<< पुण्यात दिवाळीत वाजणारे फटाके कुठे घ्यावेत? >>

Submitted by प्रसाद. on 31 October, 2015 - 10:36

५ आणि ६ नोव्हेंबरला पुण्यात येत आहे. बाजीराव रोडला उतरणार आहे.
तिथुन सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी दिवाळीत वाजवायचे फटाके मिळण्याची चांगली ठिकाणे कोणती?
लवंगी (घरगुती नसले तरी चालतील), नाचणार्‍या चकर्‍या, उडुन फुटणारे पाऊस, रॉकेट, नागगोळ्या, पाऊस/अनारसे इत्यादि घ्यायचे आहेत. त्या ठिकाणचे अजून प्रसिद्ध फटाके सुचवल्यास उत्तमच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पुण्यात FC Road, जंगली महाराज रोड बाजीराव रोड असे फिरणे झाले. तिथे कुठे फटाक्यांची दुकाने दिसली नाहीत, नाही तर सुचवली असते.

आम्ही गेली सात आठ वर्षे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फ्क्त काही झाड (६), आणि काही शॉट्स जे उंच जाउन विविध नक्षीकाम दाखवतात (३-४) एवढे उडवतो.
ध्वनी प्रदूषण करत नसलो तरी हे सुद्धा वायु प्रदूषणाला हातभार लावतातच, तेव्हा तेही बंद करण्याचा विचार आहे.

रकाने: हैद्राबाद वेळेचे बंधन कुणी पाळत नाही. रात्री अपरात्री सुद्धा आवाज सुरु असतात. सांगुन पाहिले तर हसण्यावारी नेतात.

वेळेचं बंधन कोणी पाळत नाहीच, कोणीही कधी ही उठतो आणि फटाके वाजवायला सुरवात करतो. कही कल्पना नसताना धाडकन आवाज येतो बरं आणखी कितीदा हा आवाज सहन करायचा आहे ते ही आपल्याला माहीत नसत. आपल्याला वाटत चला आता संपले ह्यांचे फटाके तर परत आवाज सुरु. दिवाळीचे दिवस झोपेचं खोबरं होतं अक्ष्ररशः

दिवाळीचे दिवस झोपेचं खोबरं होतं अक्ष्ररशः
<<

मनीमोहोरजी, दिवाळीतील चार दिवस सोडले तर वर्षातील ३६१* दिवस मिळतात झोपायला, फक्त तेवढे चार दिवस थोडे सहन करायचे. नाहीतरी सर्वसामन्य जनतेला वर्षातुन असे कितीक दिवस मिळतात फटाके फोडायला. Happy

का ह्या फटाक्याने आवाज नाही येत का?

बहुतेक वेदात लिहिले असावे की हा फटाका सोडुन दुसरा फटाका फोडावा. Happy

राहुल१२३, तुम्हाला खोडसाळपणा करायचा आहे हे उघड आहे. तेव्हा असल्या फालतू प्रश्नांना उत्तर देण्यात येणार नाही.

होय हो सहन करावेच लागते. आमच कोण ऐकतय हो ? माझ्या हातात असत तर मी बंदीच घातली असती फटाक्यांवर ( स्मित)

राहुल१२३, हल्ली लक्ष्मी बार कोणी फोडत नाही याने हिंदू देवतांची विटंबना होते असे लक्षात आल्यामुळे फिल्मी नट-नट्यांचे बार असतात.

राहुल१२३ | 3 November, 2015 - 14:45 नवीन
मोदींच्या राज्यात तरी या फटाक्या वर बंदी यावी. असे मनापासुन वाटतेय.
<<

राहुल१२३, किमान शंभर प्रतिसाद तरी व्हायला हवेत ह्या धाग्यावर. मोदिंना तुम्ही आणुन त्याची सोय केलीच आहे, आता तुमच्या इतर मित्रांना बोलावून इतर नेत्यांना ही आणा. मग काय मज्जाच मज्जा.

बाजीराव रस्त्यावर कुठे उतरणार ?

पाशां ऑन रस्त्यावर उतरायची पाळी का आली तुमच्यावर पाशां ऑफ

बाजीराव रस्त्याकडून चिमण्या मारुतीकडे जाताना एक मोठे पिंपळाचे झाड आहे त्याला एक पार आहे त्याला लागून असलेल्या बोळात एक दुकान आहे फटाक्यांचे तिकडे खास पुण्याचे शालजोडीतले फटाके पण मिळतात.

ठराविक वेळेला गेलात तर फुकटात देखिल मिळू शकतात.

वरची प्रतिक्रीया फारच मनाला लावुन घेतलेली दिसतेय तुम्ही हर्पेन.
जाऊद्या हो, आमची काय हिम्मत होतेय तुमच्या पुण्यात यायची व बाजीराव रस्त्यावर उतरायची. मला माहिते नव्हते त्या रस्त्यावर तुम्ही बसता ते.

बाजीराव रस्त्याकडून चिमण्या मारुतीकडे जाताना>> हे नविनच आहे. हा कुठला मारुती??

चिमण्या गणपती आहे. पार म्हणालास तर शनिपार आहे. Proud

बाजीराव रोडवर संगम साडी सेंटरकडून आतल्या बोळात ही एक फटाक्यांच दुकान आहे!>>
हो. स्वस्त असतात तिथे फटाके. Happy माझ्या जुन्या घराशेजारीच. Happy

मी स्वतः व मुलेबाळे गेली साताठ वर्षे तरी फटाक्या शिवायच दिवाळी साजरी करतो.
पण त्यामागे कसल्याही प्रदुषणाचे वगैरे कारण नाही. होय, अगदी मला दमा असला तरीही......
फटाके अतिमहाग झाल्याने ते वाजविणे बंद केले.
रहाता राहिला प्रश्न वेदकाळात काय वाजवित होते वा नव्हते.
मी वर्तमानातील हिंदु आहे, तेव्हा कानाला सवय असावी, उगाच कुणा टिनपाट गुंडाच्या/मवाल्याच्या/अतिरेक्याच्या/ब्रिगेडीच्या हातातील पिस्तुल पाहुन वा त्याच्या गोळ्यांचा आवाज ऐकुन वा कुठील बॉम्बस्फोट ऐकण्याची वेळ आल्यास, माझी नुस्त्या आवाजानेत "हातभर फाटून" जाऊ नये म्हणुन, माझी पोरेबाळे नुस्त्या "मोठ्या आवाजाला" घाबरणारी बनु नयेत म्हणून मी त्यांना अगदी लहानपणीच फटाक्याच्या आवाजातुन तशी न घाबरण्याची दीक्षा दिली आहे. वेळ येताच पुढील पिढीलाही देईन.

सीएनजी गाड्या चालवनार्या किंवा एसी न वापरार्या लोकांनी फटाके फोडू नका असे सांगितले तर आपण ऐकू. नायतर वर्षभर पेट्रोल डीझेल च्या कारा पळवायच्या, घरात एसी लावायचं आणि इतरांना सांगायचं फटाके फोडू नका … प्रदूषण होते Proud

अनिरुद्ध, नैतर्काय. कोपर्‍यावर सिगारेट आणायला जाताना बुडाखाली धूर ओकणारी बाईक लागते काही लोकांना. आनि म्हणतात प्रदूषण होतं फटाक्यांनी Proud

तिसरे महायुद्धावर धागा आहे ना ?
तर माझ्यामते, ते सुरु झाल आहे वा नाही या फंदात न पडता, आपापल्या मुलाबाळांना आत्तापासुनच "दारुगोळ्याच्या" शिस्तशीर सुरक्षित हाताळणीची सवय लागावी याकरता स्वतःच्या देखरेखीखाली दिवाळीच्या निमित्ताने फटाके नामक दारुगोळा जरुर जरुर आणुन द्यावा..... Proud

नैतर होत काय, की कोपर्‍यावरच्या ठेल्यावर जाताना बुडाखाली बाईक घेतली जाते, ठेल्यावरुन सिगारेट घेतली जाते, पण लायटरने ती पेटवताना मिशा जाळून घेतल्या जातात नैतर हात भाजुन घेतला जातो... आपल्या पाल्याचे भविष्यात असे भाजणे नको असेल, तर त्यांना सुरक्षित रित्या आगीचा वापर करायला फटाक्यांमार्फत शिकवा.

प्रदूषण होत रे फटाक्यांनी. ना नाही, पण मग एका सणावरी ४ फटाके हौसेने उडवले कोणी तर काय फरक पडतो Wink आख्ख जग फोडत ३१ डिसेंबरला. तेव्हा निदान भारतात जागृती मोहीम करावी की.

बाकि मी सिगरेट ग्रुपसोबत जात नाही चहा प्यायला Happy

Pages