<< पुण्यात दिवाळीत वाजणारे फटाके कुठे घ्यावेत? >>

Submitted by प्रसाद. on 31 October, 2015 - 10:36

५ आणि ६ नोव्हेंबरला पुण्यात येत आहे. बाजीराव रोडला उतरणार आहे.
तिथुन सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी दिवाळीत वाजवायचे फटाके मिळण्याची चांगली ठिकाणे कोणती?
लवंगी (घरगुती नसले तरी चालतील), नाचणार्‍या चकर्‍या, उडुन फुटणारे पाऊस, रॉकेट, नागगोळ्या, पाऊस/अनारसे इत्यादि घ्यायचे आहेत. त्या ठिकाणचे अजून प्रसिद्ध फटाके सुचवल्यास उत्तमच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजीराव रोड लगतचं एक मुख्य दुकान सुचवलेय की मी! थोडं पुढे गेलात तर मंडई जवळ स्टॉल्स लागलेलेही आढळतीलच Happy

>>
बाळाजीपंत | 2 November, 2015 - 07:39 नवीन
मी दण़क्यात वाजवणार आहे फटाके. देदणादण.

विठ्ठल | 2 November, 2015 - 08:05 नवीन
फार तर ज्यांच्या घरात लहान मुले फटाके एंजॉय करतात, तर त्यांच्या आनंदापुरतेच वाजवणे योग्य.>> म्हणुन तर देदणादण!
>>

दाल मे कुछ काला है दया Wink

फटाक्यांचे ५ फायदे
१) मोठा आवाज ऐकल्याने ,वर्षभर काम करुन मनाला आलेली मरगळ निघून जाते
२) रोज शुध्द हवा खाल्याने शुध्द हवेचे महत्व कमी झालेले असते, दिवाळीत फटाके फोडल्याने ते महत्व पुन्हा वाढते Happy
३) फटाक्यांमुळे बालचमुंना आनंद साजरा करता येतो,( उगाच प्रदूषणाच्या आणि चांगल्या संस्काराच्या नावाखाली त्यांचा आनंद हिरावून घेवू नये Happy
४) मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे जून्या व पडक्या काचा फूटतात त्यामुळे घरात नविन काचा बसविल्या जातात - घर छान दिसू लागते Happy
५) दिवाळीनंतर किल्ला तोडण्यासाठी फटाक्यातल बॉम्ब वापरल्यास कमी कष्टात आणि नेत्रसुखात किल्ला तोडता येतो.

५) दिवाळीनंतर किल्ला तोडण्यासाठी फटाक्यातल बॉम्ब वापरल्यास कमी कष्टात आणि नेत्रसुखात किल्ला तोडता येतो.
<<

यावरुन आमच्या इथे आजुबाजुची मुल एकमेकांचे बनविलेले किल्ले तोडायला, अगरबत्तीच्या टोकापासून खाली थोड्या अंतरावर सुतळीबॉंमची वात बांधुन नंतर अगरबत्ती पेटवून (टाईम बॉम) एकाद्या किल्ल्यात ठेऊन देतात. त्याची आठवण झाली.

सारसबागेच्या बाजूच्या त्या म्युनिसिपल स्पोर्ट्स ग्राउण्ड वर नसतात काय आजकाल ष्टॉल्स? लहानपणी तिथली ट्रीप म्हणजे सहामाहीनंतर चा सर्वात आवडता उद्योग.

Pages