Submitted by कविता क्षीरसागर on 14 December, 2015 - 08:34
वाटा …
ओळखीच्या कशा तिच्या वाटा ?
काय स्वप्नांत पाहिल्या वाटा ?
भास त्याचा उगाच का झाला ?
शोध घेऊन परतल्या वाटा
का पुन्हा मी तुझ्याच दाराशी
हाय ! वाटाच विसरल्या वाटा
बहर सारे जळून गेले रे
मग वसंतात टाळल्या वाटा
का अशी सैरभैर होशी तू ?
या कशाने ग पुसटल्या वाटा ?
हा प्रवासी पसंत नाही तर
बदलल्या पाहिजेत ह्या वाटा
कविता क्षीरसागर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>हा प्रवासी पसंत नाही
>>>हा प्रवासी पसंत नाही तर
बदलल्या पाहिजेत ह्या वाटा <<< व्वा व्वा
सुरेख गझल
पाहता पाहता तुझी वाट विसरून
पाहता पाहता तुझी वाट
विसरून गेलो माझी वाट -
रस्ता हां प्रिये तुझ्या घरचा
जणू माझी वहिवाट -
छान
छान
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद बेफिकीरजी
आपल्या सारख्या जाणकार गझलकाराकडून वाहवा मिळणे हे माझे भाग्यच आहे
धन्यवाद अरविंदजी
mayumk छान शेर
फॅन आहे मी तुमची!
फॅन आहे मी तुमची!