Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://youtu.be/SDZreVXhm8Q
https://youtu.be/SDZreVXhm8Q
ओमार व्हिझ्क्वेल हायलाइट्स..
केन ग्रिफी ज्युनिअर.. तोच ना.. जो नेहमी उलटी टोपी घालायचा?
मला वाटत तुमच्याकडे पण दोन्ही गेम खेळणारा प्लेयर होता .. डिऑन “ निऑन “ सँडर्स!
बेसबॉल हिस्टरीची जर आवड असेल तर केन बर्न्सची दहा पार्टची “बेसबॉल” ही अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी बघ... जबरदस्त!
जाउ देत.. मी विसरलो.. हा फुटबॉल बीबी आहे...
पण तुला एक गोष्ट सांगावीशी
पण तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते.. माझ्या बेसबॉल जर्नीची सुरुवात कशी झाली..
८० च्या दशकात माझ्या शिक्षणासाठी मी जेव्हा इथे आलो तेव्हा माझे २ मोठे भाउ ऑलरेडी इथे आलेले होते. त्यातल्या एकाच्या बायकोचे( म्हणजे माझ्या वहिनीचे) २ भाउ.. इथे अमेरिकेतच लहानाचे मोठे झाले होते. त्यांचे वय साधारण माझ्या इतकेच होते.
पहिल्याच वर्षी मी माझ्या वहीनीच्या वडिलांच्या घरी थँक्सगिव्हींग डिनरला गेलो होतो. त्यांच्या फिनिश्ड बेसमेंटमधे उतरत जात असताना.. बेसमेंटच्या जिन्या समोरच एक लाइफ साइझ चा सहा फुटी कार्ड बोर्ड कट आउटने केलेला एक बेसबॉल प्लेयर.. डावखुरा बॅट हातात घेउन... बॅटींग पोझमधे स्टांस घेतलेला मला दिसला.
साहजीकच नुकताच भारतातुन आलो असल्यामुळे अमेरिकेतले बेसबॉल प्लेयर्स तर सोडच... पण बेसबॉल या खेळाबद्दलपण मला जास्त काही माहीती नव्हती. त्यामुळे साहजिकच मी माझ्या वहिनीच्या भावांना सहज विचारले.. हा कोण बाबा आहे?
झाल... हा माझा प्रश्न ऐकल्यावर ते दोघे उडालेच व त्या दोघांच्या चेहर्यावर असे काही हावभाव आले की काय वेडा माणुस आहे मी ..असा प्रश्न विचारयतोय म्हणजे... ते एकमेकांकडे व आळीपाळीने माझ्याकडे बघुन म्हणाले... आर यु सिरिअस? यु आर आस्कींग हु धिस गाय इज? मी भाबडेपणाने म्हटले की हो बाबा.. कोण आहे हा?
ते म्हणाले.. ही इज अ गॉड ऑफ बेसबॉल! ही इज नन अदर दॅन “ जॉर्ज ब्रेट! “ मी म्हटले गॉड?
ते साहजिकच रॉयल्सचे कट्टर फॅन असल्यामुळे जॉर्ज ब्रेट म्हणजे त्यांच्यासाठी गॉड होता..
मग त्यांनी माझ्या बेसबॉलच्या ज्ञानाचे बौध्धीक घेतले.. अर्थातच मी त्याच्यात वाइट रित्या नापास झालो.. त्यांनी माझ्यावर कोणाची बॅटींग अॅव्हेरेज किती, कोणाला किती बॅटींग टायटल्स मिळाली, कोणाला किती साय यंग अॅवॉर्ड मिळाले, कोणाचा इ आर ए बेस्ट, कोणाला किती गोल्ड ग्लोव्ह्स मिळाले आहेत वगैरे वगैरे .. अशी तेव्हा.. मला फाल्तु वाटणारी माहीती पुरवली.
पण मीही क्रिकेटभक्त असल्यामुळे त्यांनी असा बेसबॉलच्या ज्ञानात केलेला माझा पाणउतारा मला झोंबला. मग मीही त्यांना विचारले.. तुम्हाला सुनील गावस्कर कोण आहे माहीत आहे? ते साहजिकच नाही म्हणाले.. तेव्हा मी त्यांना म्हणालो... अरे तो क्रिकेटचा गॉड आहे गॉड! व त्यांना त्याचे बॅटींग रेकॉर्ड सांगुन, डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स अशी नावे त्यांच्या तोंडावर फेकुन मारली.. बट दे केअर्ड लेस अबाउट ऑल दॅट!
मग मी विचार केला की मला जर अमेरिकेत माझे उर्वरीत आयुष्य काढायचे असेल तर मला इथले कल्चर,इथले गेम्स, इथला इतिहास यात रस घेउन त्याची इत्यंभुत माहीती केली पाहीजे.
मग मी पुढची काही वर्षे त्या सगळ्याचा खुप सखोल अभ्यास केला, त्यांचा इतिहास समजुन घेतला, त्यांचे गेम,त्यातली आकडेवारी, त्यातले रेकॉर्ड यांचा सखोल अभ्यास केला व पुढच्या २-३ वर्षात मला खरच बेसबॉल व फुटबॉल गेम समजु लागले व जेन्युइनली आवडु लागले.
आणी मग एक वेळ अशी आली की माझ्या वहिनीच्या दोन्ही भावांनी माझ्यापुढे हात जोडले.. व म्हणाले की तु धन्य आहेस.. तु आता आमच्या तोंडावर असे रेकॉर्ड्स फेकुन मारतोस की जे आम्हालाही माहीत नाहीत...
२०१५ मधे मी कुपर्सटाउनला असलेल्या बेसबॉल हॉल ऑफ फेमची वारीसुद्धा मुलाबरोबर करुन आलो...
मस्त स्टोरी आहे रे तुझी.
मस्त स्टोरी आहे रे तुझी. मूळात खेळाची आवड आणि पीयर प्रेशर असल्या शिवाय नविन खेळाची गोडी लागत नाहि. तु वर दोन मेजर स्पोर्ट्स खेळणार्या खेळाडुंचा उल्लेख केला आहेस, त्यात एम्जेला वगळुन कसं चालेल. पहिल्या रिटायर्मेंट नंतर एम्जे जेंव्हा माय्नर लीग बेसबॉल खेळायला गेला, तेंव्हा मला देखील आश्चर्य वाटलं होतं. नंतर कुठेतरी वाचलं कि हायस्कुल मधे असताना बेसबॉल वाज हिज फर्स्ट पॅशन.
बाय्दवे, गेल्या वीकेंडला मी नेफिवर एम्जेची "दि लास्ट डँस" हि डॉक्युमेंटरी पाहिली. जबरदस्त बनवली आहे. एम्जेचं अग्रेशन, पॅशन, सहकारी खेळाडु (स्काटि पिप्पन, रॉडमन...), कोच (फिल जॅक्स्न), ओनर्/मॅनेजर (रेन्स्डॉर्फ्/क्रॉस) शी असलेलं त्याचं रिलेशन या सगळ्या बाबींचा मस्त आढावा घेतलेला आहे. एम्जेचा सुवर्णकाळ ज्यांनी मिस केला त्यांच्याकरता, अँड व्हाय हि इज ए गोट, हे समजण्याकरता अगदि मस्ट सी...
राज.... एम जे ची संपुर्ण
राज.... एम जे ची संपुर्ण करिअर विटनेस केलेल्या भाग्यवंतातला मी एक!
तुमच्या फाल्कन्सच्या सिझनला काही अर्थ उरला नाही.
पण तुमचे यंग ब्रेव्ह्स मात्र एकदम एक्सायटींग वाटतात बघताना.. त्यांचा एक पाय वर्ल्ड सिरीजमधे आलेला आहे. तुमच्या बॅटर्सनी काल क्लेटन कर्शॉची वाट लावुन टाकली...
क्लेटन कर्शॉ रेग्युलर सिझनचा दर वर्षी दादा असतो .. पण पोस्ट सिझनमधे तो आता “ चोकर“ म्हणुन अजरामर झाला आहे... खरच त्याची कीव येते आता! डॉजर्स फॅन्स त्याच्याकडुन दर वर्षी अपेक्षा करतात की रेग्युलर सिझनचा कर्शॉ पोस्टसिझनमधे पण तसाच पिचींग करेल पण भरवश्याच्या म्हशीला टोणगा म्हणीप्रमाणे दर वर्षी क्लेटन कर्शॉ माती खातो.
मुकुंद मी १६-० लिहिले काय नि
मुकुंद मी १६-० लिहिले काय नि चीफ्स नी घात केला. रेडर्स रीयली ?
तुमच्या फाल्कन्सच्या सिझनला काही अर्थ उरला नाही. >> रायन असेल का पुढच्या वर्षी ?
>>तुमच्या फाल्कन्सच्या सिझनला
>>तुमच्या फाल्कन्सच्या सिझनला काही अर्थ उरला नाही.<<
अंकल आर्थर ऑलरेडि स्टार्टेड क्लिनिंग द हाउस. टीम रिबिल्ड करावीच लागणार, कदाचित त्याच दृष्टिकोनातुन फाल्कन्स्चा डोळा '२१ ड्राफ्टवर आहे.
इफ यु नो व्हॉट आय मीन. या संदर्भात ब्रॅड पिटचा मनीबॉल माझ्या डोळ्यासमोर का येत आहे, हे कळंत नाहि...असामी.. मी तुला सांगीतले होते
असामी.. मी तुला सांगीतले होते.. १६-० खुप अशक्य आहे .. रेडर्स थ्र्यु किचन सिंक अॅट अस. दे अँड देअर कोच वेअर डेस्परेट टु बिट अस अॅट एनी कॉस्ट.. दे गँबल्ड ऑन एव्हरी प्ले.. अँड इट पेड ऑफ.. आणी महोम्स हॅड अॅन ऑर्डिनरी गेम.. फॉर अ चेंज..
पण टॉम ब्रेडी चक्क कितवा डाउन आहे हे विसरला? .. वॉव...
राज.. तु म्हणतोस त्यात तथ्य आहे.
पण उद्या नंबर २ अलाबामा क्रिम्सन टाइड्स विरुद्ध नंबर ३ जॉर्जिया बुलडॉग्स बघणार का? मस्त मॅच अप आहे.पण बामा कोच निक सेबन कोव्हिडने आजारी आहे. बुलडॉग्स शुड टेक अॅड्व्हँटेज ऑफ दॅट..
या वर्षी नॉटर डेम पण टॉप ५ मधे आहे... बर्याच वर्षांनी.. पण क्लिम्सन नंबर १? गिव्ह मी अ ब्रेक!
>>उद्या नंबर २ अलाबामा
>>उद्या नंबर २ अलाबामा क्रिम्सन टाइड्स विरुद्ध नंबर ३ जॉर्जिया बुलडॉग्स बघणार का? <<
हो रे, बघणार (अधुन मधुन). पण खरं सांगतो यार, कोविडने वाट लावली आहे एकुणांत सगळ्या स्पोर्ट्सची. दोन आठवड्यांपुर्विचा जॉर्जिया-ऑबर्न गेम काय पुचाट झाला यार. मी सारखा चॅनल बदलत होतो. आज बामा होमगेम, लेट्स सी इफ बुल्डॉग्ज आर अप टु टेर देम अपार्ट...
>>पण क्लिम्सन नंबर १? गिव्ह मी अ ब्रेक!<<
आय थिंक, क्लेम्सन डिझर्व टु टॉप एसीसी. नॉट्र डेम इज ओवरेटेड, अँड गेटिंग (अन्ड्यु) अटेंशन ड्यु टु देर ब्रँड रेकग्निशन...
जॉर्जिया बुलडॉग्स.. नो शो इन
जॉर्जिया बुलडॉग्स.. नो शो इन सेकंड हाफ.....
क्लिम्सनच्या गेमचा स्कोर बघुन कोणाला वाटेल की तो बास्केटबॉल ( अर्थात एकतर्फी ) मॅचचा स्कोर आहे की काय...
ब्रेव्ह्स.. काय झाल? वाटल नव्हत की सिरीज ७ व्या गेमपर्यंत जाइल.
ब्रेव्ह्ज... कमनशिबी.. गेम
ब्रेव्ह्ज... कमनशिबी.. गेम चांगला झाला..
पण.. ४ थ इनिंग बेस रनींग बाय ब्रेव्ह्ज वॉज अॅट्रॉशिअस!.. रनर्स ऑन सेकंड अँड थर्ड बेस... विथ नोबडी आउट... अँड ब्रेव्ह्ज मॅनॅज्ड टु गिव्ह डॉजर्स अ व्हेरी व्हेरी रेअर... ५– २—५—२—५—६ डबल प्ले... वॉव!
त्या इनींग मधे ब्रेव्ह्जना डॉजर्सचे कंबरडे मोडणे शक्य होते.. पण...
जाउ दे.. ब्रेव्ह्ज कडे चांगली टीम आहे. दे विल बी बॅक...
पण टॉम ब्रेडी चक्क कितवा डाउन
पण टॉम ब्रेडी चक्क कितवा डाउन आहे हे विसरला? .. वॉव. >> तुम्ही दोघे कुठल्या बाफावर कुठल्या खेळाबद्दल बोलायचे विसरताहात तसेच रे
काल खेळला ब्रेडी परत ब्रेडी सारखा पण एकंदर पॅटसा सारखे शॉर्ट फास्ट थसारखेबक्स सारखे डाऊन द थ्रो ह्यात गेम प्लॅन सारखा हेलकावे खात राहतोय.
चीफ्स बिल्स चांगला होईल गेम असे धरूया.
>>कमनशिबी.. गेम चांगला झाला..
>>कमनशिबी.. गेम चांगला झाला..<<
दॅट डबलप्ले वाज इन्सेन. फक्त सेकंड आणि थर्ड बेस लोडेड असताना ग्राउंडर वर रन घ्यायची काहिहि गरज नव्हती. बोथ रनर्स वेर क्लुलेस...
असामी...
असामी...
बेसबॉलसाठी वेगळा बीबी काढायचा कंटाळा आला.. तसेही संपुर्ण मायबोलिवर मी सोडुन दुसरा कोणीही बेसबॉल फॅन नाही.. राजची टीम प्लेऑफ्स मधे आहे म्हणुन इथेच लिहीले.
राज.. थर्ड बेसवरच्या रनरला तरी माफ करता येइल.. तो इन्स्टिंक्टिव्हली बेस सोडुन धावला.. इट वॉज अ रिफ्लेक्स.. अॅज सुन अॅज बॅटर मेड अ काँटॅक्ट.. पण सेकंड बेसवरचा रनर..थर्ड बेसवरच्या रनरचे ते सगळे स्ट्रँड आउट होउन आउट होणे.. तो आउट होइसपर्यंत.. बघ्यासारखा पुढेमागे जात... बघत बसला.. हे दिसत असुनसुद्धा.. की थर्ड बेसमन स्ट्रँडेड झाला आहे व नक्कीच आउट होणार आहे. मग थर्ड बेसचा रनर आउट झाल्यावर याला जाग आली व मग तो थर्ड बेसकडे धावत सुटला.. टु लेट... बोनहेड डिसीजन बाय हिम...
आणी तुमचा थर्ड बेसवरचा कोच काय करत होता? त्याचे काम असते रनर्स ना सांगायचे की..गो अहेड.. धाव.. की नको धावुस.. ही वॉज अ नो शो इन धिस होल अॅट्रॉशिअस डिसप्ले ऑफ बेस रनींग..
आमचे रॉयल्स २०१४ व २०१५ .. लागोपाठ २ वेळा वर्ल्ड सिरीजमधे गेले होते व २०१५ मधे आम्ही वर्ल्ड सिरीज जिंकलो ..तेही कोणीही स्टार प्लेयर्स नसताना... कारण? .. कारण.. आमचा जबरदस्त डिफेंस... आणी जबरदस्त बेस रनींग! जेरॉड डायसन, टेरेंस गोर, लोरेंझो केन व अल्सिडस एस्कोबार यांचा जबरदस्त स्पिड व एरिक हॉझमर अॅट फर्स्ट बेस व माइक मस्टॅकस अॅट थर्ड बेस.. यांचा डिफेंस .. हे काँबिनेशन वापरुन आम्ही वर्ल्ड सिरीज जिंकलो होतो. डिफेंस विन्स मॅचेस हे आमच्या रॉयल्स बाबतीत खरे होते.
असामी.. आज जिंकलो.. सेकंड हाफ
असामी.. काल बफेलो बिल्स् विरुद्ध जिंकलो.. सेकंड हाफ आम्ही डॉमिनेट केला. पावसामुळे अँडी रीडने आज ‘मार्टी बॉल’ खेळायचे ठरवले( आठ्वतय ९० च्या दशकात मार्टी शॉटनहायमर आमचा कोच असताना आम्ही फक्त रनींग गेमच खेळायचो? ) व क्लाइड एड्वर्ड हिलेअरने १५० च्या वर यार्ड्स घशात घातले.
आमचा तिसर्या क्वार्टरमधला .. फोर्थ डाउन व इंचेस असतानाचा टच डाउन बघितलास? अँडी रीडने “रिव्हर्स विशबोन” फॉर्मेशन करुन.. टच डाउनचा व्युह आखला होता.. जबरदस्त! यु ट्युबवर बघता आला तर बघ.. अँडी रीड हॅज सो मेनी युनिक प्लेज इन हिज बुक.... व्हेरी इनोव्हेटीव्ह! सो हार्ड फॉर डिफेंस टु डिफेंड सच युनिक फॉर्मेशन्स अँड युनिक प्लेज! अँड अँडी हॅज बंच ऑफ सच युनिक प्लेज इन हिज प्लेबुक.. जस्ट फॉर सच डाउन्स अँड सच सिच्युएशन्स!
जरी आज आमच्या डिफेन्सला ५-६ पेनल्टीज मिळाल्या व त्यामुळे बिल्सना भरपुर फर्स्ट डाउन मिळाले.. तरी ओव्हर ऑल आमचा डिफेंस आज चांगला होता. जॉश अॅलन क्वार्टरबॅक न वाटता.. रनींग बॅक आहे की काय अस वाटत होत...
पण झाल काय की महोमच्या पासींग गेमला घाबरुन व त्याच्या टायरिक हिल, मिकोल हार्डमन व ट्रॅव्हिस केल्सीला लाँग बॉल टाकण्याच्या भितीपोटी.. बफेलो बिल्सच्या डिफेन्सिव्ह लाइन ला खुप भगदाडे पडली होती आज.. फक्त ४ जण लाइनवर.. बाकी सगळे बॅक पेडल करत केल्सी, टायरिक व मिकोल हार्डमनला कव्हर करण्यात गुंतले होते व त्याचा पुरेपुर फायदा क्लाईड एड्वर्ड हिलेअरला मिळाला... (बाय द वे.. सो फार ही हॅज टर्न्ड आउट टु बी अ ग्रेट फर्स्ट राउंड ड्राफ्ट पिक फॉर अस.. फ्रॉम एल एस यु!)
पुढच्या आठवड्यात अजुन एक मस्त रनीग बॅक.. लव्हॉन बेल.... न्यु यॉर्क जेट्स सोडुन ..आमच्यातर्फे खेळणार आहे ..
शिवाय अजुन २ आठवड्यांनी आमचा इंज्युर्ड वाइड रिसिव्हर सॅमी वॉटकिन्स परत खेळेल. आमच्या सर्व अपोनंट्सच्या डिफेन्सचे लक्ष टायरिक हिल व ट्रॅव्हिस केल्सीला डबल टीम करण्यात गुंतले असते त्यामुळे सॅमी वॉटकिन्स व डिमार्कस रॉबिन्सन खुप वेळा ओपन असतात व महोम्स बरोब्बर त्यांना टारगेट करतो. त्यामुळे सॅमी वॉटकिन्स व डिमार्कस रॉबिन्सन हे दोघे गेममधे असणे आमच्या साठी खुप महत्वाचे आहे.. दे बोथ आर अनसंग हिरोज ऑफ अवर टिम.. आमच्या सुपरबोल विजयात त्या दोघांचा खुप मोट्ठा वाटा होता.
पाऊस असला कि बहुतेक टिम्स
पाऊस असला कि बहुतेक टिम्स रनिंग गेम करतातच ना रे. बिल्स चा डीफेन्स ह्यावर्षी नेहमीसारखा वाटत नाही आहे. त्यामूळे कालचा चीफ्स चा विजय अजिबात दुय्यम ठरत नाही अर्थातच, पूर्ण डॉमिनेशन होते. बिल्स बद्दल नवीन क्यू बी आला की नेहमीच हाईप असते असे माझ्यातला पॅट्स फॅन म्हणतो
अँडी रीड हॅज सो मेनी युनिक प्लेज इन हिज बुक... >> हो म्हणूनच बेलीचेक बद्दल असलेले चेस बघायला मजा येते ना रे.
असामी.. चल आता बोलुयात..
असामी.. चल आता बोलुयात.. प्लेऑफ्स आर अराउंड द कॉर्नर!
चिफ्सनी फर्स्ट सिडिंग, फर्स्ट राउंड बाय व होम फिल्ड अॅड्व्हँटेज.. थ्रु आउट द प्लेऑफ्स तर मिळवले खरे... पण इन लास्ट ८ गेम्स.. दे लुक्ड व्हेरी मच डिफिटेबल ..इन एव्हरी गेम!
राज.. काल पण अॅट्लांटाबरोबर आम्ही कसेबसे जिंकलो... धिस आय विल से... १४-१ चिफ्स रेकॉर्ड डझ नॉट लुक जस्टिफाइड... अँड सेम गोज फॉर अॅट्लांटा फाल्कन्स रेकॉर्ड ऑफ ४-११... दे आर डेफिनेटली बेटर टीम दॅन देअर रेकॉर्ड शोज!
त्यामुळे चिफ्स जर प्लेऑफ्स मधे हॉट टीम बरोबर हरले तर मला आश्चर्य वाटणार नाही.
तसे झाले तर ए एफ सी मधे तुम्हाला काय वाटते सुपरबोलला कोण जाइल? बिल्स( जॉश अॅलन इज प्लेइंग ग्रेट!) ? स्टिलर्स ....का टेनेसी टायटन्स( किंग हेन्री फुल फॉर्म मधे आहे.. नेहमीप्रमाणे!)
एन एफ सी मधे ..सिअॅटल सिहॉक्स व ग्रिन बे पॅकर्समधे मस्त एन एफ सी चँपिअनशिप गेम होइल असे मला वाटते.. एन एफ सी इस्ट इज अ जोक! डॅलस काउबॉइज व वॉशिंग्टन रेड्स्किन्स आर लिडींग विथ मिझली रेकॉर्ड ऑफ ६-९!
असामी.. आता तुला कळले असेल की ब्रॅडी वॉज द गाय .. हु वॉज बिहाइंड.. युअर ६ सुपरबोल चँपिअनशिप्स... नॉट बिल बिलाचेक... ही इज जस्ट द ऑर्डिनरी कोच... त्याला ब्रेडीशिवाय प्लेऑफ्सला सुद्धा जाता आले नाही... उलट ब्रेडीने तिथे टँपा बे बकीनिअर्स
सारख्या फाल्तु टीमला...त्याच्या टॅलंटने.. प्लेऑफ्समधे आणले आहे..
मुकुंद, मी काल फर्स्ट
मुकुंद, मी काल फर्स्ट क्वार्टर बघुन कंटाळलो, आणि २-३ एरंड्स हातावेगळे करुन आलो. गेम खरा चौथ्या क्वार्टरला तेहि शेवटच्या पांच मिनिटांत सुरु झाला.
रुकि कॉर्नरबॅक टरेल्स निअर इंटरसेप्ट इन द एंड झोन माइट हॅव सेंट ए चिल डाउन द स्पाइन. पण त्यानंतरचा महोम्सचा टच्डाउन थ्रो वाज जस्ट इमॅक्युलेट. मजा आली काल...
>>तसे झाले तर ए एफ सी मधे तुम्हाला काय वाटते सुपरबोलला कोण जाइल? <<
चिफ्स्चे चांसेस वाटत आहेत, इफ नॉट देम, देन बिल्स. टाय्टन्स आय डाउट, बट यु नेवर नो व्हॉट विल हॅपन इन प्लेऑफ्स...
>>एन एफ सी मधे<<
दो आय हेट टु से धिस, बट सेंट्स विल बी इन एनएफसी चँपियन्शिप गेम...
सुपरबोल - सेंट्स व. चिफ्स्/बिल्स...
राज.. पॉलिटिक्स जाउन दे..
राज.. पॉलिटिक्स जाउन दे.. माझे पहिले पॅशन स्पोर्ट्स आहे. प्लेऑफ्स बघत आहेस का? ( बाय द वे तिकडे कॉलेज फुटबॉलमधे.. बामा.. राउटेड.. ओहायो स्टेट .. इन द टायटल गेम.. नो सरप्राइज देअर!)
आता ६ टीम्स राहील्या आहेत.
आतापर्यंत झालेल्या गेम्स मधे ग्रिन बे पॅकर्स व एरन रॉजर्स.. व्हेरी इंप्रेसिव्ह!
पिट्सबर्ग स्टिलर्सचा प्रेसिपिटस फॉल.. डिड एनिबडी सी इट कमींग?
आजचा बफेलो बिल्स-बाल्टीमोर रेव्हन्स चा गेम.. वॉज व्हेरी डिसअॅपॉइंटींग..
उद्या आमचा गेम.. मला भिती वाटत आहे की आम्ही कदाचित.. ३ आठ्वड्याच्या गॅपनंतर.. रस्टी असु.. आणी गेले ८-९ गेम्स आम्ही ३ पॉइंट्स किंवा कमी मार्जिनने जिंकलो आहे.. .. सो आमचा १४-२ रेकॉर्ड .. सिम्स लिटल इन्फ्लेटेड!
आणी उद्याचा दुसरा गेम... ब्रेडी विरुद्ध ड्र्यु ब्रिज.. दोन फ्युचर हॉल ऑफ फेमर्स.. दोघेही ४० च्या वरचे.. आय अॅम व्हेरी मच लुकींग फॉरवर्ड टु सी दॅट गेम!
असामी... ... आता रॅम्स.. ज्यांचा डिफेंस वॉज नंबर १.. आर आउट... अॅज आय नो ..यु आर पार्शिअल टु डिफेंस...तुला काय वाटते .. उरलेल्या टीम्समधे कोणाचा डिफेंस.. इज गुड इनफ टु लिफ्ट द लोंबार्डी ट्रॉफी?आपल्या सगळ्यांना माहीत आहे.. उरलेले सगळे क्वार्टरबॅक्स.. महोम्स, जॉश अॅलन, ब्रेडी, ड्र्यु ब्रिझ व एरन रॉजर्स... दे ऑल कॅन सिंगल हँडेडली... विन द गेम्स ..विथ देअर ट्रिमेंडस ऑफेन्सिव्ह प्रॉवसेस..
काल पॅकर्सचा गेम बघायचा होता
काल पॅकर्सचा गेम बघायचा होता पण नाहि जमलं. आज दोन्हि गेम्स बघणार - चीफ्स-ब्राउन्स, सेंट्स-बक्स. माझे पैसे चीफ्स आणि सेंट्स वर...
गो सेंट्स!! कमॉन ड्र्यू ब्रीझ
गो सेंट्स!! कमॉन ड्र्यू ब्रीझ!!!
चिफ्स सिझन ओव्हर.. महोम्स...
चिफ्स सिझन ओव्हर.. महोम्स... आउट विथ कन्कशन... ट्रॅजिक! ...
हुश्श!... थोडक्यात बचावलो...
हुश्श!... थोडक्यात बचावलो..... वुइ डॉज्ड द बुलेट!
जर महोम्स परत आला एफ एस सी... चँपिअनशिप गेममधे... तर चिफ्स हॅज अ चांस टु विन द सुपरबोल अगेन..धिस यिअर!
महोम्स ट्विटेड...“ हेनी“ थिंग इज पॉसिबल..... टु गिव्ह क्रेडिट..टु चॅड हेनींग्स.. फॉर स्टेपिंग इन हिज शुज.. अँड मेकिंग सम क्रिटिकल गुड प्लेज.. इन द फायनल मिनिट्स...
गेटींग रेडी फॉर ..वॉचींग द
गेटींग रेडी फॉर ..वॉचींग द नेक्स्ट गेम.. बिट्विन २ ग्रेट क्वार्टरबॅक्स! ब्रेडी- ब्रीझ.. मेजवानी!
महोम्सला सिरीयस इजा झाली
महोम्सला सिरीयस इजा झाली नसावी हीच मनापासुन प्रार्थना! तो तंदुरुस्त राहीला तर पुढची अनेक वर्षे आहेत त्याच्याकडे/ आमच्याकडे सुपरबोल जिंकायला.
ब्रेडीला मानल पाहीजे.परत एकदा कॉन्फरंस चँपिअनशिपमधे!
ड्र्यु ब्रीझ निवृत्त होणार म्हणे. तस झाल तर काय कारकिर्द्र होती त्याची न्यु ऑर्लिन्समधे! सलाम! त्याचा पासींगचा रेकॉर्ड फक्त ब्रेडीच मोडु शकतो पण त्याच्या रेकॉर्ड करिअर पेक्षा त्याचा नम्रपणा व नॉन्कॉन्ट्रोव्हर्शियल करिअर सगळ्यांच्या लक्षात राहील.
महोम्स जर खेळु शकला नाही तर माझे पैसे ग्रिन बे पॅकर्स व एरन रॉजर्सवर. पण सुपरबोल मधे कोणीही आले तरी यंग गन( महोम्स किंवा जॉश अॅलन) विरुद्ध ओल्ड व्हेटरन ( ब्रेडी किंवा एरन रॉजर्स) असाच सामना असेल.
हा बाफ मला दिसतच नव्हता रे
हा बाफ मला दिसतच नव्हता रे इतके दिवस
महोम्सला सिरीयस इजा झाली नसावी >> +१. चीफ्स पेक्षा ब्राऊन्स जास्त बावचळलेले वाटले मला महोम्स बाहेर गेल्यावर. ईट वॉज देन देअर गेम टू लॉस्ट अँड दे डीड. बिल्स माफिया नि महोम्स मजा येईल बघायला. चुरशीची झाली तरी महोम्स जिंकेल असे वाटते. इथे जो जिंकेल तो सुपर बॉल पण जिंकेल. ब्रेडी नि रॉजर्स दोघेही टक्कर देऊ शकत नाही.
मुकुंद, तु वर बेलिचेक नि ब्रॅडी बद्दल बोललास ते पटले नाही. दोघे तेव्हढेच जबाबदार होते. ब्रॅडी बक्स मधे गेला जी लोडेड टीम होती. यंग डीफेन्स नि डाय्नॅमिक ऑफेन्स. ब्रॅडी नसतानाही गेली वर्षे ऑफेन्सीव्ह स्कोअरींग मधे बक्स कुठे होते ते बघ. Not to take anything away from Brady, just that his transition was much easier than Belichek's. Yeah Belicheck could have done better but I doubt anybody could have pulled anything better than what he did after loosing his starters. Brady was proficient against Saints but not exceptional. He cashed in all mistakes Saints did. Remaining 3 teams have good defenses and better offense. If there is shootout, I doubt Brady will be able to keep up with any of them. Lets see.
असामी, मला माहीत आहे रे की
असामी, मला माहीत आहे रे की फुटबॉल टीम स्पोर्ट आहे. मी मजा करत होतो.
आज दोन्ही गेम्स मस्त होतील. कोण जिंकेल हे सांगणे कठिण आहे. चारी टीम्स मस्त खेळत आहेत.
पण तसे असुनही आमच्या नेबरहुडमधे तुला सांगायला नको की कसे वातावरण असेल ते
सगळ्या गराजेसच्या बाहेर प्री गेम पार्टीज सुरु झालेल्या आहेत. सबंध नेबरहुड चिफ्स्च्या लाल रंगाने, झेंड्यांनी सजवलेले आहे. बहुतेक घरात सगळे आपापले चिफ्स गिअर घालुन संध्याकाळच्या गेमची वाट बघत आहेत. बर्याच घरात पार्टीजची तयारी चालु आहे. माझ्या समोरच्या घरातला, त्याच्या गराजमधे असलेल्या बिग स्क्रिन टी व्ही समोर प्री गेम पार्टीसाठी त्याची एक्स्टेन्डेड फॅमीली व मित्र गोळा करुन चिफ्सचे टॉमाहॉक वॉरचांट मोठ्या स्पिकरवर लावुन ग्रिलवर बार बी क्यु करायला सुरुवात करत आहे. तीच गोष्ट नेबरहुडमधे व सबंध कॅन्सस सीटी भर चालु आहे. होपफुली महोम्स आम्हा सगळ्यांना डिसपॉइंट करणार नाही. त्याला खेळायला क्लिअर केल आहे.
ही चिफ्सच्या टॉमॉहॉक वॉर चांटची क्लिप ऐका मग तुम्हाला कळेल आमच्या चिफ्स टीमचे टॉमॉहॉक वॉर चांट कसे आहे व कल्पना येइल की आमच्या नेबरहुडमधे त्यामुळे कसे फेस्टिव्ह वातावरण निर्माण झाले आहे
https://youtu.be/3PHY1iwWLK4
आणी हे अजुन एक व्हर्जन.. लाइव्ह गिटार अँड ड्रम बँडने वाजवलेले आमच्या टीमचे थीम म्युझिक, मस्तच!
https://youtu.be/mj-77kN2vyM
टॉम ब्रेडी... GOAT!
टॉम ब्रेडी... GOAT!
मानल पाहीजे... तो १० वा सुपरबोल खेळणार! कुठलेही विशेषण वापरले तरी ब्रेडीसाठी ते कमीच पडेल!
हॅव्हिंग सेड दॅट, एरन रॉजर्स फारच सुमार खेळला. आणी पॅकर्सच्या शेवटच्या पझेशनमधे टँपा बे च्या ५ यार्ड लाइनवर असताना त्यांनी फोर्थ डाउन असताना टच डाउन करायचा प्रयत्न करायच्या ऐवजी फिल्ड गोल का मारला हे मात्र अनाकलनिय होते.
आता आमचा गेम!
वय ४३ वर्षे. १०वी चॅपियनशीप.
वय ४३ वर्षे. १०वी चॅपियनशीप. फक्त आणि फक्त रिस्पेक्ट!
>>टँपा बे च्या ५ यार्ड लाइनवर
>>टँपा बे च्या ५ यार्ड लाइनवर असताना त्यांनी फोर्थ डाउन असताना टच डाउन करायचा प्रयत्न करायच्या ऐवजी फिल्ड गोल का मारला हे मात्र अनाकलनिय होते.<<
त्यांचं गणित चूकलं रे. तो आधीचा टु पॉइंट क्न्वरजन फेल गेला, आणि त्यानंतर ८ पॉइंट गेम झाला तेंव्हाच एनेफसी चँपियनशिप हातातुन निसटली. दे नीडेड ए टचडाउन अँड फिल्ड गोल ऑर अनदर टु पॉइंट क्न्वरजन टु विन्/टाय द गेम. म्हणुन तो फिल्ड गोल, आशा करत कि पुढचं पझेशन कन्वर्ट करु. असो.
रॉजर्स लेट एवरीबडि डाउन. मेंटली थकल्यासारखा वाटला; हि डिडंट इवन ट्राय टु स्टेप अप अँड कॅपिटलयाझ टु इंटरसेप्शन्स...
भारी झाला गेम! सर्वात भारी
भारी झाला गेम! सर्वात भारी हाफ टाइम च्या जस्ट काही सेकंद आधीचा ब्रॅडी अन स्कॉटी मिलरने एक्झिक्यूट केलेला सुपर्ब टच डाउन. लास्ट क्वार्टर मधे मात्र दोन्ही कडून चुका , इंटरसेप्शन्स झाली. पॅकर्स च्या त्या फिल्ड गोल चा डिसिजन झेपला नाही.
Pages