झपाटलेल्या जागा

Submitted by हेमाशेपो. on 7 November, 2015 - 01:43

झपाटलेल्या म्हणून कुप्रसिद्ध असणा-या जागा सर्वत्र असतात. त्याबद्दल चर्चा, आख्यायिका असतात. कुठे कुठे स्थानिकांना किंवा पाहुण्यांना आलेले अनुभव याच्या कथा असतात. त्यावरून मग कुणी कुणी आव्हान म्हणून भेटही देतात. त्यांचे काही निगेटिव्ह अनुभव असू शकतात.

पुण्यातही अशा काही जागा आहेत. त्यातल्या दहा जागांचा एक व्हिडीओ सुरूवात करून देण्यासाठी शेअर करत आहे. पुणे आणि उर्वरीत जगातील तथाकथित झपाटलेल्या जागांसंबंधित अशा सर्व परस्परविरोधी बाबींचा, मतांचा धांडोळा इथे घेऊयात.

एखाद्या जागेबद्दल लिहीताना तिला क्रमांक देण्यात यावेत. म्हणजे जसं की पुण्यातल्या या दहा जागांच्या बाबतीत पहिले दहा क्रमांक. पुढे कुणाला नव्या जागेबद्दल लिहायचे झाल्यास

अनु. क्र. (स्पेस) गावाचे नाव / स्थळाचे नाव असं छोटेखानी शीर्षक देऊन त्याबद्दल लिहावं

उदा.

क्र. १ व्हिक्टरी सिनेमा (पुणे)
===================

यामुळे पुढे एखाद्याला मागे पडलेल्या जागेबद्दल संदर्भ देताना सोयीचे होईल.
सहकार्याबद्दल आपले सर्वांचे आभार.

आपली नम्र

हेमा शेखर पोतदार

नोट : जालावर अमूक तमूक ठिकाणच्या कुप्रसिद्ध झपाटलेल्या जागा असे अनेक व्हिडीओज आहेत. जर आपण देत असलेल्या जागांबद्दल अधिक माहीती म्हणून हा व्हिडीओ वापरायचा असल्यास हरकत नाही. पण जागांना अनुक्रम देण्यात यावेत.

जर व्हिडीओतल्या जागा एकापेक्षा जास्त असतील आणि नुसतीच लिंक द्यायची असल्यास व्हिडीओज ला क्रमांक देण्यात यावेत.

उदा.

व्हिडीओ क्र, अमेरिकेतील दहा कुप्रसिद्ध झपाटलेल्या जागा. हे क्रमांक वेग़ळे असावेत यासाठी क्र देताना

व्ही ०१, व्ही ०२ असे द्यावेत ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात बहुतेक निळू फुले, राम नगरकर, सरला येवलेकर होते. एक गिरणीचं गाणं होतं त्यात. सार्वजनिक गणेशोत्सवात वाडी दाखवला होता हा सिनेमा. अंधुकसा आठवतोय. अर्धा सिनेमा किनतानावर झोपून गेले होते Proud

हार्‍या नार्‍यात दादाकोंडके कुठून आले मध्येच?<<<<
काहीही... यांच्यात काय साम्य आहे?<<<<

रॉबीन Lol

एक गिरणीचं गाणं होतं त्यात.<<<<
कशी नखर्‍यात चालतीया गिरणी.. जयवंत कुलकर्णींनी गायलं होतं.

निळू फुले आणि राम नगरकर होते हर्‍यानार्‍या मध्ये.

अरुण सरनाइक, अशोक सराफ, दादा यांच्यातला फरक नाही कळायचा.<<<<
ते पुरुष होते हे सोडून त्यांच्यात बाकी काहीही साम्य नव्हते.

ते पुरुष होते हे सोडून त्यांच्यात बाकी काहीही साम्य नव्हते.>>> आणि त्यांना कधी मिशी असायची तर कधी नसायची...हे पण साम्य आहे Proud

मालवणला आता जिथे साळगावकरांनी गणपतीचे देऊळ बांधलेय तिथून वेळेवर ( मालवणी भाषेत समुद्र किनार्‍यावर ) जो रस्ता जातो तो मेढा. त्याच भागात आमचे घर होते. पण तिथे एक पडके घर होते. बरीच वर्षे कुणी तिथे जातयेत नसे. आम्हा मुलांना मात्र तिथून जाताना अगदी भर दिवसाही भिती वाटायची. नंतर बर्‍याच वर्षांनी मी त्या रस्त्यावरून गेलो, ते घर आणखीनच पडले होते पण भिती नाही वाटली.

याच रस्त्यावरून चांभारणीच्या वेळेकडे ( अर्थ तोच ) एक बोळ जातो. या बोळाच्या शेवटी ब्रम्हदेशाच्या राजाराणीची समाधी आहे, तिथे एक आडवे वाढलेले नारळाचे झाड आहे. तिथल्या समुद्रकिनार्‍यावर आम्हाला पोहायची बंदी होती ( कारण तो खुप खोल आहे आणि त्यात भोवरें आहेत. ) तिथून पुढे एक पडके चर्च होते ( ते आता नव्याने बांधलेय ) तो भागही अगदी भरदुपारी भयानक वाटायचा. त्या चर्चकड तर मी कधी फिरकलोही नाही. आता कदाचित तिथे वर्दळ असणार.

दिनेशदा , मालवणला ब्रम्हदेशाच्या राजाराणीची समाधी????????

हो ! त्यांना रत्नागिरीला बंदीवासात ठेवले होते. त्याबद्दल रॉबिनहूडचा सविस्तर लेख आहे इथे.

मालवणला ब्रम्हदेशाच्या राजाराणीची समाधी????????>>>>>>>>>> अहो जशी शनिवार वाड्यात मस्तानीची समाधी आहे तसंच असेल काही Happy

दिनेमाल,
मालवणला गेलं की सापडेल का ती जागा ? तिथे कुणाला अनुभव वगैरे ?
झपाटलेली असल्यास अनु. क्रं द्याल प्लीज

तुमच्या भ्रमंतीत देशोदेशीच्या अशा काही जागांना भेट दिली आहे का ?

ह्या अनुभवाबद्दल मायबोलीवर आधी लिहिले आहे का ते आठवत नाही.
२००५मध्ये आम्ही अमेरिकेतील टेनेसी राज्यातील चॅटनूगा ह्या गावाला भेट दिली होती. तिथल्या सुप्रसिद्ध लूकआऊट माऊंटनवर एका जुनाट इनमध्ये आम्ही राहिलो होतो. तिथल्या करकरणार्‍या फरश्या, जुनाट फर्निचर, खोलीतले मिणमिणते पिवळे दिवे आणि खोलीबाहेरच्या दाट झाडीत रात्री 'शूऽक शूकऽऽशूक' असे भितीदायक ओरडणारे रातकिडे ह्यामुळे तिथला अनुभव गंमतशीर होता पण झपाटलेला अनुभव त्या इनमधला नाही Happy त्या कॉटेजला टेनेसी नदी आणि डाऊनटाऊनचा सुंदर व्ह्यूही होता.

तर पहिल्या दिवशीच्या रात्री उशीरा अंधार पडल्यावर डाऊनटाऊन चॅटनूगातून जेवून-खाऊन आम्ही लूकआऊट माऊंटनवरच्या आमच्या कॉटेजमध्ये यायला निघालो. तिथले रस्ते माहीत नसल्याने अर्थातच आम्ही पूर्णपणे जीपीएस सिस्टीमवर भिस्त ठेवून होतो. डोंगर चढायच्या सुरुवातीला एका ठिकाणी जीपीएसने आम्हाला सरळ रस्ता घ्यायला सांगितला पण डोंगरावर जाणारा तो रस्ता स्वाभाविकपणे उजवीकडे वळत होता, तसाच चुकून घेतला गेला. रस्त्यावर किर्र अंधार, तुरळक गाड्या आणि डोंगरावरची वळणं ! जीपीएस प्रत्येक वळणावर रस्ता चुकल्याचं आणि रिराऊट करत असल्याचं सांगू लागला. गाडी थांबवायला, रिव्हर्स घ्यायला जागा नव्हती. आम्ही पुढेपुढे जात राहिलो. कुठून ती पहिली डायरेक्शन चुकवली असं झालं होतं. अचानक एका वळणावर आमचं कॉटेज समोर आलं आणि हुश्श्य झालं !

दुसर्‍या दिवशी दुपारी गावातून परत त्याच रस्त्याने येताना आम्ही तो सरळ रस्ता अगदी पक्का लक्षात ठेवला. त्या रस्त्यावर गेल्यावर पुढे दोन्ही बाजूंनी घरं होती पण ओस पडलेली वस्ती होती. टोटल शुकशुकाट ! एकही घर राहतं नाही. काही दारांवर तर चक्क वेली चढल्या होत्या. त्या गल्लीच्या टोकाशी पोचल्यावर मॅप अजूनही सरळच जायला सांगत होता पण रस्ता तर तिथे संपत होता. पुढे जंगल होतं. परत फिरायला म्हणून रिव्हर्स गियर टाकला तर गाडीसमोर चक्क काळंकुट्टं मांजर आलं. तिथला तो सन्नाटा भर दुपारी सुद्धा आमच्या अंगावर आला. काल रात्री रस्ता चुकलो ते किती बरं झालं हे जाणवून आम्ही परत एकदा हुश्श्य केलं Happy

सिंगापुर ला अश्या बर्याच जागा आहेत. त्यात बेडोक reservoir ही मला माहित असलेली जागा.

आजुनही सिंगापुर मधील म्हातारे चायनीज अमावसेला आणि पित्रुमासात ह्या भागात जाउ नका असा सल्ला देत असतात. काही लोकाना तिथे भुते दिसलेली आहेत. मला तरी नाही दिसली. Happy (चायनिज मध्ये पुर्ण महिना पाळतात आणि त्याला hungry ghost असे म्हणतात. )

@ किरू

लहानपणी खरंचच पहिल्यांदा पाहीलेले चेहरे वेगळे ओळखू येत नाहीत. आमच्याकडे दोन तीन वर्षांनी चांगला सिनेमा यायचा. त्यामुळं आधी शशीकपूरचा आ गले लग जा हा सिनेमा पाहिला आणि नंतर अमिताभचा कुठला तरी पाहिला. अमिताभच्या सिनेमात आम्ही सगळे बच्चे लोक ओरडलो , :"शशीकपूर "

कधी कधी आइच्या कडेवरचं एकदम लहान मूल कुणालाही पप्पा म्हणतं हा प्रसंग तर कॉमन आहे. मूल आईला लक्षात ठेवतं. नंतर इतर. असो. नाहीतर इथेच मुलांचं संगोपन सुरू व्हायचं..

भल्ताच इनोदी धागा ! त्यामुळे एरव्ही सिरिअस व चरित्र भूमिका करणारे कलावंतही येथे विनोद मूर्तीच्या भूमिका करीत आहेत.

येऊ द्या आणखी येऊ द्या.

हेमा'ताई' तुमचा उद्देश सफल झाला आहे यात शंका नाही

अग्गबाई ! काय हे ? लगे हाथ नाम भी फोड दिया Sad

राहूजी
तुमचा प्रॉब्लेम अजूनही लक्षात नाही आला मला. त्यासाठी विपूतही विचारलं होतं. पण तुम्ही उत्तरच नाही दिलं. तुमच्या मते इथे काही अनैतिक, बेकायदेशीर असं काही चालू असेल किंवा नियमात बसणारं नसेल तर प्रशासकांना सांगून धागा परस्पर उडवला तरी माझी हरकत नाही. बाकी तुमची मर्जी !

कृपया लोक मूर्ख बनतात वगैरे नकोच प्लीज.
नवल मासिक केवळ अशाच कथांना वाहीलेलं असतं तरी ते खपतं .

१३) आळंदी रत्याला साठे बिस्कीट कंपनी (आता बिग बझार) च्या अलीकडे ओढ्यावरचा एक पूल आहे. पूर्वी या पुलावर एका मुलीचं भूत दिसतं असं खूप लोक म्हणत. तिथे अपघात देखील व्हायचे नियमित. इथेच राणकापूर दर्शन या इमारतीत ममता हॉस्पिटलच्या वर राहणा-या चौहान अंकल या माझ्या परिचितांच्या भावाचा अमावस्येला जीवघेणा अपघात झाला. त्याच जागेवर महिन्यापूर्वी एक अपघात झाला होता. अशाच पद्धतीने.

हे किस्से खरे आहेत असा कुठलाही क्लेम केलेला नाही. तसं हेडर मधे स्पष्ट केलेलं आहे. गावी निवांत बसल्यावर असा विषय निघतो त्या स्वरूपाचा धागा आहे. फक्त जागेबद्दलची वदंता खरी असावी एव्हढीच अपेक्षा आहे. तिचं पोस्टमार्टेम करायला बंदी नाही... हेडर मधे दिलेलंच आहे.

>>>> तिचं पोस्टमार्टेम करायला बंदी नाही... हेडर मधे दिलेलंच आहे. <<<<<
त्यामुळेच तर दातखीळी बसली आहे ना.... Proud
अहो एखाद्या "प्रॉपर्टी" बद्दल भुताखेतांच्या कहाण्या सांगितल्या तर अफवा पसरवत असल्याच्या गुन्ह्याखाली एकीकडून प्रॉपर्टीचे मालक, व दुसरीकडून असल्यानसल्या कायद्यांनिशी अन्निसवाले तुटून पडतील, त्यांचे काय करायचे? Wink
तुमचे ठिक आहे हो..... डमी नाव, गाव पत्ता, बाकी काही उघड नाही... आमचे तसे नाही ना..

मला स्वतःला कधी तसे काही दिसत नाही, मी वर मालवणमधल्या ज्या जागांबद्दल लिहिले आहे त्या लहानपणी बघितल्या. बहुतेक सोबतच्या चुलत भावंडानी भितीही घातली असेल.

मस्कतमधे ( सल्तनत ऑफ ओमान ) मधे मात्र अशी एक इमारत माझ्या घरासमोरच होती. ( मत्राह हाय स्ट्रीट, खीमजी फर्निचर मार्ट च्या बाजूची बिल्डींग ) त्या इमारतीत लोकांना विचित्र अनुभव आले, कुणी तिथे रहायला तयार होईना. मग रॉयल ओमान पोलिसातले काही अधिकारी तिथे एक रात्र राहिले, त्यांनाही तसाच अनुभव आला. उद्घाटनाला लावलेल्या दिव्यांच्या माळाही काढायला कुणी कामगार तयार होईना. नंतर बरीच वर्षे ती इमारत तशीच रिकामी होती. आजूबाजूच्या इमारतीत लोक रहात होते. गेल्या वर्षी बघितले तर आता लोक राहतात तिथे... भूते दुसरीकडे गेली असतील. अशीच एक इमारत मस्कतमधल्याच कोर्निश भागातही होती. ती इमारत पाडून तिथे एक हॉटेल बांधले तेही चालले नाही.

Pages