माळवा सहल

Submitted by मनीमोहोर on 2 December, 2015 - 12:42

नोव्हेंबर डिसेंबर महीने हे पिकनीक ट्रीप साठी अगदी योग्य असतात. तीन चार दिवसचीच सुट्टी होती आणि इंदौर कधीच खुणावत होत, मुख्य म्हण्जे तिथला सराफा. म्हणून तिथेच जायच निश्चित केलं त्याविषयी थोडं

सकाळी अवंतिका एक्सप्रेस ने इंदौर ला पोचलो. हवा थंड होती. हॉटेल वर जाऊन जरा स्थिरस्थावर झालो आणि दुपारी इंदौर दर्शनाला बाहेर पडलो. शहरातली देवळं, राजवाडे वैगेरे पाहिले. जैन धर्मी यांच देऊळ असलेलं शीश महाल फार आवडला. रात्री प्रसिद्ध सराफा ला गेलो . तिथे एक वेगळीच दुनिया दिसत होती. खाण्याच्या शौकिनांना अगदी पर्वणीच . भुट्टेका कीस, दहीवडा यातच पोट गार झाल पण तरी खूप काही खायच दिसत होत म्हणून मग रबडी, साबुदाणा खिचडी असं थोडं थोडं चवीपुरतच घेतलं

राजवाडा
From indore

खजराना गणेश टेंपल

From indore

दुसर्‍या दिवशी धुक्याची दुलई पांघरलेले इंदौर

From indore

इंदूरच्या प्रसिद् पोहे आणि जिलेबीचा ब्रेकफास्ट करुन मांडूला जायला निघालो. उत्तम गव्हासाठी प्रसिद्ध माळव्यातली अशी शेती बघुन डोळे आणि मन दोन्ही सुखावले .

From indore

मांडुचा जहाज महाल

From indore

From indore

मांडुतलीच एक मस्जीद

From indore

हा आहे राणी रुपमतीचा महाल. ह्याला रुपमतीचा मंडप म्हणतात.

From indore

मांडु बघुन नंतर लगेच महेश्वरला आलो . तिथे अहिल्यादेवीचा राजवाडा अगदी नर्मदेच्या काठावरच आहे आणि तो खूप बघण्या सारखा आहे. त्यांच देवघर आणि देव खूप छान आहे ते नक्की बघाव. इथे महेश्वरी साड्या फार सुंदर मिळतात. फोर्ट मध्येच सराकारी दुकान आणि लूम असं दोन्ही आहे.

From indore

From indore

अहिल्या फोर्ट

From indore

रात्रीच्या मुक्कामाला श्री ओंकारेश्वरला आलो. इथल्या श्री गजानन महाराज, शेगाव यांच्या भक्त निवास बद्दल खूप वाचल होत म्हणून इथेच मुक्काम केला. आणि ह्या ट्रिप मधल हे भक्त निवासच सर्वात आवडल. सकाळ संध्याकाळ आरती, भजन आणि इतक सुंदर वातावरण एखाद्या रिसॉर्ट पेक्षाही सुंदर वाटत होतं. दोन रात्री आणि एक दिवस आम्ही इथे राहिलो.

From indore

From indore

From indore

From indore

From mayboli

table style="width:auto;">From indore

ही कचराकुंडी पहा म्हणजे कल्पना येईल.

From indore

मेंटेनंस चोवीस तास.
From indore

ओंकारेश्वरची नर्मदा मैय्या. अधिक निळं काय आहे आकाश की पाणी ?

From indore

From indore

मंदिरात जाण्यासाठी अलीकडेच बांधलेला हा पुल . नदीच्या पात्रात एकही खांब नसलेला. वरच्या लोखंडी कांबीनी तोलुन धरलेला. हा फक्त पादचार्‍यांसाठीच आहे.

From indore

ओंकारेश्वर मंदिर

From indore

शेवटच्या दिवशी उज्जैन ला श्री महांकाळेश्वराचे दर्शन घेतले. शहरात फेरफटका मारला आणि संध्याकाळी अवंतिका एक्स्प्रेस मध्ये घरी येण्यासाठी बसलो.

ही बस उज्जैन दर्शनची

From indore

तीन रात्री आणि चार दिवसाचा हा खरोखर छोटा ब्रेक मनाला ताजतवान करणारा ठरला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म.मो. - सुंदर फोटो आणि वर्णन !

नर्मदा नदीचा विशेष आवडला.

गजानन महाराज संस्थानचं भक्तनिवास दिसतंयच स्वच्छ आणि सुंदर. इंद्रधनुष्यने म्हटल्याप्रमाणे पंढरपुरला 'गजानन महाराज' संस्थानच्या भक्त निवासातच राहीलो होतो आणि तिथेही असंच मंदीर आहे.

धन्स मैत्रिणीनो
srd फोटो पाहिले तुम्ही दिलेल्या लिंकवर .छान आलेत.

तो दहीवडे वाला आजुनही उंच प्लेट भीरकाउन देता का >> हो देतो सायु. आम्ही टुरिस्ट म्हणून आम्हाला तसच दिले त्याने.

हो, मंजू ... मंजूताई आणि मनीताई सॄष्टीचा गोंधळ झालाय ( स्मित)... मंजू जाऊन आलीस की फोटो डकव इथे नक्की.

इंदोरच्या स्वच्छता व हिरवाईने मन जिंकलं होतं.रूम छान होती. बोलणं खूपच मधाळ व अगत्यपूर्ण. चहा पिऊन तयार झालो व बाहेर पडलो. कोपऱ्यावरच मुरलीवाल्याकडे पोहा कचोरी जलेबीचा नाश्ता. गेले तीन महिन्यापासून दिक्षीतची होते ती इंदोरला आल्यावर ठरवल्याप्रमाणे दिवेकर झाले. तिथेच खरजाना गणपतीची बस मिळाली. रिक्षावला पाचशे रूपयांत फिरवणार होता पण दोनवाजल्यानंतर. समोरच खजराना गणपतीला जायची बस मिळाली. लोकं इतकी चांगली भेटली ना की डिटेलमध्ये माहिती सांगत होती Live Trip Advisor. संपूर्ण इंदोर बसने फिरलो. लाल बाग, काच मंदिर, बडा गणपती आणि हो छप्पन दुकान व रात्रीचा सराफा बाजार! जोशी दहीवडेवाल्याने प्लेट वर उंच उडवून दिली. पब्लिक मोबाईलमध्ये शूट करत होती. अग्रवाल मिठाईवाल्याकडे गजक व वेगवेगळे नमकीन चवीसाठी ठेवलेले होते त्यातून आवडलेले घेतले.
दुसऱ्यादिवशी कॅबने मांडव, महेश्वर व मुक्कामाला ओंकारेश्वर! हे एका दिवसात करणं धावपळीचं झालं. जहाज महलमधला लाईट अन् साऊंड शो बघता नाही आला, रुखरुख लागून राह्यली.
दैनंदिनीत लिहीलेलं इथे नोंदवून ठेवते...

मस्त वृतांत मंजू.

माझ्या ही ह्या ट्रिपच्या आठवणी ताज्या झाल्या तुझ्या पोस्ट मुळे मंजू ।

१.महेश्वरच्या रम्य घाटावर एक संध्याकाळ आणि एक सकाळ अवश्य घालवा.
२.ओंकारेश्वरला सर्वात उंचावर असलेल्या पांडवकालीन शिवमंदिराला आवर्जून भेट द्या.(अंदाजे 200 पायऱ्या) आणि सकाळच्या प्रहरी नर्मदेत एक डुबकी जरूर मारा.
लाखात एक जण जरी म्हटला कि हे करून पस्तावलो तर मी पाहिजे ते हरायला तयार आहे.

"गराडू" कंदाचे तुकडे (टॅपिओका सारखा असतो) तळून फार छान मिळतात या परिसरात. वरून चाट मसाला. व्वा.
छान आठवण करून दिलीत. धन्यवाद

Pages