नॉर्थ स्ट्रॅडब्रोक बेट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया

Submitted by हर्षल_चव्हाण on 17 December, 2015 - 23:04

....................क्वीन्सलँड राज्य ऑस्ट्रेलियातलं सनशाईन स्टेट म्हणून ओळखलं जातं. (इतर ऑस्ट्रेलियन राज्यांच्या तुलनेत जास्त उबदार वातावरण म्हणून). क्वीन्सलँडला नैसर्गिक समुद्रकिनारे आणि त्यातही कोरल समुद्राची देणगी असल्यामुळे इथलं पर्यटन समृद्ध आणि सर्वश्रूत आहे. ब्रिस्बेनच्या जवळ एका दिवसात भेट देऊन परत येण्याजोगी व्यवस्था असल्यामुळे, नॉर्थ स्ट्रॅडब्रोक किंवा स्ट्रॅडी बेट हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. पॉईंट लूक-आऊट आणि सिलिंडर बीच यादरम्यान असणारा अत्यंत सुंदर देखावा मी खालील चित्रांद्वारे इथे पोस्टतोय. बाकी माहिती विकीपेडीया वर मिळेलच. ब्रिस्बेन सिटीतून, क्लीव्हलँड रेल्वेलाईन ने क्लीव्हलँड हे शेवटचं स्टेशन गाठायचं. मग कनेक्टींग बस पकडून, क्लीव्हलँड पोर्ट ला उतरायचं. तिथून वॉटर टॅक्सी अर्थात फेरी पकडून डन्वीच पोर्ट, आयलँडवर जायचं. हे आयलँड जगातलं दुसरं सगळ्यात मोठं बेट आहे (सँड आयलँड). त्यामुळे इथे वस्ती आहे. (मला वाटलं होतं तस डेजर्टेड नव्हतं.) बस पकडून इथल्या तीन व्हिजिटींग पॉईंट्सना जाता येतं.

उरलेलं आयलँड पहायला स्वतःची गाडी घेऊनही जाता येऊ शकतं.
....................ऑस्ट्रेलियात इतके समुद्रकिनारे आहे, असं म्हणतात की; एकेक बीच पहायचं झालं तर सत्तावीस वर्षे लागतील. बरेचसे किनारे सुंदर, नीटनेटके आणि स्वच्छ निळ्या पाण्याचे आहेत (सगळेच नाहीत), त्यामुळे सगळेच नंतर एकसारखे वाटायला लागून फोटोग्राफी बंद करून केवळ डोळ्यांत साठवून घेतले तरी पुरेसे आहेत. तर स्ट्रॅडब्रोक पहायला गेल्यानंतर, पॉईंट-लूक आऊट पासून ते जॉर्ज वॉक ते डेडमॅन्स बीच असा वॉक आम्ही केला. व्हेलवॉचिंग पॉईंटवर मी खूप वेळ होतो, पण एकही व्हेल दिसला नाही हे दुर्दैव. अ‍ॅमिटी पॉईंटला जाता आलं नाही, (खरंतर, उन्हाच्या त्रासामुळे जाण्याचं टाळलं.)

1 Point Look Out George Walk Another.jpg2 Point Look Out George Walk 3.jpg3 Point Look Out George Walk Begin.jpg4 Point Look Out George Walk Way.jpg5 Point Look Out George Walk1.jpg6 Point Look Out George Walk2.jpg7 Point Look Out George Walk4.jpg8 South George.jpg9 Captain Cook Lookout.jpg10 Captain Cook Lookout2.jpg11 Captain Cook Lookout3.jpg

इथे ब्लोहोल आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्याचा, इथे मोठा आवाज होतो, आणि याची उंचावरून पाहतांना भितीही वाटते.

12 Whalerock Blowhole.jpg13 Whale Watching Platforms.jpg14 Beach.jpg15 Beach2.jpg16 Dune Platforms.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

आहा.. निळाशार समुद्र आणि पांढर्याशुभ्र फेसाळलेल्या लाटा....अफाट सुंदर कॉम्बिनेशन आहे.