मशरुम कबाब आणि मिनी पराठे

Submitted by अमेय२८०८०७ on 22 November, 2015 - 11:32

खरेतर असल्या पारंपरिक पदार्थाला शाकाहारी साज चढवून भ्रष्ट केल्याबद्दल शिक्षा म्हणून पूर्वीच्या नवाबजाद्यांनी (योग्य तिथे शीग लावून) तंदूरच्या तोंडीच दिले असते पण सरदारांनी संस्थाने खालसा करून तो धोका वेळीच संपवून टाकल्याने, आता ही रेसिपी लिहायला हरकत नाही.

साहित्य:
1. कबाबसाठी
पाच सहा मशरुम्स बारीक चिरून
एक मध्यम कांदा बारीक चिरून कुरकुरीत तळून घेतलेला
सहा सात लसूण पाकळ्या चिरून तळून घेतलेल्या
दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून (तिखटपणानुसार कमी-जास्त)
काजू दहा बारा
काश्मीरी तिखटपूड एक टी स्पून
धणे पावडर अर्धा टे स्पून
गरम मसाला एक टी स्पून
वेलचीपूड अर्धा टी स्पून
भाजलेले बेसन तीन टे स्पून
हळद एक चिमूट
मीठ मिरपूड चवीनुसार
केवडा वॉटर दोन तीन थेंब (ऑप्शनल)
थोडे केशर अर्धी वाटी गरम दुधात मिसळून
तूप, तेल

2. मिनी पराठे
मैदा दीड वाटी, एक टी स्पून साखर, एक टे स्पून तूप, केशर, मीठ

पराठे भाजण्यासाठी तूप

3. टॉपिंग
चार टे स्पून घट्ट दही, एक टी स्पून आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, तिखटपूड आणि मीठ मिरपूड चवीनुसार, थोडी बारीक चिरून कोथिंबीर

4. सजावटीसाठी थोडी काकडी टोमॅटो मुळा चिरून

कृती

तूप आणि थोडे तेल तापवून त्यात हिरव्या मिरच्या हलके परतून घ्याव्यात, काजू घालून खरपूस परतावेत.
मशरुम्स घालावेत, मीठ मिरपूड घालावी. मशरुम्स चांगले शिजले की त्यात तळलेला कांदा व लसूण आणि बाकी मसाले घालावेत. भाजके बेसन घालून एकजीव करून घ्यावे. मिश्रण गार झाले की मिक्सरमधून (पाण्याशिवाय) बारीक पेस्ट करून घ्यावी.

पेस्टमध्ये केशर आणि केवडा वॉटर घालून कबाब तयार करून घ्यावेत.
kababs5.jpg

नॉन स्टिक तव्यावर कबाब भाजून घ्यावेत (तेलाशिवायही छान भाजले जातात).

मैद्यात बाकी घटक घालून मळावे आणि मिनी पराठे बनवून तूप लावून खरपूस शेकून घ्यावेत. पराठ्याचा आकार कबाबपेक्षा थोडा मोठा ठेवावा.
kababs4.jpgkababs2.jpg

फायनल प्रॉडक्ट. स्टार्टर म्हणून चांगला विकल्प वाटतोय.

kababs1_0.jpg

दिलेल्या प्रमाणात फोटोतल्या आकाराचे दहा कबाब झाले.
पराठे कणकेचेही करता येतील पण कबाबच्या चवीला मैद्याचेच जास्त पूरक वाटतात मलातरी.

स्रोत : शेफ हरपाल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, काय दिसतंय. आहाहा.

स्टार्ट मस्त. पूर्वीची अमेय स्टाईल येतेय हळूहळू. Lol

स्लर्प ऽऽ ऽऽ ऽऽ ऽऽ ऽऽ....

अतिअवांतर - फायनल प्रॉडक्ट. स्टार्टर म्हणून चांगला विकल्प वाटतोय >>>> इथे विकल्प शब्द चांगलाच खटकतोय का ????? Wink Happy

दिनेशदा नेहमीचेच बटन मशरुम्स, आकाराने थोडे मोठे होते मात्र.
जेम्स बॉंड, अंकु
कोरडे नाही लागत (म्हणजे गरम गरमच खाल्ले तेव्हातरी नाही लागले). टॉपिंगसोबत मस्त चव जमली होती.

भारी. आम्हाला मशरुम आवडत नाहीत त्यामुळे शाकाहारी पदार्थ असला तरी आम्ही ब्याडवर्ड एके ब्याडवर्ड Happy

सिंडरेला Lol
म्हणून तर जगात दुराचार बोकाळतोय
(बाकी मी दिवाळीनंतरही थोडा ग्रेस पीरियड जाऊ दिला, न जाणो मशरूमपण गहजबी साबित व्हायचे!)

अरे सह्ही दिसतायत कबाब!! केवडा वॉटर वापरणे इन्टरेस्टिंग वाटले. मला मश्रूम आवडतात. त्यामुळे नक्की करून बघणार हे. प्रेझेन्टेशन फारच भारी!

आमच्याकडले सात्विक ज्ये ना ब्यॅडवर्ड सात्विक पदार्थ खात नाहीत. त्यांच्या करता मश्रुम्स(च) वापरुन करणार

दह्याचं टॉपिंग इण्टरेस्टिंग दिसतंय.

रच्याकने आज तुळशीचं लग्न आहे. मश्रुम्स ची रेस्पी चालेल का ?

ओह बटन मश्रुम..

या रेसिपीत वाईल्ड मश्रुम, किंवा सुकवलेले काळे मश्रुम वगैरे पण चांगले लागतील. गोव्यात पावसाळ्यात एक वेगळे मश्रुम मिळतात, तेही चांगले लागतील.
शेवळे, केळफूल पण चांगले लागेल अर्थात त्यांना जास्त मेहनत आहे.

अरे सह्ही दिसतायत कबाब!! केवडा वॉटर वापरणे इन्टरेस्टिंग वाटले. मला मश्रूम आवडतात. त्यामुळे नक्की करून बघणार हे. प्रेझेन्टेशन फारच भारी! >>> मलापण खूप आवडतात मशरूम्स, सो नक्की करून बघेन...
btw केवडा वॉटर म्हजमे नक्की कायय़ कुठे मिळतं आणि त्याचा उपयोग नक्की कशासाठी केला जातो ?