Submitted by कविता क्षीरसागर on 20 October, 2015 - 11:10
बाळाचा खाऊ
बाळाला अजून , आले नाहीत दात
म्हणून कुकरमध्ये होतो, गुरगुट्या भात
दुधामध्ये बिस्किटे , डुबक्या मारतात
बाळासाठी कशी , मऊ मऊ होतात
वाटी चमचा घेऊन ,येती भाज्यांचे सूप
बाळाला ते आमच्या , आवडते खूप
थोडे थोडे खाऊ लागलाय , आता पिकलेले केळ
मुटू मुटू खाण्यात त्याचा , मजेत जातो वेळ
एवढा सारा खाऊ , खातो हा एकटा
तरी सुद्धा रात्रभर , चोखत बसतो अंगठा
कविता क्षीरसागर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कविता. .कविता, ही
छान आहे कविता.
.कविता, ही कविता पण कविता ग्रुप मधे हलव.
धन्यवाद !!
धन्यवाद !!
मस्सस्सस्त!
मस्सस्सस्त!