Submitted by पुरंदरे शशांक on 4 December, 2015 - 02:12
कोऽहं
मी सुरुप मी कुरुप
दयावान हिंस्त्र मीच
रुपवर्णा पलिकडिल
मीच तो जनावनात
तप्त शीत मीच एक
सुखदु:खातीत मीच
भव्य दिव्य मीच एक
क्षुद्र भासतो क्षणात
मी वसंत मी शिशिर
वाळवंटी मी अथांग
सागर अन् अंतराळ
भरुन सर्व निस्तरंग
मी प्रकाश मूर्तिमंत
तमातूनि मी वहात
गतिमान मीच एक
अचल शांत निर्विकल्प
ना तनात ना जगात
ना मनात ना क्षणात
भासमात्र सर्व येथ
मीपणही भास फक्त .....
---------------------------------------------------------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली. छान आहे.
आवडली. छान आहे.
आवडली ,नाव कोहं असले तरी
आवडली ,नाव कोहं असले तरी कविता सोहं आहे
सुंदर.
सुंदर.
आवडली ,नाव कोहं असले तरी
आवडली ,नाव कोहं असले तरी कविता सोहं आहे +१
किंवा तत्वमसि पण चालेल ना !
सुरेख.
सुरेख.
वाह...किती नेमक्या शब्दांत
वाह...किती नेमक्या शब्दांत त्या सर्वव्याप्त अहं ब्रम्हास्मि पर्यंतच्या अनुभूतीचे सार कवितेच्या कणार्क रूपात बांधलेत ..
मी प्रवासात मो.वर लिहण्याचा
मी प्रवासात मो.वर लिहण्याचा प्रयत्न करतेय त्यामुळे चुकून .....
आवडली , नाव कोहं असले तरी
आवडली ,
नाव कोहं असले तरी कविता सोहं आहे +2