धागा व लेखनपरवाना धारकाची कैफियत

Submitted by अभि_नव on 31 December, 2015 - 11:49

विडंबन या साहित्यप्रकारांतर्गत एक निव्वळ विनोदी लेखनाचा प्रयत्न.
प्रशासनाला हरकत असल्यास डिलीट केले जाईल.
कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
टवाळा... धाग्यावर दिनेशदांनी दिलेल्या प्रचंड १-० बहुमताचा आदर करुन स्वतंत्र धागा काढलेला आहे.
========================================================================

नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दिर्घकाळ (मोडीतली) राजडूकरे मारण्याचा योग आला. त्याची लेखनशैली ब-यापैकी दूर प्रसिद्ध आहे. तेव्हा "त्याच्या" सुरक्षिततेचा प्रश्न येत नाही का अशी रास्त शंका मला आली. तो म्हणाला त्याने रितसर आयडी काढुन लेखन परवाना घेतलेला आहे. पण कोणी धागा उघडुन आत आलेच आणि धाग्यातील माहिती सपशेल खोटी आहे असे दाखवुन दिलेच तर प्रतिवाद करण्याची हिंमत होईल का नाही माहिती नाही.

त्या निमित्ताने त्याने या धाग्यांच्या भानगडीची गोष्ट सांगीतली. लेखन परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तो तुम्हाला का हवा याची अजिबात पडताळणी होत नाही. मग तुमचा आयडी लिनक्स का कुठल्या सर्वर वर लगेच बनुवन तयार होतो. त्या आधी हा डूआय आहे की नाही याची पडताळनी होणे अपेक्षीत असते. पण सहसा तसे होत नाही. मग मुळ आयडी असुनही आपले डझनवार डुआय बनवता येतात. तुम्हाला परदेशी रोमन बनावटीचा आयडी हवा असेल तर तोही मिळतो. पुर्वी फक्त तोच मिळायचा.

असे करुन एकदाचा आयडी मिळाला की "आतल्या मर्यादीत ग्रुपात असलेल्या" माबोकंपुला जाऊन कळवायचे. मग आला प्रश्न डूआयांचा. कारण आधी केलेला अर्ज फक्त मुळ आयडीसाठी असतो, डुआयसाठी नाही. मग डुआयसाठी वेगळा अर्ज. डुआयसाठी पुन्हा होमपेज वर जायची गरज नसते. ते थेट प्रशासनमान्य रजिस्टर पानावर मिळते. त्याच्या परिपुर्ण वापरासाठी तुमच्याकडे मुळ आयडीचा लेखन परवाना आवश्यक असतो.

प्रशासनमान्य डुआय फुकट मिळतो. तो प्रत्येक डुआय धारातिरर्थी पडताना माबोचित्रगुप्ताला त्याचा हिशोब द्यावा लागतो. त्या पेक्षा वयक्तीत प्रतिसाद न देता डुआय वापरावा. हा सरावासाठी उपयोगी पडतो.

सार्वजनीक बाफवर हा डुआय कोणाचा आहे हे लगेच ओळखू येईल असा प्रतिसाद देण्याची परवानगी नसते. तसे केल्यास दीड प्रतिसादात कोणीही सभासद तुम्हीच "आपले ते हे" अशी बोंब मारु शकतो.

असा आयडीघातक जुगार खेळायचा तर काही प्राथमीक शिस्त पाळायला हवी असे सांगीतले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी आपल्या कंपु बंधुभगीनीने जरी दिवा मागितला तरी आधी त्यात उपहासात्मक अप्रत्यक्ष अपमानाचा करंट टाकुन मगच तो द्यावा.

आता नविन दिवस आला या व अशा स्पर्धेच्या वेळी आपल्याकडील जिलब्यांचे पातेले रिकामे करावे लागते. स्पर्धेच्या काळात तुमच्या जिलब्या संपण्याला परवानगी नसते. तेथे प्रतिसाद जमा करण्यासाठी शंभर प्रतिसाद ईतरांच्या धाग्यावर त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर पुढच्या नव्या धाग्यावर ते शंभर प्रतिसाद चालत नाहीत. त्या साठी दुसरे पाचशे द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे त्या त्या दिवसाचे तात्पुरत्या काळाचे धागे काढणे मोठे गमतीशीर असते. तुम्हाला किमान सभ्य भाषेत किती कमाल अपमान करता येतो याची खातरजमा करण्यासाठी(च) तुम्हाला प्रतिसाद दिला जातो. तुम्ही जर कु.रु. असाल तर दुर्लक्ष करुन असाल त्या एमनसी मधुन पुढील प्रतिवादाची मालीका चालु ठेवणे अपेक्षीत असते. तुम्ही एमनसीत नाहीत आणि गफ्रे सोबत आहात असे सांगीतले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला तुमचे गिरे तो भी‌ टांग उपर झालेले तुम्हाला मान्य आहे असे समजले जाते.

या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने लेखनपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की लेखनपरवाना परत करणे म्हणजे मुळ आयडीने सन्मानाने जगता येणे नव्हे. कारण त्या सगळ्या जिलब्या म्हणजेच लेखन तुमच्या व्यक्तीमत्वाशी जोडले गेलेले असते. त्यामुळे ते परत परत करण्याची पद्धत असते. तर मग त्या लेखन परवान्याचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे अगदी असाच जिलब्या पाडण्याचा सो-या (पक्षि: लेखनसामर्थ्य) आहे व ज्याला त्याच्या जिलब्या इथे खपवायच्या आहेत अशी व्यक्ती शोधुन तिला गाठायचे. व तिच्यापेक्षा पकाऊ जिलब्या पाडायच्या. बाकी माबोजनता केवळ तुमचा (लेखन) तमाशा पाहु शकते.

तर अशी ही कैफीयत धागा व लेखनपरवाना धारकाची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीये Lol

पण टवाळखोरांसाठी इशारा लिहीलाच नाही. आता किमान प्रतिसादात तरी इथे येऊन घाण करू नका वगैरे शब्दफुले उधळली जातील असे बघा. (आपण कुणाचे विडंबन केले आहे याचे भान ठेवा.)

साधुकानंद | 31 December, 2015 - 22:35
ही सर्व माहिती चुकीची आहे.... नुसता परवाना मिळतो.

उन्मेऽऽष | 31 December, 2015 - 22:44
रोचक माहिती.
माझे एक काका चार चार ओरिजिनल आय डी बाळगायचे. परवाना की नो परवाना पता नही. पण त्यामुळे त्यांचा दरारा होता. जो मलाही कामात यायचा. कारण माझ्याशी पंगा म्हणजे लगेच याचे काका चार आयडींची फौज घेऊन येतील असे पोरांना वाटायचे.

तीनचंद | 31 December, 2015 - 23:48
अमेरीकेत खुले आम धागा काढायला दिलेली मुभा काढुन घ्यायचा प्रस्ताव आला आहे. तिकडे तर अनेक ड्यू आय ठेवतात आणि बेछुट धागेबाजी ही करतात.

ड्यू आय लागतात कुणाला ? जे अवैध प्रतिसाद देतात किंवा राजकीय वैमनस्य पत्करतात. साध्यासुध्या आयडींना भिती दाखवायला नुसते प्रतिसाद पुरेसे आहेत.

mi_manu | 31 December, 2015 - 23:56
हा लेख खूप आवडला.
'आपण ड्यू आय काढावा' असं उगीचच्या उगीच धोका नसताना ग्लॅमर म्हणून मध्ये मध्ये वाटत असतं पण त्याचा परवाना लागतो यापलिकडे सामान्य आयडीला काहीही माहिती नसते.

मस्तंय. नवीन सभासदांना प्रवेश देतानाच हे वाचणे कंपल्सरी असायला हवे
तसे केल्यास दीड प्रतिसादात कोणीही सभासद तुम्हीच "आपले ते हे" अशी बोंब मारु शकतो. >>> हो. सिंबा नावाचे एक ड्युआयडी यात आघाडीवर असतात. माझ्या प्रत्येक धाग्यावरच्या प्रतिसादाचा वास काढत ते मागे मागे येत असतात. हा खेळ एकटेच खेळत शंभर एक प्रतिसाद (विषयाला सोडून) देऊन धागा भरकटवण्यात मातबोलीत त्यांचा हात कुणी धरत असेल असे वाटत नाही.

यांच्यावर कारवाई का होत नाही या प्रश्नाचे उत्तर या धाग्यावर मिळाले. लोक पण इरीटेट होत नाहीत हे विशेष आहे..