<< पुण्यात दिवाळीत वाजणारे फटाके कुठे घ्यावेत? >>

Submitted by प्रसाद. on 31 October, 2015 - 10:36

५ आणि ६ नोव्हेंबरला पुण्यात येत आहे. बाजीराव रोडला उतरणार आहे.
तिथुन सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी दिवाळीत वाजवायचे फटाके मिळण्याची चांगली ठिकाणे कोणती?
लवंगी (घरगुती नसले तरी चालतील), नाचणार्‍या चकर्‍या, उडुन फुटणारे पाऊस, रॉकेट, नागगोळ्या, पाऊस/अनारसे इत्यादि घ्यायचे आहेत. त्या ठिकाणचे अजून प्रसिद्ध फटाके सुचवल्यास उत्तमच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर्षी मी फटाके वाजवणार नाही, ना आमच्या कॉलनीतील कोणाला वाजवून देणार.
ना बजाऊंगा ना बजाने दूंगा !
# प्रदूषणमुक्त दिवाळी
# स्वच्छ भारत अभियान

^^^

यंदा हे व्रत अंगीकारल्यामुळे आप्लयाला मदत नाही करू शकणार, क्षमस्व Sad

तसेही पुणे हे फटाक्यांसाठी प्रसिद्ध आहे का याबाबत साशंकच आहे.

यावर्षी मी फटाके वाजवणार नाही, ना आमच्या कॉलनीतील कोणाला वाजवून देणार.
>>

उत्तम! आम्हीदेखील ४-५ वर्षे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतोय.

आजकाल कुणीही सोम्यागोम्या उठसुट कोणत्याही कारणासाठी कोर्टात धाव घेतो. फटाके त्यातलेच एक कारण.
वर्षातुन एकदा दिवाळी येते आणि दिवाळीत दोन ते तीन दिवस फारतर फटाके वाजवले जातात आता या दोन ते तीन दिवसात कितीसे ध्वनीप्रदुषण होणार आहे.

पुण्यातल्या दिवाळीत वाजणारे व इतर ठिकाणच्या दिवाळीत वाजणारे वेगळे असतात का बुवा? Happy
आम्ही पटाके गेली ५ वर्षे बंद केलेत

आम्ही पटाके गेली ५ वर्षे बंद केलेत
<<
खरे आहे,
मोदि कृपने आजकाल फटाक्यांचे भाव देखिल एवढे गगनाला भिडलेत की सर्वसामन्य जनतेला ते देखिल परवडेनासे झालेत.

आम्ही "जोरदार सुरक्षित पध्दतीने वाजवून देतो" वाजवून घेण्याची इच्छा असल्यास फर्ग्युसन कॉलेज रोडवर दिवाळीत भेटावे.
फटाक्यांच्या संदर्भात.

आम्ही "जोरदार सुरक्षित पध्दतीने वाजवून देतो" वाजवून घेण्याची इच्छा असल्यास बाजीराव रोडवर दिवाळीत भेटावे.
फटाक्यांच्या संदर्भात. Proud

दिवाळीत दोन ते तीन दिवस फारतर फटाके वाजवले जातात

>> अहो आहात कुठे? क्रिकेटचया म्याच पासून तर लग्ने, वाढदिवस, निवडणुका, अधिवेशने अशा हजार निमित्ताने फटाके वाजवण्यात येतात. ज्यांच्या घराज वळ असली कार्यालये हॉल आहेत त्याना विचारा काय त्रास होतो ते. चिन्यांनी फटाके निर्माण करण्यापूर्वी तुमचे पूर्वज काय वाजवीत होते हो दिवाळीत? आजारी माणसे आहेत का घरात? नसतील तर पाडा आणि त्यांना वाजवून दाखवा २-३ दिवस फटाके....

Lol

अरेच्चा, ह्याची नेमणुक तर प्रशासकांच्या विपुत कट्ट्यावरिल सदस्यांच्या चहाड्या करण्याकरता केली होती ना. मग हा इथे कसा?

मला वाटते दिवाळीत आवाज न करणारे फटाके वाजवण्यावर कुणालाच आक्षेप नसावा, आणि वर्षेभर फटाक्यांच्या आवाजापेक्षा कितीतरी पटीने जास्त ध्वनी आणि वायु प्रदुषण रस्त्यावरुन चालणारी वाहने पसरवत असतात त्यावर बंदि बाबत मात्र कोणीच आवाज उठवत नाही.

मोठ्या शहारात असतो प्रश्न प्रदूषणाचा.
प्रसाद हे जर फटाके घेउन जाऊन गावी उडवणार असतील, तर तिथे प्रदूषणाचा एवढा प्रश्न नसेल.
शिवाय त्यांनी सुतळी बॉम्ब, हजारांच्या माळा इत्यादिंची चौकशी केलेली नाही, लवंगी बद्द्ल विचारले आहे तेव्हा आवाजाच्या प्रदूषणाचा प्रश्न नसावा.

आम्ही मागील ७,८ वर्षापासून फटाके वाजवणे बंद केले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वगेरे तर प्रदूषणकारी फटाक्यांच्या धुराचे ढ़ग दिसतात आकाशात. त्यामुळे फटाके वाजवणे नकोच वाटते.
शिवाय तो काही आपल्या संस्कृतीचा भाग नव्हे !

प्रश्न फक्त दोन तीन दिवसांचा नाहीये, पण त्या दोनतीन रात्रीच एवढे प्रदूषण होते की एका झटक्यात डॅमेज होऊन जाते.
उदाहरणार्थ रोज झोपेची एक गोळी घेणे - वर्षाला ३६५ गोळ्या होतात.
याऐवजी वर्षभर अर्धी गोळी घेत एखाद्या दिवशी २०-२५ गोळ्या घेतल्या तर ..

आवाजाचे फटाके नको रोषणाईचे चालतील असे आपण बरेचदा म्हणतो, पण त्या रोषणाईतून ध्वनीप्रदूषण होत नसले तरी त्यापेक्षा घातक असे वायूप्रदूषण तर नाही ना होत हे देखील बघायला हवे.

अवांतर - आमच्याकडे तुळशीच्या लग्नालाही मजबूत फटाके वाजतात.

फटाक्याने सर्व प्राणि मात्रे दचकतात व घाबरून बस्तात केविल वाणी. कधी हे संपते आहे ह्याची वाट बघत. गरम फटाक्यावर पाय पडल्यास त्यांना भाजते. शेपटीला फटा़के लावणारे ही काही वेडे लोक्स अस्तात. फटा़के म्हणजे निव्वळ पैशाचा धूर.

दिवाळीत दोन ते तीन दिवस फारतर फटाके वाजवले जातात >> हे कुठे? आमच्या इथे तर दिवाळी ५-६ दिवसांवर आली का फटाके वाजविण्यास सुरवात होऊन ते थेट तुळशीच्या लग्नापर्यंत सुरुच असतात. असे १५-२० दिवस रोजच फटाके वाजत असतात फक्त मुख्य दिवाळीचे ३ दिवस व तुळशीच्या लग्नाला प्रमाण खुपच जास्त असते.

आम्ही पण फटके नको म्हणणार्यापैकी स्मित >> आम्ही पण. आता विचार केला तेव्हा आठवले की गेली ९ वर्षे आम्ही फटाके वाजविले नाही. गेल्यावर्षी लेकीसाठी चक्र आणि पाऊस आणलेले तेही एक पॅकेट.

फटा़के म्हणजे निव्वळ पैशाचा धूर.
<<

अगदि खरे आहे,
इथल्या प्रामाणिक प्रतिक्रीया पाहून माझे देखिल मतपरिवर्तन झाले आहे, आता या दिवाळीपासून फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याची मी प्रतिज्ञा करत आहे.

धन्यवाद. Happy

मुंबईत या. अब्दुल रेहमान स्ट्रीटवर ह्व्वे तसे फटाके मिळतील. मुंबईतले सगळे हिंदु तिथेच घेतात आणि कचरा करतात. आणि मग आ.वं. प्रधानसेवकांना 'स्वच्छ भारत' अशी घोषणा करावी लागते.

आणि फटाके लवकरच घेऊन टाका. दिवाळीच्या सुमारास पाकिस्थानात निर्यात होणारेत असं अमितकाकांनी भविष्य वर्तवलंय.

मी घेऊन ठेवलेत. १४-१५ ला काही मित्र येणारेत मुंबईत, त्यांच्यासाठी Wink

मी शेवटचे फटाके आठवीत असताना वाजवले होते, नववीत असताना घरी यावर्षीपासून मला फटाके नको म्हणालेलो.
अर्थात त्यामागे प्रदूषण वगैरे फंडा नसून आमची तेव्हाची आर्थिक परीस्थिती पाहता मला हा पैश्यांचा चुराडा नको वाटला.

तसा मी कट्टर फटाकेविरोधी नाही, कधी लग्नात नवरदेवाचे आगमन झाले म्हणून तर कधी भारत क्रिकेटचा सामना जिंकला म्हणून आनंद व्यक्त कोणी करत असेल तर बरे वाटतात.
अर्थात त्यातही ती लांबलचक हजारो फटाक्यांची माळ नको वाटते.

दिवाळीला मात्र सण साजरी करायची एक प्रथा म्हणून फटाके वाजवत बसायचे हे पटत नाही.

मला आपल्या प्राचीन प्रथांचे काही सखोल ग्यान नाही, पण आपल्या धर्मातील इतर उत्सवांच्या एकेक मंगल प्रथा पाहता असे दारूचे विषारी फटाके वाजवावेत ही आपली मूळ प्रथा असेल असे वाटत नाही.
मला हा `गटारीला दारू प्या' यातला प्रकार वाटतो, हा देखील काही दशकांनी प्राचीन प्रथा म्हणूनच गणला जाईल.

प्रॉब्लेम असा आहे हल्ली सोशलसाईटवर असे काही मत व्यक्त केले की हिंदू धर्म आणि सणांवर टिका म्हणून एक आवाज उठायचे फॅड आलेय. अर्थात त्याने मी माझे मत मांडायला दबत नाही, की हा उल्लेख मी इथे धागा भरकटवायला केला नाही. पण फटाके लोकांनी कमीतकमी वाजवावे असे माझे प्रामाणिक मत आहे हे नोंदवायचे आहे. फार तर ज्यांच्या घरात लहान मुले फटाके एंजॉय करतात, तर त्यांच्या आनंदापुरतेच वाजवणे योग्य.

फार तर ज्यांच्या घरात लहान मुले फटाके एंजॉय करतात, तर त्यांच्या आनंदापुरतेच वाजवणे योग्य.>> म्हणुन तर देदणादण! Proud

मी फटाके वाजवत नाही गेले अनेक वर्ष झाले Happy
आमच्या घरात फक्त फुलबाज्या येतात (ऋन्मेषची पोस्ट वाचून त्याही आणाव्यात की नाही असं वाटायला लागलंय)
पण मला आवडतं फुलबाज्या लावायला
एकुणात दिवाळीत मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर सबोवताल पसरलेला प्रकाश! (हे मुलाचे नाव या अर्थी घेऊ नये Proud )
आणि अजिबात आवडत नसेल ते म्हणजे भयंकर आवाज करत फुटणारे फटाके. फार त्रास होतो Sad

फटाके वाजवावे कि नये हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक प्रश्न आहे, मी प्रत्येक दिवाळीला वाजवतो त्यात जास्त करुन पाऊस,फूलबाजे किंवा बाण असतात जे माझ्या मुलाला आवडतात. आवाज करणारे फटाके वाजवायला आवडत नाही.
फारतर लवंगी किंवा त्याहून जरा मोठे असणारे लाल रंगाचे हळू वाजणारे नेहमीच वाजवायला आवडतात. बाकी ध्वनी प्रदूषण , वायू प्रदूषण वाढते वगैरे असे म्हणणे म्हणजे दार उघडे ठेवून मोरीला बोळा लावण्यासारखे आहे... असो

मूळ धागाकर्त्यासाठी
१) स्वारगेट पासून जवळच असलेल्या पोलीस ग्राऊंडवर फटाक्याचे स्टॉल असतात.
२) डी पी रोड म्हात्रे पुलाजवळ मोठे स्टॉल असतात तिथे बार्गनिंग करुन घेता येतील
शूभ दिपावली

लहान मुलापासून म्हातार्‍यांपर्यंत एन्जॉय करता येईल असं आहे हे. सगळे फटाके वाजवू शकतात. यंदा आम्ही सगळे सोसायटी आणि परिसरात मस्त फटाके वाजवणार आहोत.

मला फटाके खर्च, ध्वनी आणि वायु प्रदुषण , झोपेचं खोबर,, भाजण्याचा धोका यामूळे कधीच आवडले नाहीत. मी एवढ्या वर्षात कधीही फटाके वाजवल्याचं मल आठवत नाही. दिवाळी अगदी उत्साहात साजरी करतो पण विनाफटाक्याची. माझ्या मुलांचं सुद्धा या बाबतीत चांगलच प्रबोधन केल गेलं माझ्याकडुन मला आवडत नाहीत म्हणून . त्यामुळे त्यांनी ही कधीच सोडलय फटाके वाजवणं

एक कागद घ्यायचा. त्याची दोन टोके धरायची. मधला भाग पण मधोमध धरायचा. दोन पोंगे होतील. कागद जोरात खाली ओढून फक्त मधला भाग सोडून दिला तर फटका वाजवल्यासारखा आवाज होतो. प्रदुषण होत नाही. करून बघा. बिग बझारवाल्यांनी शिकवले. ते फटाके विकत नाहीत ना! म्हणून ...... ! Happy

Pages