झपाटलेल्या म्हणून कुप्रसिद्ध असणा-या जागा सर्वत्र असतात. त्याबद्दल चर्चा, आख्यायिका असतात. कुठे कुठे स्थानिकांना किंवा पाहुण्यांना आलेले अनुभव याच्या कथा असतात. त्यावरून मग कुणी कुणी आव्हान म्हणून भेटही देतात. त्यांचे काही निगेटिव्ह अनुभव असू शकतात.
पुण्यातही अशा काही जागा आहेत. त्यातल्या दहा जागांचा एक व्हिडीओ सुरूवात करून देण्यासाठी शेअर करत आहे. पुणे आणि उर्वरीत जगातील तथाकथित झपाटलेल्या जागांसंबंधित अशा सर्व परस्परविरोधी बाबींचा, मतांचा धांडोळा इथे घेऊयात.
एखाद्या जागेबद्दल लिहीताना तिला क्रमांक देण्यात यावेत. म्हणजे जसं की पुण्यातल्या या दहा जागांच्या बाबतीत पहिले दहा क्रमांक. पुढे कुणाला नव्या जागेबद्दल लिहायचे झाल्यास
अनु. क्र. (स्पेस) गावाचे नाव / स्थळाचे नाव असं छोटेखानी शीर्षक देऊन त्याबद्दल लिहावं
उदा.
क्र. १ व्हिक्टरी सिनेमा (पुणे)
===================
यामुळे पुढे एखाद्याला मागे पडलेल्या जागेबद्दल संदर्भ देताना सोयीचे होईल.
सहकार्याबद्दल आपले सर्वांचे आभार.
आपली नम्र
हेमा शेखर पोतदार
नोट : जालावर अमूक तमूक ठिकाणच्या कुप्रसिद्ध झपाटलेल्या जागा असे अनेक व्हिडीओज आहेत. जर आपण देत असलेल्या जागांबद्दल अधिक माहीती म्हणून हा व्हिडीओ वापरायचा असल्यास हरकत नाही. पण जागांना अनुक्रम देण्यात यावेत.
जर व्हिडीओतल्या जागा एकापेक्षा जास्त असतील आणि नुसतीच लिंक द्यायची असल्यास व्हिडीओज ला क्रमांक देण्यात यावेत.
उदा.
व्हिडीओ क्र, अमेरिकेतील दहा कुप्रसिद्ध झपाटलेल्या जागा. हे क्रमांक वेग़ळे असावेत यासाठी क्र देताना
व्ही ०१, व्ही ०२ असे द्यावेत ही विनंती.
मुंबईला बांद्रा बँड स्टँड
मुंबईला बांद्रा बँड स्टँड भागाकडे जाणार्या रस्त्यावर एक गोलाकार बांधलेली इमारत बरीच वर्षे पडीक होती. ( हा भाग मुंबईतला पॉश एरिया. आपला तो "चिरतरुण" शाखा पण याच भागात राहतो. पण तरीही ती इमारत तशीच होती. आता तिथे काय आहे, कुणाला कल्पना आहे का ? ( मी ती १९८६ / ८७ ला बघितली होती. नंतर तिथे जाणेच झाले नाही. )
दादरच्या खांडके बिल्डींग
दादरच्या खांडके बिल्डींग बद्दल माहिती आहे का ?
खांडके बिल्डींग कायम गजबजलेली
खांडके बिल्डींग कायम गजबजलेली असते, तिथे काही असा प्रकार ऐकला नाही. आता ती पाडून नवी बांधताहेत तर तिथे काही जिवंत विहिरी सापडल्या एवढेच ऐकले. ( या इमारती अगदी भर रस्त्याच्या जवळच आहेत, भूतांना सोयीच्या नाहीत. पुर्वी तिथे रात्री १२ पर्यंत नाटकाची आणि मग पहाटे भाजीपाल्याची गर्दी असायची )
गोरेगाव पूर्वेत अशी एक
गोरेगाव पूर्वेत अशी एक झपाटलेली बिल्डिंग होती . तिचा उल्लेख कायम भुताची बिल्डिंग असा व्हायचा. होती म्हणायचं कारण आता त्या बिल्डिंगमधले सर्व फ्लॅट्स occupied आहेत
माझ्या लहानपणी या ह्या बिल्डिंगबद्दल बरेच ऐकले होते. ह्या बिल्डिंगच बांधकाम म्हणे खूप वर्षे रखडलेले . काम सुरु केले कि कामगारांचे मृत्यू ठरलेले वगैरे. पूर्वेत राहण्याऱ्या शाळा सोबतीना हमखास ह्या बिल्डिंग बद्दल विचारलं जायचं . ते हि असच काही बाही सांगायचे. आता यातलं किती पत खर खोटे माहीत नाही . मला वाटत भ्रमर अधिक माहिती देऊ शकतील
खांडके बिल्डींग नाही. सैतान
खांडके बिल्डींग नाही. सैतान बिल्डींगचे वरचे दोन मजले.
भूत दुसरीकडे जातात किंवा गायब
भूत दुसरीकडे जातात किंवा गायब होतात याचे कारण भूतनाथ सारखा एखादा चांगला भूत असू शकेल.
(No subject)
मला भुतांची भिती
मला भुतांची भिती वाटते.
झपाटलेल्या जागांसारखे येथील काही धागे (बीबी) झपाटलेले असू शकतात काय? कुणी यावर संशोधन केले आहे का?
तशा धाग्यांची माहिती आधीच मिळाली तर तिकडे जायला नको.
इथ्ल्या काहि आयडि सुद्द्दा
इथ्ल्या काहि आयडि सुद्द्दा झपाट्लेल्या असु शकतील ना?
कोप-यातल्या वाट्या चमचे यांची
कोप-यातल्या वाट्या चमचे यांची भीती वाटू लागली आहे. तारुण्यपीटिका सुद्धा झपाटलेल्या असतात, कारण त्यात एक काळे बी असते असे नुकतेच कळाल्यापासून भीती वाढली आहे.
कुणाला मुंबईतल्या धारावी मधला
कुणाला मुंबईतल्या धारावी मधला पिवळा बंगला आठवतोय का ?
पुर्वी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स नव्हते त्यावेळची गोष्ट. तिथे ड्राईव्ह इन थिएटर होते. आणि तिथून बस निघाली कि थेट धारावी पर्यंत स्टॉप नव्हता ( ३७१ बस ) आता आहेत तश्या इमारतीही नव्हत्या. ( ते तिवरांचे जंगल पक्ष्यांचे अभयारण्य होते ) तिथल्या वळणावर भडक पिवळ्या रंगात रंगवलेला एक बंगला होता ( त्यावर लाल अक्षरात पिवळा बंगला असे लिहिले होते ) तिथे थोडा राबता असायचा, गराजही होते वाटतं. तरी ती जागा भयाण वाटायची. नंतर तो बंगला भर वस्तीत आला. यावेळेस दिसला नाही तो.
Pages