सिंगापुरमधील दिवाळीची सजावट

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा. इथे मलाच एकट्याला दिवाळीचे इतके वेध का लागले आहे कळत नाही!!!! छे!! सिंगापुरमधे तर दोन महिन्यापासूनच दिवाळीची सजावट पुर्ण झालेली असते. सरंगून आणि रेस कोर्स रोडवरची रोषणाई बघून तुम्हाला दिवाळीची सुरुवात खूप एक दोन महिन्यांपासूनच वाटायला लागते. ह्या सजावटीची काही दृष्ये:

दिपमाळांची ही कॅनोपी...

वरची होती २०१० मधली .. तर ही २०१५ मधली:

दरवर्षी एक विलेज भरते. इथले वातावरण खूपच सात्विक असते. कुठेच तुम्हाला मास वगैरे विकत मिळणार नाही.

हा मी.. मला बघून काहीजणांनी 'भेट तू कधीतरी मग दाखवतो" असे म्हंटले असेल Happy ते हे आपले त्यांनी तर नक्कीच म्हंटले असेल.

प्रकार: 

थर्मोकोल, प्लास्टिक, मॅन मेड केमिकल्सचे रंग ( हे सर्व मेड इन चायना असेल तर त्या मॅनु, प्रॉसेस ला काहीही रेगुलेशन नसणार, ) हे वापरुन बनवलेले भरम्साठ पदार्थ दिसायला कितीही चकचकीत दिसले तरी ते सात्विक ? हजारो / लाखोंच्या डॉलर्स किमतीच्या जीवनावश्यक नसलेल्या, अन काही(च) दिवसात लँडफिल मधे जाणार्‍या वस्तू विकल्या जातात ते सात्विक वातावरण ? >>>

२०१३ चे सिंगापुर चे दिवाळी डेकोरेशन हे ९०% गोष्टी रीसायकल करुन बनवले होते. त्यात ५०,००० जुन्या CD, भंगारर्वाल्याकडुन घेतलेले जुने सामान वगैरे गोष्टी वापरल्या होत्या. CD वरचे डेकोरेशन मतिमंद मुलाकडुन करुन घेतले होते. त्यामुळे ती मुले पण खुप खुश झाली होती. ( माझ्या बायकोने त्यासाठी समाजसेवा केली होती म्हणुन हे माहित.) त्यानंतर सिंगापुर सोडल्याने अत्ता काय करतात ते माहित नाही.

विजेचा अप्व्यय तर मायबोली वर पण करतो.

साडेसातीचा खूपच त्रास होतो आहे.>> त्रास करुन घेतलास तर सगळ्याचाच होईल,
काय्म गोष्टि स्वतःवर ओढुन त्या तुटेस्तोवर ताणतोस मग त्रास झालास की इतराना बोल लावतोस... नॉट गुड! मागेही तु फार पर्सनल रिमार्क दिले होते जे वाचुन मलातरी वाईट वाटल..(.वरही तु तेच करतोयस,)

(हे रिमार्क माबोवर परत परत फिरुन येणार्‍या ड्यु आय कडुन आले अस्ते तर इतकही लिहल नसतच... तु माबोवर बरयाच आधिपासुन आहेस म्हणून एवढ लिहलय..).

हे आतरजाल आहे , खर आयुष्य नाही

दिवाळिच्या शुभेच्छा!

बी दिवाळीच्या तुम्हालापन खुप सार्‍या शुभेच्छा..
तुम्ही खरच बहोतच तरुण दिसता .. सहिए.. तुम्हाला बघुन कुणीच तुम्हाला पन्नाशीचे म्हणणार नै हे तर नक्कीच..

तुम्हाला बघुन कुणीच तुम्हाला पन्नाशीचे म्हणणार नै हे तर नक्कीच

>>

हे मात्र खरं हं! अगदी पंचविशीतले दिसता तुम्ही.

>>
दरवर्षी एक विलेज भरते. इथले वातावरण खूपच सात्विक असते. कुठेच तुम्हाला मास वगैरे विकत मिळणार नाही.
<<

दिवाळीच्याच काय की इतर कोणत्या सणाच्याही बाजारात मांस्/मच्छी विकत नसतात.

<<<<<< बेफि मी रोज योगाभ्यास करतो. प्राणायाम सुद्धा. त्यामुळे मी पन्नासचा वाटत नाही.>>>>

बी, तुम्ही वर डकवलेल्या तुमच्या फोटोवर तारीख १५/१०/२०१० आहे. पाच वर्ष जुना फोटो आहे असं दिसतय.

Pages