माळवा सहल

Submitted by मनीमोहोर on 2 December, 2015 - 12:42

नोव्हेंबर डिसेंबर महीने हे पिकनीक ट्रीप साठी अगदी योग्य असतात. तीन चार दिवसचीच सुट्टी होती आणि इंदौर कधीच खुणावत होत, मुख्य म्हण्जे तिथला सराफा. म्हणून तिथेच जायच निश्चित केलं त्याविषयी थोडं

सकाळी अवंतिका एक्सप्रेस ने इंदौर ला पोचलो. हवा थंड होती. हॉटेल वर जाऊन जरा स्थिरस्थावर झालो आणि दुपारी इंदौर दर्शनाला बाहेर पडलो. शहरातली देवळं, राजवाडे वैगेरे पाहिले. जैन धर्मी यांच देऊळ असलेलं शीश महाल फार आवडला. रात्री प्रसिद्ध सराफा ला गेलो . तिथे एक वेगळीच दुनिया दिसत होती. खाण्याच्या शौकिनांना अगदी पर्वणीच . भुट्टेका कीस, दहीवडा यातच पोट गार झाल पण तरी खूप काही खायच दिसत होत म्हणून मग रबडी, साबुदाणा खिचडी असं थोडं थोडं चवीपुरतच घेतलं

राजवाडा
From indore

खजराना गणेश टेंपल

From indore

दुसर्‍या दिवशी धुक्याची दुलई पांघरलेले इंदौर

From indore

इंदूरच्या प्रसिद् पोहे आणि जिलेबीचा ब्रेकफास्ट करुन मांडूला जायला निघालो. उत्तम गव्हासाठी प्रसिद्ध माळव्यातली अशी शेती बघुन डोळे आणि मन दोन्ही सुखावले .

From indore

मांडुचा जहाज महाल

From indore

From indore

मांडुतलीच एक मस्जीद

From indore

हा आहे राणी रुपमतीचा महाल. ह्याला रुपमतीचा मंडप म्हणतात.

From indore

मांडु बघुन नंतर लगेच महेश्वरला आलो . तिथे अहिल्यादेवीचा राजवाडा अगदी नर्मदेच्या काठावरच आहे आणि तो खूप बघण्या सारखा आहे. त्यांच देवघर आणि देव खूप छान आहे ते नक्की बघाव. इथे महेश्वरी साड्या फार सुंदर मिळतात. फोर्ट मध्येच सराकारी दुकान आणि लूम असं दोन्ही आहे.

From indore

From indore

अहिल्या फोर्ट

From indore

रात्रीच्या मुक्कामाला श्री ओंकारेश्वरला आलो. इथल्या श्री गजानन महाराज, शेगाव यांच्या भक्त निवास बद्दल खूप वाचल होत म्हणून इथेच मुक्काम केला. आणि ह्या ट्रिप मधल हे भक्त निवासच सर्वात आवडल. सकाळ संध्याकाळ आरती, भजन आणि इतक सुंदर वातावरण एखाद्या रिसॉर्ट पेक्षाही सुंदर वाटत होतं. दोन रात्री आणि एक दिवस आम्ही इथे राहिलो.

From indore

From indore

From indore

From indore

From mayboli

table style="width:auto;">From indore

ही कचराकुंडी पहा म्हणजे कल्पना येईल.

From indore

मेंटेनंस चोवीस तास.
From indore

ओंकारेश्वरची नर्मदा मैय्या. अधिक निळं काय आहे आकाश की पाणी ?

From indore

From indore

मंदिरात जाण्यासाठी अलीकडेच बांधलेला हा पुल . नदीच्या पात्रात एकही खांब नसलेला. वरच्या लोखंडी कांबीनी तोलुन धरलेला. हा फक्त पादचार्‍यांसाठीच आहे.

From indore

ओंकारेश्वर मंदिर

From indore

शेवटच्या दिवशी उज्जैन ला श्री महांकाळेश्वराचे दर्शन घेतले. शहरात फेरफटका मारला आणि संध्याकाळी अवंतिका एक्स्प्रेस मध्ये घरी येण्यासाठी बसलो.

ही बस उज्जैन दर्शनची

From indore

तीन रात्री आणि चार दिवसाचा हा खरोखर छोटा ब्रेक मनाला ताजतवान करणारा ठरला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी, हॉटेलवाले अरेंज करुन देतात गाडी. मी जायच्या आधीच एसी इनोव्हा बुक केली होती. स्टेशन पिक अप टू ड्रॉप. १२०००/- तीन दिवसांचे झाले होते.

हो ते लिहिणारच होते आणि हॉटेल आणि ड्रायव्हरचा नंबर देते नंतर. आम्हाला प्रत्येकीला ४,५००/- खर्च आला. ट्रेन स्लिपर मुंबईवरून, दोन दिवस एसी हॉटेल स्टे आणि खान पिण धरून. फक्त भक्तनिवास मधे कुलर आहे.
हॉटेलच सरांउंडीग चांगल नव्हत पण रूम्स खूप स्वच्छ होत्या.

सुंदर फोटो आणि छान माहिती.
बरेच दिवस ईंदौर हुलकावण्या देतंय, आता जाणं मस्ट.

रश्मी, आम्ही पण टॅक्सीच केली होती इंदूर ते उज्जैन स्टेशन. तेच चांगल पडत.

त्या उज्जैन दर्शन बसच्या मी प्रेमात होते म्हणून फोटो काढला.

सुंदर फोटो आणि माहिती. इंदौरविषयी इतकी वर्षे इतके ऐकले आहे, पण हुकलेच आहे अजून. पाहू कधी योग येतो तो.

फोटो आवडले.मुंबईहून थोडी दूर मनाला उल्हसित करणारी सहल आहे ही.आम्ही पाच वर्षांपुर्वी या नोव्हेंबरात थंडीत चार दिवसांत सहल केली होती. माहेश्वर,मांडू आणि उज्जयिनी येथे एकेक दिवस राहिलो.इंदुरात मुद्दामहून राहिलो नव्हतो.खादाडीचा उत्साह नव्हता. शीशमहाल आणि राजवाड्याजवळचे काचमंदिर वेगवेगळे आहेत का?

वॉव सही फोटो आहेत! जावच लागणार पुढच्या ट्रिप मध्ये!
अलीकडेच सासुबाई बसने नमर्दा प्रदक्षिणा करून आल्या. त्यांनी पण यातले काही फोटो पाठवले होते.

फारच सुंदर वर्णन आणि फोटो.
खरतर ह्यातल्या एकएक ठिकाणावर स्वतंत्र लेखमालिका लिहियला हवी होती. >>>>+१११११११

ह्या ट्रिप मधल हे भक्त निवासच सर्वात आवडल. सकाळ संध्याकाळ आरती, भजन आणि इतक सुंदर वातावरण एखाद्या रिसॉर्ट पेक्षाही सुंदर वाटत होतं. >>>>>>> व्वा.. सर्व धार्मिक ठिकाणी अशी स्वच्छता अवश्य पाहिजे .... Happy

फोटो picasaweb वर अपलोड केल्यावर त्याची लिंक कुठे असते?तुमच्या फोटोची embedwebsite वाली आहे तशी मला मिळत नाहीये.

srd, लिक टु थिस फोटो असं उजव्या बाजुला खालती दिसत. त्यावर क्लिक करा. आणि साईज ही अ‍ॅडजेस्ट करता येते. ६४० बाय ६४०ही आयडियल साइ़ज आहे फोटोची

अथांग निळ्या आभाळाचे प्रतिरुप असलेले नर्मदामैयाचे विशाल पात्र पाहताच आशा बगे यांच्या त्रिदल कादंबरीतला शेवट आठवला .

मी ती कादंबरी नाही वाचलीय पण नर्मदा दर्शनाची ओढ हे ही इकडे जाण्याला एक प्रमुख कारण होत भुईकमळ. परिक्रमा तर नाही करु शकणार आपण पण निदान तिच दर्शन तरी घेऊ हा विचार होता. आणि नर्मदेन निराश नाही केल आम्हाला. मांडूच्या रुपमती महालातुन अगदी दूरवरुन तिच पहिल दर्शन झाल मग महेश्वरला परत अगदी जवळून भेटली आंणि ओंकारेश्वरला तर चहु बाजुनी ती आहे तिच झुळझुळण आणि निळशार दिसण मनाला फार प्रसन्न करत. सूर्याची किरण जेव्हा नदीपात्र चमकवतात ते दॄश्य ही अप्रतिमच.

हेमाताई नर्मदा अगदी डोळ्यासमोर आली, तशीपण ती लाडकीच नदी. मुंबई-बडोदे प्रवासात लहानपणी साद घालणारी.

#फोटो-@मनीमोहोर धन्यवाद.करून बघतो.इकडे ६४० pxl चे फोटो येतात परंतू त्यांची लिंक काढून मूळ picasaweb वरचे 3 MB चे फोटो पाहिले.खूपच सुंदर आहेत.

#त्यावेळी फिल्म कॅम्रा होता त्याच्या प्रिंटसचे परत फोटो नाही येत चांगले.(कोटा-बुंदीच्या धाग्यात राजस्थानचे आहेत ते सांपल बघता येतील.)

खुप सुरेख लेख.. प्र.ची,लेखन लाजवाब..
पाच सहा वर्षा पुर्वी इंदौर ला जाण्याचा योग आला..
सगळ्या आठवणी ताज्या तवान्या झाल्यात..
राजवाडा, सराफा, खाऊ गल्ली.. तो दहीवडे वाला आजुनही उंच प्लेट भीरकाउन देता का? त्याची ती स्टाईल खुप
प्रसिध्द होती...
लाल महाल पण आहे ना तीथे.. शहाजी भोसल्यांचा.
त्यांचा पण देव्हारा पाहाण्या सारखा होता अगदी....
गजानन माहाराज मंदिर परिसर आणि स्वच्छता वाखाणण्या जोगी आहे..

सुंदर.

ममो, मस्त वर्णन व प्रचि! मलाही इंदोरला जायचंय ते नर्मदेच दर्शन घ्यायला आणि हा योग येऊ घातलायं ... जाण्यापुर्वी परत एकदा वाचीन.
सृ ची काहीतरी गफलत झालीये Happy
>>>>>सुंदर फोटो आणि माहिती मंजुताई..>>>>

Pages