बाळाचा खाऊ

Submitted by कविता क्षीरसागर on 20 October, 2015 - 11:10

बाळाचा खाऊ

बाळाला अजून , आले नाहीत दात
म्हणून कुकरमध्ये होतो, गुरगुट्या भात

दुधामध्ये बिस्किटे , डुबक्या मारतात
बाळासाठी कशी , मऊ मऊ होतात

वाटी चमचा घेऊन ,येती भाज्यांचे सूप
बाळाला ते आमच्या , आवडते खूप

थोडे थोडे खाऊ लागलाय , आता पिकलेले केळ
मुटू मुटू खाण्यात त्याचा , मजेत जातो वेळ

एवढा सारा खाऊ , खातो हा एकटा
तरी सुद्धा रात्रभर , चोखत बसतो अंगठा

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users