मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको.
हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही. मी आतापर्यंत अनेकांना याबाबत विचारलेले आहे. त्यात १) काय फरक पडतो, २) मी द्वैतवाद वा अद्वैतवाद मानतो, ३) मी भगवद्गीता या ग्रंथाचा पूजक, ४) फार तर भगवद्गीतेबरोबर रामायण हाही माझा धर्मग्रंथ, ५) या भूमीत रुजलेला आणि वाढलेला सनातन धर्म, ६) हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही यातच त्याचे महानपण-वेगळेपण वगैरे आहे, ७) मी सर्वांना समान मानतो, ८) हिंदुत्व हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे अशी विविध उत्तरे मिळतात. अशा मोघम उत्तरांमुळे कोणाही जिज्ञासू व्यक्तीचे समाधान होणे शक्य नाही. उलट असे प्रश्न विचारून धार्मिक बाबतीतील तज्ज्ञ म्हणवणा-या सदर व्यक्ती त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले म्हणून नंतर फटकून वागतात किंवा भेटायचे टाळतात.
अशा परिस्थितीत येणा-या पिढ्यांना हिंदुत्वाबद्दल अनास्था वाटेल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही का?
वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते.
पुढचा प्रश्न: हिंदू धर्माचे प्रतिनिधी नक्की कोण?
शंकराचार्य म्हणावेत तर अतिशय कर्मठ अशी त्यांची प्रतिमा, सामान्य जनतेशी संपर्क शून्य, त्यातही अनेक पीठे आणि श्रेष्ठत्वावरून त्यांच्यामध्येच मधूनमधून होणारे वाद. हे प्रतिनिधी हिंदू समाजातील कोणत्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात? त्यांच्यात दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा एक जण तरी आहे का? की आरक्षण लागू नसल्यामुळे तेथेही फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे? आणि त्यामुळे समाजातील हे अनेक मोठे घटक या धर्मात सामावलेलेच नाही?
कोणाला प्रश्न पडेल निश्चितपणे कोण प्रतिनिधी आहे हे सामान्य हिंदू व्यक्तीला माहीत नसले तर काय फरक पडतो? तर फरक पडतो. हे आजवर कोणाच्या लक्षात आले नाही का? की विविध कारणांनी ‘जैसे थे’ परिस्थिती लादली गेली? जातीपातीमुळे संपूर्ण हिंदू समाज मुळात यांचे प्रतिनिधित्व नाकारतो हे कारण आहे का? धर्माचा इतक्या सहस्त्रकांचा डोलारा केवळ त्याच्या जडत्वामुळे (inertia) चालू आहे का अशी शंका यामुळे वाटते.
फरक का पडतो?
१) प्रतिनिधित्वाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विविध बाबा-बुवा-महाराज यांचे फावते. प्रसंगी ते विविध अवतार अहेत म्हणून कमकुवत मनाच्या लोकांना आपल्या कच्छपी लावतात. हा प्रकार कल्पनेच्याही बाहेर बोकाळलेला आहे.
२) हिंदू धर्मात अनेक पंथ असल्यामुळे विस्कळीतपणा आणखी वाढतो. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्हाला हिंदू धर्मातून वगळा ही या समाजातील काहींची मागणी मधूनमधून वृत्तपत्रात दिसते.
३) शीख, बौद्ध धर्मीय हेदेखील हिंदूधर्मीयच आहेत असे हिंदू त्या धर्मांच्या पोटच्या जिव्हाळ्यामुळे म्हणतात. परंतु या धर्मांची याबाबतची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असते.
४) तेहेतीस कोटी देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे असे अनेकदा ऐकतो. कित्येकदा कृष्णाच्या राधा वा गोपींबरोबरच्या शृंगाराचे वर्णन तिखटमीठ लावून सांगितले जाते तर तसे काही नव्हतेच असेही म्हटले जाते. कोणतीच सुसुत्रता नसल्यामुळे धर्म बदनाम होतो, चुकीच्या संकल्पना बोकाळतात.
५) हिंदूह्रदयसम्राट अथवा हिंदू या शब्दाचा समावेश असलेली तत्सम बिरूदे लावून घेऊन काही स्वयंघोषित नेते लोकांचा मानसिक गोंधळ वाढवतात. त्यांचे वा त्याच्या संघटनेचे अनेकदा होत असलेले धर्मविरोधी, झुंडशाहीचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन पाहून हाच तो हिंदू धर्म का असा काहींचा समज होतो आणि हिंदू धर्माची त्यामुळे बदनामी होते. त्यात काही राजकीय लोकदेखील सामील असल्यामुळे अर्थातच राजकीय कारणांसाठी त्याचा वापर केला जातो.
६) राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रमुख संघटना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करतात. परंतु ती काही धार्मिक संघटना नाही. त्यामुळे त्यांना मोठाच राजकीय विरोध होत असल्यामुळे धर्माच्या पातळीवर हिंदू समाज विभागला जातो. विभिन्न राजकीय विचारसारणी असण्यात काहीच गैर नाही, परंतु त्यामुळे एकाच धर्मातील लोकांचे धृवीकरण होणे योग्य नाही, किंबहुना धर्मासाठी ते धोक्याचे आहे.
७) भगव्या रंगाचा ध्वज वापरून काही राजकीय संघटना/पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही जण वारंवार वादग्रस्त विधाने करतात, त्यामुळे देशातील धार्मिक तेढ वाढते आणि देशाची प्रगती खुंटते.हे लोक खरोखरच हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का हे त्यामुळे शोधणे आवश्यक आहे.
८) अगदी अलीकडेच चालू झालेल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीला धार्मिक स्वरूप देऊन त्याचेही शास्त्र निर्माण करण्यात येते आणि त्यामुळे भोंदूपणा वाढतो. अशा कितीतरी गोष्टी दाखवता येतील.
९) हिंदू धर्मियांमध्येच एकमेकांचा जातीय आणि जातीच्या आधारावरील तुच्छतेने सतत केला जाणारा उल्लेख एके दिवशी कोणते रूद्र रूप धारण करेल याचा नेम नाही. याबाबतील कितीही कायदे केले तरी धार्मिक आणि सामाजिक पातळीवर लोकांची मानसिकता बदलेपर्यंत हा बदल होणे शक्यच नाही. हा धोका असताना दुसरीकडे मात्र धार्मिक पातळीवर याची जबाबदारी कोण घेणार हेच निश्चित करता येत नाही.
१०) कोणतीच सुसुत्रता नसलयामुळे आपापल्या जातीपुरत्या संघटना निर्माण केल्या जाऊन धर्म सोयिस्करपणे वा-यावर सोडला जातो. यात जातीय कट्टरपणा वाढीला लागतो हे वेगळे सांगायची गरज नाही.
११) मी वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजातील विविध घटकांना या प्रतिनिधींमध्ये समाविष्ट केलेच गेलेले नसेल तर आगामी काळात धर्मालाच त्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकेल.
१२) कोणी हिंदू धर्मातील प्रथांना विरोध करायला गेले तर ते काय सांगतात – का सांगतात, याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना इतर धर्मातील विसंगती दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का असे म्हणून त्यांच्या भुमिकेवर धर्मविरोधी असा ठप्पा मारण्यात येतो. धार्मिक पातळीवर या गोष्टींचा योग्य त्या प्रतिनिधीकडून या बाबतीत काही निर्णय घेता आले तर कितीतरी गोष्टी संघर्षाच्या थराला जाणारच नाहीत. यामुळे समाजातील सौहार्द्रता वाढेल हे सांगायची गरज नाही.
१३) धर्माच्या प्रतिनिधित्वाबाबत काहीत निश्चित नसल्यामुळे विविध जातींमधील विविध पातळीवरील राजकीय नेतेच या जातींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. अलीकडे जातींच्या आधारावर मागितली जाणारी आरछणे त्यांपैकीच एक. धर्माच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित झाली तर अशा संधीसाधूंना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सतत गढूळ होणा-या सामाजिक वातावणाला पायबंद बसेल.
१४) आज देशातील मोठी लोकसंख्या धार्मिक जाणीवेच्या बाबतीत खरे तर निद्रिस्त आहे. मग ते सुशिक्षित वा अशिक्षित असोत वा गरीब असो. कारण रोजच्या जीवनसंघर्षातून त्यांना या गोष्टींचा विचार करायला वेळ नाही. पण यातील काही टक्के लोक तरी या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागले तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल.
आणखी शोधल्यास अशी अनेक कारणे आढळतील.
असे झाले तर धर्माचे प्रतिनिधी एक प्रकारचा माफिया निर्माण करतील अथवा आचार-विचार स्वातंत्र्यावर गदा येईल असा समज करून घेण्याचे कारण नाही, कारण देशाची घटना, कायदे यांना यापासून धोका पोहोचणारच नाही.
कोणाला या बाबी गांभिर्याने घेणे गरजेचे आहे असे वाटत असेल तर त्यांनी यात जरूर भाग घ्यावा. फक्त त्यात जातीय/धार्मिक आवेश नको. कारण त्यामुळे चांगली चर्चा होऊ शकणार नाही आणि त्याला भलतेच वळण लागेल. शिवाय ज्यांना यातली तळमळ दिसते त्यांनी त्यांच्या परीने विविध पातळींवर या विषय न्यायलादेखील माझी काहीच हरकत नाही.
मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे? एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही. कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत.
ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही. गांभिर्याने चर्चा करण्याची इच्छा असलेल्यांचे स्वागत व आगाऊ धन्यवाद.
राजेश कुलकर्णी, तुमचा धागा
राजेश कुलकर्णी, तुमचा धागा चांगला आहे. ह्यावर अभ्यासू लोकांची मतं वाचायला आवडतील.
आपल्या धर्माचा अभ्यास आपण शाळेत करत नाही, किंवा मंदिरात जाणे, सण साजरे करणे ह्याव्यतिरिक्त सामान्य माणसाला धर्माविषयी काही माहिती नसते. रोजच्या आयुष्यात त्याची गरजही नसते. ज्यांनी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, अरबिंदो घोष, आणि इतर अभ्यासकांची पुस्तके वाचली असतील त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात देताही येतील, पण सामान्य माणूस ह्यावर फार वरवरची उत्तरे देऊ शकेल. ही उत्तरे शोधायची प्रत्येकाला गरजही भासणार नाही. पण एक अभ्यास म्हणून मी ज्या धर्मात जन्मले त्याचे मूळ, शिकवण ह्याबद्द्ल पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला काही जणांना नक्कीच आवडू शकते. मला वाटतं अश्या लोकांकरता हा धागा जास्त उपयोगी असेल. ही लोक कट्टर हिंदुत्ववादी नसून लोक मानवता हा धर्म मानणारीही असतील.
हिंदू धर्मात काय वाईट आहे, आणि इतर धर्म कसे श्रेष्ठ/कनिष्ठ आहेत (भाजप/काँग्रेस, ब्राह्मण/इतर जातीय, हिंदू/मुसलमान्/ख्रिश्चन.....) ह्यापेक्षा जरा फॉर अ चेंज हा धागा ट्रॅक वर ठेवा ना, लोक्स!!
काही चांगल्या पुस्तकांची सजेशन्सही चालतील.
माझ्या वाचनानुसार, काथ्याकूट
माझ्या वाचनानुसार, काथ्याकूट करण्याजोगा हा विषय असला , तरीही सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास , पुढील श्लोक वाचावा.
स्मृती भिन्न: श्रुतयो विभिन्ना
नैको ॠषिर्यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्थाः ॥
अर्थः- स्मृती भिन्न आहेत, श्रुती भिन्न आहेत, ( म्हणजे त्यांच्यातील तत्वज्ञानाचा एक्मेकांशी काही संबंध नाही ) कोणत्याही एकाच ॠषीचे मत प्रमाण म्हणून स्वीकारले जात नाही. खरं म्हटलं तर धर्माचे तत्व , अज्ञात गुहेत दडवून ठेवण्यात आलेले आहे. ( त्यामुळे ते शोधण्याचा कोणीही प्रयत्न करू नये , असे सुचविण्यात आले आहे). मग जीवनाचा म्हणा अगर सत्याचा मार्ग कोणता ? तर आपल्या अगोदर जे महा जन म्हणजे ज्ञानी , मुनी, मोठे लोक , ज्या मार्गाने गेले , त्याच मार्गाने आपण जावे हेच खरे. ! !
अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी.
http://sanskritdocuments.org/doc_z_misc_vaakyasangraha/vaakyaexamples.ht...
माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ
माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नाही. पुर्वीच्याच मार्गाने जा असे नाही अपेक्षित. त्या त्या काळातील , ' महाजन ' अशा व्यक्तींनी जसे आचरण केले तसे करावे. म्हणजेच येथे तारतम्य वापरावे, असे सुचवावयाचे आहे.उदाहरणार्थ :- पेहराव कसा असावा ? मी जर पुर्वीच्या लोकांसारखे धोतर, बंडी, पगडी अगर मुंडासे घालून , बगलेत लांब दांड्याची छत्री घेवून ,लोकल्ने प्रवास करण्याचा प्रयत्न केला , तर लोक मला मूर्खात काढतील. दुसरे उदाहरण अरब लोक जसा पायघोळ अंगरखा घालतात , तसा घालून , मी जर चेन्नई सारख्या शहरात , भर उन्हाळ्यात फिरू लागलो तर घामाने न्हावून निघेन.
( चेन्नई कशाला, येथे महाराष्ट्रात, भर उन्हाळ्यात , लग्नात , केवळ शिवला आहे म्हणून, थ्री पीस सूट घालुन , येणारे पाहूणे पाहिले आहेत ! ) आता साधी गोष्ट आहे. जेथे थंडीचे प्रमाण जास्त आहे , तेथेच थ्री पीस सूट नेकटाय इ. , घालणे योग्य , नाही कां ? जसे हे पेहरावाच्या बाबतीत,
तसेच पूजा, प्रार्थना, जप, संस्कार, विद्या , याबाबतीत म्हणता येईल.
एकच गोष्ट धरून न ठेवता, बदल करीत रहाणे , हेच जीवंतपणाचे लक्षण आहे. सर्वसमावेशक असणे म्हणजे आपल्या धर्म , पंथ अगर संप्रदायात , जे तारतम्याने योग्य वाटते ते स्वीकारणे. तसेच इतरही धर्मात, पंथात, अगर संप्रदायात जे काही योग्य वाटेल , ते स्वीकारणे. त्याप्रमाणे आचरण करणे. उदाहरणार्थ ' गरबा ' खेळणे ही काही महाराष्ट्राची परंपरा वा संस्क्रुतीचा भाग नव्हे, पण तरीही आम्ही त्याचा आनंद घेतोच ना ! ! मला या बाबतीत एक ' शेर ' आठवतो .
" झुकता वो ही है, जिनमें जान होती है ! वरना अकडे रहना तो , मुर्देकी पहचान होती है ! ! "
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/44280
धर्मास ग्लानि आली आहे काय?
धर्मास ग्लानि आली आहे काय?
http://www.maayboli.com/node/39305
रमेश भिडे | 23 November, 2012 - 13:59
"यदा यदा हि धर्मस्य "या भगवंताच्या उक्तीनुसार जेव्हा जेव्हा अधर्म प्रबळ होतो किंवा खरा धर्म लोप पावतो ,त्यावेळी परमेश्वर स्वत: जन्मास येवून अधर्माचा नाश करून , दुष्टांना शासन करून पुन्हा धर्म स्थापन करतो.
आज जगात किंवा विशेषत:भारतात राहणाऱ्या माणसाला या गोष्टीची अतिशय प्रकर्षाने जाणीव व्हावी कि Oh My God! iसिनेमात दाखवल्याप्रमाणे धर्मसंस्था भ्रष्ट झाली आहे. धर्माचे ठेकेदार आपापली दुकाने मांडून पाप-पुण्याचा धंदा मांडून बसले आहेत. आणि यास्तव धर्माचाच (काळा )बाजार भरल्याने पर्यायाने राजकारण ,समाजकारण आणि सगळेच एकूण चित्र अतिशय भयाण -रीत्या निराशाजनक झालेले आहे.
भ्रष्टाचार ,अनाचार,दुराचार जातीयवादी विद्वेष आणि विशिष्ट (कथित)उच्च-वर्णीय यांचा द्वेष करणे,खर्या राष्ट्र-पुरुष,देशभक्त,साधू-संत पुरुषांचा ,दैवतांचा उपमर्द करणे, इत्यादी सैतानी प्रवृत्ती अतिशय बेफाम धुमाकूळ घालत आहेत.कितीही पाप/भ्रष्टाचार करा,पण अमुक स्वामी/बाबाचा शिष्य व्हा,सगळे गुन्हे माफ! अरे काय चाललेय काय?
मुळात धर्म ही काय संकल्पना आहे ते समजून घेतले तर धर्मास ग्लानी कशी येते ,ते लगेच समजून येऊ शकेल
एक शेतमालक आहे ,त्याने दहा माळी नोकरीला ठेवले.
दहा माळ्यांना एकेक रोप दिले . पाणी,खत,हत्यारे , औषधे,मशागत करण्याचे समान सर्व दिले.
आणि त्या माळ्यांना ते रोप लावण्यास संगितले. व त्याची वाढ करणे ,जोपासना करणे , संरक्षण -संवर्धन करण्याची जबाबदारी माळ्यांना दिली.
प्रत्येक माळ्याने ते रोप लावले ,वाढवले ...जपले .
6 महिन्यांनंतर शेतमालक पुन्हा आला ,आणि रोपे पहिली .
काही रोपे चांगली तरतरीत,हिरवीगार होती.जोमदार होती.तर काही मलूल,मरतुकडी होती.
याचे कारण काही माळी कामचुकार निघाले.
त्यांनी औषधे फवारली नाहीत, खाते दिली नाहीत,गाई-गुरांपसून /ऊन-पावसात रोपांचे संरक्षण केले नाही.
तीच संकल्पना विविध धर्मांना लावून बघा.... मनुष्याचे जीवनमान सुधारावे, त्याची आत्मिक,भौतिक ,सामाजिक प्रगति व्हावी ह्याची जबाबदारी धर्मावर देण्यात आली.पण......................
आज किती आणि कोणते धर्म ते काम करतात? कधी विचार केला आहे?
धर्मो रक्षति रक्षत: या वचंनानुसार धर्म सज्जनांचे रक्षण करतो,दुर्जनांचे निर्दालन करतो ...हे आज घडते का?
नाही..................! असेच उत्तर दुर्दैवाने मिळेल ....
धर्म आणि शास्त्राचे ठेकेदार आणि खोटारडे बाजारू कथित धंदेवाईक तांत्रिक-मांत्रिक यांनी निरर्थक,वेळखाऊ आणि अनुत्पादक अशा कर्म-कांडात आणि पाप-पुण्याच्या जंजाळात धर्म आणि समाजाला अडकवून ठेवले आहे.
यातही पुन्हा मेख अशी की ,ज्या वेदांना प्रामाण्यभूत मानून कथित धर्म-शास्त्राची रचना झालेली आहे, त्या वेदापैकी केवळ 5% वेद साहित्य उपलब्ध आहे. उर्वरित 95% वेदात काय होते? आणि त्यावर आधारित कथित शास्त्र कसे असेल? हे कोण ठरवणार?
शास्त्र असे सांगते, तसे सांगत नाही, म्हणून कोकलणार्या5 जुनाट, पोथीवादी ,कर्मठ, गल्लाभरु विद्वानाचे (?) वैचारिक शेण आम्ही कथित शास्त्र म्हणून का स्वीकारावे?
तर अशी सगळी स्थिति आहे...................
यावरून मी असा निष्कर्ष काढला आहे की , (निदान भारतातील/हिंदू ) धर्माला ग्लानि आलेली आहेच! आणि हे सत्य त्या जगन्नियंत्या पर्यन्त पोहोचणे अतिशय आवश्यक आहे.
हे प्रभू तूच आता जन्म घे ,आणि तुझ्याच उक्तीनुसार सज्जनांचे रक्षण आणि दुश्टांचे निर्दालन कर रे बाबा!
प्रभूंनी केव्हांच जन्म घेतला
प्रभूंनी केव्हांच जन्म घेतला आहे आणि काही आयडी यमसदनास धाडले आहेत, तर काही निजधामास जाण्याची शक्यता आहे.
कोणतेच बंधन नाही, आपण
कोणतेच बंधन नाही, आपण आपल्याला हवे तसे बदलू शकतो, या गोष्टी केव्हा चांगल्या वाटतात? जेव्हा धर्माच्या नावाचा दुरूपयोग करणा-या शक्ती नसतात.
आता आपला धर्म म्हणजे काय हेच माहित नसलेल्या बहुसंख्य 'अडाणी' (याचा योग्य तो अर्थ लक्षात घ्यावा) लोकांनी जोपासलेल्या धर्माच्या भलत्याच कल्पना, अंधश्रद्धांचा फायदा घेऊन काही मुठभर लोक या धर्माला रस्त्यावर आणण्यात यशस्वी झालेले आहेत. त्याचा सर्वांनाच उपद्रव होतो. काहीही झाले की यांच्या भावना दुखावल्याचा बहाणा करून ते हवे तसे करून घेतात, काही गोष्टींना विरोध करतात. हे आपण वरचेवर पहात आहोत.
साती यांचा दोन्ही पोस्ट
साती यांचा दोन्ही पोस्ट आवडल्या आणि सहमत.
Atishay sundar vishleshan
Atishay sundar vishleshan tyabadall 100% marks
Kharacha hindu dharma kai ahe? Ek hindu mhanun jar ya dharmachi vakili karaichi vel alyas Swami Vivekananda avashya vacha.
Vivekanada sarkhe hindu dharma sahaj ani saral aaj paryant konich sangitla nasel.
Gita madhe dharmapekha mansane aple ayushya kashya padhatine jagle pahije he uttam padhatine va vyavharik ritya pataun dhile ahe
Ugach pooja archa/karma kanda asla phapat pasara gitet nahi
mhanun mala ha grantha sarochha dharma grantha vatato
arthat majha etar dharma granthar etka abhyas nahi; tyamule to kadachit majha graha hi asu shakto
sati, sachin pagar yanche mudde patnyasarkhe ahet
प्रतिनिधीची आवश्यकता कशाला
प्रतिनिधीची आवश्यकता कशाला हवी. उलट कुणा एकाची एकाधिकारशाही नाही हेच उत्तम. त्यामुळे आधुनिक काळाप्रमाणे योग्य ते बदल करणे मी जास्त प्रिफर करेन. आणि त्यासाठी कुणी एक प्रतिनिधी मला जाब विचारू शकत नाही.
चैत्रगंधा, अगदी सहमत
चैत्रगंधा, अगदी सहमत !
कायेना, इतर धर्मामधे काही संकल्पना आहेत, एक धर्मगुरू, एक ग्रंथ, इ. इ.
त्यामुळे त्यांना हिंदू धर्माचा व्यापक विचार कळत नाही.
मग ते म्हणतात की अरे आमच्या सारखा कसा नाहीये तुमचा धर्म ?
Pages