माळवा सहल

Submitted by मनीमोहोर on 2 December, 2015 - 12:42

नोव्हेंबर डिसेंबर महीने हे पिकनीक ट्रीप साठी अगदी योग्य असतात. तीन चार दिवसचीच सुट्टी होती आणि इंदौर कधीच खुणावत होत, मुख्य म्हण्जे तिथला सराफा. म्हणून तिथेच जायच निश्चित केलं त्याविषयी थोडं

सकाळी अवंतिका एक्सप्रेस ने इंदौर ला पोचलो. हवा थंड होती. हॉटेल वर जाऊन जरा स्थिरस्थावर झालो आणि दुपारी इंदौर दर्शनाला बाहेर पडलो. शहरातली देवळं, राजवाडे वैगेरे पाहिले. जैन धर्मी यांच देऊळ असलेलं शीश महाल फार आवडला. रात्री प्रसिद्ध सराफा ला गेलो . तिथे एक वेगळीच दुनिया दिसत होती. खाण्याच्या शौकिनांना अगदी पर्वणीच . भुट्टेका कीस, दहीवडा यातच पोट गार झाल पण तरी खूप काही खायच दिसत होत म्हणून मग रबडी, साबुदाणा खिचडी असं थोडं थोडं चवीपुरतच घेतलं

राजवाडा
From indore

खजराना गणेश टेंपल

From indore

दुसर्‍या दिवशी धुक्याची दुलई पांघरलेले इंदौर

From indore

इंदूरच्या प्रसिद् पोहे आणि जिलेबीचा ब्रेकफास्ट करुन मांडूला जायला निघालो. उत्तम गव्हासाठी प्रसिद्ध माळव्यातली अशी शेती बघुन डोळे आणि मन दोन्ही सुखावले .

From indore

मांडुचा जहाज महाल

From indore

From indore

मांडुतलीच एक मस्जीद

From indore

हा आहे राणी रुपमतीचा महाल. ह्याला रुपमतीचा मंडप म्हणतात.

From indore

मांडु बघुन नंतर लगेच महेश्वरला आलो . तिथे अहिल्यादेवीचा राजवाडा अगदी नर्मदेच्या काठावरच आहे आणि तो खूप बघण्या सारखा आहे. त्यांच देवघर आणि देव खूप छान आहे ते नक्की बघाव. इथे महेश्वरी साड्या फार सुंदर मिळतात. फोर्ट मध्येच सराकारी दुकान आणि लूम असं दोन्ही आहे.

From indore

From indore

अहिल्या फोर्ट

From indore

रात्रीच्या मुक्कामाला श्री ओंकारेश्वरला आलो. इथल्या श्री गजानन महाराज, शेगाव यांच्या भक्त निवास बद्दल खूप वाचल होत म्हणून इथेच मुक्काम केला. आणि ह्या ट्रिप मधल हे भक्त निवासच सर्वात आवडल. सकाळ संध्याकाळ आरती, भजन आणि इतक सुंदर वातावरण एखाद्या रिसॉर्ट पेक्षाही सुंदर वाटत होतं. दोन रात्री आणि एक दिवस आम्ही इथे राहिलो.

From indore

From indore

From indore

From indore

From mayboli

table style="width:auto;">From indore

ही कचराकुंडी पहा म्हणजे कल्पना येईल.

From indore

मेंटेनंस चोवीस तास.
From indore

ओंकारेश्वरची नर्मदा मैय्या. अधिक निळं काय आहे आकाश की पाणी ?

From indore

From indore

मंदिरात जाण्यासाठी अलीकडेच बांधलेला हा पुल . नदीच्या पात्रात एकही खांब नसलेला. वरच्या लोखंडी कांबीनी तोलुन धरलेला. हा फक्त पादचार्‍यांसाठीच आहे.

From indore

ओंकारेश्वर मंदिर

From indore

शेवटच्या दिवशी उज्जैन ला श्री महांकाळेश्वराचे दर्शन घेतले. शहरात फेरफटका मारला आणि संध्याकाळी अवंतिका एक्स्प्रेस मध्ये घरी येण्यासाठी बसलो.

ही बस उज्जैन दर्शनची

From indore

तीन रात्री आणि चार दिवसाचा हा खरोखर छोटा ब्रेक मनाला ताजतवान करणारा ठरला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. इंदूरात राहूनही ओंकारेश्वर महेश्वरला कधी गेलो नाही. हे फोटो पाहून वाटतंय जायला हवं होतं.
इंडूरातला लालबाग पॅलेस, छत्र्या आणि अन्नपूर्णा मंदिर पाहिली की नाही?

फार सुंदर हेमाताई. लिखाण, फोटो सर्वच लवली. इंदोरला मावशी राहत असूनही अजून योग नाही आला जाण्याचा. ती बोलाऊन कंटाळली Happy .

ममो, सुंदरच.
शेगावबद्दल मला जरा जास्तच आपुलकी आहे. आणि अगदी कुठल्याही मोठ्या अश्या मंदीरात गेलं की प्रतेकवेळीच तुलना केली जाते. शेगावच्या मंदीरात सततचा राबता असतो पब्लिकचा पण कोपरा कोपरा स्वच्छ्ता आहे.
बाकी मूल्य देऊन घ्यायच्या सुविधाही फारच स्वस्त आहेत.

मस्त झाली ना ट्रिप?? मांडूला जाताना अलाउद्दिन खिलजी ने आफ्रिकेतून आणलेली बाओबाब ची झाडं पाहायला गम्मत वाटते.. लगेच तिथेच गोरख चिंचा ही असतात विकायला..

इंदौर चा शीश महल पाहिलास कि नै??

होळक्ररांच्या छत्र्या ही अतिशय प्रेक्षणीय आहेत, पण तिथे फोटोग्राफी अलाऊड नाही..

सुंदर फोटो, आणि माहिती ही मस्त.

ओंकारेश्वर आणि महांकालेश्वर हे दोन्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी ना? उज्जैन हे इंदूरहून एका दिवसात जाउन येण्यासारखे आहे का?

हो आरामात एका दिवसात जाऊन येता येतं, फारेण्ड, इंदौर उज्जैन मधे हार्डली ५०,६० किमी चं अंतर आहे.

जमल्यास भर्तृहरी ची गुफा ही बघून ये

टण्या, त्या पाच मजली राजवाड्याचा फक्त दर्शनी भाग शिल्लक आहे. आतलं पुष्कळसं १९८४च्या दंगलींत खाक झालं.

ममो, झकास!

भक्त निवास फारच सुंदर. शेगाव संस्थानच्या सगळ्याच वास्तू स्वच्छ आणि सुंदर आहेत. गजाननविजय मध्ये ओंकारेश्वरची कथा आहे ना?

उज्जैन दर्शनची बस आवडली.

महेश्वरी साड्या घेतल्या असशील तर तेही फोटो मस्ट :डोमा:. सराफामधल्या खादाडीचेही फोटो टाकायचे असतात.

फारच सुंदर वर्णन आणि फोटो.
खरतर ह्यातल्या एकएक ठिकाणावर स्वतंत्र लेखमालिका लिहियला हवी होती.

सुंदर!

गजानन महाराजांच्या मठातील मंदिर सगळी कडे एक समान असतात का? पंढरपुरच्या मठातील मंदिरही वरिल मंदिरा समान आहे.

ममो.........खूप छान फोटो आणि लिखाण!
सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात ...........काही कारणाने उज्जैनला ३/४ दिवस रहायचा योग आला होता (इन्टरव्हर्सिटी नॅशनल्स स्पोर्ट्ससाठी).
तेव्हा इंदौर जाता जाता पाहिलं होतं.
इंदौरच्या सराफ्यास भेट देण्याचा योग कधी येतो पाहू!

सुबह काशी, दोपहर अयोध्या और शाम माळवा! हे पुलंकडून कळलेलं माळवा..
ममो, उपयुक्त माहिती आणि मन प्रसन्न करणारे फोटो!
ह्या पूर्ण प्रवासावर एक छान लेख लिहा ना..

धन्यवाद सर्वाना

भरत, लाल महाल, अनापूर्णा देवीच मंदिर, छत्र्या सगळं पाहिलं .

वर्षु, शीश महाल फार आवडला. काय कला कुसर केलीय. डोळे दीपले अगदी . तसा तो फार काही जूना नाहीये पण आपल्याकडे अजून ही इतक्या उच्च दर्जाची कलाकृती करणारे कलाकार आहेत याचा अभिमान वाटला. तसेच बाओबाब ची झाडं पाहिली.गोरख चिन्च लगेच विकत घेतली.

केश्वे, एकाच वेळी खाण, पर्स सांभाळण आणि फोटो काढ़ण हे तिन्ही शक्य नव्हत महणून फोटो नाही काढू शकले सराफा मध्ये. खाण्यावर केंद्रित केल सगळ लक्ष.

ही ट्रिप माझ्या सदैव लक्षात राहिल त्याला कारण ही तसच आहे ह्या ट्रिप मध्ये माझ्या यजमानानांच पैशाच पाकीट दोन वेळा पडल पण दोन्ही वेळा ते तिथल्या लोकांनी आम्हाला शोधत शोधत येऊन परत दिल. माळव्यातल्या माबोकारांची आणि एकूणच आपल्या सगळ्यांची मान अभिमानानी ऊंच व्हावी अशी ही घटना आहे. म्हणजे पाकीट पडलं म्हणून नव्हे ते परत मिळलं म्हणून.

महेश्वरचा किल्ला फार सुंदर आहे आणि तिथली नर्मदा नदी ही फार सुंदर आहे नर्मदेच्या तीरावर एम पी टूरिज़म च हॉटेल आहे ते ही फार छान आहे. साड्यांचे फोटो नाहीयेत काढ़ते आणि डकवते

ह्या ट्रिप मध्ये इंदूरला एक दिवस राहून दोन दिवस ग. म भक्त निवासात राहायच कारण ते अतिशय सुंदर आहे. ओंकारेश्वर इतर धार्मिक स्थळां सारखच आहे पण ह्या भक्त निवासात प्रवेश करताच आपण एका वेगळ्याच जगात आहोत अस वाटत. पण तिकडच बुकिंग आधी होत नाही तिथे गेल्यावरच करायच. जेवणाची सोय ही अतिशय छान आहे.

मंदिरात नावेनी पण जाता येत. आम्ही जाताना नावेनी गेलो होतो तेव्हा गजानन महाराजांच्या गोष्टीची आठवण झाली. नर्मदा नदी फार छान आहे. पाणी अगदी निळशार आहे नदीच. ओंकारेश्वरला चहुबाजुनी छोट्या छोट्या टेकड्या आहेत आणि मंदिर ही टेकडीवरच आहे. मंदिरात मला रूईच्या फुलांचे हार विकायला दिसले. ते अतिशय सुंदर दिसत होते.

महाकाळेश्वराच मंदिर ही खूप मोठं आणि छान आहे पण फोटो नाही काढून देत . नेहमी गर्दी आणि दर्शनासाठी भली मोठी लाईन असते त्यामुळे हातात वेळ राखूनच जावे. तसेच उज्जैनच्या एका देवळात ( नाव नाही लक्षात ) दारुचा प्रसाद चढवितात त्यामुळे देवळाच्या बाहेर एरवी मिठाईची दुकान असतात इथे छोट्या छोट्या दारुच्या बाटल्यांची. !!!

ती उज्जैन दर्शनची बस आमच्या बरोबरच होती पण सतत हुलकावण्या देत होती पण अखेर मिळवलाच फोटो. !!!!

उज्जैन आणि महांकाळेश्वर बघितलंय लहानपणी, तेव्हा मावशी नागद्याला राहायची. नागद्याचं बिर्ला मंदिरपण सुरेख आहे. पण इंदोर नाही बघितलं तेव्हा.

ममो, पुन्हा गेला होतात का? मस्त फोटो. वेळ मिळेल तेव्हा इथेच झब्बू देईन. ममोंचे ओंकारेश्वरच्या गजानन महाराजांच्या भक्त निवासचे फोटो आणि इंदोरची खादाडिचे फोटो आणि वर्णन एकून आम्ही मैत्रिणी ह्या ट्रिपला गेलो होतो आणि सर्व मदत ममोंनी केली त्याच बरोबर मयेकरांनी सुद्धा. दोघांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना ही ट्रिप खूप आवडली. सविस्तर वेळ मिळाला की लिहिन इथेच. Happy

आम्ही इंदोरमध्ये सराफा बाजार ला गेलोच नाही. आम्हाला ५६ दुकानचे चाट अजिबात आवडले नाही आणि आमच्या ड्रायव्हरने सांगितले कि इधरही के लोग रात मे वहां ठेला लगाते है. Uhoh म्हणून मग कॅन्सलच केल. Happy

ममो, तो दारूवाला देव काळभेरव मंदिर आहे. मी बघितल वाडग्याने तो देव दारू पित होता. वरदाच सांगू शकेल खर कारण. आमच्या ड्रायव्हरने सांगितल की ह्या वर संशोधन झाल आहे. लोकांनी आणलेल्या दारूच्या बॉटल मधील दारु त्या वाडग्यात थोडी काढून देत होते आणि वाडगा भरल्यावर देवाला भरवत होते. Uhoh

संदिपनी ऋषींचा आश्रमही खूप छान आहे पण तिथे फक्त पाय लावून आलो. पुन्हा इंदोर, उज्जेन, मांडू, महेश्वर जायची इच्छा आहे. आम्ही चार दिवस होतो पण तेवढे दिवस कमीच वाटले. पूर्ण व्यवस्थित फिरायच असेल तर किमान १ आठवडा हवा. ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्या साठी ही पर्वणीच आहे. अहिल्याबाईंचा फोटो सहित ईतिहास वाचायला वेळ कमी पडला. पूर्ण वाचत गेल तर छान लिंक लागते. ते सुध्दा अर्धवट सोडून निघाव लागल होत. Sad

व्वा! मस्त फोटो आलेत. नर्मदा मैय्याने प्रसन्न केले. ममो, तुम्ही कुटुम्बीय तिथे ( इन्दौरला ) पोहोचल्यावर कसे फिरलात? म्हणजे टॅक्सी वगैरे बुक केली होती का? बाकी फोटो मध्ये तर उज्जैन दर्शनची बस दिसतीय, ती आधी बुक करावी लागते का?

Pages