अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाउ अबाउट दोज चिफ्स!( अँडी रीडच्या आवाजात). Happy

वॉव! महोम्स, केल्सी व टायरिक हिल्स.. व्हॉट प्लेयर्स!

काय बोलणार त्यांच्याबद्दल? त्यांचा खेळच सगळ सांगुन जातो.

टायरिक हिल्सचा स्पिड पाहीलात? उगाच नाही त्याच टोपण नाव चित्ता आहे Happy

चिफ्स परत एकदा सुपरबोलमधे आणी त्यात महोम्स परत एकदा ब्रेडी विरुद्ध.. यापेक्षा मस्त स्क्रिप्ट सुपरबोलसाठी असु शकली असती का?

चिफ्स परत एकदा सुपरबोलमधे आणी त्यात महोम्स परत एकदा ब्रेडी विरुद्ध.. यापेक्षा मस्त स्क्रिप्ट सुपरबोलसाठी असु शकली असती का? >> इंजॉय कर. मी वर्षाच्या सुरूवातीपासून सांगतोय तुला की महोम्स परत जिंकेलच. काय पॉईज आहे.

बक्स नि पॅकर्स दोन्ही टीम्स नी एव्हढ्या अन्फोर्स्ड चूका केल्या काल की ब्रॅडी सारख्या प्लेऑफ्स कोळून प्यायलेल्या मनुष्याने फायदा उचलला नसता तर नवलच होते. रॉजर्स ला ईंटरसेप्शनचा फायदा उचलू न देण्याबाबत टॉड बोवेल्स ला मानले पाहिजे. ब्रॅडी एव्हढाच बक्स्च्या डीफेन्स चा वाटा होता त्या विजयात. पॅकर्स ना रॉजर्स वर १००% विश्वास वाटत नाही असे सतत वाटत राहिले आहे ह्या वर्षी ते अजूनच जाणवले. ईंटरसेप्शन ऑर नॉट, समोर ब्रेडी सारखा परकेट क्लॉक मॅनेजर असताना फिल्ड गोल घेऊन तुमच्या बेस्ट प्लेयर (रॉजर्स - अ‍ॅडम्स) पासून बॉल दूर करणे ही भयंकर घोडचूक होती. पॅकर्स च्या ऑफेन्सिव्ह लाईन कडे तेव्हढाच दोष जातो.

बिल्स ची विंडो पुढच्या वर्षी बंद होईल. हे वर्ष त्यांना बेस्ट चान्स होता. पॅट्स ची कॅप स्पेस नि जेट्स चे ड्राफ्ट प्लेसेस बघता पुढच्या वर्षी ए एफ सी ईस्ट भयंकर काँपीटेटीव्ह होणार आहे.

बक्स चूक न करता पुढचा सामना खेळतील नि चुरशीचा सामना होईल अशी आशा धरूया. बक्स कंसरव्हेटिव्ह अ‍ॅप्रो च घेऊन खेळणार असतील तर खेळले नाही तरी चालेल Happy

आता वेध सुपरबोलचे!

असामी, बक्स -पॅकर्स गेम बद्दलच्या तुझ्या विश्लेषणाशी सहमत.

सुपरबोल चिफ्स जिंकतील अस मला वाटते (व्हॉट अ सरप्राइज Happy )

बकिनिअर्स डिफेन्सने जर महोम्सला प्रत्येक पझेशनला फिल्ड गोलवरच थोपवले तर त्यांना ब्रेडी सुपरबोल जिंकुन देउ शकतो. बट इफ इट कम्स डाउन टु अ ऑल आउट ऑफेन्सिव्ह शुटआउट बिटविन दिज २ ग्रेट क्वार्टरबॅक्स, महोम्स विल आउट्स्कोर ब्रेडी.

बट इफ इट कम्स डाउन टु अ ऑल आउट ऑफेन्सिव्ह शुटआउट बिटविन दिज २ ग्रेट क्वार्टरबॅक्स, महोम्स विल आउट्स्कोर ब्रेडी. >> एनी टाईम. मॅनिंग नि काही वर्षांपूर्वीचा रॉजर्स वगळता मला नाही वाटत गेल्या १०-१२ वर्षांमधले कोणी शुटआउट मधे महोम्स ला हरवू शकतील.

बकिनिअर्स डिफेन्सने जर महोम्सला प्रत्येक पझेशनला फिल्ड गोलवरच थोपवले >> माझ्या आठवणी प्रमाणे पॅटस च्या गेम मधे पहिले तीन क्वार्टर्स हे झाले होते नि मग महोम्स सुटला. कॅम त्याच्याशी शुटआउट मधे स्पर्धा करणे अशक्य होते. कॅम ने आधी फ्फार स्कोअर केला नव्हता हे भोवलेच. तेंव्हा बकिनिअर्स डिफेन्स बरोबर ब्रॅडी ला मोठा वाटा उचलायला लागेल हेही नक्कीच. ब्रॅडी जास्त अ‍ॅग्रेसिव्ह असेल असा माझा अंदाज आहे. इंटरसेप्शन झाले तरी चालतील पण स्कोअर करायचा प्रयत्न करत राहायचा ह्या मूडमधे.

>>उगाच नाही त्याच टोपण नाव चित्ता आहे<<
हि इज इन्क्रेडिबल. पण मी त्याला चित्त्या ऐवजी सश्याची उपमा देइन. कारण चित्त्याचा पाठलाग कोणिहि करत नाहि, परंतु सश्याच्या मागे शिकारी कुत्रे लागतात, आणि त्यांना तो कसा चकवतो याचं टायरीक हिल्स शिवाय दुसरं उदाहरण असुच शकत नाहि... Proud

राज, तु म्हणतोस त्यात तथ्य आहे Happy

असामी, अरे गेल्या वर्षीचा सुपरबोल आठवतोय? फॉर्टीनायनर्सनी पण महोम्सला ३.२५ क्वार्टर्सपर्यंत थोपवुन ठेवले होते पण शेवटचा ०.७५ क्वार्टर महोम्सला बाजी उलटवायला पुरेसा ठरला होता.

डोळ्याचे पाते लवायच्या आत २-३ टच डाउन टाकुन हा माणुस मोकळा होतो! त्यामुळे आम्ही कितीनेही जरी मागे असलो तरी वुइ आर नेव्हर आउट ऑफ एनी गेम. असा दरारा व अशी भिती अपोनंट्सना जो मॉंन्टॅना विरुद्ध खेळताना वाटायची.

मला एवढच बघायच आहे की टॉम ब्रेडी- ग्राँक मॅजीक कनेक्शन अजुन टिकुन आहे का आणी इज इट इनफ टु विन द सुपरबोल फॉर टँपा बे.

मला एवढच बघायच आहे की टॉम ब्रेडी- ग्राँक मॅजीक कनेक्शन अजुन टिकुन आहे का >> ते दोन वर्षआंपूर्वीच संपले रे. यंदा बक्स कडून ग्राँक मुख्यत्वे ब्लॉकर म्हणून खेळलाय. रेड झोन मधे वेपन म्हणून थोडाफार वापरलाय किंवा डायव्हर्जन.

राज, तुझे बरोबर आहे. बट आय अ‍ॅम नॉट रेडी टु थ्रो इन द टॉवेल यट! आय हॅव्ह अ फेथ इन महोम्स!

कॅन्सास सीटी इज बिटींग देमसेल्व्ह्स.. सो फार.. पेनल्टीज.. पेनल्टीज अँड पेनल्टीज! अनबिलिव्हेबल!

अजुन दोन गोष्टी. कॅन्सास सिटी ऑफेन्सिव्ह लाइन इज ऑल सेकंड टीम.. आमचे नेहमीचे दोन्ही गार्ड्स इन्जुरीमुळे खेळत नाही आहेत. सो बक्स डिफेन्स इज हॅव्हींग अ फिल्ड डे अगेन्स्ट महोम्स!

आणी काल मी म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत चिफ्स आर स्कोरींग ओन्ली फिल्ड गोल्स अँड बक्स टच डाउन्स. असेच जर चालु राहीले तर ब्रेडी त्याचा सातवा सुपरबोल आज जिंकेल.

वुइ आर प्रॅक्टीकली गिव्हिंग सुपरबोल टु बक्स अँड ब्रेडी.. ऑन अ सिल्व्हर प्लॅटर... मिलिअन्स ऑफ पेनल्टीज बाय अवर अ‍ॅट्रॉशिअस डिफेन्स!

इफ धिस हॉरर शो बाय अवर डिफेंस कंटिन्युज इन सेकंड हाफ.. महोम्सच काय... इव्हन गॉड कॅन नॉट सेव्ह चिफ्स टुडे. Sad

“बकिनिअर्स डिफेन्सने जर महोम्सला प्रत्येक पझेशनला फिल्ड गोलवरच थोपवले तर त्यांना ब्रेडी सुपरबोल जिंकुन देउ शकतो. “

हे कालचे माझे भाकीत खरे ठरण्याच्या मार्गावर आहे.

महोम्स हॅड अ वर्स्ट गेम ऑफ हिज करिअर! अनफॉर्च्युनेटली इट केम इन अ सुपरबोल.

ब्रेडी आउट्प्लेड महोम्स, ब्रुस एरिअन्स आउटकोच्ड अँडी रीड, बक्स डिफेन्स आउटप्लेड चिफ्स ऑफेन्स, बक्स ऑफेन्स आउट्प्लेड चिफ्स डिफेन्स.. इन शॉर्ट.. बकिनिअर्स आउटप्लेड चिफ्स इन टुडेज सुपरबोल..दे डिझर्व्ह टु विन सुपरबोल टुडे!

अगदीच वन साइडेड गेम झाला आजचा. वॉज होपींग फॉर अ क्लोज अँड एक्सायटींग सुपरबोल.

हॅट्स ऑफ टु टॉम ब्रेडी! ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम! ७ सुपर बोल विन्स! टेक अ बाव ब्रेडी! शब्दच नाहीत त्याच्या या अनबिलिव्हेबल अचिव्हमेंटसाठी!

तुम्हा कोणाला अँडी रीडचे .. हाफ टाइमला ५० सेकंद बाकी असतानाचे व टॉम ब्रेडीकडे बॉल असताना घेतलेले २ टाइम आउट बिझार वाटले नाहीत? अ‍ॅट्रॉशिअस क्लॉक मॅनेजमेंट बाय अवर कोच! इसेन्शिअली गिव्हींग टॉम ब्रेडी प्लेंटी ऑफ टाइम टु स्कोर टच डाउन.. जस्ट बिफोर हाफ टाइम अ‍ॅण्ड लुझींग ऑल द मोमेंटम! इन्स्टेड ऑफ गोइंग इन टु हाफ टाइम डाउन ओन्ली बाय ८, वुइ मॅनेज्ड टु गो डाउन बाय १५!

बाय द वे.. अँडी रीडच्या दारुड्या मुलाने( जो चिफ्सचा लाइनबॅकर कोच आहे) परवा दारुच्या नशेत असताना दुसर्‍या गाडीला ठोकुन मोट्ठा अ‍ॅक्सिडंट केला ज्यात एक ५ वर्षाची लहान मुलगी क्रिटिकली इज्युर्ड होउन आय सी यु मधे मृत्युशी झगडत आहे . अँडी रीडच्या दारुड्या मुलावर पोलीसी कारवाइ चालु आहे. त्या गोष्टीचा कोच अँडीवर परिणाम झालेला आज स्पष्ट दिसुन येत होते. ही वॉज मेंटली अब्सेंट इन टुडेज गेम.

चीफ्स चा एकूणच खेळ काल पार डीरेल्ड वाटला. हाय स्कोरिंग गेम बघायच्या अपेक्षेने बसलो होतो, पण भरमसाठ फंबलिंग्ज, सॅक्स, पेनल्टीज, आणि 'दी महोम्स ला' फाइट देणे दूरच पण ए क ही टचडाउन करता येऊ नये! जिंकायचे क्लियर फेवरीट्स असताना चीफ्स नी असे सपशेल लोटांगण घालावे हे अनबिलिव्हेबल होते! अर्थात याने ब्रेडी चे क्रेडिट कुठे जात नाही. काय सफाईदार एक्झिक्यूशन! उगीच नाही म्हणत ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम!

मैत्रेयी, १००टक्के बरोबर बोललीस!

एखादा ढ विद्यार्थी वार्षिक परिक्षेला अजिबात न अभ्यास करता गेला तर परिक्षेत कसा परफॉर्मंस देइल? चिफ्स व महोम्सने कालच्या सुपरबोलमधे तश्या ढ विद्यार्थ्यासारखा परफॉर्मंस दिला. दे वेअर नॉट प्रिपेअर्ड अ‍ॅट ऑल! त्यांना असे वाटले की ते डिफेंडींग चँपिअन्स असल्यामुळे व आतापर्तंत चांगले खेळले म्हणुन नुसत्या त्या बळावर सुपरबोल आपोआप त्यांच्या पायाशी लोळण घेइल!

या लाजिरवाण्या पराभवातुन धडा घेउन होपफुली चिफ्स अँड महोम्स विल कम बॅक स्ट्राँगर, हेल्दिअर, मोर प्रिपेअर्ड अँड रेझोल्युट नेक्स्ट यिअर.

मला एवढच बघायच आहे की टॉम ब्रेडी- ग्राँक मॅजीक कनेक्शन अजुन टिकुन आहे का >> मुकुंद म्हणतात ना, बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर , तसे झाले तुझे . ही इच्छा सुपरबॉल जिंकण्यापेक्षा अधिक स्ट्राँग ठरली .

विनोदाचा भाग सोडून दे. चीफ्स डिफेन्स भलताच अ‍ॅट्रॉशिअस होता . ब्रॅडी किती कमी वेळा प्रेशर मधे होता. एव्हढ्या मस्त वातावरणात खेळलाय कि बस्स. बक्स च्या ऑफेन्सिव्ह लाईन ला क्रेडीट द्यायला हवे.
ब्रुस अरियन्स ला त्याने नोव्हेंबर नंतर ब्रॅडीला बक्स्च्या ऑफेन्समधे फिट करायचा अनाठायी प्रयत्न सोडून बक्स ऑफेन्सला ब्रेडीच्या स्किममधे फीट करू दिले. त्याने किती फरक पडला बघ. शॉर्ट नि मीडीयम पासेस नि क्लॉक मॅनेजमेंट ह्यात ब्रॅडीला मात देउ शकतील असे फारच कमी जण आहेत. गमतीचा भाग म्हणजे ब्रॅडी, ग्राँक , ब्राऊन, फॉर्नेट हे ए एफ सी मधले प्लेयर्स घेऊन बक्स जिंकले. स्क्रीन करून केलेले पासेस बघताना थेट जुने पॅट्स गेम्स पाहतोय असा फील येण्यासारखे वाटत होते.
ग्राँक ला दोन्ही वेळा अजिबात कव्हर केले नाही डीफेन्स ने ? हा च माणूस इंजर्ड असतानाही डबल कव्हरेज मधे असायचा. ब्रॅडी - ग्राँक ने मस्त फायदा उठवला ह्या चीफच्या प्लॅनिंग (?) चा.
टॉड बॉव्लेस च्या डीफेन्स ने परत दिल खूश केले. सलग तीन गेम्स एलिट क्वारटर्बॅक ना नामोहरम केलय त्याने एव्हढा यंग डीफेन्स बरोबर घेऊन. चीफ्स ची ऑफेन्सीव्ह लाईन दुबळी झालीये ह्याचा पूरेपूर फायदा घेतलाय. महोम्स पूर्ण वेळ बिचारा सैरावैरा धावत होता. "सेकंड हाफ मधे डिफेंडर ने त्याच्य पायाला घातलेला विळखा , तो पडताना त्याने केलेला पास नि रिसीव्हरने क्यूवर अगदी तो ड्रॉप करणे" हा चीफ्स च्या गेम चा चपखल स्नॅपशॉट होता. ऑफेन्सीव्ह लाईन चा भाग सोडून देऊ पण किती ड्रॉप होते ? किती वेळा ओपन झाले रिसीव्हर्स? हे बघता ' महोम्स ने फेकून त्यानेच पकडावे ' अशी अपेक्षा होती असे वाटत राहिले. जिसेल च्या शब्दांमधे सांगायचे तर 'he can not throw and f* catch it' (She said that to Giant fan when he taunted her for Brady's pass was dropped by Welker in 2011 championship game).
पेनल्टीज बद्दल मला स्वतःला चीफ्स ला काही पेनल्टीज उगाचच दिल्या गेल्या असे वाटले पण एकंदर अकारण ओव्हर अ‍ॅग्रेसीव्ह नि हँडसी असल्याचा फटका चीफ्स डीफेन्स ला पुरेपूर बसला आहे.
रीड पोराच्या भागडी मूळे खरंच गेम मधे मेंटली नव्हता असे वाटले. क्लॉक मॅनेजमेंट हा रीडचा कधीच स्ट्राँग सूट नव्हता त्यामूळे तिथे मी पास देईन.

ब्रॅडी चे सात टायटल्स हे सध्याच्या अ‍ॅक्टीव्ह क्वारटर्बॅक च्या टोटल रिंग्सपेक्षा जास्त आहेत ( ७ विरुद्ध ६ - २ बेन चे, रॉजर्स, विल्सन, महोम्स, फोल्स चे प्रत्येकी एक). ग्राँक आतापर्यंत तो खेळलेला प्रत्येक सुपरबॉल जिंकलाय. लकी मॅस्कॉट ! Happy ब्रॅडी असलेल्या शेवटच्या दोन सुपर बॉल मधे Sean नी Mahomes अशा दोन तत्कालीन बेस्ट कोच नि क्वारटरबॅक च्या टीम्स ना बिना टचडाऊन राहावे लागलाय. काय बोलणार ह्यावर ! GOAT is GOAT and KID is KID. Happy

या लाजिरवाण्या पराभवातुन धडा घेउन होपफुली चिफ्स अँड महोम्स विल कम बॅक स्ट्राँगर, हेल्दिअर, मोर प्रिपेअर्ड अँड रेझोल्युट नेक्स्ट यिअर.>> +1

असामी, तु ९९% बरोबर बोललास( ब्रेडी- ग्राँक कनेक्ट व्हावे ही माझी विश जास्त स्ट्राँग होती याबाबत असहमत Happy )

चिफ्सची ऑफेन्सिव्ह लाइन ही सगळी सब्स्टिट्युट प्लेयर्सनी भरली होती, चिफ्सना खुप पेनल्टिज मिळाल्या, चिफ्सनी खुप कॅचेस ड्रॉप केले, महोम्सच्या टो वर ऑपरेशन जरुरीचे आहे अश्या सगळ्या लंगड्या सबबी देण्याऐवजी चिफ्सनी अ‍ॅज अ होल टीम म्हणुन या सुपरबोलमधे अतिशय सुमार व त्यांना शोभेल असा खेळ न करता अगदी एंबॅरेसींग खेळ केला हे मान्य केले पाहीजे. हे अ‍ॅकनॉलेजमेंट व ते बिलकुल तयारी न करता सुपरबोलला आले होते ही गोष्ट ते जेवढ्या लवकर मानतील तेवढ्या लवकर ते या लाजिरवाण्या पराभवातुन बाहेर येतील असे मला वाटते.

टॉकींग अबाउट गोट अँड किड, मला नेहमीच वाटत आले आहे की महोम्सला ब्रेडीच्या पंगतीत बसवायची घाइ व चुकी नुसते चिफ्सचे फॅन्सच करत नाही आहेत तर सबंध मिडिया पण त्या बँडवॅगन वर चढली आहे.

मी अस म्हणत नाही की महोम्समधे ग्रेट व्हायची क्षमता नाही पण इट्स टु सुन टु टॉक हिम अ‍ॅज ग्रेट!

पुढच्या ३-४ वर्षात महोम्सच्या बाबतीत दुध का दुध या पानी का पानी सगळ्यांना कळेलच. पण सध्या सगळ्यांनी त्याला महोम्सच राहु द्यावे.

शॉर्ट नि मीडीयम पासेस नि क्लॉक मॅनेजमेंट >>> अगदी! हाफ टाइम च्या आधी २० एक सेकंद असतानाचा टच डाउन हे उत्तम उदाहरण, असं वाटत होतं की क्लॉक ब्रेडी ला नव्हे ब्रेडी क्लॉक ला डिक्टेट करतोय!
टॉम ब्रेडी- ग्राँक मॅजीक कनेक्शन अजुन टिकुन आहे का >> मॅजिक कनेक्शन हे खरंच. आणि दे मेड इट लूक सो ईईझी!

टॉकींग अबाउट गोट अँड किड, मला नेहमीच वाटत आले आहे की महोम्सला ब्रेडीच्या पंगतीत बसवायची घाइ व चुकी नुसते चिफ्सचे फॅन्सच करत नाही आहेत तर सबंध मिडिया पण त्या बँडवॅगन वर चढली आहे. >> बरोबर. पण त्याचा एकंदर पॉईज, टॅलंट बघून तो त्या तुलनेला लायक आहे असे माझेही प्रामणिक मत आहे. ब्रॅडि, पेटन , रॉजर्स, बेन सगळ्यांचे परफेक्ट गुण वेचून घेतलेत त्याने. फक्त रीड सारख्या ऑफेंसीव्ह माईंडेड कोच ऐवजी बेलीचेक, झिमर सारख्या डीफेंसीव्ह कोचबरोबर तो जास्त रिंग्स जिंकेल असे मला वाटते. त्याला ऑफेंसीव्ह फ्रंट वर फार मार्गदर्शनाची गरज नाही. ही ईज इन हिज ओन टेरेन. असो.

असामी, राज आणी इतर फुटबॉलप्रेमी, चला , प्लेऑफ्स सुरु होतोय! आता तरी इथे येउन लिहा व हा बा.फ. परत जागा करा!

रार, आमची गाठ तुमच्याबरोबर! बिग बेन चमत्कार करुन दाखवेल महोम्स विरुद्ध? एकाच टीमला एकाच सिझनमधे दोनदा हरवणे कठिण असते. चिफ्सने सावध असावे.

कोणाचे काय अंदाज? या वर्षी सगळ्यांचाच बेभरवश्याचा कारभार आहे. सगळ्या टीम्सनी पुष्कळ वेळा माती खाल्ली आहे या सिझनमधे. माझ्या मते यंदा सुपरबोलचा हमखास दावेदार कोणीच नाही!

राज.. कालचा बामा- जॉर्जियाचा नॅशनल चँपिअनशिपचा गेम बघीतला असशीलच! तुमचे बुलडॉग्स मस्तच खेळले! खासकरुन डिफेन्स! तुमच्या क्वार्टरबॅकने फंबल झाल्यावरच्या पुढच्याच पझेशनमधे एकदम गट्सी व जबरी टचडाउन केला! शिअर विल पॉवर आय विल से! ही फोर्स्ड दॅट अ‍ॅक्युरेट लाँग टचडाउन पास इन एंड झोन! आणी शेवटचा प्ले.. पिक सिक्स! मजा आ गया! अभिनंदन! जॉर्जिया डिझर्व्ह्ड टु विन द नॅशनल चँपिअनशिप! मला वाटत १९८० मधे हायझमन ट्रॉफी विनर हर्शल वॉकरने नॅशनल चँपिअनशिप मिळवुन दिल्यानंतर परत एकदा जॉर्जिया फायनली अ नॅशनल चँपिअन!

आता तरी इथे येउन लिहा व हा बा.फ. परत जागा करा! >> तूच धुमकेतू शी वाद घालायला गेला होतास Happy

या वर्षी सगळ्यांचाच बेभरवश्याचा कारभार आहे. हे मान्य. चारजर्स वि. रेडर्स हा खरा सुपरबॉल होता. कसला गेम होता राव. हर्बर्ट इस रीयल थिंग. एफसी नॉर्थ अतिशय टफ डिव्हीजन असणार येते काही वर्षे. महोम्स होताच त्यात अजून हर्बर्ट ची भर पडली. ब्राँकोज नी एखादा चांगला क्यूबी घेतला की झाला. रेडर्स टेनॅशियस खेळतात. महोम्स परत एकदा घेऊन जाईल असे वाटते. पॅकर्स ऐन वेळी नांगी टाकतात. बक्स इंजर्ड आहेत. टायटन्स जर डेरीक हेन्री सुटला तर धमाल उडवतील अन्यथा वाटत नाही. बिल्स अ‍ॅलन वर फारच अवलंबून आहेत. पॅट्स , बेंगॉल फारच नवखे. रॅम्स , कार्डिनल्स , इगल्स , स्टीलर्स फ्लॉड टिम्स आहेत, गुणी असल्या तरी - त्यांचे फ्लॉ जास्तीच उघड आहेत. ते बॉईज बॉईज आहेत तेंव्हा Happy

असो, आपण तंगड्या वर करून एंजॉय करणार. Wink

>> जॉर्जिया डिझर्व्ह्ड टु विन द नॅशनल चँपिअनशिप!<< +१
आम्हि टेकचे फॅन, बट वी रुटेड फॉर डॉग्ज. Happy मस्त झाला गेम. फस्र्ट हाफ पर्यंत डॉग्ज वेर काइंड ऑफ लॉस्ट, बट दे पिक्ड अप इन लास्ट क्वार्टर. अरे, तु जॉर्जिया-मिशिगन गेम बघितलास? व्हॉट ए गेम...

निक सेबनचे एसइसी चँपियनशिप नंतरचे शब्द त्याच्याच घशात गेले.. सॉर्ट ऑफ...

"द रॅट पॉय्झन दॅट यु पुट औट देर धिस विक वॉज यम्मी..." Lol

राज, तुम्ही यलोजॅकेट्स म्हणजे! Happy

माझी पुतणी व तिचा नवरा दोघे जॉर्जिया अल्युम्नाय, ती भारतातुन आली तेव्हा अथेन्स्मधे तिचे बस्तान बसवायला मी तिच्या मदतीला गेलो होतो . त्यानंतरही किती तरी वेळा तिला भेटायला अथेन्सच्या वार्‍या केल्या होत्या. त्यामुळे म्हण की अलाबामा/ एल एस यु ला सारखे सारखे नॅशनल चँपिअन बघण्याचा कंटाळा आला आहे असे म्हण, मी जॉर्जियालाच सपोर्ट करत होतो. जॉर्जिया वॉज लाँग ड्यु फॉर धिस!

नाही रे, जॉर्जिया- मिशिगन गेम नाही बघता आला.

असामी, हो रे, खरच काय गेम झाला तो! हर्बर्टने किती ४थ डाउन कंप्लिट केले? मे बी सम काइंड ऑफ रेकॉर्ड? चार्जर्सना गेम टाय करायला गेम क्लॉकवर २- का २.५ मिनिट्स मिळाली होती ४ थ्या क्वार्टरमधे, पण ती २.५ मिनिटे जायला अ‍ॅक्चुअल क्लॉकवर २०-२२ मिनिटे मिनिटे गेली! इट वॉज इन्सेन!

हर्बर्ट अजुन रॉ वाटतो. पण त्याच्याकडे टॅलंट आहे यात वाद नाही. तो, जॉश अ‍ॅलन, पॅट्रिक महोम्स व जो बरो… एन एफ एल ची पुढची १०-१२ वर्षे हेच गाजवणार! बर झाल, कारण बिग बेन, ब्रेडी,एरन रॉजर्स व ड्र्यु ब्रिझ हे अस्तास पावत/ पावले आहेत. त्यांची गादी आता हे चालवतील. एन एफ एल इज इन गुड हँड्स! Happy

चिफ्सचा भरवसा नाही यंदा. डिफेन्स एकदम सस्पेक्ट आहे. तुला व राजला ठाउकच आहे की डिफेन्स विन्स द मॅचेस! गेल्या वर्षीच्या सुपरबोलमधे टँपा बे बकिनिअर्स डिफेन्स ओन्ड अवर ऑफेन्स अँड वुइ लॉस्ट इन द सुपरबोल लास्ट यिअर! आणी लास्ट सुपरबोल हरल्यावर मी म्हटले होते की चिफ्सनी भरमसाट मिळत असलेल्य्या पेनल्टीज अ‍ॅव्हॉइड केल्या पाहीजेत यापुढे. पण दुर्दैवाने वुइ आर स्टिल प्लेग्ड बाय वे टु मेनी पेनल्टीज धिस यिअर टु! अँड दोज पेनल्टीज आर किलिंग अस! गेल्या आठ्वड्यात आम्ही जो बरोच्या सिनसिनाटी बेंगल्स कडुन नुसत्या जो बरोच्या जबरी खेळामुळे व आमच्या अ‍ॅट्रोशिअस डिफेन्समुळे व रिडिक्युलस अंपायरींग मुळेच हरलो नाही तर काही क्र्युशिअल पेनल्टि़ज सुद्धा त्या पराभवाला कारणीभुत होत्या, खासकरुन स्पेशल टीमला मिळालेल्या होल्डींग पेनल्टीमुळे आमचा किक ऑफ रिटर्न टु टचडाउन ( चौथ्या क्वार्टरमधे) फुकट गेला व शेवटी आम्ही ३ पॉइंट्सने हरलो.

असो. यंदा कोणीच हमखास फेव्हरेट नसल्यामुळे सगळ्या मॅचेस घासुन होतील व आपल्याला आनंद देउन जातील हीच अपेक्षा!

अँड द लेजेंड ऑफ द “ जो बरो“ कंट्युन्युज!

बरो, महोम्स, अ‍ॅलन.. पुढची दहा वर्षे मेजवानी!

माझा अंदाज- बफेलो बिल्स- चिफ्स, सिनसिनॅटी बेंगल्स-टेनेसी टायटन्स

मग

चिफ्स-बेंगल्स

मग बेंगल्स अँड अमेझिंग जो बरो इन सुपरबोल .. आणी बेंगल्स सुपरबोल चँपिअन्स… जो बरो.. सुपरबोल एम व्ही पी!

आणी हो, हे सांगायचेच राहीले!

फुटबॉल गॉड्स जो बरो वर खुष असल्यामुळे सुपरबोल ईज हिज टु लुज!

आजचा त्याचा कॉन्ट्रोव्हर्शिअल “ व्हिसल“ वाला टचडाउन पाहीला का? बिचारे रेडर्स! आमच्या चिफ्सना हरवताना पण त्या गेममधे सगळ्या कॉन्ट्रोव्हर्शिअल कॉल्सचा कौल जो बरोच्या बाजुने पडला व त्यामुळे ते जिंकले व महोम्सला हरवु शकले होते.

बिल्स- पॅट्रिअट्सचा गेम बघतोय. न्यु इंग्लंडचा क्वार्टरबॅक अगदीच चम्या दिसतोय. एनिवे.. बिल्स ३३- पॅट्रिअट्स ३! ३ रा क्वार्टर. पॅट्रिअट्स क्वार्टरबॅकने ओलरेडी २ इंटरसेप्शन्स टाकले व उलट जॉश अ‍ॅलनने ५ टचडाउन टाकले आहेत! जॉश अ‍ॅलन इज रिअली अ व्हेरी टॅलंटेड क्वार्टरबॅक!

म्हणुनच मी आधीच्या पोस्टमधे म्हटले होते की जॉश अ‍ॅलन, जो बरो व पॅट्रिक महोम्स.. पुढची १० वर्षे मेजवानी! Happy

आणी हो , आज परत एकदा सिद्ध झाले की न्यु इंग्लंडचे सगळे सुपरबोल व त्यांचे सगळे सक्सेस फक्त टॉम ब्रेडी आणी टॉम ब्रेडी याच्यामुळेच होते! बिल बेलाचेक अगदीच सुमार व ओव्हररेटेड कोच होता/ आहे! Happy

Mukund, while watching today’s games I was thinking about tomorrow’s game and you… I was so sure - you will write here about that. I logged in after long time just to check that Happy

रार! व्हॉट अ प्लेझंट सरप्राइझ!

तुला माहीत आहे मी तुला इथे नेहमीच मिस करणार! Happy असामी काय, तु काय.. आपल्यासारखे प्युअर खेळप्रेमी.. इथे कितीही दिवस डोकावले नाहीत तरी आपले कनेक्शन टिकुनच राहणार आहे. Happy

कुठेही असशील तिथे मजेत रहा.. रेस्ट अश्युर्ड .. यु विल बी मिस्ड अँड थॉट अबाउट!

बिल्सनी पॅट्रिअट्सची पिस काढली आज! लाजिरवाणा पराभव. आम्ही उद्या जिंकलो तर ( सॉरी रार!) पुढच्या आठ्वड्यात महोम्स-अ‍ॅलन.. फायरवर्क्स गलॉर! चिफ्सनी त्यांचा टुकार डिफेन्स सुधारला नाही तर महोम्सच काय.. ब्रम्हदेवही चिफ्सना जॉश अ‍ॅलनच्या ऑनस्लॉटपासुन वाचवु शकणार नाही!

उद्याच्या गेम्समधे डॅलस काउबॉइज- सॅन फ्रॅन्सिस्को फॉर्टीनायनर्स गेम बघण्यासारखा होइल अस वाटतय.

रार, इट वॉज रिअली गुड टु सी यु हिअर आफ्टर अ‍ॅन इटर्नीटी!

रा़ज, तुमच्या अ‍ॅट्लांटा एरियाला ( मला माहीत की आहे जॉर्जिया बुलडॉग्स अथेन्सला असतात, अ‍ॅट्लांटापासुन ३५-४० मैलावर) यावर्षी २ नॅशनल चँपिअनशिप्स मिळाली आहेत! अभिनंदन!

मलाही मनापासुन वाटतय की आमच्याही एरियाला यंदा २ नॅशनल चँपिअनशिप्स मिळाव्यात Happy चिफ्सना सुपरबोल व मार्च मॅडनेसमधे माझ्या अल्मामॅटर, युनिव्हरसिटी ऑफ कॅन्सस जे हॉक्स ना एन सी ए ए बास्केटबॉलमधे नॅशनल चँपिअनशिप! वा! काय मजा येइल! Happy

महोम्स शो.. ऑल द वे टुडे!

मला आमच्या चिफ्सना जिंक्स करायचे नाही पण देअर इज नो अदर टीम इन द एंटायर एन एफ एल मोर फन टु वॉच व्हेन महोम्स, केल्सि अँड टायरिक हिल आर अलाउड टु प्ले देअर गेम बाय द कोच! जबरदस्त एंटरटेनींग!

महोम्सचे आजचे काही काही टच डाउन पासेस रीडिक्युलस कॅटेगरीमधले होते, अंडरहँडेड पास काय! ओव्हरहेड पास काय! फक्त त्याच्याकडेच तसले अनबिलिव्हेबल टॅलंट आहे!

टेक अ बाव बिग बेन.. व्हॉट अ करिअर!

आधीच्या गेम्समधे टॉम ब्रेडी वॉज टॉम ब्रेडी आणी डॅलस -सॅन फ्रॅन्सिस्को गेम चांगला झाला. डॅलसचा शेवटचा रन प्ले कॉल झेपला नाही! एनि वे.. माझ्या मते डॅक प्रेस्कॉट इज हायली ओव्हररेटेड क्वार्टरबॅक!

Pages