केक कसा करावा?????...

Submitted by Hemantj82 on 31 December, 2015 - 03:52

मला माझ्या wife ला गिफ्ट एक मस्त केक द्यायाचा आहे.. तरी कोणी मला सांगेल का तो कसा करावा...

अगदी केकची भांडी सुद्धा ओवेन साठी कुठली घ्यावी एतुन सुरवात आहे. एकदम cream चा नको आहे... घरचा घरी बनवला जाइल असा हवा आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/17973
ही एक सोपी रेसिपी आहे.
एगलेस करायचा असेल तर रव्याचअ केक करता येइल. सर्च विंडो मधे केक अशी शब्दखूण लिहील्यावर बर्याच रेसिपी सापडतील.

अगदी केकची भांडी सुद्धा ओवेन साठी कुठली घ्यावी एतुन सुरवात आहे.
तर मग मॅजिक ओव्हन नावाचे केकचे दुकान असते त्यात जसा हवा तसा तयार किंवा बनवुन मिळतो. हाकानाका
(थमत्ता नैइ याल !)

थमत्ता नैइ याल !>>>> हायला आधी हे काय समजलंच नव्हतं. Happy

पहिल्यांदाच करत असाल तर बायकोच्या बर्थडेचा मुहुर्त साधु नका. म्हणजे कधीतरी एकदा असंच ट्राय करा. मग गिफ्ट करा. आता विकतचा आणा की मस्तपैकी डार्क चॉकलेट केक. यम्म यम्म.

ओव्हन आहे का? मावे आणि ओटिजी मधला फरक कळतो का? प्रश्न प्रश्न प्रश्न......

जर घराबाहेर पडणे शक्य असेल तर सध्या केकच्या दुकानात खुपच सुंदर केक्स मिळताहेत. स्वस्तात काम होऊन जाईल आणि बायकोबरोबर क्वालिटी टाईम द्यायला वेळही बराच उरेल. तेव्हा सध्या दुकानच बघा.

शेवटी एकदाचा cake केला... एकदम साधा केला होता पण आवडला सगळ्यांना..

यौ tube व आपल्या सगळ्यांचे आभार...

मी एका सोप्प्या केक ची रेसिपी वाचली होती.
Glucose biscuit चे 2 पुडे आणी Bourborn biscuit चे 2 पुडे mixer मधुन काढुन घ्यावे. तसेच त्यामधे चवीनुसार साखर आणि eno fruit salt (lemon flavor) 1 पाकिट टाकणे. सर्व मिश्रण mixer मधून बारीक झाले की त्यामध्ये दुध घालून त्याची thick paste करायची . हे मिश्रण microwave मध्ये 15-20 min ठेवायचे. 10 min झाल्यावर त्यामधे एकदा सूरी घालून बघा. केक झाल्याची खुण म्हणजे मिश्रण चाकूला चिकटून रहात नाही.

शेवटी एकदाचा cake केला... एकदम साधा केला होता पण आवडला सगळ्यांना..
>>>

अभिनंदन,
बायकोसाठी प्रेमाने यशस्वी केक केल्याबद्दल सुद्धा, आणि इथे आलेल्या दुकानातून केक घेण्याच्या सल्ल्यांमुळे आपला निर्धार डगमगू दिला नाहीत याबद्दल सुद्धा.
दुकानातील केक वर्षभर उपलब्ध असतो, पण कश्याची काहीच माहीती नसताना बायकोसाठी म्हणून केक करायचे धाडस तिच्यावर प्रेम करणारा नवराच करू शकतो. आणि हे स्पेशल डे' लाच करावे. केक अगदी फसला असता तरी या गोड फजितीचा अनुभव आयुष्यभराला पुरला असता Happy

हेमंत, नुसते प्रश्न विचारणार्‍यांपेक्षा तुम्ही प्रश्न विचारून स्वतःचं उत्तर पण लिहिलंत. Happy
याबद्दल अभिनंदन!
केक सगळ्यांना आवडला याबद्दल डबल अभिनंदन!