नाबाद १००९ प्रणव धनावडे कौतुक.

Submitted by अश्विनीमामी on 5 January, 2016 - 23:24

कल्याणच्या १५ वर्षीय प्रणव धनावडेने भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी केली आहे. काल ६५२ नाबाद वाचले होते तेव्हाच अरे व्वा असे वाटले होते. घरी येउन बघितले तर १००९!!! चक्क ते ही नाबाद. आता त्याच्या टीम ने डाव डिक्लेअर केला आहे.

१२९ चौकार आणि ५९ षटकारांनी ही खेळी अविस्मरणीय झाली आहे. या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा ११७ वर्षांचा जुना विक्रम मोडीत निघाला आहे. असा विक्रम आहे हेच मला काल पहिल्यांदा कळलं . मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रणवने ही अप्रतिम खेळी केली आहे. आता शालेय क्रिकेट म्हणून हा विक्रम कमी लेखण्यासारखा आजिबातच नाही. अजून पाच सहा वर्शात हा युवा खेळाडू भारता तर्फे खेळावा व भारताला अनेक विजय, मान मरातब मिळवून द्यावेत हीच शुभेच्छा.

प्रणवच्या शिक्षण आणि क्रिकेट प्रशिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. दिग्ग़ज क्रिकेट खेळाडूंनी ही त्याचे अभिनंदन केले आहे. आंतर शालेय क्रिकेट मधून असे नवे हिरे सापडत असतात त्यामुळे ह्या स्पर्धा मुलांसाठी महत्वाच्याच आहेत.
खूप आनंदाची बातमी. व प्रणवचे कौतूक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाच सपोर्ट अन्य खेळांसाठीही मिळेल अशी आशा आहे. >> आता हे म्हणू शकता. पूर्वीही असे म्हटले जाई, मधल्या काळात असं काही म्हटलं की हल्ला होत असे.

ही एक चांगली अचीवमेन्ट आहे. इतकेच. अगदी दुसरा तेंडुलकर वगैरे हे जरा जास्तच होतेय. शाळेतल्या क्रिकेट स्पर्धा काही स्टॅन्डर्ड स्थितीत होत नाहीत शिवाय विरोस्धी संघाच्या दर्जाचाही प्रश्न असतोच. एतकेवेळ उभे राहण्याचे कॉन्संट्रेशन आणि शारिरीक क्षमता असणे रिमार्केबल आहेच. त्यानिमिताने जगातल्या सगळ्या उच्च धावसंख्येचे खेळाडू पाहता एकही पुढे गाजलेला क्रिकेटर झालेला नाही. या रेकॉर्डात पृथ्वी शॉ नावाचा एक मुलगा होता. ह्यारीस शील्ड .काय झाले त्याचे पुढे.? सातत्य महत्वाचे.

एक मात्र नक्की, कुठल्याही फॉर्मेटमध्ये ३०० प्लस स्ट्राईकरेटने हजार डावा कुटने हे अचाटच आहे.

पादुकानंदांशी सहमत. कदाचित उद्या हा मुलगा कुठे दिसणारही नाही.

समोरचा संघ केवळ ५२ धावात गुंडाळला गेला. त्यांची फलंदाजी जशी आहे तसेच गोलंदाजीही तशीच असणार. त्यामुळे मोठे फटके खेळायची क्षमता अंगी असली तरी तंत्र नक्कीच चेक झाले नाहीये या खेळीत.

आणि तंत्र ही अशी गोष्ट आहे की क्रिकेटमध्ये असे गणित मांडू शकत नाही की खराब गोलंदाजांना हजार धावा मारल्या तर ठिकठाक गोलंदाजांना ५०० मारेल, चांगल्या गोलंदाजांना २०० मारेल, आणि उत्तम गोलंदाजांनाही १०० तरी मारेल.... जर तंत्र नसले तर चांगल्या गोलंदाजांसमोर उभे राहणेही अवघड होईल, धावा मारणे दूरची गोष्ट.

हे अगदी कोणाच्या डोक्यात थेट तेंडुलकर येऊ नये यासाठी.. तो सोळाव्या वर्षी वकार अक्रम सारख्या दिग्गजांना तोंड देत होता.

बाकी मुलाचे कौतुक आहे, मनापासून अभिनंदन Happy

अभिनंदन!!!!

मी टीव्हीवर त्याच्या पालकांची मुलाखत पाहिली. वडील रिक्षाचालक आहेत. सर्वसामान्य परिस्थितीतील हा मुलगा..सरावासाठी रोज मुंबईला जावं लागत होतं म्हणे त्याला.
पालकांचं खरंच कौतुक आहे...रिक्षाचालक म्हणजे काही श्रीमंत वगैरे नाही. त्याच्या वडिलांना विचारलं तुम्हाला खर्च कसा परवडतोय तर ते सहज म्हणाले- हौसेला मोल नसतं! हॅट्स ऑफ !

लोक तुलना करताहेत कारण सचिन तेंडुलकर हे नाव शालेय क्रिकेटमधल्या खेळीने चर्चेत आले. catch them young असे धोरण स्विकारल्यानंतर त्याला सोळाव्या वर्षी तर विनोद कांबळी ला तीन वर्षांनी संधी मिळाली. सकारात्मक दृष्टीकोण ठेवल्याने पुढचा इतिहास घडला. एरव्ही रणजी गाजवलेल्या मिलिंद गुंजाळला संधी मिळालेली नाही.
त्यामुळे तुलना होणे गैर नाही. वासिम अक्रम सारखा मारा तो खेळू शकेल की नाही याचे उत्तर मैदानावर मिळू शकेल.

तुफानी खेळी! आज पेपरमध्ये सर्वाधिक धावांच्या पहिल्या दहा खेळी आल्या आहेत. पहिल्या व दुसर्‍या क्रमांकाच्या धावांमध्ये अवाढव्य फरक आहे. अभिनंदन!

बेफी, अहो मला वाटलेलं तुम्हीच धागा काढाल. मी वाट पाहिली बराच वेळ.

ह्या वयात फक्त आणि फक्त उत्तेजन देणे व सपोर्ट करणे म्हणजे बेस्ट पॉसिबल ट्रेनिंग मिळवून देणे वगैरे. अर्थात जेवण खाण आरोग्य पूर्ण ठेवणे. त्याचा आत्मविश्वास कायम असाच ठेवणे. हे महत्वाचे.
( ही अगदीच मम्मी गिरी झाली. ) पहिल्या खेळीतच सचिन बरोबर तुलना होण्याचे भाग्य देखील किती खेळाडूंना मिळते?

हा कदाचित वेगळ्या पद्धतीने उत्तम खेळाडू बनेल. त्याने इनिंग अतिशय प्लॅन करून खेळली आहे असे धोनी म्हटले आहेत. ही मॅच मुंबई क्रिकेट असो सिएशन मान्यता प्राप्त आहे.

सानिया मिर्झा विंबल्डन ला पहिले पदक जिंकली होती तेव्हा मला असेच कौतूक वाटले होते. आपली
जागा शोधून तिने मागच्या वर्शात उत्तम कामगिरी केली आहे.

>>>बेफी, अहो मला वाटलेलं तुम्हीच धागा काढाल. मी वाट पाहिली बराच वेळ.<<<

Proud अशी बदनामी बरी नव्हे.

रिक्षाचालक म्हणजे काही श्रीमंत वगैरे नाही. त्याच्या वडिलांना विचारलं तुम्हाला खर्च कसा परवडतोय तर ते सहज म्हणाले- हौसेला मोल नसतं! हॅट्स ऑफ !
>>>

त्याचा खर्च आता मुंबई क्रिकेट बोर्ड की कोणीतरी उचलणार आहे. गूड स्टेप. एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट निघायची शक्यता असते तिथे पैलू पाडायला टाईम वेस्ट करू नये.

अभिनंदन! जबरी. तेंडुलकर शी तुलना होणे अगदी साहजिक आहे, कारण तो व विनोद कांबळी ही पहिल्यांदा शाळेतील त्या मोठ्या भागीदारी मुळेच चर्चेत आले होते. होप याला चांगला कोच व लागेल ते आर्थिक सहकार्य मिळेल.

समोरचा संघ केवळ ५२ धावात गुंडाळला गेला. त्यांची फलंदाजी जशी आहे तसेच गोलंदाजीही तशीच असणार. त्यामुळे मोठे फटके खेळायची क्षमता अंगी असली तरी तंत्र नक्कीच चेक झाले नाहीये या खेळीत.

आणि तंत्र ही अशी गोष्ट आहे की क्रिकेटमध्ये असे गणित मांडू शकत नाही की खराब गोलंदाजांना हजार धावा मारल्या तर ठिकठाक गोलंदाजांना ५०० मारेल, चांगल्या गोलंदाजांना २०० मारेल, आणि उत्तम गोलंदाजांनाही १०० तरी मारेल.... जर तंत्र नसले तर चांगल्या गोलंदाजांसमोर उभे राहणेही अवघड होईल, धावा मारणे दूरची गोष्ट.>>>>>>>++++१
त्याला तब्बल २२ जीवदाने मिळाली

छोटी मुलाखत. तीही अगदी सचिन चीच आठवण करून देणारी. बुजरेपणा वगैरे Happy
http://www.bbc.com/news/world-asia-india-35230388

पहिला कोणीतरी कोच मिळाला पाहिजे चांगला याला. अंडर-१९ साठी सुद्धा तयारीला तेवढा वेळ आहे.

आंतरशालेय स्पर्धा म्हणजे काही कमी स्पर्धा नसते. किट सकट आहे, व्यवस्थित स्कोअरकार्ड लिहीले जात आहे. आणि इतरही किमान दहा फलंदाज खेळले याच ग्राउण्ड वर याच मॅच मधे. हा इतका वेळ खेळला म्हणजे तेवढा फिटनेस, पेशन्स नक्कीच असेल. ऑल द बेस्ट!

हा इतका वेळ खेळला म्हणजे तेवढा फिटनेस, पेशन्स नक्कीच असेल >> +१. त्याला आताच सचिनबरोबर कंपेअर करून त्याच्यावर अपेक्षांचं ओझं टाकू नये. लेट हिम लर्न, ग्रो अँड प्ले हिज नॅचरल गेम.

प्रणव धनवडेचे अभिनंदन.
सचिन पेक्षा ही मोठ्ठा की होईल किंवा नाही माहित नाही.
पण वैयक्तिक स्कोर पेक्षा देशाला महत्व द्यावे एवढी माफक अपेक्षा आहे.

विरुद्ध संघ कच्चा असला तरीही एवढी मोठी वैयक्तिक धांवसंख्या ह्या गतीने उभी करणं खरंच कौतुकास्पदच व प्रतिभेचं निर्विवाद द्योतकच ! प्रणव, अभिनंदन व शुभेच्छा !!
<< त्याला आताच सचिनबरोबर कंपेअर करून त्याच्यावर अपेक्षांचं ओझं टाकू नये. लेट हिम लर्न, ग्रो अँड प्ले हिज नॅचरल गेम.>> सहमत.

Pages