कुर्गी पापुट्टू

Submitted by दिनेश. on 1 November, 2015 - 16:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष्क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष्क्ष

वाढणी/प्रमाण: 
सहा ते आठ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
अर्थातच बीनांटी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार.
टण्या, अगदी गोड नाही होत. त्याशिवाय सोबत घेतलेल्या कॉफि किंवा मसालेदार पदार्थांशी त्याची छान गट्टी जमते.

परत आभार, कुर्ग प्रांतात पुर्वी फारसे बाहेरचे लोक जात नसत. घरेही खुप लांबलांब अंतरावर, घनदाट जंगल, अपुरे रस्ते, भरपूर पाऊस म्हणून असेल. आता त्यामानाने परिस्थिती बरी आहे. एकदा जायला पाहिजे मला.

ब्रेकफास्टला खाताना त्यावर मध ( तोही तिकडचा खास असतो ) आणि तूप घालून घेतात.>>> अहा!
बाकी करणं आणि मांडणं नेहमीप्रमाणे सुबकच.

तांदूळ घालून अगदी भरड वाटा ( इडली रवाही असाच थोडा भरडून घ्या )>>> इडली रवा नाही ना घ्यायचा?

पराग, पुट्टु वेगळे आणि पापुट्टु वेगळे.
पापुट्टु खास कुर्गी लोकांची स्पेश्यालिटी आहे.

पुट्टू लाडवासारखे गोल किंवा एक सिलींडरसारखं लांब भांड असतं त्यात केळीच्या पानांच्या रोलमध्ये तांदणाचं बॅटर घालून पण करतात.

(इकडे लहान गोलमटोल मुलालाही 'पुट्टू' म्हणतात. ) Wink

पुट्टू लाडवासारखे गोल किंवा एक सिलींडरसारखं लांब भांड असतं त्यात केळीच्या पानांच्या रोलमध्ये तांदणाचं बॅटर घालून पण करतात.>>> ते केरळी लोक पण करतात. ही रेसिपी पुट्टूचा तांदूळ वापरून कदाचित करता येईल.

आमच्या समोरच्या राव आंटी बरीच वर्षं मडीकेरीला राहिल्या होत्या. त्यांच्याकडून काय काय अफलातून् डिशेस खायला मिळाल्या. कूर्गी कॉफीचं वेड त्यांच्यामुळेच लागलं/

कुर्ग प्रांतात पुर्वी फारसे बाहेरचे लोक जात नसत. घरेही खुप लांबलांब अंतरावर, घनदाट जंगल, अपुरे रस्ते, भरपूर पाऊस म्हणून असेल. आता त्यामानाने परिस्थिती बरी आहे>>> उत्तम आहे असं म्हणयला हवंय. टूरीस्ट डेस्टिनेशन म्हणून कर्नाटक सरकारने या भागाला उत्तम उदयाला आणलंय. (कर्नाटक सरकार टूरीझमसाठी जितकं करतं त्याच्या काही टक्कीसुद्धा महाराष्ट्र सरकार करत नाहे!!)

नंदिनी.. ज्यावेळी बीनांटी तिथे रहायला जायचा विचार करत होत्या, त्यावेळी तर खुपच वाईट परिस्थिती होती. ( त्या मुंबईतच वाढल्या होत्या ) मग कृपाला म्हैसूरला शिकायला ठेवले होते. माझे आईबाबा गेले होते, त्यावेळी रस्ते नव्याने बनत होते. आता पर्यटक पण जातात असे दिसते आहे.

कुर्गी लोक दिसायलाही फार देखणे असतात.

दिनेश, तुम्ही नक्की कुठल्या सालाबद्दल बोलत आहात ते माहित नाही. मी २०११ मध्ये गेले होते. दोन अडीच वर्षं आम्ही मंगळूरलाच होतो, त्यामुळे या भागामधेय दोन तीनदा जाणं झालं होतं. तेव्हापासून टूरीस्ट डेस्टीनेशन म्हणून माहित आहे, या भागामधेय होम स्टे ही संकल्पना खूप हिट आहे, आणि बहुतेक घरांमधली लोकं एक्स्ट्रा इन्कम म्हणून टूरीस्टसाठी खास दोन चार खोल्या बांधून घेतात. शिवाय घरामध्येच खास घरगुती कूर्गी जेवण बनवून एकदम ऑथेंटीक फील आणतात.

हो, कूर्गी लोकांचा एकंदर लूक इतर कर्नाटकी लोकांपेक्षा खूप वेगळा आहे, आणि ते बरेच्दा देखणे असतात.

२०११ म्हणजे अलिकडेच कि, बीना आंटी बहुतेक १९७८ / ७९ ला तिकडे रहायला गेल्या. माझे आईबाबा १९८३ /८४ दरम्यान गेले होते त्यांच्याकडे.

दिनेश, आता खुपच फरक पडलेला दिसतो कुर्गमध्ये...

गेल्या वर्षी म्हणजे २०१५ डिसेंबरला कुर्ग ला ६-७ दिवस होतो...बरीच मंडळी होती...महिंद्र क्लबमध्ये, पण आम्ही स्थानिक जेवणही वेगवेगळ्या ठिकाणी खाल्ले...फिरलो हि बरेच...अतिसुंदर असा प्रदेश...अखंड मडीकेरी जिल्ह्यात कुठेही AC नाही...शेतीची जमिन जराही फुकट घालवलेली नाही....

(नंदिनी....उत्तम आहे असं म्हणयला हवंय. टूरीस्ट डेस्टिनेशन म्हणून कर्नाटक सरकारने या भागाला उत्तम उदयाला आणलंय. ) अगदी १०० ट्क्के खरय....

बरं....वरील दिसणार्या प्रकारच्या भाताला मी लहान असल्यापासुन करपा भात म्हणायचे...म्हणते....मला खुप आवडतो असा भात... आणि आता वरची डाळ-भात आता माझ्याकडे झालीच म्हणुन समजा....मस्त....सुन्दर.... Happy

Pages