पडली नाही.
रणजी मधे खेळलेलं असलं पाहीजे हा नियम नंतर शिथील करण्यात आला आणि सचिनची निवड करण्यात आली. त्या वेळी कॅच देम यंग असं धोरण बनलं होतं.
प्रणव धनावडेच्या आधी
प्रणव धनावडेच्या आधी कुठल्यातरी एका मुलाने सहाशे की आठशे धावांचा विक्रम केला होता. तो ही विस्मरणात गेला आहे. त्याचे असे विस्मरणात जायचे कारण काय असावे ? कि त्यावेळीही प्रतिस्पर्धी संघात लहान मुले होती आणि मैदान छोटे होते ?
गोलंदाज कि फलंदाज हा मुद्दा हास्यास्पद वाटला.
मला अंडर-१६ बद्दल अगदी मोघम
मला अंडर-१६ बद्दल अगदी मोघम माहिती आहे. प्रणव धनावडे चे सिलेक्शन का झालेले नाही कल्पना नाही. निदान एक चान्स मिळायला हवा होता. अजूनही मिळावा.
मात्र याचा संबंध अर्जुन तेंडुलकर शी का लावला जातोय माहीत नाही. अर्जुन तेंडुलकर सिलेक्शन सर्किट मधे गेली २-३ वर्षे आहे. अंडर-१४ ही खेळलेला आहे. त्यामुळे अचानक त्याला डावलून याला घेतलाय अशी शक्यता कमी आहे.
तो मुख्यतः बोलर आहे हा ही भाग आहेच.
रणजी मधे खेळलेलं असलं पाहीजे हा नियम नंतर शिथील करण्यात आला आणि सचिनची निवड करण्यात आली. त्या वेळी कॅच देम यंग असं धोरण बनलं होतं. >>> घायल - हे रोहन गावस्कर बद्दल म्हणायचे होते का? सचिन रणजीतूनच कसोटीत गेला.
रोहन रणजी खेळला होता. सचिन ला
रोहन रणजी खेळला होता. सचिन ला आधी १४ वर्षाखालील गटात निवडले गेले. नंतर पाकिस्तान च्या दौऱ्यात निवडले गेले, त्यानंतर् रणजी खेळला असावा तो. गुगल न करता आठवतेय त्या आधारे लिहीले आहे.
माझा मुद्दा हा आहे की, आंतरशालेय स्पर्धेत एक मुलगा चौदा वर्षांचा आणि बाकी दहा वर्षांची मुले असतील तर याआधीच जात रेकॉर्ड्स आहेत ते तपासून पाहायला हवेत. सचिन ला संधी मिळण्याचे कारण तेच आहे. १५ वर्षाखालील संघ निवडताना काय कामगिरी पाहिली जाते, विश्वविक्रंम ध्यानात का घेतलाा जात नाही याबद्दल लोक बोलणारच.
नेमक्या काय फॅक्टस आहेत ते कळायला हवे. रोहन गावस्कर ला पण का निवडले गेले ते कळाले नव्हते. तीच गोष्ट पार्थिव पटेल ची. मुद्दा हा आहे.
Timeline February
Timeline
February 23-25, 1988
A monster in the making
Sachin Tendulkar, 14, and Vinod Kambli, 16 compile a 664-run unbroken partnership for Shardashram Vidyamandir against St Xavier's at Azad Maidan. Kambli makes 349 not out, Tendulkar 326 not out. It remains the highest partnership recorded in any form of cricket, until in November 2006 two schoolboys from Hyderabad - Manoj Kumar and Mohammad Shaibaz - overtake the record with an unbeaten 721-run partnership.
December 11, 1988
Truly first-class debut
At 15, scores an unbeaten century against Gujarat at the Wankhede Stadium to become the youngest Indian to make a hundred on first-class debut. Was picked after Bombay captain Dilip Vengsarkar watched him negotiate Kapil Dev in the nets.
December 14, 1989
Bloody-minded to start with
On the last day of the last Test of his first Test series, in Sialkot, gets hit on the nose by Waqar Younis - also in his first series. Falls down, gets up, and wipes away the gushing blood. Medical assistance is declined. Is eventually out for 57.
सचिन तेंडूलकरची सुरुवातीची टाइमलाईन देतो आहे.. नीट वाचा आणि मग ठरवा...
विश्वविक्रंम ध्यानात का
विश्वविक्रंम ध्यानात का घेतलाा जात नाही याबद्दल लोक बोलणारच. >>> होय, त्याबद्दल काहीच वाद नाही. फक्त अर्जुन च्या सिलेक्शन शी फारसा संबंध नसावा इतकेच. दोघांना इथे समान संधी नाहीये हे उघड आहे. अर्जुनला वासिम अक्रम बोलिंग टिप्स देतोय. उद्या सिलेक्टर्स ना तो जर म्हंटला की याला निवडून पाहा, तर कोणत्याही सिलेक्टर ला ते डावलणे अवघड जाईल, फॅमिली कनेक्शन असो वा नसो.
सचिनसाठी कोणतेही नियम बदलल्याचे आठवत नाही. तो अगदी पारंपारिक पद्धतीने कसोटीत गेला.
हिम्सकूल आभार. फारएण्ड माझा
हिम्सकूल आभार.
फारएण्ड माझा मुद्दा सचिन नियम बदलून गेला हा नसून चर्चा का होते हा आहे. त्यातला विश्वविक्रम केलेल्याचं सिलेक्शन का नाही केलं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे याबद्दल धन्यवाद.
प्रणव धनावडे सोबत खेळत असलेली मुले दहा वर्षांची होती हा जो मुद्दा आहे त्यामुळे एकूणच आंतरशालेय स्पर्धेत सचिनच्या नंतरही जे काही विश्वविक्रम बनलेत त्याबाबत शंका उपस्थित होते. अगदी सचिन विनोद च्या पार्टनरशिपच्या वेळीही विरोधी संघात समवयस्क होते का हा मुद्दा उपस्थित होतो. (दहा आणि चौदा या वयात देखील फारसा फरक दिसत नाही).
त्याचबरोबर त्यानंतर जे विश्वविक्रम भारतात झाले त्या मुलांचे पुढे काय झाले हा मुद्दाही महत्वाचा आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजू मांडतोय. प्रणव धनावडे च्या आधी तीन चार वर्षांपूर्वी एका मुलाने असा विक्रम केला होता. रोहन गावस्कर किंवा पार्थिव पटेल ही दोनच उदाहरणे इथे दिली आहेत. षटकार या साप्ताहिकात पूर्वी द्वारकानाथ संझगिरी एक सदरच चालवत असत त्यात वशिलेबाजी हाच विषय होता. असो.
सचिन च्या मुलाचं सिलेक्शन कसं झालं हे आता नीट समजलं. पण ते सगळ्यांना माहीत असणे शक्य नाही, त्यामुळे तशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. ही चर्चा पण फेसबुकवर चालू आहे. योग्य ती माहिती पोह्चली तर चर्चा बंद होईल.
सचिन सिलेक्ट झाला होता तो
सचिन सिलेक्ट झाला होता तो काही एका विक्रमी खेळीमुळे नाही.कांबळीबरोबर भागीदारी करण्याआधी सचिन सिनिअर मुंबई रणजी संघासोबत १ सीझन होता (जरी ११ मधे आला नसला तरी). वयाच्या ११व्या वर्षापासून कांगा लीगमध्ये त्याची चर्चा होती. त्याला क्लबसाठी खेळता यावा म्हणून CCI सारख्या क्लबने वयाची अट शिथिल केली. त्यावेळी CCI मध्ये संदीप पाटील, राजू कुलकर्णी असे भारतीय संघातले लोक खेळायचे आणि एकूणात पावसाळी स्पर्धेमुळे बरेचसे रणजी खेळाडू खेळायला मोकळे असायचे. सिलेक्शनच्या आधी सचिन प्रत्येक पायरीवर परफॉर्मन्स देत चढला. एक ६६१ ची भागीदारी आणि डायरेक्ट मुंबई संघात असं नव्हतं. (आणि एक म्हणजे ६६१ भागीदारीवेळी विरुद्ध संघात एक बॉलर साईराज बहुतुलेही होता.) वर हिम्सकूल नी सांगितल्याप्रमाणे मुंबई साठी खेळण्याआधी कपिल आणि मदनलालला नेट्समध्ये सहज खेळला होता तो. त्याला मिळालेल्या सगळ्या संधी त्याने 'कमावलेल्या' होत्या म्हणता येईल. यानंतरही विश्वविक्रम हेच "सचिन ला संधी मिळण्याचे कारण तेच आहे." म्हणणे चुकीचे होईल.
प्रणवची १००० ची खेळी उत्तमच होती. पण एक भान ठेवले पाहिजे की विक्रम म्हणजे talent ची पूर्ण परीक्षा नव्हे. विरोधी शाळेचा मुख्य संघ परीक्षेमुळे जाऊ शकला नाही म्हणून ऐनवेळी १२ वर्षाची अगदी पहिला सामना खेळणारी मुले गेली यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्रणवच्या खेळीचे विक्रम म्हणून महत्त्व कमी होत नाही. पण तेवढ्यावरून सचिन- विराटसारख्या खेळाडूंशी तुलना करणे चुकीचे आहे. त्यानंतर किंवा आधी प्रणवचा परफॉर्मन्स कसा आहे याची किती लोकाना माहिती आहे? १००० मुळे जी प्रसिद्धी मिळाली आहे त्यानंतर त्याची प्रत्येक १०० एक बातमी असणार आहे. कुठे वाचलेली आठवतेय? प्रणव धनावडेला आधी स्वतःला सिद्ध करु द्या. आतापासूनच 'त्याच्यावर अन्याय झाला' असे गळे काढणार्या बातम्या देऊन काय मिळवतो आपण? त्याच्या फोकससाठी ते मारक आहे. रिजेक्शनवर जिद्दीने कष्ट करून मात करु दे त्याला. परफॉर्मन्स कधी लपून राहात नाही.
http://www.criclife.com/buzz/
http://www.criclife.com/buzz/seen-and-heard/pranav-dhanawades-father-cle...
However, Dhanawade’s father himself has come out and quashed all the rumours saying his son was not eligible for selection, so why the controversy? Prashant Dhanawade told the media that certain sections of their fraternity are spreading false stories regarding Pranav’s non-selection. The fact is that West Zone’s U-16 team is picked from the MCA U-16 team, which Pranav was not a part of.
Arjun, who is an all-rounder, was a part of MCA’s team and hence was eligible to be picked. So all the fuss that is being made around the issue is completely uncalled for.
भुत्या मस्त पोस्ट. फॉर्म इज
भुत्या मस्त पोस्ट. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट हे समजायला वेळ लागतो...
भुत्या, हिम्सकूल धन्यवाद,
भुत्या, हिम्सकूल धन्यवाद, सचिनबद्दल छान माहिती आली
भुत्या मिलिंद गुंजाळ,
भुत्या
मिलिंद गुंजाळ, सुरेंद्र भावे ही नावे ऐकली आहेत का ? ऐकलेली असतील तर या लोकांनी काय सिद्ध करायचे ठेवले होते ? जमल्यास षटकार चे जुने अंक वाचा. सचिनबद्दल हिम्सकूलने आधीच माहिती दिलेली आहे.
गळे काढणे वगैरे शब्दप्रयोग जरा बाजूला ठेवावेत आणि पार्थिव पटेलला का संधी मिळाली याचेही उत्तर द्यावेत. त्याला देखील एकदा नाही बरेचदा संधी मिळालेली आहे.
प्रणव धनावडे चं निमित्त झालं असावं.
गुंजाळ, भावे होते मोठे
गुंजाळ, भावे होते मोठे फलंदाज, मुंबई- दिल्ली वर्चस्वाचा त्याना तोटा झाला. पण त्याचा आता काय संबंध? कमी वयातल्या खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहेच. त्यानंतर यशापर्यंत पोहोचायला नशीब, वेळ अशा गोष्टी आहेत. पण त्या खेळाडूच्या हातात आहेत का? राजिन्दर गोयल आणि पॅडी शिवलकर डावरे फिरकी ६०० बळी घेऊनही एकही कसोटी खेळले नाहीत. कारण बेदी सारखा बॉलर संघात होता आणि बाकी ३ स्पिनर्स. हे नशीब झाले. पण म्हणून प्रयत्न थांबवावेत का? आज एवढे क्रिकेट खेळले जाते हा नाही तर तो पर्याय असतोच.
पार्थिव पटेलचं म्हणाल तर- ज्या वेळी कुणी कीपर नव्हता तेव्हा दुसरा कीपर म्हणून दौर्यावर गेला. तिथे रात्रा जखमी होऊन संधी मिळाली. एक मॅच वाचवली. ही स्टोरी. आता इंग्लंड्ला का नेला म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे तो u१९ चा कप्तान होता आणि अ संघाबरोबर आधी गेला होता. कदाचित हे पुरेसे असेल- नसेल. खरोखर भारतीय संघाच्या लेव्हलचा नव्हता हे माझे मत.
यातला विश्वविक्रम केलेल्याचं
यातला विश्वविक्रम केलेल्याचं सिलेक्शन का नाही केलं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे याबद्दल धन्यवाद. >>> हे नाही समजले. सिलेक्शन व्हायला हवे होते हे माझे मत आहे. का झालेले नाही याबद्दल काहीच कल्पना नाही. होपफुली अंडर-१९ ला होईल त्याने सातत्य दाखवले तर.
भुत्या - बाकी डीटेल्स बरोबर आहेत, पण कांबळी बरोबरची भागीदारी शाळेतली. रणजीच्या आधीची.
पण त्याचा आता काय संबंध? >>>
पण त्याचा आता काय संबंध? >>> काय संबंध म्हणजे ?
पार्थिव पटेलला फलंदाज म्हणून संघात यायचं होतं. ते जमत नसल्याने विकेटकीपर म्हणून आला. त्याच्या विकेटकीपिंगचा दर्जा चांगला होता का ?
माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे. सुरूवातीपासून संघात घेतल्या गेलेल्या खेळाडूंबद्दल चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे आता झाली तर अस्वस्थ होण्याचं कारण नाही. ज्याला या ना त्या निमित्ताने सिलेक्शन कमिटीच्या किंवा प्रभावी व्यक्तीच्या जवळ जाण्याची संधी मिळते त्याचं सिलेक्शन होतं. अगदी एमआरएफ पेस फाउंडेशनमधून जवागल श्रीनाथला संधी मिळाली त्याचं कारण डेनीस लिली आहे.
त्याचवेळी मिलिंदगुंजाळम, भावे सारखे हजारो खेळाडू पराक्रमामागून पराक्रम करूनही त्यांना संधी मिळत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. लोक बोलतात ते उगीच हा टोन खटकल्याने एव्हढा प्रपंच.
बाकि मला क्रिकेटमधे अजिबात इंटरेस्ट नाही. नियमित पणे या खेळावर काही न काही आरोप होतच असतात. ते करे की खोटे हे संबंधितांना लखलाभ,
फारएण्ड, माझ्या
फारएण्ड, माझ्या प्रतिसादातल्या लिंकमध्ये सिलेक्षन न होण्याचे कारण दिले आहे.
त्याचवेळी मिलिंदगुंजाळम, भावे
त्याचवेळी मिलिंदगुंजाळम, भावे सारखे हजारो खेळाडू पराक्रमामागून पराक्रम करूनही त्यांना संधी मिळत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. लोक बोलतात ते उगीच हा टोन खटकल्याने एव्हढा प्रपंच. >>> हे त्या खेळाडूंच्या दृष्टीने दुर्दैवी आहे पण क्रिकेटच काय, अनेक क्षेत्रात खरे आहे. (फक्त मिलिंद गुंजाळ आपला चांगला महाराष्ट्राचा आहे. त्याला तमिळ करू नका
). गुंजाळ, भावे आणि सुगवेकर हे ८० चे दशक गाजवत होते पण त्यांना कधीही संधी मिळाली नाही (गुंजाळ एकदा सिलेक्ट झाला होता पण संघात आला नाही असे काहीतरी व्हेगली लक्षात आहे. कदाचित दुसरा असेल, पण महाराष्ट्राचाच). त्यांचे नेटवर्किंग कमी पडले, की सिलेक्टर्स शी संबंध बिघडले माहीत नाही. त्याच ८० चे दशक म्हणजे कोटा सिस्टीम चा काळ.
पार्थिवच्या नंतरच्या
पार्थिवच्या नंतरच्या संधींबद्दल माहीत नाही पण २००२ इंग्लंड दौरा वशिल्यावर नसावा असे वाटते. २००१ मध्ये u१७ चा क्प्तान आणि २००२ मध्ये u१९ वर्ल्ड कपसाठी कप्तान. दोन्ही वेळी तो विकेटकीपरच होता. आपली त्यावेळी कीपिंगची जागा तळ्यात मळ्यात होती. रात्राने आणि एकूण भारतीय संघाने वेस्ट इंडीज मधे जे दिवे लावले होते त्यानंतर नव्या चेहर्याची गरज होती. त्यामुळे दुसरा कीपर म्हणून त्याला नेणे वाजवी असावे.
महाराष्ट्रातर्फे बरेच खेळाडू
महाराष्ट्रातर्फे बरेच खेळाडू उत्तम खेळूनही भारतीय टीम मधे कधीच खेळले नाहीत.. त्यात संतोष जेधेच पण नाव घालावे लागेल.. ९२-९३ च्या सिझन मधे रणजीमधला नंबर एकचा ऑल राऊंडर होता तो.. पण टीम मधे नाही आला..
आपला शंतनु सुगवेकरही..
आपला शंतनु सुगवेकरही..
मला वादामध्ये भाग घ्यायचा
मला वादामध्ये भाग घ्यायचा नाहिये.
पण गुणवत्ता असून संधी न मिळाल्यापैकी अजून एक उदाहरण -
अमोल मुजुमदार.
पोत्याने रन्स काढूनही टेस्ट्/वन डे मध्ये घेतलाच नाही.
मला वादामध्ये भाग घ्यायचा
मला वादामध्ये भाग घ्यायचा नाहिये. >> वाद नाही चालू इथे. माहितीचे आदान प्रदान.
सुरेंद्र भावे आणि मिलिंद गुंजाळच्या बाबतीत द्वारकानाथ संझगिरी यांनी लोकसत्ता मधे पण बरच लिखाण केले आहे. चतुरंग पुरवणी मधे त्यांचं सदर असायचं.
त्यांना नाकारण्याचे कारण हे होते की महाराष्ट्र कधीच उपांत्य फेरीच्या पुढे पोहोचला नाही त्यामुळे कमी सामने त्यांच्या वाट्याला येत. रणजी मोसमातली एकूण कामगिरी बघून सिलेक्शन होत असल्याने दिल्ली किंवा मुंबईचे अनेक खेळाडू एकाच वेळी संघात असायचे.
..
..
सकुरा तै विनोद कांबळी आणि
सकुरा तै
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरची आकडेवारी बघायला तुमच्याकडे गुगल नाही का ? गुणवत्तेला चिकाटी, संयम आणि दूरदृष्टीची जोड देण्यात विनोद कांबळी कमी पडला हे समजायला शाळा शिकण्याचीही गरज नाही.
घायल, प्रणव धनावडे चा धागा
घायल, प्रणव धनावडे चा धागा असल्यामुळे मी माझी पोस्ट संपादित केली आहे..
क्रिकेट संघात निवड या
क्रिकेट संघात निवड या मुद्द्यावर धागा आलाय तर ही माहिती इथे अप्रस्तुत ठरू नये.
Anurag Thakur has played one match in first-class cricket representing Himachal Pradesh and leading the team as captain in a match against Jammu and Kashmir in the 2000/2001 season. Jammu and Kashmir won by 4 wickets
Early on in his administrative tenure, he gained fame for possibly being the first cricketer to have made his first-class debut after taking over as the president of the state cricket association. This debut was his one and only first-class cricket match. This experience in first-class cricket enabled his induction into the BCCI national junior selection committee, satisfying the condition that only first-class players could be national selectors.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या अनुराग ठाकूर यांची हि.प्र.च्या क्रिकेट संघात नुसती निवडच नाही झाली, तर ते डायरेक्ट कप्तान झाले. या एका फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्याच्या जोरावर ते पुढे बीसीसीआयच्या राष्ट्रीय ज्युनियर निवड समितीचे सदस्यही झाले.
मुद्गल समिती काही म्हणतेय का याबद्दल?
Pages