आलिबाग व जवळच्या ठिकाणाची माहिती हवी आहे.

Submitted by राजेंद्र on 27 October, 2015 - 01:56

आलिबाग व जवळच्या ठिकाणाची माहिती हवी आहे.
आमच्या ऑफिस मधल्या लोकांना आलिबाग, मुरुड-जंजिरा येथे जायचे आहे. तेथील पाहण्याची ठिकाण, राहण्या साठी व खाण्या साठी हॉटेल ची सोय.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलिबाग शहरापासून साधारण दोनेक किमी वर किहिम नामक गाव आहे. तिथे 'साई-ईन' नावाचे रिसोर्ट आहे.६ ते ७ एकर्स प्रॉपर्टी आहे त्यांची. स्विमिंग पूल, इन डोअर , आउटडोअर गेम्स, गार्डन्स, वनराजी अगदी रम्य वातावरण आहे. मी गेल्या वर्षी गेले होते. जेवण, स्टाफ सर्व्हिसही खूप चांगली आहे. या ठिकाणाहून अनेक बीचेस जवळ आहेत. उदा. वर्सोली, अक्षी, नागाव, अलिबाग इ.

ही त्यांची साईट

http://www.alibaugbeachresort.com/sai-inn-holiday-resort-kihim/index.php

अलिबागपासून मुरूडकडे जाणाऱ्या मार्गावर काशिद आणि नंदगाव हे दोन बीच आहेत. फारशी वर्दळ नसलेले आणि भुरभुरीत रुपेरी वाळूचे हे अतिशय स्वच्छ किनारे परदेशी समुद्रकिनाऱ्यांची आठवण करून देतात. या भागात स्थानिक रहिवाशांनी निवास आणि जेवणाची सोय केलेली असते. छोटे छोटे बंगले, रुम्स अगदी सहज मिळतात. फॅमिलीसह जाण्यासाठी अतिशय उत्तम लोकेशन.

वा.....