वाटा …

Submitted by कविता क्षीरसागर on 14 December, 2015 - 08:34

वाटा …

ओळखीच्या कशा तिच्या वाटा ?
काय स्वप्नांत पाहिल्या वाटा ?

भास त्याचा उगाच का झाला ?
शोध घेऊन परतल्या वाटा

का पुन्हा मी तुझ्याच दाराशी
हाय ! वाटाच विसरल्या वाटा

बहर सारे जळून गेले रे
मग वसंतात टाळल्या वाटा

का अशी सैरभैर होशी तू ?
या कशाने ग पुसटल्या वाटा ?

हा प्रवासी पसंत नाही तर
बदलल्या पाहिजेत ह्या वाटा

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मनापासून धन्यवाद बेफिकीरजी
आपल्या सारख्या जाणकार गझलकाराकडून वाहवा मिळणे हे माझे भाग्यच आहे
धन्यवाद अरविंदजी
mayumk छान शेर