Submitted by हर्ट on 22 December, 2015 - 02:40
इथे कुणी नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे कुणी नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे?
नागनाथ इनामदारांची राऊ आणि
नागनाथ इनामदारांची राऊ आणि झुंज ही दोन पुस्तके वाचली आहेत. दोन्ही ऐतिहासिक कादंबर्या आहेत आणि लेखनशैली छान आहे.
राऊ नावाची दोन पुस्तक आहेत हे
राऊ नावाची दोन पुस्तक आहेत हे माहीत नव्हतं . कधी मिळालं तर वाचेन .
मी आत्ता वाचायला सुरुवात केली
मी आत्ता वाचायला सुरुवात केली आहे. जेवढे वाचलेय त्यावरुन तरी चांगले वाटतेय. लेखनशैली आवडलीय.
राऊ नावाची दोन पुस्तक आहेत हे
राऊ नावाची दोन पुस्तक आहेत हे माहीत नव्हतं .>>
बी ने असं कुठे म्हटलंय!
बी, मी वाचलीये राऊ. शालेय जीवनात ऐतिहासिक कादंबर्यांमधला फँटॅसिझम फार आवडत असे. त्या काळात वाचलेली कादंबरी आहे.
ना.सं. इनामदारांचे नाव नागनाथ आहे हे आधी माहीत नव्हते.
झुंज कादंबरी कुणावर आहे. वाचलीय मी ही बहुदा.
सदाशिवरावभाऊंच्या पत्नी पार्वतीबाई ह्यांच्या आयुष्याव्ररही एक कादंबरी आहे ना. इनामदारांचीच आहे का!
झुंज कादंबरी कुणावर आहे.
झुंज कादंबरी कुणावर आहे. >>>>> यशवंतराव होळकर.
झुंज कादंबरी कुणावर आहे.
झुंज कादंबरी कुणावर आहे. >>>>> यशवंतराव होळकर
>>
नाही वाचलीय ही कादंबरी.
सदाशिवरावभाऊंच्या पत्नी पार्वतीबाई ह्यांच्या आयुष्याव्ररही एक कादंबरी आहे ना. इनामदारांचीच आहे का!>>>
शिकस्त! कादंबरीचे नाव आता आठवले. ना. इनामदारांचीच आहे !
'आलमगीर' - इनामदारांची अजून एक कादंबरी. औरंगजेबावर आहे.
शालेय जीवनात ऐतिहासिक
शालेय जीवनात ऐतिहासिक कादंबर्यांमधला फँटॅसिझम फार आवडत असे. >> +१
मी पण शाळेत असतांना वाचलीये राऊ. तेव्हा आवडली. आता परत वाचली तर आवडेलच असं नाही.
ओह ! मला वाटलं ना स आणि
ओह ! मला वाटलं ना स आणि नागनाथ वेगवेगळे लेखक आहेत का .
ना स इनामदारांची राऊ वाचली आहे
ऐतिहासिक कादंबरी म्हणून आणि
ऐतिहासिक कादंबरी म्हणून आणि बाजीराव बद्दल माहिती म्हणून वाचायला चांगली आहे. पण तो जसाच्या तसा इतिहास नाही हे धान्यात असु द्या.
पण तो जसाच्या तसा इतिहास नाही
पण तो जसाच्या तसा इतिहास नाही हे धान्यात असु द्या.>>
करेक्ट. म्हणूनच परत वाचायचा अजिबात मोह होत नाहीय.
सेना > +१११११११ इतिहासात
सेना > +१११११११
इतिहासात डोकावताना काही व्यक्ती-पात्रे, वंशावळ, घटना, लढाई, करार -तहनामे त्यांची कलमे हे बऱ्याच वेळा इतकं सुटसुटीत नसतं. अश्यावेळी त्या त्या प्रकारावर कथा-कादंबरी/पोवाडा/लघुकाव्य/नाटक असेल तर तुलनात्मक दृष्ट्या काही पात्र आणि त्यांची पार्श्वभूमी लक्षात रहाते हि जमेची बाजू. म्हणून ह्यातून येईल तोच खरा इतिहास नव्हे.
बाकी 'बिगरी ते म्याट्रिक' मध्ये पु. लं. नी हा घोळ इतिहासातील शिवाजी आणि नाटकातील शिवाजी हा फरक खूपच मिश्किलपणे मांडला आहे
ना. सं. इनामदारांची 'मंत्रावेगळा' हि दुसऱ्या बाजीराव पेशवा ह्यांच्या वर आधारित अजून एक कादंबरी.
'बिगरी ते म्याट्रिक' हे
'बिगरी ते म्याट्रिक' हे पुलंचे पुस्तक आहे हे मला माहिती नव्हते. धन्यवाद तोफखाना.
दुसरा बाजीराव पेशवा हा खूप
दुसरा बाजीराव पेशवा हा खूप कमी वयात वारला ना. आत्महत्या की काय असे काहीतरी बहुदा. की तो दुसरा माधवराव?
दुसरा बाजीराव पेशवा हा खूप
दुसरा बाजीराव पेशवा हा खूप कमी वयात वारला ना. आत्महत्या की काय असे काहीतरी बहुदा. की तो दुसरा माधवराव?>>>> तो दुसरा माधवराव किंवा सवाई माधवराव पेशवे. वयाच्या एकविसाव्या वर्षी आत्महत्या केली. त्यानंतर दुसर्या बाजीरावास पेशवेपद मिळाले.
@ बी : 'बिगरी ते म्याट्रिक'
@ बी : 'बिगरी ते म्याट्रिक' >> हे मी त्यांच्या कथाकथन मध्ये ऐकला आहे, ते कोणत्या पुस्तकाचा भाग आहे आहे माहित नाही
@ निंबुडा : दुसऱ्या बाजीरावांचा मृत्यू १८५० नंतर झाला.
अधिक माहिती 'सेनापती' देतीलच
धन्यवाद, नरेश. मला शंका होतीच
धन्यवाद, नरेश. मला शंका होतीच दुसरा माधवराव असेल म्हणून
इथेच एक विचारतो आनंदीबाईंनी ध
इथेच एक विचारतो आनंदीबाईंनी ध चा मा केला. ह्याला धरुन आणा चे ह्याला मारुन आणा करताना खोडाखोड दिसली नाही का वाचणार्यांना ते जुने पत्र आहे का अजून कुठे
बी, ते पत्र आनंदीबाईंनीच
बी, ते पत्र आनंदीबाईंनीच लिहिले ना... त्यांना धरून आणा लिहायला सांगितले ते त्यांनी मारुन आणा असेच लिहिले. खाडाखोड कुठे झाली यात.
(मी त्यावेळी उपस्थित नव्हते, कुठेतरी वाचलयं त्यावरुन सांगतेय.. तु होतीस का तिथे? असे कोणी विचारायच्या आत खुलासा करतेय. )
निधी माझ्यामते हा बदल
निधी माझ्यामते हा बदल आनंदीबाईंनी पत्रात केला होता.
हो आनंदीबाईंनीच केला पण
हो आनंदीबाईंनीच केला पण राघोबादादांनी त्यांना तोंडी सांगितलं आणि पत्र लिहिताना / सांगताना आनंदीबाईंनी तो बदल केला. असे मी कुठेतरी वाचलंय. लिहिलेल्या पत्रात खाडाखोड झाली असेल तर लगेच कळलं असतं की.
आनंदीबाईंनी खास दूत पाठवून या
आनंदीबाईंनी खास दूत पाठवून या कार्यासाठी जर्मनीहून खोडरबर मागवले होते. उत्तम प्रतीच्या अश्या त्या मौल्यवान रबरामुळे खोडाखोड दिसून आली नाही. पुढे या रबराचे बरेच तुकडे झाले. आमच्या एका इतिहासप्रेमी स्नेह्यांकडे याचा एक छोटा तुकडा जतन केलेला आहे.
मामी, नंतर काय भाषा वगैरे
मामी, नंतर काय भाषा वगैरे वापरतोस असे म्हणू नकोस.
स्टे अवे प्लीज!
मामे,
मामे,
(No subject)
स्टे अवे प्लीज! >>> याचं
स्टे अवे प्लीज! >>> याचं प्रयोजन समजलं नाही. तुला जसे प्रश्न पडतात तशीच आम्हाला उत्तरं पडतात.
याचं प्रयोजन समजलं नाही. तुला
याचं प्रयोजन समजलं नाही. तुला जसे प्रश्न पडतात तशीच आम्हाला उत्तरं पडतात.>>
ह्याच प्रयोजन इतकच मी माझ्या लिखानाशी निगडीत तू बोलता कामा नये. मी तुझ्याशी बोलतो का? नाही ना!!! तुझ्या लिखाणावर माझी कधी प्रतिक्रिया असते का? नाही ना!!! कारण मला तू आवडत नाहीस आणि त्रासदायक व्यक्ती वाटते म्हणून मी तुझ्यासारख्या अवांछित लोकांना माझ्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या लिखाणावर जी काही उत्तरे तुला पडतात ती तू लिहित जाऊ नकोस. मी जर तुला शिवागाळ केला तर माझे नाव अॅडमिन पर्यंत जाईन. पण त्यांना हे कळणार नाही की विषय कुठुन सुरु झाला. मी तुला एकवेळ नाही अनेकदा सांगितले आहे की माझ्या लिखाणावर तुझी प्रतिक्रिया नको पण तू ऐकत नाहीस. होप तुला आता स्टे अवे म्हणजे काय हे कळले असेल.
अॅडमिन प्लीज मामीला दोन शब्दात समजवून सांगता येईल का? धन्यवाद.
(No subject)
ह्याच प्रयोजन इतकच मी माझ्या
ह्याच प्रयोजन इतकच मी माझ्या लिखानाशी निगडीत तू बोलता कामा नये. मी तुझ्याशी बोलतो का? नाही ना!!! तुझ्या लिखाणावर माझी कधी प्रतिक्रिया असते का? नाही ना!!! कारण मला तू आवडत नाहीस आणि त्रासदायक व्यक्ती वाटते म्हणून मी तुझ्यासारख्या अवांछित लोकांना माझ्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या लिखाणावर जी काही उत्तरे तुला पडतात ती तू लिहित जाऊ नकोस. मी जर तुला शिवागाळ केला तर माझे नाव अॅडमिन पर्यंत जाईन. पण त्यांना हे कळणार नाही की विषय कुठुन सुरु झाला. मी तुला एकवेळ नाही अनेकदा सांगितले आहे की माझ्या लिखाणावर तुझी प्रतिक्रिया नको पण तू ऐकत नाहीस. होप तुला आता स्टे अवे म्हणजे काय हे कळले असेल.
>>> च्च च्च च्च च्च! असले जाचक नियम करण्यापेक्षा जरा लाईटली घेतलंस ना तरी तुझ्या दृष्टीकोनात खूप फरक पडेल आणि अशी अकारण चिडचिड होणार नाही.
पटलं तर बघ.
च्च च्च च्च च्च! असले जाचक
च्च च्च च्च च्च! असले जाचक नियम करण्यापेक्षा जरा लाईटली घेतलंस ना तरी तुझ्या दृष्टीकोनात खूप फरक पडेल आणि अशी अकारण चिडचिड होणार नाही.
पटलं तर बघ.
>>
मामी, तू माझ्याविरुद्ध जी तक्रार केलीस त्याचे हे उत्तर आले आहे माझ्या विपुत http://www.maayboli.com/user/65/guestbook आणि परत अशी विपु मला नको म्हणून मी असे जाचक नियम केले आहे. सो प्लीज..
11 December, 2015 - 01:36
बी,
प्रतिसाद देताना भाषा जपून वापरा. तुमच्याबद्दल अनेक तक्रारी आलेल्या आहेत. पुन्हा तक्रार आलई तर सदस्य्त्व स्थगीत करण्यात येईल.
मी तक्रार केली हे कशावरून बी?
मी तक्रार केली हे कशावरून बी? एडमिननी सांगितलं की मी तक्रार केलेली नाही तर माझी माफी मागणार का? कारण मी तक्रार केलेली नाही. पण ते तुला पटणार नाही.
Pages