मिश्र डाळींची भजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 December, 2015 - 04:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रत्येकी पाव वाटी मुगडाळ, चणाडाळ, मसुर डाळ, उडीदडाळ किंवा आपल्याला आवडतील व उपलब्ध असतील त्या डाळी. (मी हिरव्या सालीची मुगडाळ घेतली आहे).
२ कांदे चिरून
थोडे हिंग
१ चमचा हळद
२-३ मिरच्या
मुठभर चिरलेली कोथिंबीर
चविनुसार मिठ
२ चमचे लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

सगळ्या डाळी एकत्र करून ५ ते ६ तास भिजवून घ्या.

ह्या डाळी व मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. जास्त पाणी घालू नये.

ह्या मिश्रणात हिंग, हळद, मिठ, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून एकजीव करा.

कढईत तेल गरम करा व त्यात चमच्याने भजी सोडा. मिडीयम गॅसवर सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळा.

सॉस किंवा चटणी बरोबर गरमागरम वाढा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

लिंबाचा रस घातल्याने चवही येते व डाळींचा वास मोडला जातो. पण तो प्रमाणात घालावा मिश्रण आंबट होई पर्यंत घालू नये.
ह्या भज्या लहान मुलांना खुप आवडतात.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सृष्टी, सायु, पद्मावती, मंजूडी, कविता, दिनेशदा, स्वाती२, स्वाती आंबोळे ताई, ममोताई, अश्विनी, नंदिनी, जाई, नरेश माने धन्यवाद.
वर्षूताई हो ह्यात भरडच डाळ अधिक चांगली लागते.

दिड मायबोलीकर नक्की करा तसे. पण थोडे पातळ धिरडी किंवा डोसा करा म्हणजे चविष्ट होतील.

सायो मिरच्या आहेत की ग लिहीलेल्या.

फेरफटका अहो कलेजी आहे की काही दिवसांपुर्वीच टाकलेली.

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

Pages