झपाटलेल्या जागा

Submitted by हेमाशेपो. on 7 November, 2015 - 01:43

झपाटलेल्या म्हणून कुप्रसिद्ध असणा-या जागा सर्वत्र असतात. त्याबद्दल चर्चा, आख्यायिका असतात. कुठे कुठे स्थानिकांना किंवा पाहुण्यांना आलेले अनुभव याच्या कथा असतात. त्यावरून मग कुणी कुणी आव्हान म्हणून भेटही देतात. त्यांचे काही निगेटिव्ह अनुभव असू शकतात.

पुण्यातही अशा काही जागा आहेत. त्यातल्या दहा जागांचा एक व्हिडीओ सुरूवात करून देण्यासाठी शेअर करत आहे. पुणे आणि उर्वरीत जगातील तथाकथित झपाटलेल्या जागांसंबंधित अशा सर्व परस्परविरोधी बाबींचा, मतांचा धांडोळा इथे घेऊयात.

एखाद्या जागेबद्दल लिहीताना तिला क्रमांक देण्यात यावेत. म्हणजे जसं की पुण्यातल्या या दहा जागांच्या बाबतीत पहिले दहा क्रमांक. पुढे कुणाला नव्या जागेबद्दल लिहायचे झाल्यास

अनु. क्र. (स्पेस) गावाचे नाव / स्थळाचे नाव असं छोटेखानी शीर्षक देऊन त्याबद्दल लिहावं

उदा.

क्र. १ व्हिक्टरी सिनेमा (पुणे)
===================

यामुळे पुढे एखाद्याला मागे पडलेल्या जागेबद्दल संदर्भ देताना सोयीचे होईल.
सहकार्याबद्दल आपले सर्वांचे आभार.

आपली नम्र

हेमा शेखर पोतदार

नोट : जालावर अमूक तमूक ठिकाणच्या कुप्रसिद्ध झपाटलेल्या जागा असे अनेक व्हिडीओज आहेत. जर आपण देत असलेल्या जागांबद्दल अधिक माहीती म्हणून हा व्हिडीओ वापरायचा असल्यास हरकत नाही. पण जागांना अनुक्रम देण्यात यावेत.

जर व्हिडीओतल्या जागा एकापेक्षा जास्त असतील आणि नुसतीच लिंक द्यायची असल्यास व्हिडीओज ला क्रमांक देण्यात यावेत.

उदा.

व्हिडीओ क्र, अमेरिकेतील दहा कुप्रसिद्ध झपाटलेल्या जागा. हे क्रमांक वेग़ळे असावेत यासाठी क्र देताना

व्ही ०१, व्ही ०२ असे द्यावेत ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातील कुप्रसिद्ध दहा जागा

https://www.youtube.com/watch?v=Cz9NKhaoBZw

१. व्हिक्टरी सिनेरी, पुणे कँप

इथे खूप जणांना पांढ-या साडीतली एक बाई दिसते. मला डोअरकीपरने पण सांगितलं होतं. पण त्याला स्वतःला दिसलेली नाही. मी पण बरेच सिनेमे (शेवटचा शो सुद्धा ) पाहीले पण अनुभव नाही आला. पण सांगणारे बरेच आहेत/

२. गगनपुरम सोसायप्रस
इथे लुंगीतला एक मनुष्य दिसतो आणि अचानक गायब होतो असं म्हणतात. काही जणांचा दावा आहे की तो शनिवारी हमखास दिसतो. तर काहींनी अमावस्या असं सांगितलंय.

३. पुन्हा पुणे कँपातलाच तो कुप्रसिद्ध बंगला. इथे जाण्याच्या अनेकांनी पैजा लावल्या आहेत. सध्या ही प्रॉपर्ती विकली गेली आहे असे म्हणतात. इथे एक म्हातारी हडळ आहे असं म्हणतात. बाहेरूनच हा परीसर उदासवाणा वाटतो. आत पाऊल टाकण्याची हिंमत होत नाही. मुक्तपीठ कम्युनिटीवर काहींनी इथे येण्यासाठी पैजा लावून दिवस निवडला होता. तिथेच त्यांनी घबराट उडाल्याचे कबूल केले होते. निगेटीव्ह अनुभवांबाबत अजून तरी माहीती नाही.

४. सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज

याबद्दल फारशी माहिती नाही. पण अलिकडे एका आत्महत्या केलेल्या मुलाच्या भूताची माहिती सोशल मीडीयावर आढळते. प्रत्यक्षात कुणाशी बोलणे झाले असल्यास इथे माहीती द्यावी. पण ही जागा अल्पावधीतच कुप्रसिद्ध झालेली आहे हे पण खरंय.

५. इस्कॉन टेंपल जवळील पडकी बंगली, पुणे कँप

ही जागा धोकादायक आहे त्यामुळं तिथे जाऊ देत नाहीत. मी जाऊन पाहीलं तेव्हां सिक्युरिटी गार्ड वगैरे दिसला नाही. लुंकड चा बोर्ड लागला आहे. आजूबाजूची जागा खूपच जुनाट आहे. शेवाळं आहे सर्वत्र. त्यामुळे भीतीचं वातावरण सुरू होतं. आत जाऊ नये असं वाटलं. पुढच्या वेळी जाण्याचा विचार आहे.

६. सेनापती बापट रोड -

रात्री बेरात्री दिसणा -या गायीचं भूत.

७. चंदन नगर

एका बांधकाम साईटवर एका मुलीचा मृत्यू झाला होता. ती मुलगी तिच्या बाहुली सोबत दिसते. इथे एक सॉफ्टवेअर कंपनी होती. कंपनीने जागा सोडली आहे. सध्या ही जागा विकण्यासाठी उपलब्ध आहे. त्या संदर्भात आतून पाहिली. २०००० स्क्वे फूट जागा आहे. बाहेरून शुभ्र पांढरी असणारी आणि उत्तम वास्तुसौंदर्य असणारी ही वास्तू सुनसान असल्याने आतून भीतीदायक वाटते. जागा दाखवायला गार्ड आत आला नाही. एजंटनेच दाखवली.

गार्डला बरेच प्रश्न विचारले पण त्याने एकाचंही उत्तर दिलं नाही.

८. एम जी रोड

वर्दळीच्या समजल्या जाणा-या एम जी रोडवर एक झपाटलेली वास्तू आहे. कँपातच अशा वास्तू जास्त का बरे ? माझे काका इथल्या सेंट्रल बँकेत असल्याने लहानपणापासून ऐकलं होतं. पण अनेकदा कँपात जाऊनही बाहेरून तरी दर्शन घ्यायचं राहूनच जातंं. व्हिडीओत आहेत डिटेल्स.

९. शनिवार वाडा

मस्तानीच्या समाधी जवळ झोपले असता रात्री (अमावस्या) नारायणराव पेशव्यांचा काका मला वाचवा असा आवाज येतो असं म्हणतात. तिथल्या वॉचमन ला विचारले तर आम्हाला नाही ऐकू आले असं म्हणाला.

१०. वेड्यांच्या इस्पितळाची विस्तारीत शाखा , एअरपोर्ट रोड (जुना), येरवडा.

इथे एक भूतबंगला याच नावाने प्रसिद्ध असणारी एक वास्तू होती. ती झपाटलेली म्हणून या पूर्ण पंचक्रोशीत कुप्रसिद्ध होती. ती एका जोडप्याने विकत घेतली. रहायला आल्यावर एके दिवशी त्याच्या कानाखाली कुणीतरी मारल्यासारखं वाटलं म्हणून त्याने पाहीलं तर त्याची बायको हवेत तरंगत होती. नंतर मुलं सुद्धा हवेत तरंगू लागली. इथे दहा एक लोकांना असे अनुभव आल्यानंतर कुणी जागा घ्यायला आलं की आजूबाजूचे लोक त्यांना विरोध करू लागले. तिथे पाटीही लावण्यात आली होती. पण बिल्डरने काढून टाकली. गुंजन सिनेमाच्या जवळ आहे हे ठिकाण. लहान असताना इथून जाताना भिती वाटायची.

त्या वेळी आजूबाजूला सुनसान भाग होता. आता मात्र हा रस्ता वर्दळीचा आहे. इथे अनेक वर्षं वेड्यांचे इस्पीतळ होते. मेंटल हॉस्पीटल मधून काही कैदी इथे ठेवण्यात येत असत. इतक्यात भेट दिलेली नाही. येत्या काही दिवसात अपडेट करीनच.

( ही जागा व्हिडीओत नाही. त्यातल्या एका जागेबद्दल फारशी माहीती नसल्याने ही जागा इथे दिलेली आहे).

बी
तुम्हाला सिंगापूर मधल्या जागा माहीत असतील तर त्या पोस्टच्या जागी लिहा. वाचायला मजा येईल. या धाग्याचा हेतू मनोरंजन असा असून अंधश्रद्धा वगैरे नाही. तरी देखील त्याबद्दलच्या चर्चा, पोस्ट्स स्वागतार्ह आहेत. दावे खोडून काढण्याळा मनाई नाही. Happy

सहमत!
आजकाल भुतांचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढलेय, आणि गेल्या दहा-पंधरा दिवसापासून तर उच्छाद मांडलाय नुसता. कधी मुक्त करतील प्रशासक त्यांना या जन्ममरणाच्या फेर्‍यातुन ते देव जाणे.

अनु क्र. १० बद्दल थोडासा गोंधळ आहे मनात.

व्हाईट हाऊस समोर एक प्रसूती गृह आहे. भावाचे म्हणणे आहे की ती वास्तू होती भूतबंगला. तो पाडून हॉस्पिटल बांधलं. वेड्यांचं इस्पीतळ शेजारी आहे. मधून मागच्या सोसायटीला रस्ता जातो.

११. निजामपूरचा वाडा
================

कोकणात जाताना ताम्हिणी घाट मार्गे गेलं तर माणगावच्या अलिकडे निजामपूर गाव लागतं. इथे फिरताना हडळीच्या वाड्याबद्दल कळालं. लोक म्हणतात स्वस्तात मिळेल, पण खरेदी करणारं कुणी नाही. वास्तू बाहेरून दिसायला भयाण आहे. पण कपडे वाळताना दिसले. लोक म्हणाले एक बाई आहे, पण तिला काही त्रास होत नाही. तिला भुतं दुसत नाहीत म्हणून ती रहायला तयार झाली.

या वाड्यात हडळ असल्याचं लोक म्हणतात. एका मित्राने या वाड्यावरूनच भयकथा लिहायला घेतली होती, तिचं रुपांतर विनोदी कथेत झालं म्हणून त्याने ती टोपणनावाने खपवली.

नाही मला अशी काहीच माहीती नाही , पण बर्‍याच ठीकाणी गेल्यावर जाणवणारी अस्वस्थता अनुभवली आहे. "वी" टी.वी. की कुठल्याशा वाहीनीवर अशी एक मालिका पाहायचे , भीती वाटायची पण नक्की काय आहे हे जाणुन घेण्याची उत्सुकता म्हणुन प्रत्येक एपिसोड पाहायचे. आवडीचा विषय आहे हा.

माझे आजोबा मुंबईत असताना त्यांना जागा मिळत नव्हती. पण खांडके बिल्डींग या नावाने प्रसिद्ध असलेल्या इमारतीत एक ब्लॉक मिळाला. कारण त्या काळी इथे भूताचा वावर आहे असा समज होता. याबद्दल कुणाला काही माहीत असल्यास लिहावे.

१२. राजस्थान मधला भानगढचा किल्ला:
हा झपाटलेल्या समजला जातो, झपाटलेला म्हणुन प्रसिद्ध आहे. याचा टिव्हीवर शो आला होता.
पर्यटन स्थळ असले तरी इथे सूर्यास्त व्हायच्या आत सगळ्यांना बाहेर काढून किल्ला बंद करतात, कुणालाच मग आत जाण्यास परवानगी नसते.
इथली कथा:
एका जादुगाराचे राजकुमारीवर प्रेम होते. पण एकतर्फी. राजकुमारीने त्याला दाद दिली नाही. तेव्हा जादुगाराने काळी जादु वापरुन तिला वश करण्याचे ठरवले. हे राजकुमारीला कळल्यावर तिने त्याची हत्या घडवून आणली. मरणापूर्वी जादुगाराने कसलासा शाप दिला आणि आत्म्यांनी किल्ल्याला झपाटले.

फोटो लिंक आणि माहिती:
http://www.holidify.com/blog/most-haunted-places-in-india-asi-list/

खखोदेजा.

<<<<<१२. राजस्थान मधला भानगढचा किल्ला:
हा झपाटलेल्या समजला जातो, झपाटलेला म्हणुन प्रसिद्ध आहे. याचा टिव्हीवर शो आला होता.
पर्यटन स्थळ असले तरी इथे सूर्यास्त व्हायच्या आत सगळ्यांना बाहेर काढून किल्ला बंद करतात, कुणालाच मग आत जाण्यास परवानगी नसते.>>>>

झी टीवीवर ही सत्य कथेची अशी एक सीरीयल असायची त्यात या किल्ल्याबाबत जाँसी की रानी सीरीयल मधली नायिका हीचे अनुभव तिने सांगितले होते, तिची हेअर डीझायनर जी प्रेग्नंट होती तिला या किल्ल्यात काही बाही अनुभव यायचे शेवटी तिने आत्महत्या केली तिथेच असे काहीसे पाहिले होते त्या एपिसोड मधे. तो हाच किला होता बहुतेक. पण त्यात एका कामवालीचा मृत्युझाला होता खुप वर्षाआधी असं काहीसं सांगितलं गेलं होतं.

पुर्वी जेव्हा आम्ही तारापुरला शाळेत जायचो तेव्हा बसस्टॉप च्या इथे पारशीलोकांची बर्‍याच मोठ्या प्रमाणात वस्ती आहे पण घर पुर्ण पॅक कधी एकही दार किंवा खिडकी उघडी दिसायची नाही , क्वचित एखादा म्हातारा पारशी बाहेर आवरात खुर्चीत बसलेला दिसायचा. त्या भागात आणखी काही घरे बर्‍याच वर्षांपासुन बंद होती तिथे गेले की कमालीची अस्वस्थता जाणवायची. तसेच त्या भागात ब्राम्हणांची घरे ही होती अगदी ते गुप्त धन लपवलेले हंडे वगैरे अशी घरे तिथे गल्लीत गेलो तरी खुप अस्वस्थ व्ह्यायला व्हायचे.

वेड्यांच्या इस्पितळाची विस्तारीत शाखा , एअरपोर्ट रोड (जुना), येरवडा. >>>>> हेमाशेपो, तुम्ही लिहिलेल्या बंगल्याबद्दल माहित नाही काही पण तो सबंध रस्ता दिवसासुद्धा इतका उदास आणि भकास दिसतो की आपण कितीही चांगल्या मुडमध्ये असताना त्या रस्त्यावरुन गेल की एक कसलीशी हुरहुर लागल्यासारखी वाटू लागते नक्की कशाचा परीणाम आहे कोण जाणे.

बाकी तुम्ही म्हणताय ती जागा गुंजन सिनेमापासुन किती लांब आहे कारण सध्या गुंजन सिनेमाच्या अगदी बाजुला एक मोठी थिएटरवजा बिल्डिंग बांधण्यात आलीय.

करमणुक धागा आहे ना झाल मग ईब्लिसजीनी काढो की दुसर्‍याकुणी काय फरक पडतोय , ते निदान मीच शहाणा असे या धाग्यात भासवत तर नाहीयेत ना मग झाले तर

अनिरुद्ध_वैद्य,
मस्तानी तिच्या 'पाबळ' येथील समाधीतुन सहज फेरफटका मारायला येत असावी शनिवार वाड्यात. Proud

मुग्धटली,
गुंजन पासून अर्ध्या किमी अंतरावर आहे. व्हाइट हाउस सोसायटीच्या समोर.

आंग्रेके
त्या व्हिडीओला व्ही - १ असा क्रमांक द्या आणि त्यापुढे कोणती जागा वगैरे लिहा. जसं अमेरिकेतील कुप्रसिद्ध दहा झपाटलेल्या जागा वगैरे. वर हेडर मधे दर्शवलेलं आहे. सध्या मोबाईलवरून लॉग इन केल्याने व्हिडीओ पाहता येत नाहीये.

(व्हिडीओचा अनु क्र व्ही - १ या व्हिडीओसाठी. पुढच्यासाठी व्ही -२)

एक जागा अशी आहे जिला क्रमांक न देता फक्त उल्लेख करणार आहे. लहानपणी माझ्या गावात रानातल्या घरासमोर एक मातीचं पडकं घर होतं. त्या घरापासून पाचशे मीटर पेक्षा जास्त अंतर राखून एका बाजूला दहा एक घरं आहेत. मागच्या बाजूला साधारण एक किमी अंतरावर पन्नासेक घरं आणि डाव्या बाजूला तितक्याच अंतरावर एक ओस पडलेला भव्य वाडा.

मध्यभागी हे घर. उरलेल्या मोकळ्या दिशेला वावर. वावर सुमारे दोन तीन किमी. त्यानंतर ओढा आणि मग स्मशान.

आमच्या रानातल्या घराच्या ओसरीवर येऊन बसलं की ते घर दिसायचं.
तिथे एकदा सकाळी सकाळी गडबड दिसली. तर एक बकरी तिथे अरुंद बोळीत अडकून मेली होती. दोन तीन दिवस बकरीच्या करूण ओरडण्याचा (कि रडण्याचा?) आवाज येत होता. पण या घराकडे कुणी लक्ष दिलं नाही. दिलंच नसतं. ती पोटुशी असल्याचं कळल्यावर कुजबूज सुरू झाली. चुलता ओरडला कि बोळ इतकी अरुंद होती की त्यात फसल्यावर तिला वळताही आलं नसेल, पुढेही नाही मागेही नाही अशा परिस्थितीत ती मेली. लगेच अंदाज करू नका.

चुलता शहरी असल्याने कुणी काही बोललं नाही.
दुस-या दिवशी बायका त्या घराचा इतिहास सांगत होत्या. काही वर्षांपूर्वी इथेच एक पोटुशी बाई अशीच मेली होती. मग कुणीतरी विचारलं पण बोळ अरुंद आहे ना ?
त्यावर एका "जाणत्या" बाईने प्रश्न विचारला, बोळ असुदे गं अरुंद, पण पोटुशी बाई तिथं कशाला कडमडायला गेली ? आहे का उत्तर ?

असा प्रश्न बिचारला की आपल्याला एक तर काहीच माहीत नसतं. त्यामुळे गप्प बसणे आलंच. पण तर्क पन चुकीचा नाही. खेड्यातल्या बायका ब-यापैकी अंधश्रद्ध असतात. त्यामुळे पोटुशी बाई कशाला तिथे गेली ?

पण त्याचबरोबर काही कारणाने तिला तिथे नेऊन मारली असेल तर ? नोबडी नोज !!

पुण्यात प्रभात रोडवर एक बंगला होता, आजूबाजूला बंद कंपाउंड, रान वाढलेलं, बहुतेक गल्ली क्रमांक ६ किंवा ७ च्या कॉर्नरवर होता. नेहमी बंदच असायचा, कोणीही माणूस दिसायचं नाही. आम्हाला लहानपणी प्रचंड कुतुहल होतं त्या बंगल्याविषयी. कोणीतरी सांगितलं की त्याच्या मालकाचा गूढ मृत्यु झालाय त्यामुळे तिथे कोणी राहात नाही. खरेखोटे देव जाणे! आता तो बंगला शाबूत आहे का तो पाडून टॉवर झालाय काय जाणे. कोणाला अधिक माहिती असल्यास सांगावे.

तुम्ही म्हणता तोच बंगला असेल तर त्यावर एक सिनेमा निघालेला आहे.

ह-या ना-या झिंदाबाद !

निळू फुले आणि दादा कोंडके यांच्या भूमिका आहेत.

Pages